हळुहळू विधानसभा निवडणूकीचा रंग भरू लागला आहे. त्यात मेगाभरती मेगागळती चालली आहे आणि आरोप प्रत्यारोपाचेही फ़टाके वाजू लागले आहेत. अशा स्थितीत बातम्याही रंगवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यातच परवा राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा संयम सुटल्याची बातमी वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात चघळली गेली. त्याचे शिर्षक मोठे विनोदी होते. ‘पवार का भडकले?’ हे विधान चुकीचे आहे. कारण पवार खरेच भडकले नव्हते, तर त्यांना जाणिवपुर्वक भडकवण्यात आलेले होते. ज्याप्रकारे त्यांना प्रश्न विचारला गेला व त्यातला आशय त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागणारा नव्हता, तर त्यांना दुखावण्याचा हेतू लपलेला नव्हता. सध्या जी पक्षांतराची साथ आलेली आहे, त्यात मोठ्या प्रमाणात पवारांचे निकटवर्ति व जुने सहकारी त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळे विचलीत होण्याइतके शरद पवार संवेदनाशील नक्कीच नाहीत. ते असल्या राजकारणात मुरलेले पुढारी आहेत. म्हणूनच चारदोन सहकारी सोडून गेल्याने प्रश्नकर्त्यावर पवार भडकले, असे होऊच शकत नाही. पवारांचा राग प्रश्नावर अजिबात नव्हता. त्यामागे दडलेल्या हेतूवर त्यांचा राग होता. प्रश्नातून सूचित केल्या जाणार्या आशयाने पवार विचलीत झालेले होते. म्हणूनच त्यांनी प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा त्या प्रश्नालाच आक्षेप घेतलेला होता. राजकारणाचा नात्याशी संबंधच काय, असा उलटा प्रश्न त्यांनी पत्रकाराला विचारला. तरीही तोच प्रश्न पुन्हा रेटून विचारला जात होता. कारण आता पवारांना कार्यकर्ते व पाठीराखेच सोडून चाललेले नाहीत, तर घरातले नात्यातलेही लोक दुरावत चाललेले आहेत, असेच सुचवायचे होते. ते दुखावणारे होते. म्हणजेच पवारांचा संयम सुटला नव्हता, तर संयम सुटावा म्हणूनच प्रश्न विचारला गेला होता.
संयम सुटला अशी मल्लीनाथी चुकीची इतक्यासाठी आहे, की अनेकदा पत्रकारांनाच कुणी उलट उत्तर दिल्यावर कुणाचा संयम सुटत असतो? नरेंद्र मोदी मागली दहाबारा वर्षे पत्रकार परिषद घ्यायचे कशाला बंद झाले? त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांची सरबत्ती घाबरवते असे अजिबात नाही. त्यांनी मागल्या दोन लोकसभा निवडणूकांमध्ये डझनावारी वाहिन्या व वर्तमानपत्रांना प्रदीर्घ मुलाखती दिलेल्या आहेत. पण ते पत्रकारांना घाबरतात, असे सांगितले जात असते. मोदी ठराविक पत्रकारांना मुलाखत देत नाहीत किंवा पत्रकार परिषद घेत नाहीत. कारण त्या पत्रकारांना कुठलाही प्रश्न विचारायचा नसतो, तर मोदींना अपमानित करायची संधी हवी असते. हे लक्षात आल्यानंतर मोदींनी पत्रकारांशी संपर्क संपवला आणि त्यावर थेट जनसंपर्काचा पर्याय शोधला. पवारांची कहाणी अजिबात वेगळी नाही. त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला, की वारंवार तोच प्रश्न विचारला गेला म्हणून साहेबांचा संयम सुटला. पण तोही खुलासा चुकीचा आहे. पवारांनी प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही, असे अजिबात म्हटलेले नाही. त्यांनी प्रतिप्रश्न केला होता आणि तो अत्यंत रास्त होता. नात्याचा आणि राजकारणाचा संबंध काय? आजवर अनेक पक्षातले अनेक नेते व कुटुंबातले अनेकजण विरोधकांना जाऊन मिळालेले आहेत. तिथे नातेवाईकांनी साथ सोडून जाण्याचे प्रश्न विचारले गेले होते का? असा प्रश्न विचारण्यामागची खोचक वृत्ती गैरलागू होती. त्यामागचा हेतू दुखावण्याचा होता आणि म्हणूनच तसा प्रश्नच गैरलागू होता. किंबहूना अन्यायकारक होता. पत्रकारिता करताना समाजाचे प्रबोधन होण्याला प्राधान्य असले पाहिजे. नेत्याला हिणवणे किंवा दुखावण्याचे अगत्य असता कामा नये. पण् त्याचे आजकाल भान उरलेले नाही.
बाळासाहेबांना पितॄतुल्य मानणार्या छगन भुजबळांना शिवसेनेतून फ़ोडण्यात पवारांनीच पुढाकार घेतलेला होता. गोपिनाथ मुंडे यांचा पुतण्या धनंजय मुंडे यालाही फ़ोडण्यात पवारांचाच हात होता. कुठल्याही राज्यात व पक्षात हे अनेकदा झालेले आहे. सुचेता कृपलानी उत्तरप्रदेशच्या कॉग्रेस मुख्यमंत्री होत्या व त्यांचे पतिराज प्रजा पक्षाचे नेता होते. हे आजचे नाही. मग नातेवाईक सोडून चालले, असा प्रश्न विचारण्याचीच काय गरज होती? पवारांना भडकवण्याचा हेतू त्यामागे होता ना? मग अपेक्षेप्रमाणे पवार भडकले असतील, तर संयम सुटला असे कशाला म्हणायचे? पत्रकार परिषदा किंवा माध्यमांना नेत्यांनी दिलेल्या मुलाखती; ह्या त्याच्या संयम व सोशिकतेची कसोटी घेण्यासाठी असतात का? त्याला अपमानित वा दुखावण्यासाठी असतात का? मुलाखती वा पत्रकार परिषदेमागचा हेतू काय असतो? त्यातले पावित्र्य नेत्यांनी पाळायचे असेल, तर त्याच व्यवहारात सहभागी असलेल्या पत्रकारांनीही तेच पावित्र्य तितकेच जपले पाहिजे. एकमेकांना चिडवणे किंवा डिवचणे म्हणजे पत्रकारिता नसते किंवा संवादही नसतो. पवार किंवा त्यांच्या पक्षातर्फ़े पत्रकार परिषद योजलेली असेल, तर त्या पक्षाचे राजकारण व कामकाज याच्याशी संबंधित प्रश्नोत्तरे व्हायला हवीत. तीच त्यातली लक्ष्मणरेषा असली पाहिजे. मग ती नेत्याने ओलांडता कामा नये आणि पत्रकारानेही पार करता कामा नये. नेते-सहकारी गेलेच आहेत आणि आता घरातले नातेगोतेही सोडून चालले असे सुचवण्यामागे हिणवण्याची क्षुद्र भावना होती. तर समोरच्याने संयम दाखवण्याचे बंधन उरत नाही. म्हणून मग अशा पत्रकारितेला विजय मल्ल्याही वाकुल्या दाखवू शकतो. तुमची अंडीपिल्ली माझ्याकडे आहेत, असे धमकावू शकतो.
मी पवारांचा समर्थक नाही आणि वेळोवेळी त्यांच्या संशयास्पद व वादग्रस्त् विधानांचा समाचारही घेत असतो. पण त्याचा अर्थ अडचणीत सापडलेल्या पवारांची टवाळी वा अपमान करण्याला मी समर्थनीय मानत नाही. जिथे पवार चुकीचे वा गैरलागू बोलले वा वागलेले असतील, तिथे त्यांना फ़ैलावर घेतलेच पाहिजे. पण मुद्दाम जखमेवरची खपली काढण्याला टिका म्हणता येत नाही; किंवा पत्रकारिताही संबोधता येत नाही. अशा लोकांना बोलवू नका, किंवा त्यांना आमंत्रण देणार असाल, तर मला बोलावू नका, असे पवार उद्गारले. ही पत्रकारितेसाठी शरमेची गोष्ट आहे. कारण खरोखरच त्यांना प्रश्न विचारला गेला, तो सभ्यतेच्या मर्यादेतला नव्हता. पवारांवर टिका करण्यासारखे अनेक विषय आहेत आणि वेळोवेळी पवारही अनेक वादग्रस्त विधाने करून पेचात पकडण्याची संधी पत्रकारांना देत असतात. ती शोधून पवारांना कैचीत पकडणे योग्य आहे. त्या प्रसंगी पवारांनी उलट प्रश्न विचारला आणि तो अत्यंत रास्त होता. राजकारण आणि नात्याचा संबंध काय? त्या पत्रकाराला किंवा अन्य कुणाला त्याचे उत्तर अजून साफ़ करता आलेले नाही. त्याचे उत्तर सदरहू वार्ताहराने तिथल्या तिथे दिले असते, तर पवारांना निरूत्तर व्हावे लागले असते आणि त्याच्या उप्पर पवार संतापले असते, तर त्यांचा संयम सुटला म्हणता आले असते. पण पवारांचा संयम सुटलेला नाही. गैरलागू प्रश्न विचारणार्यांचा व तेच रेटून गदारोळ करणार्यांचा संयम सुटलेला आहे. पत्रकारिता हा संयमाचा पेशा आहे आणि तिथेच किती अराजक माजलेले आहे, त्याचा हा दाखला आहे. तसे नसते तर पवारांचा संयम सुटला किंवा पवार कशाला भडकले; अशा हेडलाईनी झाल्या नसत्या. किंवा तो प्रसंग अगत्याने प्रक्षेपित झाला नसता.
खरय भाउ
ReplyDeleteसाहेबाना उमेदवारी देताना नातेवाईक चालतात (माझ्या घरातील मुले असताना दुसर्यांच्या मुलांचे हट्ट का पुरवू असे म्हणू शकतात). तर पक्ष सोडताना नातेवाईक नाही तर नेते, असे म्हणुन कसे चालेल?
ReplyDeleteजे पेरले ते उगवणारच ना कधी तरी...
यावरून आठवलं, परवा महापुराच्या काळात एका वृत्तवाहिनीने चंद्रकांतदादांसोबत पण हाच प्रयोग केलेला.
ReplyDeleteपण ते त्याला पुरुन उरले.
आज सर्व पक्षांत अनेक असे लोक आहेत की ज्यांचे पद केवळ नात्यामुळेच शक्य आहे. काँग्रेसचा पंतप्रधानपदासाठीचा उमेदवार काय पात्रतेमुळे तेथे पोचला काय? राजकारणाचा आणि नात्याचा संबंध काय हा प्रश्नच चुकीचा आहे.
ReplyDeleteअगदी बरोबर
Deleteखूप वेगळा विचार भाऊ, या दृष्टीने या प्रसंगाकडे कुणीही बघू शकले नाही.पवार पराभव दिसू लागल्यामुळे भडकले असेच मला वाटले.
ReplyDeleteभाऊ बरोबर आहे, राजकारणाचा आणि नात्याचा संबंध नाही. मग तिकीट वाटप करताना आणि पक्षात पदे देताना हे विचार जातात कुठे. धनंजय मुंडे ना विरोधी पक्ष नेतेपद आणि बीड जिल्ह्यात संघटनेची सर्व सूत्रे देण्यामगचा हेतू काय हे सांगायला नको.
ReplyDeleteराजकारणाचा आणि नात्याचा संबंध काय याचे समाधानकारक उत्तर, सुप्रिया, राहुल, आदित्य, पंकजा, अखिलेश, धनंजय वगैरे मंडळी देऊ शकतील. किंबहुना राहुल गांधी यांनी याबाबत परदेशात जाऊन वक्तव्य केले आहे.
ReplyDeleteपत्रकार असे प्रश्न का विचारु शकला....
ReplyDelete1. पवारांची पडती बाजू आणि
2. पवारांनी अनेकांना पुर्वी दुखावले आहे. कधी सामाजिक स्थिती, कधी जात, कधी व्यवसाय, कधी आर्थिक स्थिती, कधी धर्म...
लोकं विसरत नाहीत, वाट पाहत राहातात आणि अनुकूल परिस्थिती आली की कुरघोडी करतात.
हा प्रश्न विचारणे योग्य की अयोग्य, हे ज्याचं त्यानं ठरवावं. मुळात, असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतील, असे वागणे आपणच टाळले पाहिजे.
अनेक राजकीय कुटुंबातील वादांबद्दल त्यांची भुमिका नेहमीच वादग्रस्त राहीली आहे हे विसरता येणार नाही.
आणि एखादा सरदार , पवारांना त्याची आठवण असणारच
Deleteपत्रकाराने मुद्दाम खोडसाळपणाने पवारांना पुन्हापुन्हा तोचतोच प्रश्न विचारणे औचित्त्याला धरून नव्हते हे खरेच आहे पण पवारांनी न चिडता तो प्रश्न टोलवून लावला असता तर त्याची चर्चाच झाली नसती । पवारांसारख्या अनुभवी नेत्याला हे अशक्य नव्हते । आपला राग अशा प्रकारे दाखवल्यामुळे ते एक अगतिक , उद्विग्न आणि हतबल नेते आहेत असे चित्र उभे राहिले आहे आणि ते अधिक केविलवाणे आहे ।
ReplyDeleteविरोध करण्यासाठी सुद्धा मर्यादेच भान असणे आवश्यक आहे.
ReplyDeleteअप्रतिम लेख.
भाऊ, आजची पत्रकारीता पत्रकारिता म्हहणावी या लायकीची आहे का? प्रश्न विचारुन उत्तरे काढण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी चिडवणे, आरोप करणे आणि स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एकाद्याला आरोपी घोषित करणे एवढेच काम चालू आहे. पण पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याने चिडण्यापेक्षा नेहमीप्रमाणेच मुरलेले समर्पक उत्तर देता आले असते. (जसे ते आतापर्यंत करत आले आहेत) पण ते चिडले आणि त्यांचा तोल गेला हे स्पष्टपणे दिसले आणि ते का हे आमच्यासारख्या सामान्यांना सहज समजले हे मात्र खरं
ReplyDeleteभाऊ एकदम जबरदस्त
ReplyDeleteउथळ पत्रकारिता करणाऱ्या लोकांना आपण ही योग्य चपराक दिली आहे.
खरे तर 60 पैकी 54 आमदार सोडून गेल्यावर सुद्धा हिमतीने पुढे जाणाऱ्या पवार साहेबांना आता सुरू असलेल्या महागळती बद्दल फार दुःख होत असेल असे वाटत नाही
पत्रकार सुद्धा कॉंग्रेस - राष्ट्रवादी सारखे का भरकटले आहेत?
ReplyDeleteभाऊ आज तुंम्ही गडबडले आहात. राजकारणात नातेवाईक वा नातेसंबंध नसतात हे हास्यास्पद वाटत. ज्या घरातुन मुलगी, पुतण्या, नातु हे केवळ पवारांचे नातेवाईक म्हणुन राजकारण करत असतात, त्यावेळी त्यांना राजकारणात कोणत्या लायकीमुळे निवडणुका लढायची संधी मिळाली? जर आपण नातेसंबंध म्हणुनच संधी मिळाली नसेल असे मानत असाल, तर बारामतीचे चंद्रराव तावरे तसेच प्रतापराव भोसले हे अतिशय जवळचे निष्ठावान फारच पुर्वी कसे व का बाजुला झाले? पत्रकार चुक ठरवायचा, तर तसं बोलायची संधी कोणी दिली? पुरोगाम्यांना जन्माने जात मान्य नाही, परंतु ह्यांच्या पोटी नेत्रुत्व जन्म घेतं ह्यावर त्यांचा ठाम विश्वास? त्यांच्या नातेवाईकांपेक्षा नेत्रुत्व करायला इतर पक्ष कार्यकर्ते कमी लायकीचे आहेत असे पवार बोलतील का? त्या पत्रकाराने एक उघड वास्तव लोकांसमोर ठेवलेलं आहे त्यात पवारांना राग का यावा? आजवरच्या पवारांच्या धुर्तपणाला त्यांचं राजकिय कर्तुत्व मानलं गेलं. त्याची चिरफाड करणारांचे अभिनंदन करायचे सोडुन आपण पत्रकाराची चुक काढत आहात हे एक आश्चर्य!!!!!....
ReplyDeleteखर बोलल कि लोकांना राग येतोच.
Deleteश्याम जी मलाही तुमचं पटतं
Deleteअसहमत. राजकारणात फक्त नातेवाईकांचाच संबंध असतो.राजकारणातील घराणेशाही प्रसिद्ध आहेत.
Deleteअगदी बरोबर.
Deleteभाऊ, हे लोक स्वतःलाच पत्रकार म्हणवून घेणारे खरेतर वर्तमानपत्राच्या मालकाचे नोकर असतात. मालकाने छू करून बोट दाखवले की तेथे जाऊन भुंकणे हे त्यांचे काम! उगाचच काडीचाही संबंध नसलेल्या... अभ्यास तर दूरच.. विषयावर एक्स्पर्ट असल्याप्रमाणे तारे तोडणे, बेछूट आरोप करणे दुसऱ्याला अपमानास्पद बोलणे यांना जमते. मालकाने हाकललेले वागळे सारखे भटके रेबिस झाल्याप्रमाणे चावू पहातात आणि त्यांना तुकडे टाकण्यासाठी काही 'प्राणि'मित्र असतात
ReplyDeleteBhau ekdam barobar
ReplyDeleteशरद पवार सारखी दिशाहीन व्यक्ती हे महाराष्ट्राच्या दुर्दैवाने नेते आहेत. त्यांची सध्याची हतबल, असहाय, अगतिक, उदिग्न अवस्था ही त्यांच्या कर्माची देणं आहे. अश्या व्यक्तीची भाऊ तुम्ही बाजू घेता , अनाकलनीय आहे.
ReplyDeleteजेव्हा नात्यातल्या लोकांना तिकीट/पद वाटप करता तेव्हा पत्रकाराकडून असले प्रश्न विचारले जातात
ReplyDeleteपण पवार साहेबांना शिताफीने टोलवता येत होताच की ?
भाऊ तुम्ही पण ?????
भाऊ, आपलं म्हणणं मला पटलं नाही, पवारांनी नातेवाईक आहे या हेतूनेच राजकारण केले आहे. आता त्यांचे जवळचे नेतेच सोडून जात आहेत, कारण त्यांनी जवळ केलेली माणसे हि असतील शिते तर जमतील भुतं या म्हणीतल्यासारखी आहेत
ReplyDeleteअचुक! भाऊंनी भलत्याच बाबतीत साहेबांचे वकिलपत्र घेतले हेच खरे.
ReplyDeleteअजिबात न पटलेला पहिलाच लेख.
ReplyDeleteभाऊ तुमचे कोठेतरी चुकत आहे ,
ReplyDeleteपवार साहेब पत्रकारचा प्रश्न सहज टोलवू शकत होतेच की पण उगाच प्रकरण चिघळवले गेले.
पण तूम्ही पण भाऊ पत्रकार असून पवार साहेब च्या बाजूने कसे काय आहात ?
याच पवारांनी महाजन, फडणवीस यांची जात काढत केलेली मुक्ताफळे देखील त्यांना हाकलून लावण्याच्या लायकीची होती, सतत पुरोगामीपणाचे ढोल वाजवित फक्त आणि फक्त ज्याने जातीचेच राजकारण केले, अशा माणसाकडून नैतिकतेची कसली अपेक्षा करावी.
ReplyDeleteभ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानणारा हा नेता आता कधी नव्हे ते कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे म्हणून देखील हे नैराश्य.
ज्यांना भ्रष्टाचाराच्या कुरणात चरायला मोकळिक दिली तेच आता एक एक करून साथ सोडत आहेत हे देखील आणखी एक नैराश्यात भर टाकणारे.
तेल लावलेला पहिलवान, बेभरवशी राजकारण, unpredictable gesture, मनात एक, ओठात दुसरे, करायचे तिसरे अशी एकंदर करणी नि या सगळ्यावर पुरून उरला एक ब्राह्मण (जात काढायची नाही, पण यांच्याच शब्दात सांगायचे म्हणून जरा रोखठोक) म्हणून देखील नैराश्य.
हा माणूस खरा कधीही कुणालाही कळला नाही, अगदी जवळच्या नि घरातल्या व्यक्तीस देखील.
सत्तेलाच धरून राहण्यासाठी कोणतेही विधिनिषेध न बाळगणे याशिवाय काही शिकवण दिली नाही नि हीच शिकवण आता गुरूला भारी पडत आहे हे नक्की.
गुरूची विद्या गुरूलाच छळत आहे, तेव्हा उगाच कुणा पत्रकाराला कशाला नावे ठेवायची.
पवारांचे लाभार्थी पत्रकार खूप आहे अगदी शेकडा ९८ टक्के, त्यामुळे आपल्या धन्यास लागेल असे काही कोणी प्रत्रकार करणार नाहीत आणि कुणी तसे केलेच तर काय हेच या लेखाद्वारे सिध्द होतेय हे खरे.
हेही मत वाचा. वेगळा अनुभव आहे.
ReplyDeletehttp://www.vikrantjoshi.com/2019/09/blog-post.html?m=1
पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय राहील, याचा अंदाज बांधू शकता काय?
ReplyDeleteभाऊ आपल्या वरील मताशी आम्ही पुरेसे सहमत होऊ शकत नाही याला काही कारणे आहेत ते खालील प्रमाणे.
ReplyDeleteआपण शरद पवारांच्या वयाचा आणि शारीरिक अवस्थेचा विचार करून दयाबुद्धीने वरील लिखाण केलेले आहे परंतु शरद पवारांनी आपल्या ऐन तारुण्यामध्ये आपल्या राजकीय गुरूंच्या वयाचा आणि शारीरिक परिस्थितीचा असा विचार कधीच केला नव्हता. इतकेच काय आपण जे राजकारण महाराष्ट्रामध्ये करतो आहोत त्यातून जातीयतेला खतपाणी घातले जात आहे आणि जातीय दंगे भडकून अनेकांचे आयुष्य उध्वस्त होणार आहे हे नक्की माहिती असून देखील त्यांनी पाकपुरस्कृत जमात-ए-इस्लामी या संघटनेबरोबर संधान बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र इतिहास बाटवण्याचे अत्यंत घृणास्पद कार्य सिद्धीस नेले आहे. जातीजातीमध्ये विद्वेष वाढवून धर्मा धर्मा मध्ये अंतर रुंद करून आपली राजकीय पोळी भाजून आपल्या नातेवाईकांना वेळोवेळी गर्भ श्रीमंत करणारा एकमेव मनुष्य म्हणजे शरद पवार. आज त्यांना नातेवाईकांचा उल्लेख केल्यावर जो काही राग येतो आहे तो काही सात्विक संताप नसून आपण केलेल्या पापांची उघड चर्चा केल्यामुळे आलेला तो तमोगुणी रागाचा भडका आहे. शरद पवारांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली व अनेक लोकांना देशोधडीला लावले आहे. आज गुंठामंत्री बनवून हातात सोन्याची कडी व स्कॉर्पिओ गाड्या घेऊन त्यांच्यासोबत फिरणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्या कसण्यासाठी जमीन पवारांनी शिल्लक ठेवलेली नाही हे त्यांच्या लक्षात जेव्हा येईल तेव्हा खूप उशीर झालेला असणार आहे. शरद पवार यांना त्या पत्रकाराने कुठलाही आगाऊ प्रश्न विचारलेला नसून केवळ वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडलेली आहेत आणि त्यात काहीही गैर केले असे मला वैयक्तिक वाटत नाही. उलटपक्षी सर्व पत्रकारांसोबत एखाद्या पत्रकारांना तू या खोलीतून बाहेर जा असे सांगणे हा लोकशाहीचा मतस्वातंत्र्याचा आणि त्या पत्रकाराच्या वैयक्तिक अपमान आहे आणि त्याच्या बाजूने आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत हे मला शेवटी नमूद करावेसे वाटते
Ekdum barobar
Deleteमी 100% सांगतो ,वरील दोन pragraph भाऊंच्या मनाच्या विरुद्ध भाऊं कडुन लिहून घेतले आहेत। हे भाऊच मत नाहीये. हो की नाही भाऊ? -तुमचा पंकज
ReplyDeleteजातीयवादी नेता आहे पवार 😑वेळोवेळी लोकांच्या जाती काढत असतो .फक्त मराठा असल्याचा अवास्तव अभिमान आहे .मग आम्ही इतर जातीचे उपटे काय 😂 आम्ही marath नसलो तरी मराठी आहोत आणि आम्हाला गर्व आहे त्याचा ..असल्या नेत्यांनी आम्हाला मराठी बाना शिकवू नये .स्वतः आपल्या जातीसाठी काय केलं ते बघ म्हणावं .भटजी ने शेवटि आरक्षण दिलंय जे याला 50 वर्षात करायला जमलं नाही .
ReplyDeleteभाऊ साहेब हा नेता किती मधल्या गाठीचा आहे हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे .याच्यावर अन्याय जरी झाला तरी बेहतर 😂 कसलीही दया मया राजकारणी संकेत पाळायची बिल्कुल गरज नाही .जिथे सापडला तिथे याला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले पाहिजेत .आता नाहीतर कधी विचारणार ? ? याने भरपूर घोटाळे कांड केलेले आहेत .
ReplyDeleteSir,
ReplyDeletetumchya blog chi link Twitter pn share krat ja..
Mhanje wachta yetil
पूर्णपणे असहमत! या जातीयवादी व्यक्तीची बाजू घ्यावी असं वाटत नाही.कितीही अडचण आली तिला तरी...
ReplyDeleteमाणूस वयाने अथवा परिस्थती ने थकला असला तरी त्याने जातिवादाच्या नावाने छत्रपतींच्या इतिहासाशी केलेली विकृत मस्करी अथवा आयुष्यभर केलेला प्रचंड भ्रष्टाचार ह्यामुळे दया पण येत नाही त्यांची...