Friday, April 3, 2015

‘जाना था जापान, पहुच गये चीन, समझ गये ना?’ ( लेखांक ३ )



Sakshi Saptsagar (साक्षी सप्तसागर) यांच्या (Marathi Facebooker's(फेसबुक वरील मराठी माणसासाठी) वर असलेल्या एका पोस्टवर मी काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यांच्याकडून त्याचे निरसन झाले नाही. पण मी पोस्टची दखल घेतली म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांच्या फ़ेसबुक ग्रुपमधील पोस्टसहित माझ्या शंका मी ब्लॉगवर टाकल्या. त्याची पोस्ट माझी भिंतीवर टाकली. मग दुसर्‍याच दिवशी Sunil Keluskar नामक व्यक्ती चवताळल्यासारखी भिंतीवर धावून आली आणि साक्षीताईंनी न केलेल्या शंकांचे निरसन करण्याऐवजी भलत्याच गोष्टी सांगुन त्या खोट्या पाडण्याचे आव्हान मला देवू लागली. संदर्भशून्य विषयांतर करण्याचे त्यांचे मोठ्या मेहनतीने आत्मसात केलेले कौशल्य मला ‘निरूत्तर’ करून गेले. त्यांचे सगळे स्वगत (monologue) इथे मुद्दाम पुन्हा ब्लॉगवर टाकत आहे. साक्षीताई खुश असताना Sunil Keluskar का चवताळले, त्याचे ‘रहस्य’ माझ्या आकलनापलिकडचे आहे. अजून साक्षीताईंच्या पोस्टचे ‘मार्टेम’ मी केलेले नसताना Sunil Keluskar ना काय झाले, त्याचे निदान कोणाला करता आले तर बरे होईल. मात्र माझ्या अल्पबुद्धीला तितके प्रकांडपांडित्य पचणे शक्य नसल्याने त्यांना ब्लॉक करावे लागले. अर्थात तीही माझीच चुक आहे. त्यांनी आधीच अनफ़्रेन्ड करायला सांगितले होते, मीच आळस केला. इतक्या मोठ्या गुढरम्य पंडिताच्या नादी लागण्याची आपली औकात नाही, हे मान्य केले पाहिजे. ‘चलती का नाम गाडी चित्रपटात किशोर व अनुपकुमार यांच्यावर गॅरेजमध्ये चित्रित केलेले गाणे मात्र आठवले. ‘जाना था जापान, पहुच गये चीन, समझ गये ना?’ बाकी Sunil Keluskar चे पांडित्य त्यांच्याच शब्दात वाचा >>>>>>>>>



Sunil Keluskar · 5 mutual friend
कसले लेख वाचता, कसल्या बाळबोध शंका विचारता.... काही आवश्यकता आहे का? काही समाजाचे प्रबोधन होते का? कि काही विचारमंथन?

भाऊ, त्याच दंग्यात माझे कट्टर हिंदू असलेले वडील कपाळावर लाल टीका लावून डॉकयार्ड रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या नवानगर नावाच्या पूर्ण मुस्लीम मोहल्ल्यातील आबा माने वाडी मद्धे असणाऱ्या आमच्या वर्कशॉप मद्धे रोज जात असत. त्याच वाडीत हिंदूंची केवळ ८ घरे आणि आजू बाजूला पसरलेले हजारो मुसलमान. त्या ८ घरांत एक घर आमचे. पण त्या दंग्यावेळी आम्ही घाटकोपरला भटवाडी मद्धे flat मद्धे रहात होतो. त्या काळात रोज घाटकोपर वरून डॉकयार्डला माझे वडील रोज हट्टाने जायचे तेही भगवा टीळा लावून आणि काळजीने त्यांच्या मागे काही पावलं मी, त्यांच्या नकळत. पण त्या अत्युच्च हिंसेच्या काळातही तिथल्या मुसलमान गुंडांनी माझ्या वडिलांना साधे बोटही लावले नाही. मला आजही आच्छर्य वाटतेय कि तिथल्या त्त्या ८ हिंदू कुटुंबांची चटणी करायला त्या हजारो मुसलमानांना काही क्षण पुरले असते, पण त्या घरांतला प्रत्येक जण पूर्ण सुरक्षित होता. आणि बाहेरून डोंगरी कडून येणाऱ्या मुसलमानांपासून तिथल्या त्या सात आठ घरांचे संरक्षण नवानगर मधले मुसलमान करत होते.

दुसरे चित्र त्याच वेळचे पण घाटकोपर भटवाडी परिसरातले, भटवाडी बाजारात एका मुसलमान म्हाताऱ्याचे स्टोव्ह रिपेअर करण्याचे खोपटे होते. हा हिंदू बहुल भाग आहे. त्याच काळात, त्या दंगलींच्या वातावरणात त्या म्हाताऱ्याचे खोपटे आमच्या शूर, निधड्या छातीच्या, लढवय्या हिंदू बाळांनी जाळायला सुरवात केली. जीवाच्या आकांताने तो म्हातारा आपले खोपटे वाचवण्यासाठी धावला, त्याच्या मागून त्याचा १० -१२ वर्षाचा नातू धावत आला. या दोघा अश्राप जीवांवर जे प्रहार त्या पेटलेल्या मुर्खांनी केले, ते दुखद होते.

आता तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या विचारा... तुम्ही लालबाग परिसरात राहिलेले आहात, माझेही बालपण लालबाग, माझगाव, डोंगरी, गिरगांव परिसरात गेले. आवश्यकता भासल्यास तुम्हाला माझगांव मधल्या नवानगर मधल्या आबा माने वाडीत मी स्वतः घेवून जाईन. आमचे वर्कशॉप आणि घर आजही तिथे आहे आणि त्याच अवस्थेत आहे. तुम्हाला दाखवता येईल. तुम्ही शोध घ्यायला एकटे जात असाल तरी जावू शकता.

त्याही पुढे जावून सांगतो, आज गेली २५ वर्षे मी गुजरातमद्धे स्थायीक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेला (कि न केलेला) विकास मला नेमका माहित आहे. इथे झालेल्या दंगलीविषयी मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी कुठल्याही धर्माचे समर्थन करत नाही... ना कुठल्या राजकीय पक्षाचे... ना मी तथाकथित सेक्युलर आहे आणि तथाकथित धार्मिक तर अजिबात नाही. हे उजवे, डावे, मध्यममार्गी ह्या मूर्ख कल्पना मी मानत नाही. मी माणसाला केवळ माणूस मानतो, हिंदू-मुसलमान, मराठा-महार, उजवा-डावा-मध्यममार्गी- समाजवादी- मार्क्सवादी, भगवा – हिरवा नाही. हे सर्व लिहिण्याचा उद्देश, कि एक विनंती करावी- डोळयावरचे चष्मे उतरवा, सत्य स्वरूपात जग निरखून पहा... अफगाणिस्तान – आयएसआयएस ची मंडळी जे तिथे करतात तसेच आपण इथे केले तर आपण त्यांच्याकडून शिकवणी घेतल्यासारखे होईल. जर इतकाच दम असेल तर पाकिस्तान बोर्डरवर जावे... आयएसआयएसच्या कॅम्पवर जा तिथे जे मुस्लीम अत्याचारी आहेत त्यांना तुमच्यातला दम दाखवा. इथे गरीब निष्पाप लोकांना दादागिरी करून काय फायदा. इतक्या दूर कशाला, जवळ महम्मद अली रोड, नळबाजार, भेंडीबाजार, परिसरावर हल्ला बोला. खात्री आहे तुमच्यात तेवढा दम नाही.

माणसाशी माणूस म्हणून वागा.... इतकेच म्हणणे आहे.
March 31 at 11:20am
---------------------------------------
hau Torsekar साक्षीताई धन्यवाद
March 31 at 1:04pm
---------------------------------------
Sunil Keluskar · 5 mutual friends
भाऊ सेक्युलर म्हणजे काय हो? (भाऊ दारू म्हणजे काय असते रे? च्या चालीवर) आम्हा पामरांना हा फरक कळत नाही. हे सेक्युलर दिसतात कसे हो? आणि नेमके तुमच्या पोस्टवर बालिश, निरर्थक, विचारहीन प्रतिक्रिया देणाऱ्यांना कसे दिसतात? तुम्ही पुरोगामी म्हणून नक्की कोणाला झापता? मग भाऊ, तुम्ही कोण? प्रतिगामी? भाऊ खरेच माझ्यासारख्या बुद्धिहीन पामराला असे अनेक प्रश्न पडतात. आपल्यासारखे विचारवंत थोडे मार्गदर्शन करतील तर बरे होईल..!

आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या पोस्ट वाचून त्यावर तुमच्या ब्लॉगवर लिहिता. पण मग त्यांच्या पोस्टवर, ब्लॉगवर सरळ का लिहित नाही? आणि आता तर त्या कोणी साक्षी (महाराज कि महाराणी) च्या मराठी फेसबुकरमध्ये लिहिलेली कथा वाचून त्यावर तुमच्या ब्लॉग मद्धे आणि फेसबुकवर प्रतिक्रिया लिहिली. नक्कीच ती अतिरंजित आणि अतिरेकी कथा होती. पण मग मीच तुमच्या फेसबुक पोस्ट मध्ये प्रतिक्रिया म्हणून कथा लिहिली..... मतितार्थ जवळपास तोच होता पण त्यावर आपली प्रतिक्रिया अजिबात नाही. कारण समजले नाही.

आता नक्कीच तुम्ही मला अनफ्रेंड कराल. हरकत नाही.... पण तुम्हाला खरे विचारवंत मानतो... पण तुम्ही त्या कुमार केतकर/ सप्तर्षी, हेमंत देसाई, प्रकाश बाळ यांच्याच पंक्तीत जावून बसायला नको असं मनातून वाटत राहते. जरी मते विभिन्न असली तरी शैली एकसारखी वाटते. जे आपल्याला बरोबर वाटते ते ठोकून सांगण्याची शैली, मग ते चुकीचे असले तरी. तुमचे सारे तर्क अगदी विचारपूर्वक व्यवस्थित रचलेले असतात.... तुमच्या भाषेत समाजवाद्यांसारखे. आपल्या बाळ्याची चूक पण तुम्ही अगदी कुशलतेने चूक नाहीच अशी सिद्ध करता. पण नुसते विचार मांडून काय अर्थ आहे. कृतीशून्य वाचाळता व्यर्थ आहे, हि तुमचीच शिकवण.

असो, मी लिहिलेल्या वास्तवावर तुमची मला झापणारी प्रतिक्रिया? माझ्या कथेतील कच्चे दुवे हेरून, मलाही काही शंका विचाराल...? Please.... तुमच्या माहितीसाठी, मुस्लीम मोहल्ला नवानगरला जाण्यासाठी डॉकयार्ड स्टेशनच्या पूर्वेच्या platform वरून उतरल्यावर लगेचच जोडून असलेल्या गल्लीत आत वळायचे.
March 31 at 4:47pm
----------------------------------------
Bhau Torsekar साक्षीताई पुन्हा धन्यवाद
March 31 at 5:30pm
----------------------------------------
Sunil Keluskar · 5 mutual friends
व्वा...! खरे निखळ विचारवंत.... वाटले होते अनुल्लेखाने माराल पण उपहासाने मारलेत, साक्षीमहाराज. उत्तर नसेल तर असे होते कधी कधी विचारवंतांचे.
March 31 at 5:51pm
----------------------------------------
Sunil Keluskar · 5 mutual friends
एक बुद्धिवादी विचारवंत, म्हणून तुमच्या कड़े पहात होतो, भाऊ तोरसेकर, पण निराशा केलीत। मी माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत् जे तथ्य मांडले आहे ते पूर्ण सत्य आहे। तुमच्या किंवा तुमच्या मागे हुजरेगिरी करणाऱ्या चमच्यांमद्दे दम असेल तर मी सांगितलेल्या पत्यावर जावून माहिती काढ़ा। ती वस्तुस्थिति आजही तशीच आहे। आजही हजारो मुस्लमानांच्या गराड्यात तिथे 8 -9 हिन्दू मराठी कुटुंब राहताहेत। जावून खात्री करून घ्या। खुले आव्हान आहे। पण आता तुम्ही असे करणार नाही। कारण तुमच्यात तो दम नाही। विचारांचा विचारांनी प्रतिवाद करणे जमायला हवे। त्यासाठी अनुल्लेख करणे, नांवे ठेवणे चुकीचे आहे। तो पळपुट्यांचा रस्ता झाला। मी केवळ एक सत्य घटना सांगितली।

तुमचे फेसबुकभाद्दर चमचे म्हणताहेत, भाऊ तुम्ही पुन्हा एक चोर पकडला। आता ह्या ध्यानाला मराठी नीट वाचता येतेय की समजत नाही। चोर जरूर पकडला पण कोणी?
March 31 at 7:43pm
-----------------------------------------
Bhau Torsekar २५ वर्षे म्हणजे १९९०पासून गुजरातमध्ये वास्तव्य करणारा माणूस त्याच काळात १९९२-९३ च्या दंग्यात मुंबईत भटवाडीत वास्तव्य करतो. डॉकयार्डमध्ये नवानगरातही असतो. अशा अनेक स्थळी एकाच वेळी हजर असण्याची सिद्धीप्राप्त महापुरूषाशी वादावादी करायची हिंमत कशी होते तुमची? आपण पामरांनी त्यांची दिव्यवाणी फ़क्त ऐकायची असते. DrParikshit Deshpnde
April 1 at 9:47pm
----------------------------------------
Sunil Keluskar · 5 mutual friends
भाऊ तोरसेकर मी 92- 93 च्या दंगलीचा उल्लेख नाही केला । त्याआधीच्या दंगलीचा केला। भिवंडी पासून सुरु झालेली मुंबईतली पहिली दंगल। नवाकाळच्या सुरेश नगर्सेकर ने त्यावर तथ्य शोधून काढले होते। बाबुराव मी कुठेही 92-93 लिहिले नसतानाही तुम्ही त्याचा दाखला देता। महाराज धन्य आहे तुमची।

कदाचित त्या पूर्वीची दंगल वयोमानानुसार तुमच्या स्मरणात नसेल। मी त्या काळातील दंगल म्हणजे मागच्या काळातील दंगल असे म्हणालो होतो। आणि सर्वज्ञानी महाराज आपण इतके दिवस पत्रकारितेत आहात म्हणजे सुरेश नगर्सेकर यांच्या विषयी माहिती असेलच आणि त्यांनी शोध पत्रकारिता कोणत्या दंगलीची केली होती ते ही माहित असेलच। की फ़क्त मोठ्या नांवाच्या मंडळींचे इतिहास पाठ करुन या टिल्ल्या चमच्यांकडून कौतुक करवून घेता। महाराज तुम्हाला शंका होत्या तर विचारायच्या। मी तुमचे शंकासमाधान केले नसते तर पुढची गोष्ट लिहिली असती तर बरोबर होते। इथे कदाचित माझ्याकडून तुमचा उपमर्द होतोय। पण तुम्हाला तुमच्याच् भाषेत उत्तर द्यायला हवे। पण एका अनुभवी विचारवंताशी अशा भाषेत वाद घालणे योग्य नाही। पण तुमच्या अंगणात बांधलेली कुत्री आवरा राव, तुमच्याशी साधा संवाद करायला गेलो तरी भूंकतात। अर्थात जे भूंकतात ते कधी चावत नाहीत। म्हणून त्यांच्या भूंकण्याची पर्वा करण्याची गरज नाही।

असो एकदा नवानगरात जावून खात्री करून या। प्रश्न हा नाही की हिंदुत्व की सेक्युलरिझम। प्रश्न हा आहे की आपल्यात माणुसकी किती शिल्लक आहे? मला आलेले अनुभव तुम्हाला आले नसतील म्हणून ते खोटे ठरत नाहीत। तुम्ही ज्या प्रकारे आपल्या बाळयांचे समर्थन करता ते पाहिले की तुमची दया येते। एक जग, दुनिया पाहिलेले, योग्य विचार करू शकणारे, बुद्धिमान व्यक्तिमत्व कुठेतरी असत्याची साथ देतेय म्हणून। दलालांची भाषा वाटते। असो तो तुमचा प्रश्न आहे। धन्यवाद याऊपर आणखी वाद वाढवू इच्छित नाही। एकमेकांची अवमानना होते। पण अजून काही शंका असतील तर नीट शब्दात, नीट स्वरात विचारा। हेटाळणी, नांवे ठेवणे असे बायकी प्रकार आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला शोभत नाहीत। तुमच्या शंकांना निट उत्तरे मिळतील। नक्की शंका समाधान होईल।
Yesterday at 1:02am
-------------------------------------------
Bhau Torsekar (असल्फ़ा गावाच्या पलिकडे पाईपलाईन लगत वसलेल्या भटवाडीच्या कोपर्‍यावरच्या गौसिया मशिदीच्या दारातून) मन:पुर्वक धन्यवाद साक्षीताई
Yesterday at 9:49am
------------------------------------------
Sunil Keluskar · 5 mutual friends
बरोबर संदर्भ। असल्फा व्हिलेज। तिथल्या समता विद्यालयाचा अंत पाहिला, हेडमास्तर ऋतुंभरा देवी तरसेकर। राजन जगतापच्या लग्नात बेलोसे च्या पोरीचे कन्यादान केलेत, त्यांची आजची अवस्था जावून पहा। उगाच निवडणुकीला उभे राहिले आणि असे पडले ..... जावूंदे। तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा ओलंडता म्हणून मी ही ओलांडाव्या हे चुकीचे। म्हणून क्षमस्व। आणखी बरेच सन्दर्भ देता येतील। (गौसिया मशिदीच्या दरवाजात एक हेडमास्तर असा संदर्भ कुठेतरी वाचल्या सारखा वाटतो) मनःपूर्वक धन्यवाद ऋतुभरादीदी।
20 hrs

1 comment:

  1. कोणाला तरी उचलून उगाच फार महत्व देऊ नये....
    असल्या वांझोट्या चर्चाखोराना कुठे चघळ्त बसताय ?
    बेचव चुईंगम थूंकून टाका कारण ते कधीच संपत नाही....
    सरळ ब्लॉक करा की....
    असले रिकामटेकडे लोक्स बरेच आहेत....

    ReplyDelete