Wednesday, October 2, 2019

मंदीचे चक्रीवादळ कुठे आहे?

Image may contain: 1 person, text

अर्थशास्त्र हा तसा माझा विषय नाही. किंबहूना राज्यशास्त्र ज्याला म्हणतात, त्याचेही कुठले धडे मी कधी गिरवले नाहीत. पण पत्रकार झाल्यावर अशा विषयांकडे बघून व त्यातल्या घडामोडी अनुभवून त्यावर भाष्य करू लागलो. सहाजिकच अशा कुठल्याही गंभीर विषयाकडे एका ठराविक चाकोरीतून बघणे मला तरी कधी जमले नाही. कुठल्याही विषयाचा किंवा शास्त्राचा चाकोरीबद्ध अभ्यास केला, मग माणसाची बुद्धी त्या चाकोरीतच अडकून पडते. अमूक म्हणजे तमूक किंवा तमूक म्हणजे अमूक असे गृहीत बनून जाते. पण जेव्हा काही अनुभव त्या चाकोरीत किंवा व्याख्येत बसणारे नसतात, तेव्हा गडबड होऊन जाते. आपल्या व्याख्या किंवा चाकोरीनुसार काही घडत नसले, मग त्यात फ़ार मोठी गफ़लत होत असल्याचे मन सांगू लागते. पण जग सतत पुढे सरकत असते आणि नव्या अनुभवांना जुन्या साच्यात किंवा व्याख्येत बसवणे अशक्य होत जाणार असते. त्याच्या परिणामी नव्या अनुभवांना जुन्या मोजपट्ट्या उपयोगाच्या नसतात आणि म्हणून विश्लेषण करताना अन्वय लावताना भल्याभल्यांची तारांबळ उडून जाते. गेल्या एप्रिल मे महिन्यात संपलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणूका व त्याचे निकाल हा त्याचा जीताजागता पुरावाच आहे. त्याविषयी भाष्य करणारे किंवा वेळोवेळी त्यावर भाकिते करणारे एकाहून एक दिग्गज राजकीय विश्लेषक व अभ्यासक पुर्णपणे तोंडघशी पडले. याचा अर्थ त्यांना आसपास काय घडते आहे, ते दिसत समजत नव्हते, असे अजिबात नाही. पण त्या अनुभवांना आपल्या कालबाह्य मापाने मोजण्याची चुक त्यांच्याकडून चालली होती. ती चुक दिसत असूनही त्यांना उमजत नव्हती, की मान्य करता येत नव्हती. ही शास्त्राचा अभ्यास करून तेच अंतिम सत्य मानण्यातली विकृती असते. ज्याला ग्रंथप्रामाण्य म्हणतात. पोथीनिष्ठा असेही त्याला म्हणता येईल. ती पोथीनिष्ठा धार्मिक असो किंवा वैज्ञानिक असो, परिणाम सारखाच असतो. आजकाल देशातली मंदी किंवा अर्थकारणाची मंदावलेली गती, याविषयीचे विवेचन म्हणूनच माझ्या आकलनापलिकडले आहे. कारण तथाकथित अर्थशास्त्राच्या पोथ्या मी वाचलेल्या नाहीत, किंवा त्यांची पारायणे केलेली नाहीत. सहाजिकच त्याविषयी व्यक्त होणारी मते किंवा काढले जाणारे निष्कर्ष, माझ्या आवाक्यातली बाब नाही. मुळात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र किंवा विज्ञान यांचे मानवी जीवनातील स्थान कोणते व महत्ता कोणती, यावरही मी अनभिज्ञच आहे. म्हणूनच मंदी वा मंदावलेली अर्थव्यवस्था किंवा त्यावर व्यक्त होणारी चिंता, मला समजू शकत नाही. मलाच कशाला सामान्य लोकांना तरी ती चिंता कितपत भेडसावत असते?
#चाकोरी_पलिकडे

गेल्या लोकसभा किंवा मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीत आरंभापासूनच देशाची आर्थिक प्रकृती डबघाईला आल्याचे हवाले आपण एकाहून एक महान अर्थशास्त्रज्ञांकडून ऐकत होतो. जागतिक कितीचे नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी तर मोदी पंतप्रधान झाल्यास भारताचा पुर्ण सत्यानाश होईल, अशी हमीच दिलेली होती. आपले स्थानिक बुद्धीमंत कुमार केतकर यांच्यावर विश्वास ठेवायचा, तर मोदीं पुन्हा निवडून आल्यास भारताचे आणखी वाटोळे व्हायचे होते. पण निदान आज साडेपाच वर्षे उलटॄन गेल्यावरही भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त होऊन गेल्याच्या कुठल्या खाणाखुणा आपल्याला अजून तरी दिसलेल्या नाहीत. ८ नोव्हेंवर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर देशातला रोजगार बुडाला, उद्योग बुडाले. लोकांचे हाल कुत्राही खात नाही, असे हवाले जागतिक किर्तीचे अर्थशास्त्री मनमोहन सिंग देत होते. माजी अर्थमंत्री चिदंबरम व रिझर्व्ह बॅन्केचे माजी गव्हर्नर रघुराम राजन अशा दिग्गजांनी भारतीय अर्थव्यवस्थेला अनंतचतुर्दशीला उत्तरपुजा झालेल्या गणपतीप्रमाणे बुडवलेले होते. पण अजून काही तो गणपती बुडालेला नाही, की त्या व्यवस्थेचे कोसळलेले अवशेष उपसून काढायला अशा महान आपत्ती व्यवस्थापनाला आमंत्रित करावे लागलेले नाही. वर्षभर देशव्यापी बेरोजगारीचा डंका पिटला गेला असताना जनतेने पुन्हा अधिक मोठे यश मोदींच्या पदरात घातलेले आहे आणि सामान्य जनता कुठेही जीवन डबघाईला आले, म्हणून प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर उतरली नाही. मग अशा अर्थशास्त्री जाणकारांचे भाकित चुकलेले आहे का? की त्यांना यातले काहीच कळत नसावे? कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे ते भविष्यवाणी करीत असतात काय? ज्या भितीने अशा जाणत्या अर्थशास्त्र्यांना मागली दोनतीन वर्षे पछाडलेले आहे, ती भिती त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याला वा जगण्याला अस्थीर करणारी नसून, एकूण करोडो भारतीयांना आयुष्यातून उठवणारी भिती होती. त्यांना अब्जाहून अधिक भारतीय देशोधडीला लागणार म्हणून चिंता वाटत होती आणि त्याच कोट्यवधी जनतेने निर्धास्तपणे पुन्हा मोदी सरकार निवडून दिले. नुसते बहूमताने नाही, तर अधिक मोठ्या बहूमताने निवडले. याचा अर्थच असे जाणकार अर्थशास्त्री जी भिती घालत होते, ती जनतेला समजलेली नाही वा अनुभवास आलेली नाही. कदाचित आणखी एक शक्यता आहे. अर्थशास्त्री जाणकार आणि सामान्य जनता, यांच्या आयुष्यात अनुभवास येणार्‍या आर्थिक घडामोडीत मोठा जमिन अस्मानाचा फ़रक असावा. त्यांची पोथीनिष्ठ अर्थव्यवस्था आणि सामान्य जनतेच्या जगण्यातले अर्थकारण पुर्णपणे भिन्न असावे. सहाजिकच असे जाणकार ज्या अर्थव्यवस्थेविषयी चिंतातूर होतात, तिच्याशी सामान्य जनतेचा सुतराम संबंध नसावा.

14 comments:

  1. भाऊ, अगदी बरोबर बोललात. मला या अर्थशास्त्रज्ञ लोंकांचं एक कळत नाही की, हे अर्थशास्त्र कोळून प्यायलोय अशी भाषा असते पण मग सर्वसमावेशक अर्थनिती यांना बनवता का येत नाही? सरकारच्या प्रत्येक अर्थ निर्णयावर यांची विरोधात टिका असते पण बरोबर काय हे कधीच सांगत नाहीत. उदा. नोटबंदी कशी चूक होती ही टिका या लोकांनी केली, पण मग काळापैसा व नकली नोटा बाहेर कशा काढायच्या यावर कोणताही उपाय सुचवत नाहीत.
    मंदीबद्दल फक्त वाहनउद्दोग त्यातही मारुती उद्योग यानीच फक्त बोंबाबोंब केली बाकीच्यांचे काय? तरीही मे ते ऑक्टोबर याकाळात या उद्योगात विक्री कमीच असते त्याचे कारण मान्सून पण यावेळेस मंदीची बोंब उठण्याचे कारण काय? तर यांना करात सवलत हवी होती हे दोनतीन दिवसातच त्यांच्या मागणीवरून दिसले. आम्हाला सामान्य माणसाला अर्थशास्त्रातील एक कळते की, आजूबाजूच्या दुकानातून खरेदीला गर्दी आहे, बाजारात माल भरपूर भरलेला आहे, हॉटेल मध्ये गिऱ्हाईक आहे मग सगळे सुरळीतपणे चालू आहे, बाकी अर्थशास्त्रज्ञ गेले खड्डयात.

    ReplyDelete
  2. भाऊ ,तुम्ही चुकताय!
    भुरटे पत्रकार,पुढारी यांची रोजीरोटी बंद होऊन ते आर्थिक मंदीच्या गर्तेत लोटले गेलेत.
    या विषयात ते भाकित करत होते.
    सामान्य माणूस व हे लोक यांची नाळ कधीच तुटली आहे.

    ReplyDelete
  3. माझा देखील अर्थशाास्ञाचा तितकासा संबंद नाही पण सर्वसामान्य निरिक्षन असे भारतातील बहुतेक व्यव्हार रोखीने अर्थात बँक वा सरकारच्या माहितीबाहेर होतात. जसं की बांधकाम, शेतकरी, मजूर, किरकोळ व्यापार, वाहतूक, दळनवळन, दवाखाना, औषधे अशी कित्येक क्षेञ परस्पर पण खूप मोठे(बहुतेक 90% च्या आसपास) व्यव्हार करत असतात. यांची सरकार दरबारी एका ओळीचीही नोंद नाही! मग जी अर्थीक सर्वेक्षणं होतात त्यात यांचं प्रतिबिंब पडनारच नाहीना?एकून व्यव्हाराच्या फक्त 10% ची माहिती घेउन त्यावरून निरिक्षणं नोंदवली जातात म्हणूनच कदाचीत यांची सर्व अनुमाणं आणि भाकितं तोंडघशी पडत असावीत!

    ReplyDelete
  4. Kumar Kehkar ani Amartya Sen sarkhe anek vicharvant(aplya mhananya nusar budhivant) yanchyarvant yanchi budhi jang lalgleli aslya mule he tharavik vicharanchya pali kade javuch shak nahi kibahuna tyanchi janyachi ichach nahi mhanun apan kiti murkha ahot he gelo veli sidha karun dakhavtat he matra khare

    ReplyDelete
  5. 1867 ते 1883 च्या दरम्यान कार्ल मार्क्सने 'दास कॅपिटल' हा ग्रंथ लिहिला. त्यात त्याने भविष्यात काय घडामोडी होणार आहेत + समाजवाद व नंतर कम्युनिझम यांची कशी वाढ होणार आहे + भांडवलशाहीची कशी आपापसात भांडणे होऊन त्याची वाढ खुंटणार आहे + जगातून शेवटी कधी भांडवलशाही नष्ट होणार आहे + मग सर्वत्र जगात समाजवादामूळे सुखमय राज्ये स्थापन होणार याचे वेळापत्रक लिहिले होते. ते वाचून सर्व समाजवादी व कम्युनिस्ट हे अधिकारवाणीने भविष्यात काय होणार आहे याची स्वप्ने सर्वांना दाखवू लागले. तिच परंपरा कुमार केतकर, निखिल वागळे, अमर्त्य सेन इ. चालवून सद्यस्थितीवर काहीजणांना गुदगुल्या आणणारी वक्तव्ये करीत आहेत. मी अशा विनोदी लेखांचे आवडीने वाचन करतो. काही काळानंतर यातले विनोद लोकांना कळतात. हिंदुत्ववादी कधीही अशा कुडमुड्या ज्योतिषांसारखी भविष्यवाणीच्या सुदैवाने पडत नव्हती.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर! गंमत म्हणजे स्वतः मार्क्सने स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मित्रावर पूर्ण अवलंबून राहिला जो भांडवलशाही कुटुंबातील होता.. त्याने कंटाळून मदत बंद केली तर त्याच्याशी भांडून परत मदत करायला भाग पाडले.. मार्क्सने अशाच श्रीमंत मुलीशी लग्न केले पण तिच्या माहेरच्या मोलकरणीशीही संबंध ठेवले मूलही झाले! पुन्हा त्याची बायको मुलं कुपोषणामुळे टी बी ने मेली म्हणजे त्याचे पूर्ण जीवन सेल्फसेंटर्ड स्वार्थी आणि कुटुंबासाठी क्रूर होते.. .. मार्क्‍सवादी लिडर्सही त्याला फॉलो करतात नाही का? 😁

      Delete
  6. 1)मार्क्सवादावर वाचकांनी लिहिलेले अगदी बरोबर आहे.2)आपण उल्लेखलेले प्रचारी अर्थशास्त्री आहेत. भगवती सारख्यांचे विचारसरणीमुक्त व्यापक अर्थविवेचन पहावे लागेल. लेखाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  7. सोने ही जीवनावश्यक वस्तु नसताना देखील दुकानांमध्ये भरपूर गर्दी असते. भाव वाढत आहेत तरीही. मंदी ही या सायकल चा एक भाग आहे.

    ReplyDelete
  8. It’s a great pleasure reading your post. It really makes feel Happy and
    I am satisfied with the arrangement of your post.
    Thank you for your post Satta King

    ReplyDelete
  9. अर्थशास्त्र हे सोशल सायन्स आहे.त्याला कोणतेही 'नियम' लागू व्हायला ते फिजिक्स, गणित केमिस्ट्री नाही आणि सर्व 'शास्त्री' बुद्धीमंत त्याला प्युअर सायन्स असल्याचा आभास निर्माण करून स्वतःच्या इच्छांचे विचार आडाखे म्हणून मांडतात. हे सर्व तुडुंब पोट भरणाऱ्या पोस्ट,अमेरिकेत किंवा ते न जमल्यास भारतात अडवून, भारतीय पेपर्स मधून वा पुस्तके छापून येथील स्थिती बद्दल गळा काढतात! त्यांची खरी इच्छा RSS मधून निर्माण झालेल्या BJP सरकार विरोधात आघाडीचा ग्रुप करून राजकारण करणे आणि त्यातून परदेशी अवॉर्डस मिळवणे.
    खरेतर अर्थशास्त्र हे त्या त्या देशातील काळ, परीस्थिती, मानसिकता, वृत्ती, या सर्वांवर अवलंबून आहे. भारतात खूपच वेगळा माहोल आहे.. अफाट लोकसंख्या तर आहेच पण त्या बरोबर एकीकडे अती गरिबी अन् टोकाची श्रीमंती तर आहेच पण जेमतेम परिस्थिती असतानाही IPL उत्सव देवळातील गर्दी आणि दान, ऋण काढून लग्न, बारशी आणि मर्तिकेही भरभरून चालू असतात!

    ReplyDelete