Thursday, January 23, 2020

‘वाघ’ मरगळ झटकतोय ?

Image result for MNS sawarkar

आज मुंबईत गोरेगाव येथे नेस्को या मोठ्या भव्य मंडपात पक्षाच्या पहिल्याच महाअधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार, ह्याविषयी कमालीची उत्सुकता सर्वांनाच होती. ती उत्सुकता माध्यमातील पत्रकारांसह मनसेच्या कार्यकर्त्यांना असणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा अन्य विविध पक्षाच्या लोकांनाही त्याची उत्सुकता असण्याला पर्याय नाही. कारण अवघ्या पाचसात वर्षापुर्वीचा हा उदयोन्मुख राजकीय पक्ष गेल्या पाच वर्षात अगदीच मरगळला होता. प्रामुख्याने मोदीयुग सुरू झाले आणि मनसे एकप्रकारे आपली वाट हरवून बसली होती. चौदा वर्षापुर्वी सेनेतून बाहेर पडून त्यांनी आपला नवा पक्ष सुरू केल्यापासून तसे राज ठाकरे चाचपडतच होते. कारण आपल्या नव्या पक्षाची राजकारणात जागा कुठली; याविषयी त्यांच्याच मनात गोंधळ असावा. अन्यथा आधी शिवसेनेचा प्रतिस्पर्धी व नंतर थेट पवारांचा शिष्य; अशाप्रकारे त्यांनी धरसोडीच्या भूमिका घेतल्या नसत्या. मनसेची स्थापना झाली, तेव्हाची परिस्थिती २०१४ नंतर किंवा बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर राहिली नव्हती. कारण मोदीयुगाचा आधार घेऊन आळसावलेल्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बाळसे आणण्यात यश मिळवले आणि त्याच लाटेत मनसे कुठल्या कुठे फ़ेकली गेली. भाजपाने २०१४ साली युती मोडून शिवसेनेला इरेस पेटवले आणि त्यातून सेना पुन्हा आपल्या आक्रमक पवित्र्यात उभीही ठाकली. पण आता मुख्यमंत्रीपद मिळवताना शिवसेनेने आपला आजवरचा हिंदूत्वाचा आक्रमक बाणा सोडला आणि ते पद वा सत्ता टिकवण्याच्या कसरतीमध्ये दिवसेदिवस सेना आपला चेहराच हरवत चालली आहे. त्यातून मराठी राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती मनसेसाठी उत्तम संधी असू शकते. अशा पार्श्वभूमीवर मनसेच्या महाअधिवेशनात नवा झेंडा आला आणि त्याची चर्चा खुप आधीपासून सुरू होती. पण खरा सिग्नल बघायचा असेल, तर व्यासपीठावरच्या फ़ोटोमध्ये भर पडलेल्या सावरकर छायाचित्रामध्ये मिळू शकतो.

गेले दोनतीन आठवडे मनसेचा झेंडा भगवा होणार, किंवा त्यावर शिवमुद्रा असणार अशा बातम्या होत्या. त्यातून शिवसेनेने वार्‍यावर सोडलेले हिंदूत्व मनसे हाती घेणार, अशीही चर्चा चालू होती. पण याच कालखंडात वादग्रस्त झालेल्या सावरकर विषयातील शिवसेनेची अगतिक भूमिका कोणी गंभीरपणे लक्षात घेतलेली नव्हती. कॉग्रेसने वा राहुल गांधींनी जाणिवपुर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला. त्यांची हेटाळणी केल्याचा विषय चर्चेमध्ये आला. पण त्याच संदर्भात कॉग्रेसच्या पाठींब्याने मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या शिवसेनेची अपमान सहन करण्याची अगतिकता फ़ार चर्चिली गेली नाही. हा मुद्दा सेनेला वा इतरांना वाटतो, तितका सौम्य वा नगण्य नाही. मराठीतल्या एबीपी वाहिनीवर ‘सावरकर’ महानायक की खलनायक’ अशी चर्चा झालेली होती आणि त्यावर आलेल्या संतप्त प्रतिक्रीयांमुळे त्या वाहिनीला आपली टीआरपी गमावण्यापर्यंत फ़टका बसला होता. त्यातून आजही महाराष्ट्रामध्ये सावरकर हा किती नाजूक व भावनांचा विषय आहे, त्याची प्रचिती येऊ लागते. त्या बाबतीत कुठल्याही संघटनेने आंदोलन छेडले नाही वा आक्रमक पवित्रा घेतलेला नव्हता. पण सोशल मीडियातून मोहिम सुरू झाली आणि त्या वाहिनीला त्या चर्चेतला संयोजक एन्करला काही महिने कॅमेरापासून दुर ठेवण्याची नामुष्की आलेली होती. हा सावरकर प्रभाव लक्षात घेतला, तर मनसेच्या व्यासपीठावरचा नव्याने आलेला सावरकरांचा फ़ोटो, त्या पक्षाच्या आगामी राजकीय भूमिकेचा सिग्नल देऊ शकतो. जिथे शिवसेना आपले कडवे वा आक्रमक हिंदूत्व सोडत जाणार आहे, ती पोकळी आपण भरून काढणार आहोत, असा संकेत राज ठाकरे यांनी एका फ़ोटोतून दिलेला आहे. अर्थात आजच राज हिंदूत्ववादी झाले असेही मानण्याचे कारण नाही आणि त्यांच्या यापुर्वीच्याही अनेक भूमिकांची झाडाझडती घेता येईल.

मात्र मध्यंतरीच्या कालखंडात मोदीयुगाचा आधार घेऊन शिवसेनेने निवडणूकीत मोठे लक्षणिय यश मिळवल्यावर मनसे मरगळली होती. कारण त्या दोन्ही पक्षांचे प्रभावक्षेत्र मराठी अस्मिता व हिंदूत्व असेच होते. काही वर्षापुर्वी रझा अकादमीने मुंबईत मोर्चा काढून आझाद मैदानाजवळ अमर जवान ज्योती स्मारकाची विटंबना केल्यावरही सेना शांत होती आणि राज ठाकरे यांनी पोलिस बंदी झुगारून निषेधाचा मोर्चा काढलेला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराचा वाद असो, किंवा इतिहासकार मेहंदळे यांच्यावर झालेला हल्ला असो, तिथेही रस्त्यावर उतरण्याची तात्काळ भूमिका मनसेने घेतलेली होती. त्यामुळे हिंदूत्व त्यांच्यासाठी नवे नाही. मात्र मध्यंतरीच्या काळात शिवसेना युतीत असल्याने मनसेला राजकीय जागा वा पोकळीच सापडत नव्हती. म्हणून राज यांनी पवारांचे ‘बोट पकडून’ आपल्या पक्षासाठी जागा संपादन करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण लागोपाठच्या लोकसभा विधानसभा निवडणूकांनी तो फ़ोल ठरला आणि आता अचानक विधानसभेत मार खाल्लेला असताना मनसेला नवी जागा सापडलेली आहे. शिवसेनाच दोन्ही कॉग्रेसच्या सोबत जाताना आपले हिंदूत्व किंवा मराठी अस्मिता गुंडाळायला सिद्ध झाल्याने ती पोकळी तयार झालेली आहे. त्या वातेवर तात्काळ जी पोकळी समोर आहे, ती सावरकरांचा अवमान वा विटंबना हीच आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आपल्या वचननाम्यात मागणी केलेली शिवसेना सावरकरांच्या अवमानानंतरही सत्तेत टिकून आहे. तिने कॉग्रेसला ताकीद देण्याचीही हिंमत केलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या व्यासपीठावर त्याच सावरकरांचा फ़ोटो मोठ्या अगत्याने आणलेला आहे. हा महत्वाचा सिग्नल आहे. त्याचा अर्थ असा, की यापुढे सावरकरांविषयी कॉग्रेस किंवा अन्य कोणी अपशब्द वा अवमानकारक बरळले; तर मनसे रस्त्यावर उतरून ‘सामना’ करणार आहे. नुसत्याच संपादकीय टिप्पण्या करणार नाही.

ज्या सावरकर भक्तांमध्ये एका प्रभावशाली वाहिनीला वाकवण्याशी कुवत आहे, ते अशा एका युक्तीने मनसेला आपल्या पाठीशी आणून उभे करता येतात ना? १९८४-८५ सालात गिरणी संप वा राजीव लाटेमध्ये मुंबईतही सेना भूईसपाट झालेली होती. ती १९८६-८७ नंतर जोमाने उभी राहिली. त्याचे मुख्य कारण तिने खांद्यावर घेतलेले हिंदूत्व होते. पण त्याचवेळी महाराष्ट्रातही मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली होती. १९८५ च्या विधानसभेत पुलोद बनवून सर्व विरोधकांची मोट बांधणारे शरद पवार आपली समांतर कॉग्रेस घेऊन कॉग्रेस पक्षामध्ये विलीन झाले. पर्यायाने उरलेल्या विरोधी पक्षांनाही नेतॄत्वच उरलेले नव्हते आणि महाराष्ट्रात जणू विरोधी पक्षच उरला नाही. ती पोकळी भरून काढायला बाळासाहेब पुढे सरसावले. बघताबघता शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचली. कारण पवारांच्या कॉग्रेसवासी होण्याने एक पोकळी निर्माण केली होती. आज शिवसेना पुरोगामी होताना हिंदूत्वाला मुरड घालण्याने काहीशी तशीच पोकळी निर्माण झाली आहे. आपल्याला ती भरून काढायची असल्याचा सिग्नल राज ठाकरे यांनी एका फ़ोटोतून दिलेला आहे. जितक्या आक्रमकपणे आता सत्ताधारी आघाडीतील शिवसेना व दोन्ही कॉग्रेसमध्ये हिंदूत्वावरून खटके उडतील व सेनेचे पाठीराखे अस्वस्थ होत जातील, त्यांच्या भावनांना फ़ुंकर घालण्यासाठी मनसे सज्ज होत असल्याचा तो सिग्नल आहे. राहुल गांधी यांच्या बरळण्याला शिवसेना वा उद्धव ठाकरे जितक्या कडव्या भाषेत चोख उत्तर देणार नाहीत. त्यापेक्षा अधिक कठोर भाषेत शब्दात राज ठाकरे चिंधड्या उडवायला मोकळे आहेत. जो शिवसैनिकाचा आत्मा व स्वभाव आहे. त्याचीच झलक नुसत्या व्यासपीठावरील नेपथ्यातून दिलेली आहे. त्यातून त्यांचा रोख कुठे आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. मात्र हे सर्व असले तरी राजकीय पक्षाला व नेत्याला सातत्य राखावे लागते. ते राज ठाकरे यांच्यात किती आहे, तेही पुढला काळच ठरवू शकेल.

एक गोष्ट इथे नोंदली पाहिजे. सावरकरांचा व्यासपीठावरचा फ़ोटो हे वातावरण निर्मितीसाठीचे सुयोग्य नेपथ्य आहे. तेही घरातूनच आलेले असावे. कारण मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत नेपथ्यकार मोहन वाघ यांचे राज ठाकरे जावई आहेत आणि जन्माने ठाकरे म्हणजे तो वाघाचाच बच्चाही आहे ना?

17 comments:

  1. सुंदर विश्लेषण भाऊ 👍💐

    ReplyDelete
  2. ज्या अर्थी राजसाहेब ठाकरे चाचपडत काकासाहेबांच्या वळचणीला गेले त्या अर्थी ते पुन्हा देखील काकासाहेबांकडे जाऊच शकतात. भाजपचे धुरीण देखील उदेभान ठाकरेसेनेच्या विश्वासघातकी प्रवृत्ती मुळे मनसेवर कितपत विश्वास ठेवतील हे येणार काळच सांगेल.

    ReplyDelete
  3. राज ठाकरेंना आता हिंदुत्व आठवले इतके दिवस नाही ह्यांचा हिंदुत्व शी काही संबंध दिसत नाही.

    ReplyDelete
  4. भाऊ, पण याच्यावर विश्वास कोण ठेवणार? पलटी बहाद्दर आहे हा.

    ReplyDelete
  5. वा भाऊ! शेवटच्या परिच्छेदातील दोन वाघांचा उल्लेख व कोटी आवडली

    ReplyDelete
  6. भाऊ मी याआधी पण तुमच्यावर चिडून तुम्ही राज ठाकरेंबद्दल खुपच हातचं राखुन बोलताय,लिहिताय असं एका ब्लॉगवर कमेंट केली होती,त्याबद्दल सॉरी.
    बाळाचे पाय पाळण्यात दिसले असच म्हणावं लागेल.
    राज साहेबांनी लाईन बदलली.त्यांचे आणि तुमचेही आभार

    ReplyDelete
  7. चला ... शेवट भाऊसाहेबांची इच्छा पूर्ण झाली. वाट चुकलेला घरातला कर्ता मुलगा परत योग्य मार्गावर आला.

    ReplyDelete
  8. राज ठाकरे,ही व्यक्ती विश्वास ठेवण्यास पात्र नाही.हे देशविरोधी बोलणाऱ्या व्यक्तीच झालेलं मतपरिवर्तन नसून...नवीन गणितं जुळवण्याचा हलकट प्रयत्न आहे असं माझं मत आहे.शिवसेनेने रिकामी केलेली हिंदुत्वाची स्पेस घेण्यासाठी हे चाललंय,तेही काकासाहेबाच्या इशाऱ्यावर चालू आहे.

    ReplyDelete
  9. राज ठाकरेचे हिंदूत्व म्हणजे कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिकांना भाजपसोबत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न.
    राज आता अतीजहाल हिंदूत्ववादी भूमिका घेवून भाजप किती मवाळ आहे, हे दाखवणार.
    मग निवडणुकीत तथाकथित कट्टर मूर्ख हिंदू मनसेकडे जाणार वा नोटा वापरणार. व आपल्या पायावर धोंडा मारून घेणार.

    ReplyDelete
  10. भाऊ, ‘वाघ’ मरगळ झटकतोय ? हा लेख वाचला. लेखाच्या हेडिंग मध्ये तुम्हीच प्रश्नचिन्ह वापरलं आहे. ‘वाघ’ खरंच
    मरगळ झटकतोय का नाही हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला आहे. या देशावर आणि या राज्यावर काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. निधर्मी देश, निधर्मी लोकशाहीचा जप करत
    काँग्रेसने धर्मनिरपेक्ष म्हणवून घेताना मध्य आणि निम्न जातींचा जमातवाद पोसला. फ़तवेबाज अल्पसंख्य धर्मगुरूंचे धार्जिण्य केले. सनातनी पुराणमतवादी, जमातवादी, मनुवादी आणि मुस्लीमद्वेष्टे नसलेल्या हिंदूंना हिंदू म्हणून हिणकस दृष्टीने पाहिले. हिंदूंना हिंदू म्हणून दोषी वाटावे असं वातावरण
    काँग्रेसने धर्मनिरपेक्ष म्हणवून घेताना हिंदूंवर लादले. कोणाकडेही तुच्छतेने पाहता कामा नये असे बोलत कमालीच्या जातीयवादी काँग्रेसने भारतातच हिंदूंकडे तुच्छतेने पाहिले. मध्य आणि निम्न जातींचा जमातवादास उत्तेजना देत मध्य आणि निम्न जातींमध्ये जातीयतेची वृक्षवल्ली लावून मतपेट्या भरून घेउन काँग्रेस ने देशावर व
    राज्यावर वरचष्मा ठेवला. स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी काँग्रेस आणि शरद पवार ह्यांना आयुष्यभर लढा दिला. शिवसेना उभी केली ती सुद्धा मध्य आणि निम्न जातींच्या मराठी तरूणांना हाताशी धरून. स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी कधीही कुणाचाच जमातवाद पोसला नव्हता. बाळासाहेबांनी त्यांच्या जीवनात मराठी भाषा अस्मिता नव्याने जागवली, राज्यातील डावी चळवळ जी अत्यंत विषारी विखारी वळवळ करत असायची तिला झोड झोड
    झोडपून ती संपवली. शिवसेना उभी करताना काँग्रेसच्या निवडणुकीच्या अर्थकारणास अंगावर घेत शिवसेनेस सत्तेत
    आणले, हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता ह्यात डिसायझिव्ह भूमिका फक्त बाळासाहेबांनीच घेतली. ठाकरेंच्या वारसांनी
    बाळासाहेबांना समजून घेतलेच नाही. ह्या लेखात तुम्ही ज्यांना वाघ म्हटले आहे ते कण्हत्या राजाची करंगळी ला
    धरून अजित डोव्ह्लल ह्यांच्या चौकशीची मागणी नजदिकच्या भूतकाळात करीत फिरत होते. भाऊ वाघ’ मरगळ झटकतोय का नाही ते माहिती नाही पण वाघाला लोकांनीच झटकण्याची १०० टक्के वेळ वाघांनी आणली हे खरे. मोदी सरकारने जम बसवल्यामुळे परस्पर बऱ्याच राजकारण्यांची दुकानं देशोधडीस लागली. शिवसेनेने सरकारमध्ये राहून स्वतःच्या नाकात स्वतःच काड्या फिरवून
    शिंका काढण्याचं राजकारण केलं. मनसे तर संदर्भहीन झाला
    इव्हीएम ला दोष राफेल वरून आरोप मोदीजींच्या परदेश
    दौऱ्यांची हेटाळणी शेतकरी आत्महत्या रोहित वेमुला प्रकरण
    सगळं सगळं केरात गेलं. मोदीजी ही समस्या झाली. अंगावर
    आलेली समस्या कशीबशी सोडवणे हा उथळवाद असतो. दोघही ठाकरेंनी मोदीजींना समस्या मानून कण्हत्या राजाची करंगळी पकडून समस्या कशीबशी सोडवणे चालू ठेवून देशाचे राज्याचे अपरिमित नुकसान केले. कण्हत्या राजाची करंगळी धरली कि सगळ्याच समस्या सुटतील ह्या कल्पनेने
    वाघ कण्हत कण्हत कण्हत्या राजाकडे जाउन म्याऊ म्याऊ करत बसलेले उभ्या राज्यानं पाहिलेलं आहे. भाऊ इट्स हाय
    टाईम ठाकरेंच्या पुढं दुसऱ्यात बाळासाहेबांचं हिंदुत्व पाहायला हवं

















    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम... भाऊ ना सांगा, तुम्ही चुकत आहात...आम्ही मूर्ख नाहीत... आम्ही करंगळी पहिली आहे..

      Delete
  11. राज ठाकरे यांची धरसोड वृृृत्तिच त्यांना घातक ठरली आहे. अवाच्यासव्वा टोल टॅक्स विरूध्द त्यांनी राणा भीमदेवाच्या थाटात पवित्रा घेतला , ते आंदोलन मधेच सोडले. मध्यंतरी मोदींची वारेमाप स्तुति केली , ती पण वाया घालवली , पवारांचे बोट धरले , ते आता सोडले. आता हिंदुत्व धरले आहे , ते सोडू नये म्हणजे मिळविली.
    राज ठाकरे यांच्या धरसोड वृृृृत्ति विषयी परखड मत व्यक्त करणारे श्री. भाउ तोरसेकर हे एकमेव आहेत. इतरांना या ठाकर्‍यांचे " राज " समजायला किती तरी जन्म घ्यावे लागतील.

    ReplyDelete
  12. येथे आणि इतरत्रही मा. राज ठाकरे यांच्या बब्तीत चर्चांमध्ये पोकळी हा हा मुद्दा कळीचा असल्याचे आढळते.जणू ती दुर्मिळ गोष्ट आहे . लोकांचे असंख्य प्रश्न,गाऱ्हाणी सोडवण्यासाठी नेत्यांची गरज असते.त्यांच्याकडे लक्ष दिले तर पक्षाचा अथवा नेत्यांचा उपयोग.त्याऐवजी भलतेच वाद उकरून काढायचे आणि नाही ते प्रश्न निर्माण करून त्यान लोकांना गुंतवायचे हे हल्ली राजकारणाचे स्वरूप झालेले दिसते.
    मंचावरील स्वा.सावरकरांचे छायाचित्र सावरकर आणि मनसे या दोघानाही उपयोगी ठरणार नाही .छत्रपती शिवाजी किंवा महात्मा गांची यांच्या अनुयायी जितके प्रभावी आहेत तितके सावरकरप्रेमी प्रभावी आहेत काय याचे उत्तर द्यायची सुद्धा गरज नाही .
    .

    ReplyDelete
  13. भाऊ, वाघाच्या बच्चा लांडग्याच्या संगतीत होता त्याच काय,

    ReplyDelete
  14. काल पर्यंत पुरोगामीचा मुखवटा धारण केलेल्या राज ठाकरे यांनी काल 23 जानेवारीला कात टाकली आहे, इथून पुढे जे दिसणार आहे ते त्यांचे खरे रूप आणि स्वरूप।

    ReplyDelete
  15. मेरीट मध्ये येण्याची अपेक्षा असलेला विद्ययार्थी नापास होत जावा असेच काहीसे राज ठाकरे यांचे झालेले आहे. परंतु राज यांचा करिष्मा मात्र वादातीत आहे.
    सातत्याने निवडणुकीत आपटलेल्या या माणसा कडे आज ही लोकांचे प्रचंड आकर्षण आहे, तुफान वकर्तृत्व आहे, छाप आहे. नाही आहे ती दृष्टी (vision या अर्थी) आणि त्या मुळे सातत्य नाही. उत्तर हिंदुस्तानी लोकांचा विरोध ह्या मुद्याला असलेल्या मर्यादा या माणसाला कळल्या च नाहीत का? चौदा वर्षांचा पक्ष अजून ही भूमिकेच्या शोधात चाचपडतोच आहे हिच खरी शोकांतिका. असो ईश्वर राज ठाकरे यांना सद्बुद्धी देवो. नव्या कात टाकलेल्या मनसे ला मना पासून शूभेच्छा

    ReplyDelete
  16. भाऊ मला राज ठाकरे हिंदुत्वाची कास धरतील असे वाटत नाही व लोकही त्यांच्या या नवीन धोरणावर पटकन विश्वास ठेवतील असे वाटत नाही कारण धरसोड वृत्ती. या दोघा ठाकरे बंधुनी मराठी माणसांना गृहीत धरुन आपाआपल्या सोईचे राजकरण करुन स्वार्थ साधले व मराठी माणसाची फरफट केली. परप्रांतीय लोकांच्या विरुद्ध मोहिम राजने सुरु केली अनेक वेळा व त्यामध्ये खsssळफटॕक करताना अनेक हिंदूंना दुखावले .लावारे तो विडीओ असे म्हणत मागच्या निवडणुकीत स्वतः एकही उमेदवार न उभा करत मोदींना व भाजपला हरवा असा प्रचार केला. स्वतः न लढता भाजपला हरवण्याकरता आपली सेना उतरवणारा हा पहिलाच सेनापती असावा. अशा नेतृत्वावर आता मतदार सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत.भाजपने यापुढे कुठल्याही पक्षाबरोबर युती न करता स्वबळावर निवडणुका लढवाव्यात.

    ReplyDelete