Tuesday, January 21, 2020

बैलाचा डोळा, अर्थात लक्ष्यवेधी

Image result for neena gupta kashyap

आजकाल स्टार आणि व्हायरल हे दोन शब्द खुप परवलीचे झालेले आहेत. व्हायरल म्हटले की डोळे झाकून खुपच गाजावाजा झालेले असे आपण समजून जायचे आणि स्टार म्हणजे त्याने काहीही बरळले तरी त्याला डोळे झाकून प्रसिद्धी द्यायची. भारतीय माध्यमांची ही स्थिती आहे. त्याचा निकष सोपा सरळ आहे, बोलणारा मोदी वा भाजपाच्या विरोधात काहीबाही बोलत असला पाहिजे वा त्याच्या कृतीचा संघाच्या विरोधात निष्कर्ष काढता आला पाहिजे. त्यामुळे संजय राऊत असोत, की अनुराग कश्यप वगैरे सारखे कोणी असोत, ते हल्लीचे स्टार आहेत. दीपिका पादुकोण नेहरू विद्यापीठात दंगेखोरांना पाठींबा द्यायला गेली आणि पडलेल्या चित्रपटातुनही स्टार उगाच होऊन गेली नाही. पण वास्तविक अशी स्टार मंडळी आपापले स्वार्थ व हेतू बघूनच परमार्थाचे छानपैकी नाटक रंगवित असतात. जेव्हा त्यांचेच तत्वज्ञान वा विचार-भूमिका व्यवसायाच्या आड येऊ लागतात, तेव्हा पहिली लाथ अशा तत्वांना मारली जात असते. त्यालाच इंग्रजीत ‘बुल्स आय’ म्हणतात. गावठी मराठीत आपण त्याला लक्ष्यवेध म्हणतो. पण हल्ली मराठीतही इंग्रजी शब्द घुसवल्याशिवाय प्रतिष्ठा मिळत नसते. तर बुल्स आयचा हिंदीतला तर्जुमा सांड की आंख असा होतो आणि त्याच नावाचा चित्रपट अनुराग कश्यप नावाच्या महान कलावंताने अलिकडेच काढला. त्याच्या पुरोगामी असण्याचा नेमका लक्ष्यवेध नीना गुप्ता नावाच्या जुन्या अभिनेत्रीने केलेला आहे. पण ती ‘भूमिका’ घेणारी नसल्याने तिच्या बोलण्याला काय किंमत ना? तिची मुलाखत बहुतांश बॉलिवुड कलाकारीचे वस्त्रहरण करणारी आहे. पण विचारतो कोण? त्यात मोदी भाजपा विरोधात अवाक्षरही उच्चारलेले नाही. अन्यथा एव्हाना नीना गुप्ताची ती मुलाखत आजच्या माध्यमी भाषेत व्हायरल होऊन गेली असती. बिचारीला अजून हे तंत्र अवगत झालेले नाही, अन्यथा गेल्या दोन दिवसात तिने दीपिकालाही मागे टाकले असते.

‘सांड की आंख’ हा चित्रपट हरयाणातील दोघा वृद्ध महिलांवरचा आहे. एक तर हे राज्य महिलांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारे मानले जाते. अशा राज्यातल्या दोन महिला उतारवयात बंदुक हाती घेऊन नेमबाजी शिकल्या आणि त्यांनी त्यात प्राविण्यही संपादन केले. त्यावर अनुरागने हा चित्रपट बेतलेला आहे. विषय चांगला आहे, पण त्यामध्ये या वयस्कर महिलांच्या भूमिका करणार्‍या अभिनेत्री मात्र कोवळ्या वयाच्या तरूणी आहेत. त्यासाठी अनेक उत्तम आणि वयस्कर अभिनेत्री आजही उपलब्ध आहेत. अनुरागच्या कलास्वातंत्र्याला न्याय देऊ शकणार्‍या अभिनेत्रींचा बॉलिवुडमध्ये अजिबात तुटवडा नाही. पण बॉलिवुडचे कलास्वातंत्र्य अविष्कार स्वातंत्र्य चित्रपटात गुंतवणूक करणार्‍यांकडे कायम गहाण पडलेले आहे व असते. त्यांचे सगळे स्वातंत्र्य फ़क्त राजकीय क्षेत्रात भूंकण्यापुरते मर्यादित झालेले आहे. जे स्वातंत्र्य त्यांना आपल्या कलाप्रांतामध्ये अनुभवता येत नाही वा ज्याचा तिथे डंका पिटता येत नाही, त्याचा अविष्कार करण्याची एकमेव संधी ते माध्यमातून व राजकीय टिकाटिप्पणी करून साधत असतात. अनुराग किंवा दीपिका त्याला अपवाद नाहीत. ह्या डबल रोलचाच पर्दाफ़ाश नीना गुप्ताने आपल्या खास मुलाखतीतून केला आहे. सांड की आख चित्रपटातील दोन्ही प्रमुख पात्रे वयस्कर असल्याने त्यात आपल्याला छान भूमिका करता येईल, अशी तिची अपेक्षा होती आणि तिने त्यासाठी अनुरागच्या कलावादाला आवाहनही केले होते. त्यालाही तशाच वयस्कर अभिनेत्रीला घेण्याची इच्छा होती. पण चित्रपटात म्हणजे त्याच्या कलाविष्कारामध्ये जो कोणी पैसे गुंतवणार होता, त्याला कला वगैरे चोचले अजिबात मंजूर नव्हते. म्हणून त्याने चित्रपटाला पैशांची गरज असेल तर कलेचा गळा घोटून त्यात तरूण अभिनेत्रींना घेण्याचा हट्ट केला. तरूणींनाच रंगभूषेने म्हातारे दाखवावे असा अट्टाहास होता. तात्काळ अनुरागच्या हातातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा गळून पडला आणि त्याने गुंतवणूकदाराच्या पायाशी लोळण घेऊन, आपल्या स्वातंत्र्याची गगनभेदी गर्जना केली.

हे आहे स्वातंत्र्य! बहुतांश हातात झेंडे घेतलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षाचा हा खरा इतिहास आहे व वर्तमानही आहे. अर्थात नीना गुप्तालाच त्याने त्या भूमिकेसाठी घ्यावे असा कोणी आग्रह धरू शकत नाही. म्हणूनच तिला भूमिका नाकारणे, हा गुन्हा असू शकत नाही. पण मुद्दा नीनाच्या जागी शबाना वा अन्य काही वयस्कर महिला होत्या. गुंतवणूकदाराचा आग्रह तरूण अभिनेत्रीसाठी होता आणि त्याला शरणागत होण्याला अनुरागसारखे स्वातंत्र्यवीर खरेखुरे स्वातंत्र्य म्हणतात. ज्या क्षेत्रात आपण काम करतो, तिथे आवश्यक असलेले स्वातंत्र्य गळचेपी होऊन पडलेले असताना, निमूट त्यालाच शरण जायचे आणि जे आपले क्षेत्र नाही, तिथल्या स्वातंत्र्याचा डंका पिटायचा, हे आजचे आधुनिक स्वातंत्र्ययुद्ध होऊन बसलेले आहे. कारण त्यातून स्टार बनता येते आणि आपल्या खर्‍याखुर्‍या शरणागतीवर पांघरूण घालायला व्हायरल गदारोळ माजवता येत असतो. नीनाने अनुरागला दोष दिलेला नाही. तिने सत्यकथन केलेले आहे. पण तरीही ती व्हायरल होऊ शकत नाही. कारण तिला स्टारव्हॅल्यू नाही ना? स्टार व्हॅल्यू असण्यासाठी अनुराग वा गुंतवणूकदार बॉलिवुडवर ताशेरे झाडून उपयोग नसतो. मोदींवर दुगाण्या झाडाव्या लागतात. पण नीनाच्या मुलाखतीत त्याचा लवलेश नाही. उलट माध्यमांनी ज्याला नव्या युगाचा स्वातंत्र्यवीर घोषित केले आहे, त्याच्या बोलण्यातला बाष्कळपणा कौतुकाचा असतो आणि नीनाने त्याचाच बुरखा फ़ाडला आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करताना या दिवट्याने मोदींच्या भारतीयत्वाचे, जन्माचे व पदवीचे पुरावे मागितलेले आहेत. ज्याला आपल्या कलाकृतीमध्ये इच्छा असूनही कलाकारांची निवड करता येत नाही, त्याने किती गमजा कराव्यात? त्याचे कारणही नाही. म्हणूनच त्याची असली बडबड बाष्कळ असते. मग त्याला माध्यमे इतकी वारेमाप प्रसिद्धी कशाला देतात? तर मोदींना शिव्याशाप आहेत ना? मग बातमी आपोआपच होते. रस्त्यावर कोणी कुत्रा भूंकत असेल आणि त्यात मोदी अशा उच्चाराचा भास झाला, तरी त्याचे भूंकणेही आजकाल व्हायरल होऊ शकते.

आपण ज्यांना स्वातंत्र्यवीर वा महान योद्धे म्हणून पेश करतोय, त्याचे वास्तविक चरीत्र व लायकी काय आहे, याचे तरी भान आजच्या संपादक माध्यमांना उरले आहे काय? गुंतवणूकदारापुढे आपले कलास्वातंत्र्य वा आवडनिवड लज्जास्पद रितीने अर्पण करणार्‍यांन ही माध्यमे स्वातंत्र्ययोद्धा म्हणून पेश करतात. तेव्हा अनुरागपेक्षा या लोकांची कींव करावीशी वाटते. ज्यांची हयात दाऊद वा माफ़ियांच्या पैशासाठी शरणागत होण्यात गेली, त्यांना स्वातंत्र्यवीर ठरवणार्‍यांची अक्कल किती असेल? पण चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तेच खरे असते. योगेश सोमण यांना राहुल विरोधात बोलले म्हणून विद्यापीठातून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतरची गळचेपी यांना समजत नाही. त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत नसते, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? अर्थात मीडिया हाऊस नावाच्या मालकांचा पट्टा गळ्यात बांधून घेतलेले संपादक वा पत्रकार यापेक्षा अधिक काय करू शकणार आहेत? मालकाच्या इशार्‍यावर भुंकण्याचे कर्तव्य बजावताना आपल्या भूमिकेसाठीही थोडे अन्यत्र भूंकायचे मिळालेले स्वातंत्र्य त्यांना आकाशाइतके मोठे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी नीना गुप्ता नगण्य असते आणि अनुराग कश्यप स्टार असतो. प्राण्यांची जात कितीही उच्च असो. त्याच्यातील उपजत जाणिवा समानच असतात. तो भटक्या असो वा पाळीव असो. नाहीतरी व्हायरल म्हणजे काय असते? गावात एक कुत्रा भूंकला, मग एकामागून एक सर्व आळीतले कुत्रे बेफ़ाट भूंकू लागतात. त्यापेक्षा व्हायरलचा अर्थ आणखी किती वेगळा आहे? पहिला वा नंतरचा कशाला भूंकला, तेही ठाऊक नसताना उपजत वृत्तीनुसार तात्काळ भूंकणे अगत्याचे असते ना? तसे हे स्टार वा त्यांचे व्हायरल नाटक आजकाल रंगलेले आहे. कोणीतरी पाठीत लाथ घालण्यापर्यंत असे आवाज शांत होत नसतात. कल्लोळ असह्य होतो, तेव्हा रहिवाशीच त्याचा बंदोबस्त करतात ना? तशी वेळ अधूनमधून येत असतेच ना? विविध माध्यमांना म्हणूनच हल्ली त्या अनुभवातून जावे लागत असते.


14 comments:

  1. कलेचा धर्माशी संबंध नसतो असे किंचाळत बोंबलणाऱ्यांपैकी बॉलिवूड सगळ्यात आघाडीवर
    आहे. शकील बदायुनी यांनी लिहिलेलं हिंदू देवतांचं
    भजनाला नौशाद चाल लावतात व युसूफखान नाव
    असलेला माणूस पडद्यावर ते गाणे गातो हे उदाहरण बॉलिवूड
    मधील नेहमीची माकडं येताजाता देत असतात. हृषीदांच्या
    खूबसूरत चित्रपटाच्या रिमेक मध्ये मग टिनपाट पाकिस्तानी फवाद खान ला घेणे, हुमैमा मलिक नावाच्या पाकिस्तानी पोरटी मग भारतात राजा नटवरलाल चित्रपटात येते. इम्रान
    अब्बास नक्वी मग बिपाशा बसू बरोबर साय फाय थ्री डी क्रियेचेर मध्ये झळकतो. थोडक्यात काय तर बॉलिवूड ने
    स्वतःहून कलेचा धर्माशी संबंध नसतो असे किंचाळत वन सायडेड पाकिस्तानी इम्पोर्ट चालू केले आहे. सुफीझम वर
    आधारित म्युझिक बॉलिवूड ने भारतीय प्रेक्षकांना ऐकवायला
    सुरु केलं. हे सगळं एक षडयंत्र आहे. सिनेमा वर पाकिस्तानी
    कब्जा केला कि भारताचा बोजवारा उडवायला सोपा. भाऊ
    तुमच्या लेखात तुम्ही प्रोपाकिस्तानी विचारसरणी राबवण्याकरता बॉलिवूड ला सेक्युलर रूप देणाऱ्या चांडाळांचं छान बुरखा फाडला आहे





    ReplyDelete
  2. भुंकणार्या कुत्र्यांची उपमा चपखल भाऊ !

    ReplyDelete
  3. "नाहीतरी व्हायरल म्हणजे काय असते? गावात एक कुत्रा भूंकला, मग एकामागून एक सर्व आळीतले कुत्रे बेफ़ाट भूंकू लागतात. त्यापेक्षा व्हायरलचा अर्थ आणखी किती वेगळा आहे? पहिला वा नंतरचा कशाला भूंकला, तेही ठाऊक नसताना उपजत वृत्तीनुसार तात्काळ भूंकणे अगत्याचे असते ना? तसे हे स्टार वा त्यांचे व्हायरल नाटक आजकाल रंगलेले आहे. कोणीतरी पाठीत लाथ घालण्यापर्यंत असे आवाज शांत होत नसतात. कल्लोळ असह्य होतो, तेव्हा रहिवाशीच त्याचा बंदोबस्त करतात ना?"
    जबरदस्त...👍👍👍

    ReplyDelete
  4. 😆😆😆😆
    भाऊ, फार भारी लिहिता तुम्ही!!! नीच पुरोगाम्यां प्रमाणे सुसंस्कृततेच्या मर्यादा न ओलांडता अगदी आमच्या मनातले बरोबर व्यक्त करता.

    पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  5. भाऊ स्वातंत्र्यवीर याला म्हनु नका.

    ReplyDelete
  6. भाऊ, शेवटी पैसा हाच देव आहे. त्यामुळे या लोकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून द्यायचा असेल तर त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्याची किंमत दाखवून दिली पाहिजे.
    टी दाखवल्यावर ABP ने बरोबर अभिव्यक्ती वगैरे गुंडाळून सपशेल लोटांगण घातले. गुंतवणूकदार आणि ग्राहक हीच खरी अभिव्यक्तीची किंमत असते, त्यावर घाव घातला की बुद्धी आणि अभिव्यक्ती बरोबर जाग्यावर येते

    ReplyDelete
  7. पहिला वा नंतरचा कशाला भूंकला, तेही ठाऊक नसताना उपजत वृत्तीनुसार तात्काळ भूंकणे अगत्याचे असते ना? . कोणीतरी पाठीत लाथ घालण्यापर्यंत असे आवाज शांत होत नसतात. कल्लोळ असह्य होतो, तेव्हा रहिवाशीच त्याचा बंदोबस्त करतात ना? तशी वेळ अधूनमधून येत असतेच ना? विविध माध्यमांना म्हणूनच हल्ली त्या अनुभवातून जावे लागत असते

    झकास एकदम

    ReplyDelete
  8. पहिला वा नंतरचा कशाला भूंकला, तेही ठाऊक नसताना उपजत वृत्तीनुसार तात्काळ भूंकणे अगत्याचे असते ना? . कोणीतरी पाठीत लाथ घालण्यापर्यंत असे आवाज शांत होत नसतात. कल्लोळ असह्य होतो, तेव्हा रहिवाशीच त्याचा बंदोबस्त करतात ना? तशी वेळ अधूनमधून येत असतेच ना? विविध माध्यमांना म्हणूनच हल्ली त्या अनुभवातून जावे लागत असते

    झकास एकदम

    ReplyDelete
  9. कुत्र्याच्या भुंकण्यातून मोदी असा भास होतो
    भन्नाट कल्पनेची आयडिया थोड्याच दिवसात याचे audio video वायरल होतील
    मोदी द्वेष्ट्यांना लाज शरम नाही

    ReplyDelete
  10. ़, स्वातंत्र्यवीर हा शब्द उपरोधाने योजला आहे

    ReplyDelete
  11. Shevati kutri kitihi bhunkali tari tyat manse tyancha awaj misalat nahit. Ti manse jevha mat dyayala jatat tevha mag tsunami yete. He bashkal bolanare he visartat ki te kharetar na bolun mate denaryanchi Shakti vadhavat ahet.

    ReplyDelete
  12. कधी ही भंपकगिरी थांबणारे काय माहित पण लोकांनी यांना किंमत देणे थांबवले पाहिजे आणि सरकार ने यांना चवकाशित अडकवले पाहिजे

    ReplyDelete