Thursday, January 9, 2020

दिव्याखालचा अंधार

Image result for majh vishesh deepika

हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहरू विद्यापीठात गेली आणि अनेक पुरोगाम्यांना शिंगे फ़ुटली आहेत. एकूण पुरोगामी चळवळ आजकाल सेलेब्रिटींचा पदर पकडून कशी जीव धरून आहे, त्याची साक्ष त्यातून मिळते. पण या संबंधाने जे वाद आणि विवाद विविध माध्यमातून उभे राहिले, त्यातली पुरोगामी अगतिकता लपून रहात नाही. हाच धागा पकडून एबीपी माझा वाहिनीने ‘ माझा विशेष’ म्हणून एक चर्चा योजली होती. त्यातले एक शीर्षक खटकले म्हणून सविस्तर लिहावे लागले. आपण वैचारिक उहापोह किंवा चर्चा घडवून आणतो, असा या लोकांचा दावा असतो. थिन्क बॅन्क नावाच्या युट्युब व्हिडीओमध्ये याच वाहिनीचे संपादक राजू खांडेकर यांनी वाहिनीच्या भूमिकेविषयी सविस्तर विवेचन केलेले आहे. पण अजून त्यांच्या वाहिनीवरील चर्चांचे संयोजक प्रसन्ना जोशी यांनी ते बघितलेले नसावे. किंवा समजून घेतलेले नसावे. कदाचित समोरचा काहीही बोलत असताना ते ऐकायचे सोडून, त्यात व्यत्यय आणण्यालाच संयोजन समजून वागणार्‍या प्रसन्नाला आपल्याच संपादकांचे संपुर्ण निवेदन खुलासा ऐकायचा संयम राहिलेला नसावा. अन्यथा त्यांनी रोजच्या चर्चेत व्यत्यय आणायचा उद्योग कमी केला असता. शिवाय त्याचे प्रतिबिंब निदान दीपिका विषयक चर्चेत तरी पडले असते. खांडेकर त्या मुलाखतीमध्ये म्हणतात, मोदी सत्तेत आल्यापासून समाजात दोन गट पडले आहेत. आमचे म्हणणे खरे माना, दुसरी बाजूच असू शकत नाही, अशी असहिष्णुता वाढलेली आहे. तुमच्या विचारापेक्षाही वेगळा विचार किंवा भूमिका असू शकते, हे मानले पाहिजे असा खांडेकरांचा त्या मुलाखतीचा एकूण सुर आहे. पण तसे असेल तर त्यांनी इतर कोणाला काही शिकवण्यापेक्षा आपल्याच चर्चा संयोजक प्रसन्नाला ही बाब समजावली पाहिजे ना? ती समजावली असती, तर दीपिकाच्या निमीत्ताने योजलेल्या चर्चेत प्रसन्नाने मराठी कलावंतांवर दुगाण्या झाडल्या नसत्या. यालाच तर आपले पुर्वज दिव्याखालचा अंधार म्हणायचे ना?

मराठी चित्रपट कलावंत भूमिका साकारतात, पण भूमिका घेत नाहीत, अशी अत्यंत बुद्धीमान मल्लीनाथी त्यामध्ये प्रसन्नाने केली. मजेची गोष्ट अशी, की कुठलाही कलाकार भूमिका घेऊ शकला नाही तर भूमिका साकारणार कशी? तो भूमिका साकारतो, म्हणजेच भूमिका घेत असतो. त्यामुळे भूमिका घेणार कधी, ही शब्दरचनाच हास्यास्पद आहे. मग प्रसन्नाला काय म्हणायचे आहे? तर मराठी कलावंत प्रसन्ना वा तत्सम पुरोगाम्यांना आवडणारी राजकीय ‘भूमिका’ कधी घेणार? ही भूमिका चित्रपटातली नसते तर राजकीय आखाड्यातली असते. तीही पुरोगामी असेल तरच ‘भूमिका’ असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली, तर त्याला पुरोगामी भाषेत भूमिका म्हणत नाहीत. त्यासाठी भक्त वा भक्ती असा शब्द आहे. त्यामुळे मराठी कलावंत ‘भूमिका’ घेत नाहीत, या उक्तीचा अर्थ  पुरोगामी मानली जाते अशी भूमिका ते मराठी कलाकार कशाला घेत नाहीत? इथे दोन प्रश्न उदभवतात, खांडेकरांना भूमिका शब्दाचा आशय समजलेला नाही, की प्रसन्नाला त्याचा अर्थ उलगडलेला नाही? कारण भूमिका घेणे म्हणजे फ़क्त पुरोगामी किंवा मोदी विरोधाची असेल, तर अन्य भूमिकाच असू शकत नाहीत. आणि अन्य भूमिकाच नसेल, तर भूमिका घेण्याला काहीही अर्थच उरत नाही. उदाहरणार्थ ज्या चर्चेमध्ये पुरोगामी पक्षांचे प्रवक्ते तोकडे पडतात, किंवा त्यांच्यापाशी कुठलाही युक्तीवाद वा मुद्दे नसतात, तिथे प्रसन्ना पक्षपाती भूमिका घेऊन पुरोगामी बाजू हिरीरीने मांडू लागतो. त्याला ‘भूमिका घेणे’ म्हणतात. पत्रकार वा चर्चेच्या आयोजकाने तटस्थ असायला हवे आणि त्यालाही सामान्य भाषेत भूमिकाच म्हणतात. पुरोगामी भाषेत तटस्थ वा अलिप्त वगैरे भानगडी नसाव्यात. अन्यथा प्रसन्नाने असा खुळेपणा कशाला केला असता? त्याने प्रत्येकाला मनसोक्त आपले विचार व्यक्त करू दिले असते आणि पक्षपाती भूमिका कधीच घेतली नसती. असो.

कुठल्याही चर्चेत वा गोष्टीत फ़क्त दोन बाजू नसतात, दोन बाजूच असत्या तर चर्चा रंगली नसती आणि न्यायालयेही चालली नसती. न्यायालयात तिसरी बाजू किंवा भूमिका असते. ज्याला न्याय देणे म्हणतात. दोन्ही बाजू संयमाने ऐकून घेण्याची प्राथमिकता त्यासाठी आवश्यक असते. बाजू मांडली जात असताना, त्यात व्यत्यय आणण्याला कोणी तटस्थ वा संयमी म्हणू शकत नाही. दीपिकाने नेहरू विद्यापीठात जाऊन भूमिका घेतली, म्हणजे तिथल्या अराजकाचे समर्थन केले. हिंसाचाराला वा दंगेखोरीला पाठींबा दिला. तो योग्य की अयोग्य, हा वेगळा विषय आहे. पण ती एक भूमिका झाली. पण तीच व तेवढीच नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भूमिका नसते व नाही. तिथे हजारो अन्य विद्यार्थी आहेत आणि त्यांचा आवाज वा मतांना माध्यमांनी कधीही प्रसिद्धी दिलेली नाही. त्यामध्ये शेकडो असे आहेत, ज्यांना आपले शिक्षण वेळच्या वेळी व्हावे आणि त्यात आंदोलने वा चळवळीचा व्यत्यय यायला नको, असेही वाटत असते. तेही प्रसन्नाच्या भाषेत कुठलीच भूमिका घेत नाहीत. मग त्यांचे काय करायचे? दीपिकाने तिथे गोंधळ घालणार्‍यांच्या समर्थनाला जाऊन एक भूमिका घेतली. पण बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांचे म्हणणे कोणी मांडावे? ती भूमिका नाही काय? विद्यापीठात शिकायला यावे आणि निदान इतरांच्या शिक्षणात व्यत्यय आणु नये; अशी काही भूमिकाच नाही काय? दीपिकाने घेतली ती भूमिका असेल तर इतर ज्यांना ह्या गोंधळ अराजकाचे समर्थन करायचे नाही, ती शांततावादी भूमिका नाही काय? गोंधळाचा विरोध वा त्याविषयी नापसंती, ही भूमिकाच नाही काय? अशी अलिप्त भूमिका म्हणजे आंदोलनाचा विरोध नसतो वा विरोधी असणार्‍यांचेही समर्थन असायचे कारण नाही. मोदी वा मोदी विरोधक यांच्या पलिकडेही तिसरी एक भूमिका असते. जी मोदी समर्थनाची नसते तर दोन्ही वादापासून दुर रहाण्याची असते. त्यामुळे भूमिका शब्दाचा अर्थ अशा निर्बुद्धांनी जरा समजून घेतला, तरी खुप काही साध्य होऊ शकेल.

मोदीवादी वा भाजपा समर्थक नसलेले लोकही खुप आहेत. पण भूमिका म्हणजे मोदीविरोध इतकीच व्याख्या मर्यादित केली; मग मोदी समर्थक नसलेलेही आपोआप मोदीभक्त म्हणता येतात. कारण असहिष्णू पुरोगाम्यांनी भूमिका पक्की केली आहे आणि त्यात समाविष्ट होणार नाही, त्याला आपोआप मोदीभक्त करून टाकलेले आहे. त्यामुळे त्यांना दीपिकाने भूमिका घेतली असे वाटते. मानसशास्त्रामश्ये याला़च कळपवृत्ती वा झुंडशाही म्हणतात. जो आपल्यासारखा दिसत नाही, वागत नाही वा बोलत नाही, त्याच्याशी थेट शत्रूभावनेने वागण्याला कळपवृत्ती म्हणतात, तो प्रत्येक सजीव प्राणिमात्रामध्ये उपजतच असते. अर्थात ती पाशवीवृत्ती असते. जेव्हा अशी कळपाची मानसिकता जपणारे जोपासणारे एकत्र येतात, तेव्हा ती झुंडीची पाशवी प्रवृत्ती उफ़ाळून येत असते आणि शत्रूवर तुटून पडण्याचा जोश अंगात आपोआप संचारत असतो. दीपिकाने भूमिका घेतली म्हणून प्रसन्नाला चढलेला जोश व त्यात त्याने मराठी कलावंतांवर चढवलेला हल्ला; त्याच प्रवृत्तीतून आलेला आहे. कारण अशीच पण वेगळी भूमिका शरद पोंक्षे यांनीही अनेकदा घेतलेली आहे. पण ती प्रसन्ना वा तत्सम पुरोगाम्यांच्या पठडीतली नसल्याने त्याची खिल्ली उडवायला वा त्यावर तुटून पडायला प्रसन्ना सज्ज असतो. त्याला भूमिका म्हणून त्याविषयी चर्चा होत नसते. कारण पाशवी प्रवृत्तीत चर्चेला स्थान नसते, किंवा तारतम्याला जागा नसते. आपल्यापेक्षा वेगळा दिसेल वा वागेल; त्याच्यावर शिकार करायला तुटून पडायचे असते. त्याला सभ्य शब्दात ‘भूमिका’ म्हटले जाते. अन्यथा प्रसन्ना तितक्याच अगत्याने शरद पोंक्षे यांच्या भूमिका घेण्याविषयी अगत्याने बोलला असता. किंवा त्याही प्रसंगी मराठी कलावंत ‘भूमिका’ घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर त्याने आगपाखड केली असती. पण त्यासाठी खरेखुरे सहिष्णू असावे लागते. मग पोंक्षे घेतात ती वेगळी असली तरी भूमिका म्हणून सत्य स्विकारावे लागेल ना? अडचण तीच असते. अंतिम सत्य गवसलेल्यांना सत्य सापेक्ष असते, तेही मानायचे नसते. म्हणून तर अशा चर्चा दिवसेदिवस निर्बुद्धांचे वैचारिक मुष्ठीयुद्ध होऊन गेले आहे. खांडेकरांनी थिन्क बॅन्कला भूमिका समजावण्यापेक्षा आपल्याच पायाखाली अंधारात चाचपडणार्‍या प्रसन्नाला प्रकाश दाखवला असता तर?


23 comments:

  1. भाऊ आजच https://www.nytimes.com/2018/05/12/opinion/sunday/liberals-youre-not-as-smart-as-you-think-you-are.html हा लेख वाचला.
    आणि आता तुमचा हा लेख...

    ReplyDelete
  2. Bhau , Simply beautiful in all and particularly the last paragraph!

    ReplyDelete
  3. Superb analysis. Similar is case of Srinivas Jain on Reality Check on NDTV. He does not allow any expert on panel who counters his/ NDTV's views or keeps on disturbing him while gives others uninterrupted more time.

    Another strategy is to not allowing that expert further opportunity. However he was nicely bashed by Mr. Kanwal Sibbal former diplomat yesterday with very sharp; to the point and precise counter questions. In present case needless to say the person is arrogant sicular and i have stopped watching ABP Mazha after their insult to Savarkar last year.

    ReplyDelete
  4. राहुल गांधी विरोधात भूमिका घेऊन सावरकर भक्ती करणाऱ्या योगेश सोमण विरुद्ध विद्यार्थी आंदोलन करत आहेत, हे दुर्लक्षित करतात त्यातच सगळे आले..

    ReplyDelete
  5. मुळात, दिपीका तेथे गेली ती स्वतःया चित्रपट जाहिरातीसाठी , एक तयार यासपीठ "पिपली" मिळाले म्हणून
    हे काल विस्तृतपणे मांडले आहे

    प्रसन्नला हा मुदा टाळायचा आहे , त्याच्या व्यवसायासाठी

    ReplyDelete
  6. We are actively advocating boycotting ABP Maza . It is most anti hindu and antinational channel.

    ReplyDelete
    Replies
    1. Already stopped watching this channel after their view on Veer Savarkar.

      Delete
    2. That is why I am waiting for Repulic India's Marathi News channel

      Delete
  7. नितीमत्तेचा अंत झाला आहे , तर ती पाळुन काय करणार? कलियुग कलियुग !!!!

    ReplyDelete
  8. जुही चावलानेही भूमिका घेतली ती या अंध गुलामाला दिसली नाही.

    ReplyDelete
  9. उपेन्द्र थत्तेJanuary 10, 2020 at 12:59 AM

    याच कारणामुळे, सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद उल्लेख केल्यापासून आम्ही एबीपी माझा बघणे बंद केले आहे. प्रसन्न जोशी हा अतिशय खालच्या दर्जाचा चर्चा संयोजक आहे, हे नेहमीच तो सिद्ध करत असतो.

    ReplyDelete
  10. भाऊ तुम्ही जे लेखणीतून आसूड ओढता ना ते ज्यांच्यावर
    तुम्ही आसूड ओढले आहेत त्यांना चांगलेच सप्प होउन लागतात. आम्ही वाचक ते एन्जॉय करतो. दिव्या खालचाअंधार वाचताना ह्याचाच पुनःप्रत्यय आला. माझा विशेष ला माझा विशेष का म्हणतात ते माझा वाहिनीचे संपादक राजू खांडेकर आणि त्यांच्या वाहिनीवरील चर्चांचे संयोजक प्रसन्ना जोशी सांगू शकतील. प्रेक्षक म्हणून मला त्यात फारसे विशेष काही वाटत नाही. शेलक्या भाषेत मला
    प्रेक्षक म्हणून एकच सांगावेसे वाटते कि चर्चांचे संयोजक प्रसन्ना जोशी हे माझी किती लाल हे दाखवायला माझा विशेष मध्ये माकडाला राग येईल इतका किचकिचाट करतात. . टिव्ही मेडिया राजकारणावर भाष्य करते कि टिव्ही मेडिया होणाऱ्या राजकारणाला वळण देण्याचा प्रयत्न करते आहे ह्या ज्वलंत विषयाचे नवीन दालन दिव्या खालचाअंधार हा लेख उघडून गेला. काही म्हणा भाऊ आधी टिव्ही मेडिया नंतर अफाट क्षमतेच्या ट्विटर फेसबुक टाईप इंटरनेट आधारित सोशल प्लॅटफॉर्म्स मुळे राजकारणी दुसऱ्या प्रतिस्पर्धी राजकारण्यांना टार्गेट करायचे सोडून इंडिव्हिज्युअल व्यक्तींपर्यंत पोहचू पाहत आहेत. मग इंडिव्हिज्युअल राजकारणी इंडिव्हिज्युअल व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी मीडियावर खळबळ करून इंडिव्हिज्युअल व्यक्तींचे आयबॉल्स व कांन स्वतःवर कसे रोखले जातील ते
    ट्राय करतो आहे. अश्यातच समोरचा काहीही बोलत असताना ते ऐकायचे सोडून, त्यात व्यत्यय आणण्यालाच संयोजन समजून वागणार्‍या संचालकांनी किचकिचाट सुरु
    केलेला आहे. किचकिचाटी संचालक हि वास्तविक इंडिव्हिज्युअल राजकारणी लोकांच्यासमोरील मोठाअडथळा
    ठरतो आहे कारण इंडिव्हिज्युअल व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी मीडियावर खळबळ करून इंडिव्हिज्युअल व्यक्तींचे आयबॉल्स व कांन राजकारण्यांवर रोखले जाण्या
    आगोदरच किचकिचाटी संचालक माकड किचकिचाट करतात. मेडिया वास्तविक पाहता प्रेक्षकांचे पोलिटिकल ओपिनियन अल्टर करू शकते. किंवा मेडिया वर येणाऱ्या व्यक्तीची वागणूक बोलणे बिहेवियर लोकांपुढे ठसठशीत पद्धतीने समोर आणू शकते ( अर्णब गोस्वामी ने राहुल गांधी
    ची संपूर्ण वाट लावलेली देशाने टिव्ही वर पहिली असेल) किंवा मेडिया अत्यंत खुबीने ज्याला पब्लिक अजेंडा म्हणतात
    तो पब्लिक अजेंडा म्हणून लोकांपुढे आणू शकते. मेडिया अगदीच बाळबोध स्थितीत असताना अमेरिकेत रुझरवेल्ट साहेबानी फायर साईड चॅट मार्फत इकॉनॉमिक डिप्रेशन असताना यश मिळवले होते. रोनाल्ड रेगन १९४२ सालचा किंग्स रो ह्या गाजलेल्या चित्रपटातून अभिनेता म्हणून पुढे
    येउन आपल्या अंगभूत मीडियावरील कम्युनिकेशन स्किल्स
    मुळे अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते. मेडिया वास्तविक पाहता प्रेक्षकांचे पोलिटिकल ओपिनियन अल्टर करू शकते पण भारतात तसे झाले नाही. राजदीप बुरखा दत्त वैगैरे बिनडोकांनी घुबडासारखे फक्त मोदींना शिव्याशाप देत मीडियाला पार झोपवले. त्यामुळे मेडिया वरील कन्टेन्ट सिलेक्टीव्हली घेण्याची सवय भारतीयांनी लावून घेतली. १९१४ चे निवडणूक रिझल्ट्स येत असताना राजदीप चे
    कानफटात कुणी तरी खेचली तो ह्या मंडळींचे डोळे उघडण्यासाठीच. पण कानफटात बसली तरी जो गप्प बसत
    नाही तो राजदीप. गॅरी हार्ट हे अमेरिकेत प्रेसिडेंट होउ शकले
    असते पण त्यांचे 1988 मध्ये डोना राईस बरोबरचे लफडं मीडियाने व्यवस्थित वाजवलं व गॅरी हार्ट संपले. मेडिया चेक आणि बेलेंस करू शकते पण भारतात पुरोगामी चळवळ च्या मागे वळवळ करणे एव्हडेच मेडिया करू शकली. एकाही मीडियाने कन्हया कुमार खालिद अथवा पप्पू ची खरी
    माहिती समोर आणली नाही. पुरोगाम्यांना आवडणारी ‘भूमिका’ वटवणे. बिनदिक्कत खोटे बोलणे. गोबेल्स लाजून पळून जाईल असा पुरोगामी प्रोपगोंडा करणे, कुठेही सखोल
    चर्चा न करणे.पुरोगाम्यांना आवडणारी राजकीय ‘भूमिका’ न
    घेणाऱ्यास मूर्ख ठरवणे. जाधवपूर विद्यापीठात काही हरामखोरानी अफझल गुरु ला सपोर्ट करणारी पोस्टर्स लावलेली. जाधवपूर विद्यापीठातील बहुसंख्य मुलांनी ती पोस्टर्स फाडली. ज्यांनी अफझलगुरू ची पोस्टर्स फाडली व
    भारताच्या घटनेच्या बाजूने उभे राहिले त्यांना NDTV ने
    अभाविप चे गुंड ठरवले. भाऊ खांडेकरांचा प्रसन्न जोशी चा
    पोपट झाला आहे. मेडिया ला चौथा खांब म्हणतात. राजदीप
    बुरखा प्रणॉय प्रस्सन ह्यांच्या सारख्यांमुळे चौथ्या खांबावर
    फक्त कुत्रा तंगडी वर करतो.


























    ReplyDelete
  11. प्रसन्ना हा मराठीतील Rubbish Kumar आहे.

    ReplyDelete
  12. भाऊ,

    तुम्ही प्रसन्न भक्त आहात का? बघता कशाला ते चॅनल?

    ReplyDelete
  13. "निर्बुद्धांचे वैचारिक मुष्ठीयुद्ध" व्वा...

    ReplyDelete
  14. त्याच नाव प्रसन्न का ठेवलं तेच कळत नाही. 🤔🤔
    नेहमीच अप्रसन्न असतो...

    ReplyDelete
  15. ABP maza चा प्रसन्ना नावांचा मुर्ख माणुस, याला पञकार वगैरे कोणी केलं याच्यावर नक्कीच पीऐचडी होवु शकते. त्या प्रसन्नाला तो अॅंकर आहे का गेस्ट हेच पक्क माहिती नसतं...तो प्रश्न विचारल्यानंतर समोरच्याला निट बोलु न देता मध्येच त्यांनी न संपविलेल्या अपुर्ण ऊत्तरातुन भलताच अर्थ काढुन बरळत राहातो...
    त्याचं प्रशिक्षण अपुर्ण राहीलंय वाटतं...

    ReplyDelete
  16. प्रसन्ना जोशी हे हाताबाहेर गेलेले कारटं आहे, राजीव खांडेकर यांनी पण हात टेकले आहेत. सावरकर पुण्यतिथी निमित्त केलेल्या चर्चेतून तोंड पोळले असतांना याचा बोलण्यातील उन्माद कमी होत नाही. का घरी बायको बोलु देत नाही याचा राग हा चर्चेत आक्रमकपणे व्यक्त करतो देवच जाणे.

    ReplyDelete
  17. Thse debates are useless. It makes no difference in nations life. Channels run their set agenda. Why good people participate these debates?
    None of them want to solve issue but they make stories and debates. If they spend same money to solve the problem there will be no need to make stories.
    JNU students protest..
    No one ask simple question to them as what is their capability. In general life simple question is asked at every stage is what is your credibility in simple language Aauquat. But none ask to JNU students as what is their Aauquat. How much they earn.
    Deepika Padukone goes to support fees hike protest. What's all put together amount of fees hike? Is it 5 or 10 core? If yes is is only price of Deepika Padukone's half of one cinema earning. She should pay it to JNU management and ask students to go to study. But she is not interested in solving issue but she want to earn out of this and show how purogami she is. Almost 60 percent population is surviving on hard work of 25 percent people in contry. Every nonsense of theirs make revenue generating class to work more.
    Aandhala daltay ani kutta pith khatay.

    ReplyDelete