अखेर राहुल गांधी यांना कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याची सुबुद्धी सुचलेली आहे. वास्तविक तेच त्या पदासाठी सर्वाधिक लायक होते. म्हणूनच चार वर्षापुर्वी उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक आईनेच केलेली होती. त्यांनी तेव्हापासूनच आपले इतिहासदत्त कार्य आरंभलेले होते. त्यामुळे अध्यक्षपदी कधी विराजमान होतात, याला फ़ारसे महत्व नव्हते. शेवटी पद वा अधिकारापेक्षा कार्याला व कर्तबगारीला महत्व असते. राहुलपाशी तितके कर्तृत्व नसते तर कोणी कशाला शतायुषी पक्षाच्या नेतॄत्वाची धुरा त्यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला असता? मग राहुल जे झपाट्याने कामाला लागले आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात कॉग्रेस पक्षाची दिल्लीतील सत्ता गमावून दाखवलीच. पण पुढल्या काळात देशातल्या एकामागून एका राज्यातील कॉग्रेसच्या संघटनेचा बोर्या वाजवण्याचे काम मोठ्या हिंमतीने पार पाडलेले आहे. किंबहूना तेच तर त्यांच्यासाठी नियतीने ठरवून दिलेले कार्य आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉग्रेस ही संघटना बरखास्त करावी, असा महात्मा गांधीचा सल्ला होता, पण त्यांच्याच चेले व अनुयायांनी तो जुमानला नाही. म्हणूनच मग ते कार्य पुर्णत्वास नेण्याची कामगिरी इतक्या उशिरा राहुलना पार पाडायची वेळ आलेली आहे. राहुल ऐवजी अन्य कोणी पक्षाध्यक्ष झाला तर आणखी काही वर्षे व निवडणूका कॉग्रेस खुडबुडत जगण्याची दाट शक्यता होती व आहे. पण राहुल ते होऊ देणार नाहीत. कारण ती श्रींची इच्छा नाही. कॉग्रेस नामशेष व्हावी. म्हणजे तिचे भारतीय राजकारणातील स्थान संपून जावे, ही नियती आहे. पण ते काम सहजासहजी होत नसते. कुणाला तरी पुढाकार घेऊन ते तडीस न्यावे लागते. राहुल आता त्या कामाला जुंपून घेत आहेत. मग त्यांनी निवडणूकीच्या मार्गाने अध्यक्षपद मिळवले की गडबडी करून मिळवले, असल्या वादात शिरण्याची काय गरज आहे?
इब्न खालदून नावाचा इतिहासकार म्हणतो, कुठल्याही साम्राज्याचा र्हास त्याच्या संस्थापकाचा तिसरा चौथा वारस वंशजच करीत असतो. त्याची मिमांसाही खालदूनने पाच शतकांपुर्वी करून ठेवलेली आहे. साम्राज्य वा सत्ता प्रस्थापित करणारी एक टोळी असते आणि त्या टोळीतले सर्व सहकारी एकमेकांचे जीवाभावाचे मित्र असतात. ते एकमेकांसाठी जीव द्यायला सज्ज असतात आणि त्यांचा म्होरक्या असतो, तो त्यातला कर्तबगार नेता असतो. सहाजिकच त्यांच्या पराक्रमाला यश मिळाल्यावर सत्ता मिळते वा साम्राज्य उभे रहाते, तेव्हा म्होरक्या नवा राजा होतो. तर त्याचे सहकारी समान दर्जाचे असले तरी सरदार म्हणून त्यात सहभागी होतात. राजाही त्यांना समान दर्जाची वागणूक देत असतो आणि त्यांचा पुर्ण मानसन्मान राखत असतो. अंतिम निर्णय घेण्यापलिकडे सर्वांचे अधिकार जवळपास सारखे असतात. अंतिम शब्द मात्र नेत्याचा असतो. पण असे राज्य साम्राज्य स्थापन झाल्यावर पुढल्या पिढीत हे संबंध तसेच रहात नाहीत. पुढल्या पिढीतली सत्ता व तिची व्यवस्था जन्माधिष्ठीत असते. म्हणूनच राजाचा मुलगा राजा व सरदारांची मुले सरदार होतात. त्यांचे परस्पर हितसंबंध सत्तेमध्ये सामावलेले असतात आणि म्हणूनच त्यांची निष्ठा राजाशी म्हणजे सत्तेशी असते. या पुढल्या राजाला कर्तृत्वाने नव्हेतर वारसा म्हणून सत्ता मिळालेली असते आणि सरदारांनाही वारसा हक्काने सत्तेचा हिस्सा मिळालेला असतो. सहाजिकच सदरार आश्रित व लाचार असतात. त्यांना लढायची इच्छा नसते, तर हाती आहे ते जपण्याची व ऐषोआरामाची फ़िकीर असते. त्यांना लढण्यात कमीपणा वाटतो. ते पगारी लोक लढायला नेमतात आणि आपापल्या सत्तेची मौज लुटत असतात. अशा अनुभवातून तिसरी पिढी सत्तेत येत असते आणि तिने कर्तृत्वाचा लवलेश बघितलेला नसतो. त्याला तर मनगटाच्या बळावर सत्ता संपादन करणारा आजोबा लज्जास्पद वाटू लागतो. ती र्हासाची सुरूवात असते.
राहुल गांधी योगायोगाने नेहरू घराण्याच्या चौथ्या पिढीतले आहेत आणि त्यांच्या वागण्यातून वा कॉग्रेसी सरदारांच्या वागण्यातून ती सरंजामशाही जशीच्या तशी आपल्याला बघायला मिळत असते. आज कॉग्रेसचे श्रेष्ठी ज्येष्ठ म्हणून जे कोणी गणले जातात, त्यापैकी एकालाही आपल्या कर्तबगारीबे सत्ता वा अधिकार मिळालेले नाहीत. त्यांना सोनिया राहुल वा त्यांच्याही पुर्वीच्या इंदिरा राजीव यांच्या मेहरबानीने सत्तापदे मिळालेली आहेत. सहाजिकच ते घराणे जोवर सत्तेत आहे वा प्रमुखपदावर आहे, तोवरच आपली सद्दी चालणार हे प्रत्येक सरदाराला ठाऊक आहे. म्हणूनच त्यांच्या निष्ठा घराणेशाहीला वाहिलेल्या असल्यास नवल नाही. मात्र राज्य टिकवणे वा विस्तारणे ह्या बाबी नुसत्या वारशातून येत नसतात, तर मनगटाच्या व कर्तबगारीच्या बळावर येत असतात. राहुलपाशी त्याचा लवलेश नाही. पण जे काही सत्तेचे अवशेष शिल्लक आहेत, त्यातला मिळणारा हिस्साही खुप मोलाचा आहे. नव्या व्यवस्थेत नव्याने आरंभ करावा लागेल आणि तितका पल्ला गाठण्यासाठी आवश्यक असलेले कर्तृत्व कॉग्रेसच्या कुठल्याही नेत्यापाशी आज उपलब्ध नाही. अपवाद सिद्धरामय्या किंवा अमरिंदरसिंग यांच्यासारखे आहेत. त्यांच्याशी राहुल कसे फ़टकून वागतात हे आपण अनेकदा बघितलेले आहे. सहाजिकच अशा लोकांना खड्यासारखे बाजूला ठेवून कॉग्रेस पुन्हा उर्जितावस्थेला येणे शक्य नाही. त्यापेक्षा त्या पक्षाचे विसर्जन हे नियतीने लिहून ठेवलेले विधीलिखीत आहे. पण ते सत्तालोलूप लोकांना कसे पटावे? त्यांना पुन्हा राहुल सत्ता मिळवतील व आपल्याला मंत्रीपदे उपभोगता येतील, असा खुळा आशावाद वाटत असला तर नवल नाही. पण राहुलना त्याच्यातही रस नाही. कारण सत्ता असणे वा नसणे यातला फ़रकही राहुलना कळत नाही. खरे तर कुठल्याही गोष्टीतला फ़रक या माणसाला कळत नसेल, तर सत्तेची काय महत्ता?
१९५७ सालापासूनच नेहरूंच्या हयातीमध्ये लोकांनी कॉग्रेसला पर्याय शोधण्याला आरंभ केलेला होता. पण मध्यंतरी इंदिराजींच्या हस्तक्षेपामुळे ते मरण पुढे ढकलले गेले होते. पुढे जेव्हा असे प्रयत्न झाले तेव्हा अवसानघातकी विघ्नसंतोषी समाजवादी मंडळींनी विरोधी राजकारणाशी दगाबाजी करून कॉग्रेसला वारंवार जीवदान दिलेले होते. त्यामुळे मरगळली कॉग्रेस वठलेल्या वटवृक्षासारखी टिकून राहिली इतकेच. कोणी तरी पर्याय म्हणून पुढे येण्याची प्रतिक्षा काळ करीत होता आणि २०१४ सालात तोच योग जुळून आला. एका बाजूला राहूलनी आतुन कॉग्रेस ढासळून टाकण्याचा विडा उचलला, तर बाहेरून त्या शतायुषी पक्षाला धडका देण्याची कामगिरी नरेंद्र मोदींनी पार पाडली. आता मोदींनी सरकार बिनबोभाट चालवून दाखवलेले असल्याने भारताला कॉग्रेस नावाच्या बुजगावण्याची अजिबात गरज उरलेली नाही. मात्र उरलासुरला सांगाडा जमिनदोस्त व्हायचे काम बाकी आहे. ते मतदार आपल्या गतीने करीत असला, तरी त्याला वेग आतून मिळायला हवा. राहुल यांच्याखेरीज ते काम कोण उत्तमरित्या कार पाडू शकेल? जे काम २०१४ सालात अर्धवट राहिलेले आहे, ते २०१९ सालात तडीस नेण्याची जबाबदारी आता राहुलनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. नियतीनेच त्यांना त्यासाठी अध्यक्ष पदावर बसवण्याची योजना आखलेली आहे. म्हणून तर त्यांनी अध्यक्ष व्हावे, ही श्रींची इच्छाच म्हणायला हवे. २०१९ सालात पुन्हा मोदी किती जागा जिंकतील? अन्य कोणी काय बाजी मारून जाईल वा आघाडीचे युग पुन्हा येईल काय? असे प्रश्न निरर्थक आहेत. बाकीच्या राजकारणाचे व्हायचे ते होईलच. पण कॉग्रेस पक्षाचे पुर्ण विसर्जन करण्याची जबाबदारी राहुल यशस्वीपणे पार पाडतील, याविषयी मनात शंका बाळगण्याचे काही कारण नाही. कारण आपल्यावर नियतीने सोपवलेले काम गंभीरपणे पुर्णत्वास न्यायला राहुल आता कटीबद्ध झालेले आहेत. त्यांना मनपुर्वक शुभेच्छा!
तथास्तु, तथास्तु, तथास्तु।
ReplyDeleteWa, Ho Jane do !!! :-)
ReplyDeleteभाजपा चे अभिनंदन फफू ची निवड अटल
ReplyDeleteकाँग्रेस संपल्यानंतर मोदी-शहांची नोकरी जाईल का? भा ज पा वाले काय काम करतील?
ReplyDeleteया प्रश्णांची उत्तरे माहिती असुन ही दिली नाहीत तर, भाऊ . . . . . तुम्हाला विक्रम-वेताळाची गोष्ट माहिती आहेच.
Mi BJP cha samarthak ahe pn ha lekh matra purnapane ekatarfi watat ahe bghu shrinchi iccha kay ahe te
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteभाऊ जरा जास्त होतय... राजकारणात कधीही काहीही होऊं शकते..
ReplyDeleteyou are biased, there has to be good opposition, and non other then congress it can be, if at all congress wants to be successful then Rahul has to give charge to persons like Scindia or Pilot I feel they are more capable to really take congress as good opposition party
ReplyDeleteYes, there has to be opposition!
DeleteBut like Congress..? NO! At least not this Congress..
This Congress is purely concentrated on one family and not the country!
Political parties should be like BJP where democracy is crucial part of their system.
One family should not be in centre of everything..
When this will change.. then congress will surely able to tackle Strong opposition like Modi-Shah..
People of India are really waiting to see some strong opposition who questions BJP for there wrong decisions..
अशा भ्रष्टाचार, ऐशोआरामी, पुरेपुर घराणेशाही, हायकमांड कलचर, आणिबाणी हुकुमशाही, मुस्लिमांचे लंगुचालन, हिंदू विरोधी गेल्या तीन दशकातली काँग्रेस यापुढे सत्तेवर तर सोडा विरोधी पक्षात पण नको. परंतु अनेक आपल्या सारख्या दलाल व हिंदू विरोधी, लाळ घोटाळ्यांना ऐशोआरामात पैसे कमावण्यासाठी अशा पक्षाची तळी उचलुन स्वार्थ साधायचा आहे. यामुळेच अशा भारतीयां मुळे हा देश हजारो वर्षे पारतंतत्र्यात लोटला गेला आहे. ज्यांना वैयक्तिक स्वार्था पुढे देशाचा धर्चा बळी दिला.एकेएस
DeleteCongress is no more a political party, it is a "culture", and "corruption" is an ideology of this culture. So, no more this Congress, and more GANDHI'S.
Deleteएका "माफिया फॅमिलीचा" सरदार बदलला.
ReplyDeleteGadgil Kulkarni Joshi abhyabkar ya lokankadun ankhi Kay apeksha Karnar, Karun sarun me nahi bay tyatli.
Deleteमा.पंतप्रधान किती भाग्यवान आहेत...
ReplyDeleteपहिली ५ वर्षं पूर्ण करण्याआधीच ही "इष्टापत्ती" होऊ घातली आहे.
काँग्रेसच्या या स्तिथी बद्दल एकट्या राहुलना जबाबदार धरणे जरा एकतर्फी होईल. बाजूला बसणारे सरदार ह्याला जास्त जबाबदार आहेत. त्यांनी कधीच राहुलना मोलाचे सल्ले दिले नाहीत. शिवाय बाळ हट्टापुढे माऊली पण हतबल झाली. साहेबानी ही परिस्तिथी 20 वर्षापूर्वीच ओळखली होती व त्यातून बाजूला झाले.
ReplyDeleteआणि तीच तर मोठी चूक होती...!
Deleteनाहीतर आज पंतप्रधान झाले असते..