Monday, December 18, 2017

गुजरातच्या निकालाचा धडा

modi gujarat cartoon के लिए इमेज परिणाम

निवडणूक निकाल हे जागांच्या आकड्यावर बघितले जातात आणि त्यावरच सत्तेचे गणित अवलंबून असल्याने बाकीचे तपशील कधी चर्चेत येत नाहीत.. पण दिर्घकालीन राजकारणाच्या अभ्यासकांना उरलेले तपशीलच महत्वाचे असतात. आताही हिमाचल व गुजरात या दोन राज्यात बहूमताचा आकडा भाजपाने पार केलेला असेल, तर जिता वही सिमख्दर या उक्तीप्रमाणे भाजपाने बाजी मारली, असेच म्हणावे लागेल. पण कॉग्रेसकडून हिमाचल हिसकावून घेताना भाजपाला गुजरातमध्ये कशीबशी सत्ता टिकवण्या इतक्याच जागा मिळालेल्या आहेत. सहाजिकच मोदींच्या मागे गुजरात भाजपासाठी कोणी वाली नाही, असे म्हटले गेल्यास नवल नाही. प्रामुख्याने कालपर्यंत ज्या राहुल गांधींची पप्पू म्हणून टिंगल केली जात होती, त्यांनी एकहाती नेतृत्व व प्रचार संभाळून गुजरातमध्ये भाजपाला शह देण्यापर्यंत मजल मारली असेल, तर त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. पण इतक्या निकालाच्या बळावर आगामी लोकसभेची समिकरणे मांडणे धाडसाचे होईल. याचे पहिले कारण म्हणजे मागल्या खेपेस मोदींनी गुजरात जिंकून दिल्लीला गवसणी घातलेली होती. पण त्यांच्याच बालेकिल्ल्यात राहुलनी मोदींना शह दिला, असेही आता म्हटले जाणार आहे. ते वरकरणी खरे असले तरी जी स्थिती गुजरातमध्ये होती, तीच तशीच उर्वरीत भारतात पुढल्या लोकसभा निवडणूकीत असेल काय? याचाही विचार पुढली समिकरणे मंडताना करावा लागतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे भाजपाच्या जागा कमी झालेल्या असल्या, तरी त्याचा गुजरातमधील मतांचा हिस्सा घटलेला नाही. उलट मतांची टक्केवारी किंचीत वाढलेलीच आहे. तशीच कॉग्रेसचीही टक्केवारी वाढलेली आहे. मग ही दोघांची वाढलेली मते कुठून आली व त्याचा पुढल्या राजकीय समिकरणावर काय परिणाम होऊ शकेल, त्याला अधिक महत्व आहे. पण निकालाच्या चर्चेत त्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही.

मागल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपा व कॉग्रेस यांच्या मतांच्या टक्केवारीत जवळपास साम्य असले, तरी भाजपा तिसर्‍या क्रमांकावर गेलेला होता आणि कॉग्रेसला मात्र स्वबळावर बहूमत मिळून गेलेले होते. गुजरातमध्येही यापुर्वीच्या निवडणूकात भाजपापेक्षाही सात आठ टक्के मते कमी असताना कॉग्रेसला जागा मात्र अनेकपटीने कमी मिळत होत्या. त्यात थोडी भर हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश यांच्यामुळे पडली आणि कॉग्रेसने मोठी बाजी मारलेली दिसते. हे निकाल बघून राष्ट्र्वादीचे नेते प्रफ़ुल्ल पटेल यांनी मारलेला टोमणा कोणी फ़ारसा लक्षात घेतलेला नाही. निवडणूकीपुर्वी त्या पक्षाने कॉग्रेस सोबत जाण्याचा संकेत दिला होता. पण हार्दिक वा अल्पेश यांच्या नादाला लागलेल्या राहुल व कॉग्रेसने राष्ट्रवादीला काडीची किंमत दिली नाही. मतदानात त्यांनी पन्नास जागी उमेदवार उभे केलेले असतील, तरी त्यांच्या बालेकिल्ल्यात ती मते कॉग्रेसला लाभदायक ठरली असती. काठावर पराभूत होणार्‍या कॉग्रेस उमेदवारांना राष्ट्रवादीने तारून नेले असते. तर निकालात जमिन अस्मानाचा फ़रक दिसला असता. आठदहा जागा जरी राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने इथल्या तिथे झाल्या असत्या, तरी भाजपाला बहूमताचा पल्ला ओलांडता आला नसता. म्हणजेच त्या पक्षाची दोनअडीच टक्के जी काही मते असतील, ती सोबत घेण्याचे नाकारून राहुलनी निर्णायक चुक केलेली आहे. बहूमताच्या पुढे सहाआठ जागा भाजपाला अधिकच्या मिळाल्या आहेत, त्याच गमावल्या असत्या तर आज भाजपाला पुढल्या लोकसभेसाठी घरघर लागली असती. मोदींच्या प्रतिमेला मोठा दणका बसला असता. आज निकाल बघितल्यावर असे शहाणपण शिकवणे सोपे असले तरी नेत्याच्या बाबतीत तशा दुरदृष्टीची अपेक्षा असते. राहुल व कॉग्रेस तिथेच तोकडे पडलेले आहेत. कदाचित त्यांनाही इतक्या मोठा यशाची अपेक्षा आरंभी नसावी.

गुजरातच्या निवडणूकीत जागांपेक्षा एक बाब अतिशय महत्वाची आहे, ती मतांच्या धृवीकरणाची! मागल्या चार निवडणूकात चाळीशीच्या अलिकडे अडकून पडलेल्या कॉग्रेसी मतांमध्ये चारसहा टक्के झालेली वाढ, ही भाजपाकडून आलेली नाही. ती मते इतर पक्षांकडून कॉग्रेसकडे आलेली आहेत. त्यात राष्ट्रवादी वा अन्य लहानसहान स्थानिक पक्षांचा समावेश आहे. मोदी विरुद्ध बाकी सगळे, याची ही सुरूवात आहे. मागल्या काही दिवसात बिगर कॉग्रेसी पक्षांनी मोदी विरोधासाठी कुठल्याही बाबतीत कॉग्रेस व राहुल यांची तळी उचलून धरलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. ज्या मतदाराला भाजपाला हरवण्याची उत्सुकता आहे, त्याच्यासाठी कॉग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचा संकेत त्यातून दिला जात असतो. इथल्या वाहिन्या वा माध्यमातून बिगरकॉग्रेसी अन्य पक्षाचे नेते प्रवक्ते ज्याप्रकारे कॉग्रेसची बाजू मांडताना दिसतात, त्यातून जनतेकडे एक संदेश पाठवला जात असतो, की पर्याय आम्ही नव्हेतर कॉग्रेस आहे. हेच १९९९ नंतर महाराष्ट्रात झाले आणि २००४ नंतर देशाच्या विविध भागात झाले. अशा प्रत्येक ठिकाणी त्या अन्य बिगर भाजपा पण बिगर कॉग्रेसी पक्षांचा मतदार क्रमाक्रमाने कॉग्रेसच्या गोटात गेलेला दिसेल. महाराष्ट्रात शेकाप जनता दल, कम्युनिस्ट वा रिपब्लिकन पक्ष अशाच वागण्याने अस्तंगत होऊन गेले. त्यांचे नामोनिशाण आता शिल्लक उरलेले नाही. त्याचीच लागण या मतदानात गुजरातमध्ये झालेली आहे. भाजपाची मते घटलेली नसताना कॉग्रेसची वाढलेली मते व जागा त्याचे द्योतक आहे. त्याचा भविष्यातील धोका अशा भाजपाविरोधी पक्षांना आहे. महाराष्ट्रात तसा धोका राष्ट्रवादी वा शिवसेनेला असू शकतो, तर उत्तरप्रदेशात मायावती मुलायमचस आणि बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला असू शकतो. त्यांच्या मतदाराने पर्याय म्हणून कॉग्रेसकडे वळण्याची प्रक्रीया सुरू झाल्याचे हे लक्षण आहे.

राहुल गांधी यांनी नोटाबंदीनंतर खुप काहूर माजवले होते. पण तरीही बाकीचे पक्ष त्यांच्या मागे उभे राहिलेले नव्हते. तेव्हा राष्ट्रपतींकडे जाण्याच्या विषयावर सोनियांना पुढाकार घ्यावा लागलेला होता. पण वर्षभरानंतर आता तमाम विरोधकांनी राहुलचे नेतृत्व मान्य केल्यासारखी परिस्थिती आहे. राहुल किती प्रभावशाली नेता आहेत वा मोदी विरोधात कुठवर टिकू शकतील, हा नंतरचा प्रश्न आहे. पण त्यांनी कॉग्रेसला गुजरातमध्ये मिळवून दिलेले यश, हे अन्य बिगर भाजपा पक्षांच्या जीवावर उठलेले यश आहे, ही बाब लक्षणिय आहे. त्याचे परिणाम पुढल्या काळात कर्नाटकात दिसतील. गुजरातमध्ये राष्ट्रवादीशी सोबत नाकारणार्‍या राहुलनी कर्नाटकात देवेगौडांशी हातमिळवणी नाकारली, तर जनता दल सेक्युलर पक्षाच्या मतांचे धृवीकरण होऊन कॉग्रेसकडे मोठ्या संख्येने ती मते वळणार आहेत. त्यात देवेगौडांच्या पक्षाला धोका आहे. त्याची कसोटी पुढल्या चार महिन्यातच लागणार आहे. तशाच वाटेने राजकारण जाऊ लागले, तर २०१९ ची लोकसभा निवडणूक येईपर्यंत बहुतेक बिगर भाजपा पक्षांना राहुलचे नेतृत्व स्विकारून मतविभागणी टाळण्यासाठी कॉग्रेसच्या आघाडीत सहभागी व्हावे लागेल. दिल्लीत बसलेले अनेक राजकीय अभ्यासक व विश्लेषक त्यासाठी दबाव निर्माण करतील आणि तसे झाल्यास कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागेल. त्याचा मोदींच्या नेतृत्वाला वा भाजपाला मोठा धोका नसून अन्य पक्षांच्या अस्तित्वाला मात्र आव्हान उभे रहाणार आहे. गुजरातच्या निकालाचा हा मोठा राजकीय संकेत आहे. त्यातून प्रत्येक बिगर भाजपा पक्षाने आपापला धडा शिकणे व भूमिका निश्चीत करणे आवश्यक आहे. बाकी भाजपाच्या जागा गुजरातमध्ये कितीने घटल्या व मोदींचे नाक कसे कापले गेले; त्याचा आनंदोत्सव करायला काहीही हरकत नाही. पण आपली मायावती मुलायम होऊ नये याचाही विचार करावाच लागणार आहे.

9 comments:

  1. Bhau
    You are counting every negligible act of Pappu at same time you are neglecting Modi / Shah achievement.

    Anyways you have your view however the only message from this Result is Modi is the only Option for majority of this countrymen.

    Thou Modau is maligned to an extent that never a PM had been still the comman man stands with him.
    Now about 2019, No in 2024 also this picture wont change.
    Opponents may play n no. of dirty tricks they did now OR they can hire advisors like you too.

    It wont work, The only thing is MODI / BJP is future of this nation & public is well aware of it.

    Again you are considering only political angles however there are Many other aspects that impacts the public opinion & people like you too cant identify that as I feel.

    Any ways you seems little nervous As BJP got majority, Still I would like to congratulate you too.

    Vande Mataram
    Bharat Mata Ki Jay.

    ReplyDelete
  2. वेगळी मांडणी. वेगळा विचार. ब्रांड भाऊ.

    ReplyDelete
  3. it will be too early to comment, however BJP needs to put lot more efforts to really gain 2019 from now only, when actual LOKSABHA elections will come the opposition parties will not come together, as they know by accepting congress leadership they will be no more, which otherwise also it will be as you said rightly

    ReplyDelete
  4. हा मुद्दा दुर्लक्षित आहे. मित्रमंडळींमध्ये चर्चा करताना हा मुद्दा चर्चेला आला तेव्हा बहुतेकांनी हसण्यावारी नेला.या निवडणुकींने धृवीकरणाची प्रक्रिया वेग पकडू लागेल असे वाटते.

    ReplyDelete
  5. he hi laskhat ghena titkach avashak ki rahul gandhi he bail var baher aahet national herald case madhe , ekda hya vishayavar pan sir tumcha lekh zala pahije , saglya chavya subramanian swamy yancha hatat aahet , ani te vyaktimatva sadha nahi !! te purna kartil he chakra rahul ani soniya yancha var karvayi honyacha

    ReplyDelete
  6. भाऊ भारतीय राजकारणात कसे फासे ऊलट सुलट पडतात हे आपण अनेक लेखात सांगितले आहे. या लेखा बद्दल धन्यवाद.
    या निकाला मुळे मोदी आणि टिमला परत एकदा शेतकरी व सामान्य माणसाच्या प्रश्ना कडे लक्ष द्यायला भाग पाडेल असे वाटते. पण राजकीय पंडीत अनेक समिकरणे मांडतील व मोदींना गुमराह करतील. अनेक रस्त्यावर फिरणार्या मिडियाच्या बुमरना सामान्य माणूस व व्यापारी मोदी सरकार कडवे डोस जरा जास्तच देतय हे सांगत होते. पाहुया या भारत वर्षांत मोदी टिमला काही सुबुध्दी/सामान्य माणसाच्या लंगुचालनाची बुद्धी देतात काय. कारण दिल्ली ची हवाच तशी आहे. अनेक विचारवंतांच्या कडबोळ्यात भले भले बेसिक विसरुन दिल्ली कर होतो.. मोदी त्याला अपवाद आहेत का हे पुढील 15-16 महिन्यात सिद्ध होइल. का परत भ्रष्टाचारी सत्तेवर येतात व ये रे माझ्या मागल्या करतात? हेच भारतीयांच्या नशिबात आहे.
    जणू काही इव्हीएम, निर्गुंतवणूक, फाॅरेन मनी मागे भारतातील मुलभुत समस्यांची विसर दिल्लीतील हवेत पडतेच का हे काळच ठरवल. व मोदी एकाच वेळी विधान सभा व लोकसभा, निर्गुंतवणूक, अमेरिके प्रमाणे अध्यक्षीय लोकशाही, ( त्यांना जवळपास च्या चौकडी ने याची सुरुवात काही निवडणूका मध्ये करुन दिली आहे. आता काँग्रेस ला व विदेशी ताकतीना नक्कीच माहिती आहे कि गांधी घराण्या भोवती भारतीय राजकारण फिरत रहाणार. आणि आडाणी जनता सहज मायाजालात फसणार. भारतीय नागरिक (लाॅजवासी) व अमेरिकेन जनता यात जमिन आसमानाचा फरक आहे. पण हे होणारच असे वाटते.
    आता भाजपला हे सर्व करायला कोण प्रमोद महाजन च्या स्वरुपात मिळतो हे काळच सांगेल.
    भारताची आवश्यकता अन्न, विज पाणी, शिक्षण हि आहे हे मोदींना कोण सांगणार?
    काय गंमत आहे बघा कारण गुजरात निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस वाले भाजपला प्रश्न विचारुन हैराण करत होते. ज्या पक्षाने व आपल्या शिक्षकांच्या/अधिकारी/युनियन ( यनियन नसेल तर भारतीय बिझनेसमन नोकरांना लुटणार व युनियन च्या नावाखाली नोकर मजा मारणार) व कार्यकारी मंडळ सरकारी सिईओ यांनी भारतीय शाळा व अनेक नवरत्न कंपन्या ची विल्हेवाट लावली व तेच आता विचारतात शिक्षण महाग झाले.
    भाऊ या सर्व परिस्थितीत आपण नेटाने लेख लिहून समाज प्रबोधन करत आहात व आता साक्षात शहा मोदी जोड गोळी ला पण याची जरुर आहे कारण पन्ना वाले चे बुथ जरा हलले आहे.
    एकेएस

    ReplyDelete
  7. काही वेळा वाटते ईव्हीएम चालू करणं हे भाजप वरच ऊलटलय..
    कारण मिडियावाले व इतर पुरोगामी यांनी गुजरात निवडणूकीच्या वेळी घटनांची सिरियल अशी लावली की ईव्हीएम जणु काँग्रेस च्या वळचणी खाली वाढलेली नोकरशाही पाहिजे तशी फिरवू शकते असा भ्रम होतो व शिक्षण महाग झाले म्हणणारेच अनुभवी लोक ईव्हिएम फिरवता येते असे आरोप करतात.. भारतासारख्या भ्रष्टाचारी व स्वार्थी लाॅजवासियांच्या देशात असे प्रयोग करण्यासाठीच काँग्रेस विरोधी पक्षाला सत्तेवर बसवते का हा एक यक्ष प्रश्न आहे ???? भाऊ तुम्हीच याची उकल करु शकतात..
    मोदी शिक्षणाचे राष्ट्रीयकरण ईंदेरीच्या बँक राष्ट्रीयकृत प्रमाणे करतात का व राष्ट्रीय बँकांचे निर्गुंतवणूक करण्या साठी या वेळी विरोधी पक्ष सत्तेवर आलाय का हे तुम्हीच सांगु शकता..
    एकेएस

    ReplyDelete
  8. अंजली कार्लेकरDecember 18, 2017 at 2:30 PM

    बरोबर!
    हा मुद्दा लक्षात आला नव्हता.

    ReplyDelete
  9. भाऊ
    हार्दिक ला विशीत असताना एवढा हिरो बनवला.. मिडियावाले रंकांचा राजा करुन भारतीय राजकारणात जात पात धर्म या विषयावर पोलराझेशन परत परत करुन दाखवतात. असे अनेक हिरो (केजरीवाल, अण्णा, कन्हैया कुमार, ) मिडियावाले करत आहेत. पण यांचे आता पर्यंत चे कर्तुत्व काय? हे कोणी मिडियावाले मुद्दामुन विचारत नाहीत. कारण देश विधायक नेतृत्वाला नेस्तनाबूत करणे व भारता सारख्या सुजलाम सुफलाम देशाला कायम पंगू ठेवणे हाच एक अजेंडा त्याना अदभुत शक्तीने आखुन दिला आहे. व पिटर मुखर्जी, मणी शंकर, प्रणब राय, केजरीवाल, शोभा डे, पाटकर, तिस्ता सेटलवार, अरुंधती राॅय, कुमार केतकर, प्रसुन वाजपेयी, रजदीप सरदेसाई या सारखी पलटण भारतीय लाॅजवासींना सहज गुमराह करतात..
    काँग्रेस ला पाठिंबा देऊन तुम्ही भ्रष्टाचारी, देशाच्या मुलभुत सिद्धांताला, फौंडेशनला धक्का पोहचवणार्या पक्षाला साथ देत आहेत का हे विचारून हैराण करत नाहीत. त्यामुळे असे उपटसुभं सहज कोणालाही लोळवु शकतात. व जसे हार्दिक पांड्या दोनचार शटकात आडवे तिडवे फटके मारुन पुर्ण बाजी फिरवतात तसेच भारतीय राजकारणात होत आले आहे होत राहिल. खंबीर देश भक्त पडत राहतील गुमराह होत राहतील.. आम्ही आहे तसेच राहु.. जाऊ तिथे खाऊ..
    चमडी देंगें लेकिन दमडी नहीं देंगें.

    ReplyDelete