Sunday, May 1, 2016

कन्हैया कुठून निपजतात?

गेल्या काही दिवसात पुरोगामी म्हणजे देशद्रोही, अशी एक प्रतिमा तयार होत असताना एक नवे प्रकरण समोर आले आहे. फ़ेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या नेहरू विद्यापीठातल्या काही मुलांनी अफ़जल गुरूच्या फ़ाशी विरोधात श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे जमलेल्या घोळक्याने देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल खुप काहुर माजले होते. त्यात विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार सहभागी असल्याने, त्याला अटक झाली होती. मग अविष्कार स्वातंत्र्याचे नवे नाटक सुरू झाले. अर्थातच कन्हैयाकुमारला बळीचा बकरा बनवल्याचे सिद्ध करण्याची सेक्युलर स्पर्धा सुरू झाल. काही अटीवर त्याला कोर्टाने जामिन दिल्यापासून त्याचे देशभर दौरे सुरू झाले आहेत. असो, पण राजधानी दिल्लीत व सरकारी अनुदानावर चालणार्‍या विद्यापीठात देशद्रोहाचा इतका मोठा अड्डा चालतो, हे ऐकून अनेकांना धक्का बसला होता. ‘भारत तेरे टुकडे होगे’ अशा घोषणा देण्याने देशद्रोह होत नाही, असेही युक्तीवाद झाले. आपल्याला राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम कोणी शिकवू नये, असेही दावे करण्यात आले. अर्थात त्यातही नवे काही नाही. पण विद्यापीठातली ही नवी बुद्धीमान पिढी इतकी टोकाची देशविरोधी कशी निपजली, याचे करोडो लोकांना आश्चर्य वाटले होते. त्यातही प्रामुख्याने ज्यांना विचारवंत बुद्धीवादी म्हणतात, अशी नामवंत माणसे त्या देशद्रोहाच्या बाजूने कशी समर्थनाला उभी ठाकतात, त्याचेही लोकांना आश्चर्य वाटले होते. आता त्याचा उलगडा होतो आहे. ज्या मुलांवर असेच संस्कार केले जातात आणि देशप्रेम म्हणजे फ़ालतु गोष्ट असल्याचे दिवसरात्र त्यांच्या मनावर बिंबवले जात असेल, तर दुसरे काय होणार? हे कसे होते व कशामुळे होते, त्याचा खुलासा दिल्ली विद्यापीठात इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाने केला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर मानल्या जाणार्‍या भगतसिंग वगैरेंना दहशतवादी संबोधून, या मुलांच्या मनात विष कालवण्याचा उद्योग अखंड चालू होता.
देशाला स्वातंत्र्य मिळून आता सात दशकांचा कालावधी होत आला आहे. पण या कालखंडामध्ये बहुतांश वर्षे नेहरू खानदानाचेच राज्य राहिले आहे. किंबहूना त्याचीच पायाभरणी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली. त्यासाठी नेहरूंची स्तुती व भलावण करू शकतील, अशा प्राध्यापक, अभ्यासक, बुद्धीमंतांना कायमस्वरूपी वतने देण्यात आली. त्या वतनांची शासकीय तिजोरीतून व्यवस्था लावण्यासाठी अनुदानित संस्थांचे एक जाळे उभे करण्यात आले. इतिहास, शिक्षण, संस्कृती, कला, साहित्य, समाजकारण अशा क्षेत्रामध्ये पांडित्य गाजवणार्‍यांची ही कायमची सोय लावण्यात आली. राजकीय सत्तेसोबतच सांस्कृतिक जीवनावर नेहरू खानदानाचाच वरचष्मा राहिल, याची दिर्घकालीन व्यवस्था करण्यात आली. त्यात राजकारण संभाळायला कॉग्रेस नावाचा पक्ष व संघटना त्यांच्यापाशी होतीच. पण विचारांच्या चर्चेच्या क्षेत्रातून उठाव होऊ नये, याची सज्जता या वतनदारांकडून करण्याचा घाट घातला गेला होता. तो किती यशस्वी झाला, ते सध्या अनुभवास येत आहे. नेहरू भारताचे भाग्यविधाते होते आणि त्यांच्या खानदानात जन्मलेला कोणीही भारतीयांचा उद्धारक असेल, अशी एक मानसिकता निर्माण करण्याचा हा उद्योग अशा विविध संस्था व संघटनांमार्फ़त चालविला गेला. त्यासाठी मग नेहरूंच्या प्रतिमेला बाधा येऊ नये, म्हणून खर्‍याखुर्‍या प्रत्येक स्वातंत्र्यवीराला व क्रांतिकारी शहीदाला जनमानसातून खच्ची करण्याचे षडयंत्र अखंड राबवले गेले. सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस ही त्यातली ठळक नावे. आता चव्हाट्यावर आलेले दिल्ली विद्यापीठाचे पाठ्यपुस्तक नवे नसून, सहा दशके जुने आहे. त्यात भगतसिंग सारख्यांना ‘क्रांतिकारी दहशतवादी’ अशा शब्दांनी संबोधित करण्यात आले आहे. त्यावरचा पडदा उठला, तेव्हा अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये सारवासारव करू लागले आहेत. चुक असेल तर दुरूस्त करावी, अशी मखलाशी सुरू झाली आहे.
अभ्यासक संशोधक वा बुद्धीमंत म्हणजे आम्ही! आणि या आम्हीमध्ये तथाकथित डाव्या वा पुरोगाम्यांना सोडून कुणालाही प्रवेश असू शकत नाही. त्यातही विचाराने डाव्या असण्याने भागत नाही, तो नेहरू खानदानाचा भक्त असायला हवा. देशाविषयी स्वातंत्र्य चळवळीबद्दल किंवा भारतीय परंपरांविषयी त्याला कमालीचा तिटकारा असायला हवा. अशाच लोकांचे अड्डे तयार करून, त्यांना वैचारिक व्यासपीठे किंवा अभ्यासपीठे ठरवण्यात आली. त्या चाकोरीत बसणार नाही, त्यांना सार्वजनिक क्षेत्रात स्थान असता कामा नये. आणि तसा नुसता प्रयत्नही झाला तरी, त्यांचे विनाविलंब खच्चीकरण करण्याला बुद्धीवाद ठरवले गेले. भगतसिंग तर संघातला वा हिंदूत्ववादी नव्हता. म्हणून त्याला ‘क्रांतिकारी’ अशी सवलत देण्यात आली. पण तरीही त्याला दहशतवादी बिरूद जोडले गेले. सावरकर वा इतरांच्या वाट्याला अखंड हेटाळणीच येत गेली. कारण त्यांच्या विचारांनी कृतीने लोक भारावले, तर नेहरू नावाचे पाखंड टिकणार नव्हते. या दुरगामी योजनेला आलेली विषारी फ़ळे म्हणजे कन्हैयाकुमार होय. हा पोरगा अशी वटवट कशाला करतो आणि त्याच्या मागे तमाम नेहरूवादी बुद्धीमंत कशा उभे राहू शकले, त्याचे हे असे सविस्तर उत्तर आहे. डावी विचारसरणी चालवण्याची संधी, म्हणून त्यात अनेक पुरोगामी विचारवंत सहभागी होत गेले. पण त्यांना नेहरूवादाच्या गुलामगिरीत पडण्याखेरीज काही संपादन करता आले नाही. संसदेत सोनिया टोळीच्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड घोटाळ्याचा विषय निघताच, उरलीसुरली कॉग्रेस कशी संसद बंद पाडायला धावली, ते आपण कालपरवाच बघितले, १३० वर्षापुर्वी कॉग्रेस नावाची संघटना देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थापन झाली, की नेहरू राजघराण्याचा पाया घालण्यासाठी उदयास आली, त्याचे भान तरी कुणा कॉग्रेसवाल्यांना उरलेले आहे काय? ज्यांना आपल्या संघटनेचाही इतिहास व उद्देश आठवत नाही, त्यांना देशाच्या इतिहासाशी कसले कर्तव्य असणार?
साडेसहा दशकात भारतात काय झाले आणि कॉग्रेसने काय केले, त्याचा हा पडताळा आहे. नेहरू खानदानाच्या वारसापुढे नतमस्तक होणारे बुद्धीजिवी, अभ्यासक, पत्रकार-संपादक आणि विचारवंत; ही भारताची कमाई आहे. म्हणून हे वादग्रस्त पुस्तक सहा दशके भगतसिंगला दहशतवादी म्हणते आणि बिनबोभाट पाठ्यपुस्तक म्हणून चालू शकले. अर्थात त्याच्याविषयी कोणीच तक्रार केली नसेल असे नाही. पण असे ओणी बोलू लागला, मग त्याची मुस्कटदाबी करण्याला बुद्धीवाद ठरवून हा उद्योग चालू राहिला. जेव्हा केव्हा देशाचा व भारतीय समाजाचा इतिहास तपासून मांडण्याचा विषय निघाला तेव्हा संघ, हिंदूत्ववादाच्या नावाने शिमगा करायचा हा नेहमीचाच खेळ होऊन बसला. कारण खरेच इतिहास व त्याचे पाठ्यक्रम तपासले गेल्यास, त्यातून नव्या भारतीय पिढीच्या मनात कोणते विष कालवले जाते आहे, विद्यार्थ्यांचे कसे कुपोषण चालू आहे, त्याचे पितळ उघडे पडले असते. म्हणूनच नुसते इतिहासाचे पुनरावलोकन करायचे म्हटले, तरी ओरडा सुरू केला जात असतो. गेल्या वर्षभरात फ़िल्म इन्स्टीट्युटपासून विद्यपीठापर्यंत असंहिष्णुतेचा गदारोळ कशासाठी चालला, त्याचे उत्तर या पाठ्यपुस्तकाने दिले आहे. आजवरची देशद्रोही पापे चव्हाट्यावर येतील, अशा भयाने या पुरोगमी भामट्यांना पछाडलेले होते. म्हणून त्याच कळपातले लोक देशद्रोही घोषणांचे समर्थन करायला पुढे सरसावले. त्यांचे वकीलपत्र घ्यायला त्यांचीच गर्दी झाली. अफ़जल वा याकुब मेमनसाठी कोर्टाच्या रात्री जागवल्या गेल्या. मोदींना किती जुनी तुंबलेली गटारे साफ़ करावी लागणार आहेत, त्याची ही नुसती झलक आहे. कारण देशाचा इतिहासच पुसला गेला, विकृत केला, मग भूगोल कोसळून पडायला वेळ लागत नाही. दिल्लीच्या त्या पाठ्यपुस्तकाने तोच इशारा दिला आहे. ती चुक त्या पुस्तकापुरती नाही. काय आणि किती सडलेले आहे, त्याची सुटलेली दुर्गंधी इतकाच त्याचा अर्थ आहे.

10 comments:

  1. भाऊ,अप्रतिम विश्लेषण!पण हे प्रत्येक भारतीयांपर्यंत पोचले तर सर्वांचे डोळे उघडतील.

    ReplyDelete
  2. पप्पू कहता हैं बडा काम करेगा ......खान्ग्रेस का काम जल्दी से ' तमाम ' करेगा........मगर ये तो कोई न जाने की उसकी ' मन्जिल ' हैं कहा

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला. स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत भारतीय जनतेची राजकीय मिळकत काही आहे का? असल्यास काय धरावी? भार्र्तीय जनतेने आत्तापर्यंत काय मिळवलं?

    थोडा विचार केल्यावर जाणवलं की आपण जेव्हा भारत म्हणतो तेव्हा आसेतुहिमाचल आणि आकच्छकामाख्य अशी एक प्रतिमा डोळ्यासमोर साकार होते. हीच खरी आपली राजकीय मिळकत आहे.

    नेमकी हीच पुरोगाम्यांना खुपत्येय आणि म्हणूनच जनतेकडून हिरावून घ्यायचीये. याचसाठी देशद्रोही कारवायांना त्यांचे छुपे वा उघड समर्थन असते. आपण सगळे मिळून हा डाव हाणून पाडणार आहोत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. भाऊ, अप्रतिम विश्लेषण ! परंतु हे प्रत्येक भारतीयां पर्यंत पोहचण्या करीता ,इतर भारतीय भाषांमध्ये आपले सर्व लेख भाषांतरीत करायला हवे. विषेषतः इंग्रजी व हिंदी मधे. म्हणजे सर्व जनतेचे प्रबोधन होइल.

    ReplyDelete
  5. भाऊ खुप महत्वाच्या गोष्टींचा पोलखोल आपण केलात त्याबद्दल धन्यवाद.
    असे मशरुमी (कुत्र्याच्या छत्री प्रमाणे अवतरलेले)...
    ह्या सगळ्या मागे एक निश्चित षडयंत्र आहे. कारण मोदी सरकार वर हल्ला व बदनाम करण्यासाठी कोणत्याही मुद्दा मिडियाला मिळत नाही..
    यांचा करविताच भ्रष्टाचारात व इशरत प्रकरणात सापडलाय. त्यापासून जनतेचे ध्यान हटविण्यासाठी हे सर्व केले जात आहे.. असा वाटतेय.
    त्याच बरोबर आपण म्हणाल्या प्रमाणे गर्दी आकर्षित करणारे व लाथ मारिल तिथे पाणी काढणारे नेतृत्व पण नाही त्यामुळे अशे मशरूमी लिडर तयार करुन लोकांची दिशाभूल करण्याचा घाट घातला आहे.
    परंतु मोदी व सहकारी या गोष्टींना कोणतीही प्रतिक्रीया देत नाहीत व आपल्या कामात व्यस्त आहेत..
    हि पण एक मोठी पोटदुखी माध्यमात आहे.
    मोदी सरकारचे एकही प्रकरण सापडले तर राइचा पर्वत केला जाईल. किंबहुना काही नसलेली पण प्रकरणे निवडणूका च्या आधी बाहेर काढून अध॔शिक्षीत जनतेची सहज दिशाभुल करत मोदी सरकारला चौफेर घेरतील कारण अजुन एक 5 वर्षाची मोदी सरकारची टम॔ हे काँग्रेसचे मृत्यू पत्रच असेल.
    मोदी सरकारची दिवस रात्र वैर्याची आहे. व सरकारची 5 वर्षा ची कामगिरी कितीही चांगली झाली तरी ही माध्यमे विविध क्लुप्त्या लढवून मोदी सरकारने कमी पडले दाखवतील.
    व असे मशरुमी लिडरचे आमिष दाखवून मतदारांची दिशाभूल करतील.
    कन्हैया च्या मिटिंग एटेडं करणारे कोण आहेत ते का एटेडं करत आहेत? हिच माध्यमे हे प्रश्न का विचारत नाहीत?
    जोडिला प्रशासन व व्होटिंग मशिन आहेतच. (आश्चर्य म्हणजे या व्होटिंग मशिन ची सुरवात प्रमोद महाजन यांनी केली आणि आपल्या पक्षाची हार ओढून घेतली. आता मोदी सरकार कडुन आशा काय काय चुका पुढच्या तिन वर्षात मुरब्बी काँग्रेस जन करुन घेतील हेच मोदी सरकारचे भविष्य ठरवेल).

    ReplyDelete
  6. अभ्यासक संशोधक वा बुद्धीमंत म्हणजे आम्ही! आणि या आम्हीमध्ये तथाकथित डाव्या वा पुरोगाम्यांना सोडून कुणालाही प्रवेश असू शकत नाही. त्यातही विचाराने डाव्या असण्याने भागत नाही, तो नेहरू खानदानाचा भक्त असायला हवा
    राष्ट्रभक्त आणि संस्कृतिरक्षक ते आम्ही असा संघ ,भाजप ,सेना याचाही पवित्रा असतो हे लक्षात घेणे आवश्यक नाही काय ? असे ध्रुवीकरण होत राहिले तर double accounts सारखे दोन्ही पक्षांनी आपापला इतिहास पुन्हा पुन्हा लिहित राहावे . खरे म्हणजे इतिहासाबाबत ,त्याच्या अशा किंवा तशा लेखनाने होणाऱ्या तरुण् पिढीवरील परिणामाबाबत आपल्या कल्पना वास्तवाला सोडून आहेत असे वाटते

    ReplyDelete
  7. भाऊ आपण अत्ता पर्यंत अनेक महत्वाच्या मुद्देयांना हात घातला आहे. पण मोठा जनतेचा हिस्सा अजुनही इतर अनेक प्रलोभनात मश्गुल आहे. मोठा हिस्सा
    भारतीय जनेचा अत्यंत स्वार्थी आणि स्वकेंद्रीत आहे. तरुण पिढीचा मोठा हिस्सा हिप्पी सारखा Sent convent school ने बनवला आहे. यात दिले जाणारे धम॔ शिक्षण हिंदू विरोधी आहे. परंतु भारतीय सण व संस्कार यांची शिवण एवढी घट्ट आहे त्यामुळे विदेशी शक्तींचा डाव मोठय़ा प्रमाणात यशस्वी होत नाही आहे.
    परंतु शिक्षण क्षेत्रातिल लुट (विघातक शिकवण) हि मोठी सामाजिक समस्या निर्माण करून ठेवली आहे.
    एके काळी सुमारे 500रु वार्षिक फि मध्ये डाॅक्टर तयार करत होते. याच पदवी साठी आता 5 कोटी पण पुरत नाहीत.
    सरकारी शाळा पद्धतशीर पणे ब॔द पाडून (एकि कडे शिक्षकांना अनेक सरकारी कामात जुंपवले व दुसऱ्या बाजूला रिझर्व कोट्या प्रमाणे शिक्षक न मिळेल्याचे कारण दाखवून सुमार शिक्षकांची भरती केली. अशे शिक्षकां वर कायम नोकरी जाईल ची टांगती तलवार ठेवून शिक्षणाचा दर्जा घसरला. त्याच प्रमाणे याचा फायदा आळशी शिक्षकांनी घेतला. व या अनेक सरकारी संस्था लयास घालवल्या. हिच पद्धत अनेक सरकारी क्षेत्रात (उद्योगात) राबविली व कामगारांना फुस देवुन स॔प घडवुन. खाजगी शाळा (उद्योगांना) पोषक वातावरण निर्माण केले. व आजचे शिक्षण सम्राट तयार केले.व ककन्हैया पण
    हेच कन्हैया देशाची दिशाभूल करत आहेत मोदी विरोधाची थातुर मातुर कारणे देत फिरत आहेत डाॅक्टर आता लुट करत आहेत. डाॅक्टरी, शिक्षकी व सरकारी पेशा हा सेवाभावी आहे व तशी इच्छा असणारा त्यामध्ये आला पाहिजे ह्यचे तारतम्य ना समाजाला राहिले ना सरकारला. शिक्षकाला मुलगी देणे म्हणजे अठरा विश्व दारिद्रयात लोटणे झाले. व हा पेशाचे समाजातील स्थान खालावले. डाॅक्टर ला आता सफेद डाकु म्हटले जाते.
    या सर्वाचे खोल वर परिणाम झाले आहेत. व आपण म्हणाल्या प्रमाणे दिसणारे केवळ हिमनगाचे टोक आहे.
    आपल्या सारखे विस लाख प्रबोधनकार देशभर होतील तेव्हाच देशात क्रांती होईल पण परत हिच परिस्थिती येईल. कारण सतत जाग्रुत देशवासी हेच देश वाचवु शकतात. नाहीतर प्रत्येक स्वातंत्र्या नंतर परत राजकपुर दिलीपकुमार अमीर पुल वपु जन्माला येतील व जनता यांच्या करमणुकी मध्ये मश्गुल होणार व मनोज कुमार ची देशभक्ती विसरुन जातात.
    आपले लेख मी अनेक ग्रुपमध्ये पाठवतो. परंतु काही ग्रुप राजकीय लेख व पक्षांचा उल्लेख असल्याने ऑब्जेक्शन घेतात.
    म्हणजे लोकशाही पाहिजे पण ती शाबुत राखण्याची जबाबदारी नको.
    लाॅज मध्ये राहिल्या सालखे देशात रहाणार मात्रुभुमी म्हणून करतव्य नको. टॅक्स भरतोना हिच देशावर मोठी मेहरबानी.
    आपले लेख अधुनीक ज्ञानेश्वरी आहे.
    अमुल शेटे

    ReplyDelete
  8. भाऊ खुप महत्वाच्या गोष्टींचा पोलखोल आपण केलात त्याबद्दल धन्यवाद.
    असे मशरुमी (कुत्र्याच्या छत्री प्रमाणे अवतरलेले)...
    ह्या सगळ्या मागे एक निश्चित षडयंत्र आहे. कारण मोदी सरकार वर हल्ला व बदनाम करण्यासाठी कोणत्याही मुद्दा मिडियाला मिळत नाही..
    यांचा करविताच भ्रष्टाचारात व इशरत प्रकरणात सापडलाय. त्यापासून जनतेचे ध्यान हटविण्यासाठी हे सर्व केले जात आहे.. असा वाटतेय.
    त्याच बरोबर आपण म्हणाल्या प्रमाणे गर्दी आकर्षित करणारे व लाथ मारिल तिथे पाणी काढणारे नेतृत्व पण नाही त्यामुळे अशे मशरूमी लिडर तयार करुन लोकांची दिशाभूल करण्याचा घाट घातला आहे.
    परंतु मोदी व सहकारी या गोष्टींना कोणतीही प्रतिक्रीया देत नाहीत व आपल्या कामात व्यस्त आहेत..
    हि पण एक मोठी पोटदुखी माध्यमात आहे.
    मोदी सरकारचे एकही प्रकरण सापडले तर राइचा पर्वत केला जाईल. किंबहुना काही नसलेली पण प्रकरणे निवडणूका च्या आधी बाहेर काढून अध॔शिक्षीत जनतेची सहज दिशाभुल करत मोदी सरकारला चौफेर घेरतील कारण अजुन एक 5 वर्षाची मोदी सरकारची टम॔ हे काँग्रेसचे मृत्यू पत्रच असेल.
    मोदी सरकारची दिवस रात्र वैर्याची आहे. व सरकारची 5 वर्षा ची कामगिरी कितीही चांगली झाली तरी ही माध्यमे विविध क्लुप्त्या लढवून मोदी सरकारने कमी पडले दाखवतील.
    व असे मशरुमी लिडरचे आमिष दाखवून मतदारांची दिशाभूल करतील.
    कन्हैया च्या मिटिंग एटेडं करणारे कोण आहेत ते का एटेडं करत आहेत? हिच माध्यमे हे प्रश्न का विचारत नाहीत?
    जोडिला प्रशासन व व्होटिंग मशिन आहेतच. (आश्चर्य म्हणजे या व्होटिंग मशिन ची सुरवात प्रमोद महाजन यांनी केली आणि आपल्या पक्षाची हार ओढून घेतली. आता मोदी सरकार कडुन आशा काय काय चुका पुढच्या तिन वर्षात मुरब्बी काँग्रेस जन करुन घेतील हेच मोदी सरकारचे भविष्य ठरवेल).Aks pnl

    ReplyDelete
  9. भाऊ नमस्कार, मी अनिकेत जोशी. 9869004496 तुमचा ब्लॉग दैनिकात वापरण्याचा मोह होतोय. परवानगी द्या. फोन नंबर व पत्ताही हवाय येऊन भेटीन म्हणतो.

    ReplyDelete