Monday, April 18, 2016

ब्रसेल्सच्या हल्ल्यानंतरचा आनंदोत्सव

ब्रसेल्स ही बेल्जमची राजधानी. काही दिवसांपुर्वीच तिथल्या विमानतळावर घातपाती हल्ला झाला. त्यातले हल्लेखोर स्थानिकच आहेत हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही. कारण त्यांच्यावर दिर्घकाळ पोलिसांची पाळत होती. हे हल्लेखोर जिहादी मुस्लिम होते आणि दोनतीन पिढ्यांपुर्वी युरोपात त्यांचे पुर्वज येऊन स्थायिक झालेले आहेत. गेल्या अर्धशतकापासून युरोपच्या अनेक देशात अशा रितीने उत्तर आफ़्रिका व अरबी देशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम स्थलांतरीत झाले. मजुरांची गरज असल्याने ह्या स्थलांतराला युरोपियन देशातील सत्ताधार्‍यांनी प्रोत्साहनही दिलेले आहे. मजेची गोष्ट अशी, की ज्या काळात भारत व अन्य आशियाई देशातून अरबी देशात रोजगार शोधायला जाणार्‍यांची झुंबड उडालेली होती, त्याच काळात अरबी-आफ़्रिकी देशातील मुस्लिमांचे युरोपात स्थलांतर वाढत गेलेले दिसते. मग त्यातल्याच काहींनी वा त्यांच्या मुलांनी आता युरोपियन नागरिक म्हणून जिहाद पुकारलेला आहे. त्याचे दुष्परिणाम युरोपियन मूळनिवाशींना भोगावे लागत आहेत. पण त्याबद्दल बोलायची कोणाची हिंमत नाही. कोणीही हे सत्य बोलायची हिंमत केली, की त्याच्यावर मुस्लिमद्वेष वा इस्लामोफ़ोबिया असा आरोप केला जात असतो. त्यापैकी कोणा महत्वाच्या व्यक्तीने असा आक्षेप घेतला आणि तो विरोधाला जुमानणारा नसेल, तर मग त्याची बातमी सुद्धा कुठे येऊ दिली जात नाही. आताही तसेच झाले आहे. बेल्जमच्या गृहमंत्र्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. पण त्याची बातमी कुठल्याही युरोपियन माध्यमात ठळकपणे प्रसिद्ध झालेली नाही. जम्बोन नावाचे बेल्जमचे गृहमंत्री आहेत आणि अंतर्गत सुरक्षा ही त्यांचीच जबाबदारी आहे. म्हणूनच ब्रसेल्सच्या हल्ल्यानंतर त्यांनी राजिनामा देऊ केला होता. असा माणूस त्याबद्दल काही बोलल्यास ते गंभीर असते. पण तेच वक्तव्य दडपले जाते, ही आजची दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. किंबहूना तोच मोठा दहशतवाद होऊन बसला आहे.
ब्रसेल्सच्या विमानतळावर बॉम्बस्फ़ोट झाले आणि लगेच तिथल्या मेट्रो स्थानकातही धमाके झाले होते. त्याचे कारण दोन दिवस तिथे पोलिस एका वस्तीत झडत्या घेत होते आणि छापे घालत होते. तिथेच कुठेतरी पॅरीसच्या हल्ल्यातले आरोपी जिहादी लपले आहेत, अशी शंका होती. तसे पुरावे पोलिसांना मिळालेले होते. त्याचा माग काढला जात होता. त्यात पोलिस यशस्वी झाले आणि स्थलांतरीत मुस्लिमांच्या वस्तीतच दडलेला सालेह नावाचा जिहादी पोलिसांच्या हाती लागला. त्याची धरपकड होताच, दुसर्‍या दिवशी ब्रसेल्समध्ये हल्ले झाले. हे हल्ले झाले, तेव्हा त्याच वस्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला, असे जम्बोन या गृहमंत्र्याने सांगितले आहे. हा अतिशय गंभीर आरोप असून संपुर्ण युरोपच्या खर्‍या दुखण्यावर बोट ठेवणारा विषय आहे. कारण अर्धशतकात आधीच लक्षावधी आफ़्रिकन व अरबी देशातून मुस्लिमांनी युरोपच्या विविध देशात स्थलांतर केले असून, दोनतीन पिढ्या तिथे जन्माला आलेल्या आहेत. अशा स्थलांतरीतांनी नव्या देशात मिसळून जायला हवे ना? ज्या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्याशी एकरूप व्हायला हवे ना? पण दोनतीन पिढ्या उलटून गेल्यावरही हे मुस्लिम नव्या देशात रुळलेले नाहीत आणि उलट स्थानिकांच्याच जगण्यात व्यत्यय ठरू लागले आहेत. आपल्याच देशबांधवांच्या जीवावर उठल्यासारखे वागत आहेत. जम्बोन यांनी त्याच दुखण्यावर बोट ठेवले आहे. पण कुठल्याही युरोपियन माध्यमाने वा पत्रकाराने त्यांची तितक्या गंभीरपणे दखल घेतली नाही. उलट ती बातमी दडपली गेली आहे. हीच गोष्ट आपल्या देशातही होत असते. सत्य कितीही प्रखर व गंभीर असले, तरी ते झाकून ठेवण्याला शहाणपण मानले जाते. त्याचा हा परिणाम आहे. हे सत्य समोर ठळकपणे मांडले गेल्यास सध्या युरोपमध्ये जो अरबी आफ़्रिकन मुस्लिमांचा नवा लोंढा आला आहे, त्याकडे मुळनिवासी संशयाने बघतील ही भिती आहे ना?
जम्बोन या बेल्जमच्या गृहमंत्र्याने युरोपला सध्या भेडसावणार्‍या समस्येचे नेमके विश्लेषण केले आहे. किंबहूना युरोपियन जिहादचे तेच खरे पोस्टमार्टेम आहे. दुसर्‍या तिसर्‍या पिढीतल्या स्थलांतरीत मुस्लिम तरूणांना कट्टरतेचे संस्कार करून जिहादी बनवले जाते आहे. ही समस्या आजची नसून मागल्या काही वर्षात बोकाळत गेली आहे. कारण ह्या समस्येवर बोलायचे नाही आणि कोणी बोलू गेल्यास सरकारच त्याच्या मुसक्या बांधते. मुस्लिमांच्या घातपाती वा धर्मांध वर्तनाविषयी बोलण्याला वंशवाद वा वर्णभेद ठरवून गळचेपी केली गेली. परिणामी इस्लामी कट्टरतावाद बोकाळत गेला आणि त्याचे परिणाम वाढत गेले. युरोपातील सर्वाधिक स्थलांतरीत मुस्लिम बेल्जममध्ये असून, त्याच देशातून सर्वाधिक मुस्लिम तरूण आयसिसच्या इराकमधील युद्धासाठी गेलेले आहेत. त्यातल्या एकाला तुर्कस्थानने सीमेवर पकडला आणि मायदेशी बेल्जमला पिटाळून लावला होता. तर स्थानिक प्रशासनाने तुर्की इशारा फ़ेटाळून लावत, त्या जिहादीला सामान्य गुन्हेगार ठरवून मोकळे सोडून दिले. कालपरवा ब्रसेल्स विमानतळावर स्फ़ोट घडवणारा आरोपी नेमका तोच असावा, याला ह=योगायोग म्हणता येणार नाही. त्याच्या घातपाती कृत्याबद्दल आयसिसला जबाबदार धरणेही गैरलागू आहे. कारण आयसिसने त्याला युरोपात पाठवले नाही किंवा प्रशिक्षित केलेले नाही. त्याला पोसले व जोपासले आहे, बेल्जमच्या सरकारने व कायद्यांनी! मग त्याचे खापर आयसिसवर कसे फ़ोडता येईल? ह्या माणसामुळे बेल्जमच्या नागरिकांना असलेला धोका तुर्कस्थानने दाखवून दिला होता. पण सरकारनेच त्याची दखल घेतली नाही. उलट त्यावर पांघरूण घातले आणि त्याला मोकाट सोडला. त्याविषयी कोणी बोलला तर त्याच्याच मुसक्या बांधल्या जात असतील, तर अशा घातपात्यांचा गॉडफ़ादर बेल्जम सरकार असते. किंबहूना युरोपातील बहुतेक सरकारेच आता जिहादी गॉडफ़ादर झाली आहेत.
आपल्या नव्या आरोपात जम्बोन यांनी नेमक्या त्याच दुखण्यावर बोट ठेवले आहे. कुणालाही केवळ मुस्लिम आहे म्हणून वा आफ़्रिकी अरबी देशातून आलेला निर्वासित आहे म्हणून नागरिकत्व किंवा आश्रय देणे, ही मागल्या काही वर्षात युरोपियन देशांनी केलेली घोडचुक आहे. ज्या कालखंडात आफ़्रिकी व अरबी देशातले मुस्लिम तरूण अन्य देशात जाऊन जिहादच्या नावाखाली हिंसेचे थैमान घालत होते, त्याच काळात त्यांना आश्रयाचे दरवाजे सताड उघडे करणारा युरोपियन महासंघ व त्यात सहभागी असलेल्या देशांनीच ह्या संकटाला आमंत्रण दिले आहे. जम्बोन यांचा पक्ष मुळातच अशा स्थलांतराचा विरोधक म्हणून उदयास आलेला आहे, दिवसेदिवस सर्व युरोपियन देशात स्थलांतरीत मुस्लिम आफ़्रिकी-अरबी लोकांविषयी एक कमालीची चीड वाढीस लागली आहे. त्यातून असे पक्ष व संघटना उदयास येत आहेत. जर्मनीत पेगिडा नावाची संघटना खुलेआम मुस्लिम विरोधी म्हणून वेगाने वाढत चालली आहे. त्याच्या बातम्या लपवणे वा झाकून ठेवणे हा उपाय नाही. कारण लोकही अनुभवातून शिकत असतात. त्यातूनच जम्बोन यांचा पक्ष वा पेगिडा नावाच्या संघटना फ़ोफ़ावत चालल्या आहेत. त्याचे पर्यवसान नजिकच्या काळा्त संपुर्ण युरोपभर यादवी युद्ध भडकण्यात होणार आहे. बातम्या लपवून सत्य अनुभवणार्‍यांची दिशाभूल होऊ शकत नाह. अनेक युरोपियन देशात लहानसहान शहरात स्थलांतरीत वा मुस्लिम नागरिकांनी मूळनिवासी युरोपियनांच्या दंगलीही सुरू झाल्या आहेत. पण माध्यमातल्या ‘म्हातार्‍यांना सत्य झाकून सूर्य उगवणार नाही’ अशा भ्रमाने पछाडलेले असल्याने तशा बातम्या येत नाहीत, जंम्बोन यांचे ताजे वक्तव्य त्यामुळेच कुठे गाजले नाही. म्हणुन त्याचे परिणाम संपणारे नाहीत. स्थलांतरीत आफ़्रिकी-अरबी तरूण जिहादी होत असल्याचे झाकल्याने, पॅरीस वा ब्रसेल्सचा हल्ला चुकला थोडाच?

2 comments:

 1. Trump first day in Oval Office first briefing by CIA Pentagon DIA FBI ....

  Trump: we must destroy ISIS.

  CIA: We cannot do that sir. We created them along with Turkey Saudi Qatar and others.

  Trump: the Democrats created them!

  CIA: It was not the Democrats. We created ISIS sir. You need them or else you would loose funding from the natural gas lobby.

  Trump: Stop funding Pakistan Let India deal with them.

  CIA: sir we cannot do that. It is Modi in India and not Manmohan.

  Trump: So what?

  CIA: Modi will cut Baluchistan out of Pakistan.

  Trump: I do not care.

  CIA: India will have peace in Kashmir they will stop buying our weapons and they will become a Superpower. Sir we have to fund Pakistan to keep India busy in Kashmir.

  Trump:you have to destroy the Taliban.

  CIA: sir we cannot do that we created the Taliban to keep Russia in check in the 80s. Now they are keeping Pakistan busy and away from their Nukes.

  Trump: we have to destroy Islamic regimes. Let us start with The Saudis.

  Pentagon: Sir we cannot do that. We created those regimes because we wanted their oil. We cannot have democracy there as otherwise their people will get that oil and we cannot let their people own it.

  Trump: Then let us invade Iran.

  Pentagon: We cannot do that sir!

  Trump: Why not?

  CIA: We are talking to them sir.

  Trump: What? Why?

  CIA: we want our stealth drone back. If we attack them then Russia will obliterate us there, as they did to our buddy ISIS in Syria. Besides we need Iran to keep Israel in check.

  Trump: Then let us attack Iraq again.

  COA: Sir, our friends ISIS already control 1/3rd of Iraq.

  Trump: Why not the whole of Iraq?

  CIA: Sir we need the Shia govt of Iraq to keep ISIS in check sir.

  Trump: I am banning Muslims from entering US.

  USCIS: We cannot do that sir!

  Trump: Why not?

  FBI: Then our population will become fearless sir.

  Trump: I am deporting all illegals to south of the border.

  Border patrol: You cannot do that sir!!

  Trump: Why not?

  Border patrol: If they are gone who will build the wall sir?

  Trump: Build the wall first you idiots!

  Border patrol: Then they will be on this side of the wall sir!!

  Trump: I am banning H1Bs!

  USCIS: You cannot do that sir.

  Chief of staff: Then we will have to outsource the White House to Bangalore sir!!

  Trump: Why the hell did I get elected?

  CIA: To enjoy the White House sir! We create the bad guys, you sign off sir. And then when we sign off you announce that you have destroyed them sir!

  Trump: God bless America the land of the free and the brave!!

  ReplyDelete