Sunday, April 24, 2016

सलीम-जावेद आणि शोले

१९७०च्या जमान्यात सलीम-जावेद ही जोडी बॉलिवुड गाजवत होती. एखाद्या हिरो इतकी त्या कथाकार पटकथा लेखकांची जाहिरात होत असे. अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटाचा महानायक होण्याचा जो कालखंड आहे, त्याच काळात ह्या जोडीने चित्रपटाला नवी दिशा दाखवली असे म्हणता येईल. सच्चाईचा पाठपुरावा करणारा व त्यात कुठलेही हाल छळ सहन करणारा नायक त्यांनी बाजूला केला आणि जशास तसे उत्तर देत प्रसंगी गैरमार्गाने न्यायाला जाऊन भिडणारा महानायक सलीम-जावेद यांनी जनमानसात लोकप्रिय केला. त्यांच्या लागोपाठ यशस्वी झालेल्या चित्रपटांनी दशकाहून अधिक काळ चित्रपट रसिकाला भारावून टाकले होते. त्यातला पहिला चित्रपट शोले असावा. आजही बॉलिवुडच्या गाजलेल्या चित्रपटाची चर्चा सुरू झाली, की लोकांना शोले आठवतो. त्याचे श्रेय या जोडगोळीला मिळाले, कारण प्रेक्षकाला भारावून टाकणे व थक्क करून सोडणे, यात त्यांचा हातखंडा होता. कुठल्या एका मुलाखतीत रमेश सिप्पी या शोलेच्या दिग्दर्शकाने म्हटले होते, की सलीम जावेदच्या पटकथेत दिग्दर्शकालाही फ़ारसे स्वातंत्र्य घेता येत नाही. प्रत्येक प्रसंग, त्या प्रसंगाचे चित्रण कुठल्या कोनातून करायचे किंवा कॅमेरा कुठून येऊन कोणावर स्थीर होईल, इथपर्यंत बारकावे पटकथेतून आखलेले असायचे. किंबहूना भले संवाद कोणीही बोलत असेल, तरी कॅमेरा कुणाच्या चेहर्‍यावरचे भाव दाखवत असावा, इथपर्यंतचा तपशील पटकथेत असायचा. थोडक्यात जी कथा प्रेक्षकाला सांगायची आहे, तिचे परिणाम आधीच ठरवून मांडणी केलेली असायची. त्यात पडद्यावर झळकणार्‍या अभिनेता अभिनेत्रीला सुद्धा स्वातंत्र्य नसायचे, इतकी पटकथा घट्ट विणलेली असायची. कदाचित सगळ्याच गोष्टी त्या पटकथेत स्पष्ट नसतील आणि दिग्दर्शकांनी अनेक जागी त्यात बदल करूनही प्रसंग व कथा अधिक परिणामकारक केलेल्या असतील.
पण चित्रपटाचा प्रभाव पाडून कथा अशी मांडायची, की त्या भ्रामकतेने प्रेक्षकही वास्तवाइतका प्रभावित झाला पाहिजे. कथा समोर घडतेय आणि आपण त्यातले प्रेक्षक आहोत, हे विसरता येत नाही. पण तुमच्या भावनांना सैल करून तुम्हालाही कथेत ओढून घेण्याची कला त्यातून सादर केलेली असायची. काही प्रमाणात कथा प्रेक्षकाच्या मनाचा कब्जा घेऊन त्यालाही कथेत सह्भागी करून घ्यायचे, हे खरे त्या सलीम जावेद जोडगोळीचे कौशल्य होते. मात्र त्यात जसा दिग्दर्शक वा कलावंत फ़ारसे स्वातंत्र्य घेऊने वाटेल तसे वागू शकत नव्हता, तसाच प्रेक्षकही काही करू शकत नसायचा. किंबहूना समोर दिसतेय, त्यात ओढला जाणारा प्रेक्षक, स्वत: विचारही करू शकणार नाही आणि दिसणारे निमूट स्विकारत जाईल, अशीच सगळी मांडणी व योजना असायची. पटकथेचे यश त्यात सामावलेले असते. जिथे तुम्ही भारावून जाता आणि आपला विचार करायचे सोडून त्याच कथानकाचा एक घटक होऊन जाता. जो घटनाक्रम आधीपासून तयार केलेला असतो. प्रसंगही आधीच योजलेले असतात. एक प्रसंग असा येतो आणि दुसरा तसा येतो. त्याचे परस्पर संबंध प्रेक्षक शोधू लागतो, इतक्यात तिसरा प्रसंग समोर येतो. त्या तिन्हीची सांगड घालण्याच्या आधी चौथा भलताच प्रसंग घडू लागतो. इतक्या वेगाने हे प्रसंग येतात व घडत जातात, की त्यांची सांगड घालताना प्रेक्षक स्वत:च त्यात गुरफ़टत जातो. त्यातल्या कुणा एका पात्राविषयी आपुलकी वाटू लागते किंवा अन्य कुणाविषयी घृणा वाटू लागते. सगळ्याच कथाकादंबर्‍या अशाप्रकारे मांडलेल्या असतात. त्यात पटकथा लेखक त्याला अपेक्षित असलेल्या प्रतिक्रीया येण्याच्या दिशेने मांडणी करीत असतो. प्रेक्षकाला तारतम्याने विचार करण्याची संधी नाकारण्यात लेखक जितका यशस्वी होईल तितकी त्याची कथा लोकप्रिय होत असते. शोलेचे यश त्यातच सामावलेले होते.
गंमत बघा, अनेकांनी पन्नास शंभर वेळा शोले चित्रपट बघितल्याचे दावे केलेले आहेत. जी कथा ठाऊक आहे आणि ज्याचा घटनाक्रमही ठाऊक आहे, तेच परत परत बघण्यात गंमत कुठली? तर त्या कथेतला गुंता जितका समजून घ्यायला जावा, तितकी ती गुंतागुंत अधिकच गुरफ़टून टाकते. अमिताभ असा का वागतो? धर्मेंद्र तसा का वागला? अमूक असा वागला असता तर? कित्येक प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरे शोधूनही नवे प्रश्न उभे रहातात. चित्रपट तुकड्या तुकड्यांमध्ये चित्रित होतो आणि मग चित्रण संपल्यावर ते तुकडे जोडून सलग कथा दिसू लागते. हे फ़क्त चित्रपटात वा कथाकादंबर्‍यातच होत नाही, वास्तविक जीवनात, सार्वजनिक जीवनात वा नागरी जीवनात बहुधा असेच घडत असते. वास्तविक आयुष्यात घडणार्‍या अनेक घटना काल्पनिक नसतात. पण त्या घडवून आणल्या जातात आणि त्यात दिग्दर्शक नसतो की अभिनेते नसतात. वास्तव जीवनातील माणसे आपापल्या भूमिका पार पाडत असतात. त्यांचे संवाद आधीपासून लिहीलेले नसतात, पण प्रसंग असे घडवून आणले जातात, की सगळी कथा आधीपासून ठरलेली असू शकते. म्हणून त्याला नाटक वा चित्रपट म्हटले जात नाही. आपण ते सत्य समजून बसतो, ते असतेही सत्य. पण त्यातले प्रसंग आपोआप घडलेले नसतात. ते घडवून आणलेले असतात. त्यात बोलले जाणारे संवाद आधीच लिहीलेले नसतात. पण त्यातले काही संवाद आधी तयार ठेवलेले असतात. त्यातली पात्रे स्वयंभू वाटतात, पण त्यांनाही कळसुत्री बाहुलीप्रमाणे खेळवणारा कोणीतरी खेळीया असतो. सलीम जावेद वा रमेश सिप्पी यांच्यासारखी त्यांची नावे पुढे आणली जात नाहीत. किंबहूना लपवली जातात. म्हणून त्या घटना आपल्याला वास्तव जग वाटत असते. पण प्रत्यक्षात असे घडवण्यात एक योजनाबद्धता असते. पटकथा असते.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अकस्मात इशरत जहान चकमकीचा विषय पटलावर आला. त्याच्याही आधी महिनाभर नेहरू विद्यापीठातील एका समारंभावरून काहुर माजले. त्याच्याही आधी देशात अकस्मात असहिष्णुतेचे वादळ घोंगावू लागले. पुरस्कार वापसीची लाट आली. मोदी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्यावर अनेक जाणत्या बुद्धीमंतांना देश सोडून पळून जाण्याची इच्छा होऊ लागली. मुंबईवर घातपात्यांनी हल्ला करून पावणे दोनशे लोकांचा बळी घेतला. त्यातच अनेक ख्यातनाम पोलिस अधिकारी मारले गेले. त्यात हेमंत करकरे यांचाही समावेश होता आणि त्यांच्या हत्येचे पाप भारताच्या गुप्तचर खात्याच्या माथी मारणारे एक जाडजुड पुस्तक विनाविलंब प्रकाशित झाले. त्याच्याही काही दिवस आधी अकस्मात मालेगावच्या स्फ़ोटामागे हिंदू दहशतवाद असल्याचे धक्कादायक शोध लागले. त्यातले अनेक भक्कम पुरावे गोळा केल्याचा दावा झाला. पण कुठलाही पुरावा कोर्टात सादर करून आरोपींना दोषी ठरवण्याचा प्रयास झाला नाही. मग आधीच तपास संपलेल्या अनेक घातपाती घटनांमध्ये हिंदू दहशतवादी असल्याचे निष्पन्न होऊ लागले. आधीच्या तपासात हाती आलेले पुरावे झाकपाक करून गुंडाळले जाऊ लागले. सात आठ वर्षापुर्वी गुजरातमध्ये झालेल्या एका चकमकीला हत्याकांड ठरवणारे पुरावे समोर येऊ लागले. आता मोदी सत्तेत येऊन दोन वर्ष होत असताना अकस्मात हे सर्व तपास बनावट व दिशाभूल करणारे असल्याचे तपशील समोर येत आहेत. ह्या सर्व आपोआप घडणार्‍या घटना प्रसंग आहेत काय? चक्रावून सोडणार्‍या या घटनाक्रमाची काही पटकथा आहे काय? असेल तर त्यातले सलीम-जावेद कोण आहेत? त्यातला रमेश सिप्पी कोण आहे? टाईम्स नाऊचा अर्णब गोस्वामी त्यातला अमिताभ आहे काय? गेल्या आठवड्याभरात समोर जो कथापट उलगडतो आहे, तो एखाद्या पटकथेसारखा आहे. म्हणून त्याची चाचपणी करून बघणे अगत्याचे आहे. त्यात काही कॉग्रेसजनांनी आणि मोदी विरोधकांनी घेतलेले आक्षेपही विचारात घेतले पाहिजेत.

5 comments:

 1. भाऊ आणखी एक परखड व उपरोधिक लेख..
  एका बाजूला आमचे भाग्य की तुमच्या सारख्या Analytical विचारवंताचे लेख वाचून या सर्व गोष्टींचा खुलासा होत आहे आणि दुसर्‍या बाजूला एवढी देश विघातक बाब बाहेर येऊन देश शांत पणे पहात आहे. यामुळे आपल्या बोकडा च्या गोष्टी ची आठवण वारंवार होत आहे खाटीका दुकानात एका बोकडाचा बळी जात असताना दुसरा बोकड शांत पणे चरत असतो तसेच आपल्या देशवासीयांचे झालेआहे . म्हणूनच भारतीय म्हणजे मानवी बोकड आहेत. त्यामुळेच अशा मानवी बोकडा वर अन्य देश शतकानुशतके ताव मारत आले आहेत.
  असहिष्णुता मुद्द्यावर पुरस्कार परत करणारे कुठे गेले?
  ह्याच विचारवंत वग॔ वर देशाची सेन्सीव्हीटी/ जाग्रुगता अवलंबून असते. यांना व पुरोगामी /समाजवादी चळवळ्यांना दावणीला बांधले की देशातील जनता पण मानवी बोकड होउन जाते. हे साधे गणित आंतरगत व विदेशी नी जाणले आहे. त्यामुळे या देशात जन्म घेण्या सारखे दुर्दैव नाही.
  मिडिया कडुन प्रबोधन फक्त देखावा आहे किंवा होतच नाही. नेहमीच दिशाभूल झाली आहे.
  मिडिया विकला गेला कि देश सहज विकला जातो. त्यामुळे अशा कितीतरी घटना बाहेर पडल्या तरी देशवासीयांवर काहीच फरक पडणार नाही.
  भाजपचे संघटन संघा वर अवलंबुन आहे बरं संघ देश विघातक घटना विरुध्द जरी रस्त्यावर उतरला तरी सव॔ पुरोगामी एकत्र येऊन मिडियाच्या सहाय्याने विषय दुसरीकडे घेऊन जातील/जातात व त्याला सेक्युलरीझम कडे घेऊन देश विधायक घटना व घडवणारे यांची पाठराखण करतात. हे सर्व ठरवुन होते. मिडिया वरील चर्चा काळजी पुव॔क ऐकल्यावर हे लक्षात येयील. काही मेंमबर दिशाभूल व भाजपचे प्रवक्ते बोलायला लागले कि हे मेंमबर मध्येच तोडुन उत्तर/ explanation पुरे करु देत नाहीत. व विकाऊ ऐडीटर इन चिफ पण बोलु देत नाहीत. त्यामुळे विषयाचे गांभीर्य निघुन घालवले जाते.
  जरी शोध पत्रकारांना इशरतच्या व भ्रष्टाचारच्या घटना माहिती असल्या तरी त्या बाहेर येत नाहीत. या घटना केवळ योगायोगाने अथवा कॅगने बाहेर काढल्या आहेत. तोपर्यंत खुपच उशीर झालेला असतो व केवळ तोंडाची वाफ घालण्यासाठी च आहेत.
  इशरत व भगवा दहशतवाद या घटना जर काँग्रेसइतर पक्षा कडुन घडल्या आसत्या तर केवढा मोठा गदारोळ ह्याच मिडियाने घातला असता व त्यांच्या मागे माइक घेऊन फिरले असते. व नेशन वाँट टु नो म्हणुन केवढा तमाशा केला असता.
  हे सर्व झाल्यावर आत्ता तावातावाने काही मिडिया चॅनेल चर्चा करून केवळ प्रकरणाची वाफ घालवत आहेत. परंतु प्रकरणात गुंतलेल्याच्या वा त्यांना हे करायला भाग पडणार्‍याच्या मागे माइक घेऊन पाठपुरावा करत नाहीत.
  यातच या मिडियाची लबाडी गुंतलेली आहे.
  भाजपचे संघटन यात कमी पडत आहे. किंबहूना त्यांचेकडे शिवसेने किंवा अंबेडकरी / एनजीओ काय॔करते नाहीत.
  व जनता झोपलेली आहे.
  याचवर what's app वर आलेली कविता पाठवत आहे

  एक ट्रक के पीछे लिखी
  ये पंक्ति झकझोर गई...!!
  "हाॅर्न धीरे बजाओ मेरा 'देश' सो रहा है"...!!!

  उस पर एक कविता इस प्रकार है कि.....

  'अँग्रेजों' के जुल्म सितम से...
  फूट फूटकर 'रोया' है...!!
  'धीरे' हाॅर्न बजा रे पगले....
  'देश' हमारा सोया है...!!

  आजादी संग 'चैन' मिला है...
  'पूरी' नींद से सोने दे...!!
  जगह मिले वहाँ 'साइड' ले ले...
  हो 'दुर्घटना' तो होने दे...!!
  किसे 'बचाने' की चिंता में...
  तू इतना जो 'खोया' है...!!
  'धीरे' हाॅर्न बजा रे पगले ...
  'देश' हमारा सोया है....!!!

  ट्रैफिक के सब 'नियम' पड़े हैं...
  कब से 'बंद' किताबों में...!!
  'जिम्मेदार' सुरक्षा वाले...
  सारे लगे 'हिसाबों' में...!!
  तू भी पकड़ा 'सौ' की पत्ती...
  क्यों 'ईमान' में खोया है..??
  धीरे हाॅर्न बजा रे पगले...
  'देश' हमारा सोया है...!!!

  'राजनीति' की इन सड़कों पर...
  सभी 'हवा' में चलते हैं...!!
  फुटपाथों पर 'जो' चढ़ जाते...
  वो 'सलमान' निकलते हैं...!!
  मेरे देश की लचर विधि से...
  'भला' सभी का होया है...!!
  धीरे हाॅर्न बजा रे पगले....
  'देश' हमारा सोया है....!!!

  मेरा देश है 'सिंह' सरीखा...
  सोये तब तक सोने दे...!!
  'राजनीति' की इन सड़कों पर...
  नित 'दुर्घटना' होने दे...!!
  देश जगाने की हठ में तू....
  क्यूँ दुख में रोया है...!!
  धीरे हाॅर्न बजा रे पगले..
  देश' हमारा सोया है....!!!

  अगर देश यह 'जाग' गया तो..
  जग 'सीधा' हो जाएगा....!!
  पाक चीन 'चुप' हो जाएँगे....
  और 'अमरीका' रो जायेगा...!!
  राजनीति से 'शर्मसार' हो ....
  'जन-गण-मन' भी रोया है..!!
  धीरे हाॅर्न बजा रे पगले...
  देश हमारा सोया है...!!!

  'देश' हमारा सोया है....!!!
  AS PnL

  ReplyDelete
 2. भाऊ ह्या सर्व प्रकरणां वरुन एक गोष्ट स्पष्ट होते की भारतिय सव॔ यत्रंणाच पोखरली आहे.
  हे सर्व शासकिय अधिकारी आता इशरत व प्रकरणाची पोलखोल करत आहेत त्यांनी त्यांवेळी पण हि माहिती काही प्रमाणात मिडिया ( Times Now ABP Star Aaj Tak आशा काही चॅनेल वरिल प्रमुखांच्या एडिटर इन चिफ च्या काना पय॔ंतं पोहचवली असणार. काहि अधिकार्‍यांचे टाॅरचरिंग तर मिडिया कडे नक्कीच पोहचले पण हे सर्व एडिटर इन चिफ आत्ता पोटतिडकीने बोलण्याचा आव आणतायत व अमिताभ होण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची अकाउंटेबिलीटी कोणाकडेच नाही. त्यामुळे अशी देश विघातक प्रकरणे वारंवार होणार.
  जेव्हा प्रशासन, लोकनियुक्त सरकार फेल जाते तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मिडिया महत्वाची भुमिका बजावतो असा सामान्य माणसाचा समज आहे. पण मिडिया पुण॔ पोखरला आहे. त्यामुळे परत परत नियती वर विसंबून रहावे लागणार आहे. एनजीओ प्रणित मेणबत्ती वाले( सोशल मिडिया वाले कुठे गेले?
  एवढे मोठे अदोंलन करणारे (ह्याच मिडियाने ते उभे केले ) आण्णा हजारे, केजरीवाल यांनी हे प्रकरण आत्ता पण का लाउन धरले नाही याचा पण उहापोह आपण करावा हि विनंती. इतर सर्व गोष्टी वर माइक धरुन पाठलाग करणारे रिपोर्ट्स आण्णा केजरीवाल कन्हैया यांच्या प्रतीक्रीया का घेत नाहीत यांना प्रतिक्रिया न घेण्याचे आदेश कोण देत आहे. त्यातून मिडियाचे आसु मगरिचे असु आहेत व आपण त्यात वाहुन जात आहोत.
  अमुल शेटे पनवेल

  ReplyDelete
 3. http://www.thelotpot.com/big-expose-congress-ncp-funding-kanhiya-kumar-creating-mirage-crowd-meetings

  ReplyDelete
 4. Aajhi aapla desh gulamitch aahe, khare swatantra ajunhi milalele nahi, lokshahi sarkar fakt navala aahe, parkiy shakti(isi) ithe hastaka marfat rajyakarbhar karat aahe

  ReplyDelete