Monday, March 4, 2019

नशीबवान मोदी

balakot के लिए इमेज परिणाम

१९७० च्या दशकानंतर इंदिराजी तशा राजकारणात एकाकी पडलेल्या होत्या. कॉग्रेसची प्रतिष्ठा रसातळाला गेलेली होती आणि पक्षातही सुंदोपसूंदी माजलेली होती. तेव्हा पक्षाला सावरण्यासाठी इंदिराजींना विरोधी पक्षांनी इतकी जबरदस्त मदत केली, की त्यांना थेट दोन तृतियांश बहूमत मिळून गेलेले होते. आज नरेंद्र मोदी नेमक्या त्यात स्थितीत येऊन पोहोचले आहेत. त्यांच्यापेक्षाही त्यांच्या विरोधकांनाच मोदींना बहूमताच्या पार नेऊन थेट निर्विवाद म्हणजे दोन तॄतियांश बहूमताच्या पार नेण्याची घाई झालेली आहे. तसे नसते तर पुलवामा आणि बालाकोटच्या निमीत्ताने विरोधकांनी इतका तद्दन बालिशपणा केला नसता. भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाई विषयक शंका घेतल्या नसत्या वा पुरावेही मागितले नसते. इंदिराजींना तेव्हा विरोधकांचे कसे ‘आशीर्वाद’ लाभले हाच माझ्या नव्या पुस्तकाचा ‘अर्धशतकाचा अधांतर’चा विषय आहे. ऐन लोकसभा निवडणूक दाराशी उभी असताना पुलवामानंतरचा भारतातील राजकीय घटनाक्रम १९७० च्या जमान्याचे स्मरण करून देणारा आहे.

लोकसभेच्या निवडणूका अवघ्या एक महिना दुर आहेत आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत घेत आहेत. अशवेळी त्यांना निवडणूका एक आव्हान म्हणून उभे करणे, हे विरोधी पक्षाचे लोकशाहीतले कर्तव्य आहे. त्यासाठी पाच वर्षाच्या कारकिर्दीत सामान्य जनतेला काय मिळाले किंवा हुकले; त्याचाच पाढा विरोधकांनी वाचण्याची गरज असते. त्याच आधारे बिगरभाजपा पक्षांनी किती अधिक कारभार दिला असता आणि लोकांच्या आयुष्यात किती सुख समाधान आणले असते, त्याची ग्वाही देण्यात पुढाकार घेण्याची गरज आहे. पण सध्या जो काही शिमगा धुळवड चालली आहे, त्याकडे बघता, तमाम मोदी विरोधक नरेंद्र मोदींना नव्या इंदिरा गांधी बनवण्यासाठी कंबर कसून उभे ठाकलेले दिसतात. इतिहासापासून काहीही शिकायची तयारी नसली, मग यापेक्षा वेगळे काहीही शक्य नसते. पण त्याहीपेक्षा गंमत याची वाटते, की मोदी नावाच्या या माणसाचे नशीब किती बलवत्तर असावे? त्यांना हवे तसे विरोधक वागावेत आणि विरोधकांनीच पंतप्रधानाला अशी पोषक राजकीय परिस्थिती निर्माण करून द्यावी, याला नशिब नाही, तर दुसरे काय म्हणता येईल? इंदिराजी अशा नशीबवान होत्या. बारगळलेली कॉग्रेस पक्षाची प्रतिष्ठा व राजकीय लोकप्रियता टिकवण्यासाठी त्यांना जनतेचे लक्ष खर्‍या प्रश्नांवरून उडवून भावनिक विषयाकडे लोकांना वळवण्याची मेहनत घ्यावी लागलेली होती. पण मोदी लोकांचे लक्ष विकास व खर्‍याखुर्‍या प्रश्नांकडे वेधण्याचे प्रयत्न करीत असताना विरोधक मात्र लोकांना भावनिक विषयाकडे ओढत आहेत. मोदींसाठी निवडणूका जिंकणे सोपे करून टाकत आहेत. तसे नसते, तर पुलवामा आणि नंतरचा पाकिस्तानवरील हल्ला, हा विषय विरोधकांनी आजचा राजकीय विषय होऊच दिला नसता. मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधक कटिबद्ध असते, तर त्यांनी असे खुळे प्रश्न विचारले नसते की आरोपही केले नसते.

पुलवामा घातपातानंतर ५६ इंची छाती कुठे गेली असा प्रश्न विचारला गेला व मोदींची टवाळी करण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानी हद्दीत घुसून हवाई दलाने पाकिस्तानी जिहादी छावण्यांवर हल्ला केला. त्याची पहिली किंकाळी पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या प्रवक्त्यानेच फ़ोडलेली होती. भारत सरकार व आपली सेना त्याविषयी मौन धारण करून बसलेली होती. भारतीय लढावू विमानांनी बालाकोटमध्ये बॉम्ब फ़ेकल्याचा पहिला गवगवा जनरल गफ़ूर या पाकिस्तानी प्रवक्त्याने केला. हे झाल्यावर मोदी सरकारने त्याचे श्रेय घेतले नाही, की त्याला दुजोराही काही तास दिलेला नव्हता. तात्काळ कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दुजोरा मिळण्यापुर्वीच त्या हल्ल्यासाठी भारतीय हवाई दलाची पाठही थोपटून घेतली. अर्थात त्यांना त्यातून राजकारण खेळायचे होते, यात शंका नाही. श्रेय हवाई दलाचे आहे मोदी सरकारचे नाही; असेच राहुलना ध्वनित करायचे होते. त्यालाही हरकत नाही. पण तसे केल्यामुळे हवाई हल्ला झाल्याचे मोदी सरकारच्याही आधी राहुल गांधींनी मान्य केलेले होते. मग आता चारपाच दिवसांनंतर त्याच हल्ल्याचा पुरावा राहूल वा अन्य कुणा कॉग्रेसवाल्यांना कसा मागता येईल? समजा तसा हल्ला झाला नसेल, तर त्याची भारतात पहिली बातमी राहुल गांधींनीच दिलेली नव्हती का? त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन करण्यातून काय म्हटले होते? हल्ल्याचे स्वागत, हेच शब्द होते ना? मग हल्लाचा पुरावा मागण्यापुर्वी किंवा तपासून घेण्यापुर्वी हा कॉग्रेस अध्यक्ष कुठल्या नशेत स्वागत अभिनंदन करीत होता? नसेल तर अभिनंदनाच्या घाईची काय गरज होती? पण बेधडक खुळेपणा चालला आहे. हल्ल्याचे स्वागत आणि त्याच हल्ल्याचे पुरावे मागण्याचा खुळेपणा कशाचा पुरावा आहे? कॉग्रेसचा अध्यक्ष वेडा झाला नसेल तर इतका खुळेपणा त्याच्याकडून होऊ शकला असता काय? यातले तर्कशास्त्र काय?

समारंभातल्या पाहुण्याने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटायची, स्पर्धकांची पाठ थोपटायची. त्यांच्या हुशारीचे कौतुकही करायचे आणि नंतर त्या स्पर्धेच्या आयोजक संस्थेलाच सवाल करायचा, की अशी कुठली स्पर्धा झाल्याचा काही पुरावा आहे काय? असेल पुरावा तर मला दाखवा. अन्यथा हे बक्षिश वितरणच एक फ़्रॉड मानावा लागेल. ह्यापेक्षा राहुल गांधी वा त्यांच्या मागे खुळ्यासारखे पळत सुटलेल्यांचे तर्कशास्त्र किंचीत वेगळे आहे काय? विद्यापीठाने पदवीदान समारंभात आमंत्रित केलेल्या पाहूण्याने मुलांना पदव्या द्यायच्या आणि आपल्या दीक्षांत भाषणात परिक्षा झाल्याचा पुरावा मागावा; त्यापेक्षा बालाकोटचे पुरावे मागणार्‍यांचे वर्तन वेगळे आहे काय? विरोधापेक्षा मोदीद्वेषाच्या आहारी गेल्याने हा बेताल खुळेपणा या थराला येऊन पोहोचला आहे. राहुल गांधी वा कॉग्रेसच्या मुखंडांना बालाकोट हल्ल्याविषयी शंका असेल, किंवा पुरावे हवे असतील, तर आधी त्यांनी हवाई दलाची पाठ थोपटल्याबद्दल माफ़ी मागितली पाहिजे. कारण जेव्हा आपण पुरावे मागतो, तेव्हा आपण मूळ दाव्यावर अविश्वास व्यक्त करत असतो ना? मग अविश्वासच होता वा असेल, तर त्यातला मानकरी असतो, त्याची पाठ थोपटताना अक्कल कुठे शेण खायला गेलेली असते? तर हल्ला, बालाकोट वा हवाई दल दुय्यम असतात. मोदींना अपमानित करण्याची नवी संधी म्हणून खुळेपणाच्या आहारी जाऊन राहुलनी हवाई दलाच्या अभिनंदनाचा पोरकटपणा केला. हवाईदलाचे अभिनंदन करण्यापेक्षा त्यातले मोदी सरकारचे श्रेय नाकारण्याची घाई त्याला कारणीभूत होती. कारण हल्ला झाल्याची बातमी आली तेव्हा त्यविषयी कुठली शंका नव्हती की त्याचे कौतुकही नव्हते. त्यापेक्षा मोदींना खिजवण्याची संधी साधायची होती. मग घटनाक्रम उलगडत गेला तेव्हा पुरावे मागण्याची अक्कल आली. पण तोपर्यंत हवाई दलाच्या अभिनंदनाचे शेण खाऊन झालेले होते. ही विरोधकांची शोकांतिका होऊन गेली आहे.

आता गंमत अशी झाली आहे, की बालाकोट विषयीचे सगळे खुलासे वा दावे सुरक्षा दलाकडून होत आहेत आणि त्यावर शंका घेण्यातून राहुलच्या नेतॄत्वाखाली भरकटत गेल्या विरोधकांना पदोपदी तोंडघशी पडावे लागत आहे. कारण मनातून ते मोदींच्या विरोधात आहेत आणि त्यासाठी शंका घेत आहेत. पण त्यांच्या प्रत्येक शब्दातून संशय मात्र हवाई दल वा भारतीय सेनेच्या कर्तृत्वावर घेतला जात आहे. थोडक्यात भाजपा किंवा मोदींना भारतीय सेनादलाच्या कर्तबगारीचे श्रेय आपणहून विरोधकांनी देऊ केलेले आहे. जितके आरोप मोदींना सतावण्यासाठी होत आहेत, तितकी भारतीय सेना दुखावली जात असून सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या मोदींच्या बाबतीत सामान्य जनतेच्या मनातली आत्मियता वाढत चालली आहे. सैनिक युद्ध करतात किंवा हुतात्माही सैनिकच होतात. त्याचे श्रेय राजकीय नेत्याने मागायचे नसते की कोणी सहसा देतही नाही. पण आपल्याच सेनेच्या कर्तबगारीविषयी शंका घेण्य़ातून ज्या भावना दुखावल्या जातात, त्या आपोआप सेनादलाच्या समर्थनाला जो कोणी उभा राहिल, त्याच्या पारड्यात जाऊन पडत असतात. आज आपल्या प्रत्येक सभेत मोदी वा भाजपाचे नेते अगत्याने सेनादलाच्या कौतुकाचे शब्द बोलत आहेत आणि विरोधक त्याच कर्तबगारीच्या कृत्याविषयी शंका घेऊन प्रश्न विचारत आहेत. तर मग ती सहानुभूती कुणाच्या वाट्याला जाईल? हवाई दल वा सेनादल निवडणूका लढवित नाही. सहाजिकच त्यांच्या समर्थनाला उभा राहिलेला पक्ष वा नेत्याच्या बाजूनेच मग जनतेची सहानुभूती जात असते. त्यासाठी मोदी वा भाजपाने खास प्रयत्न केलेले नाहीत. पण विरोधकांनी मात्र सहानुभूतीचे एक एक मत मोदींच्याच पारड्यात व मोदींच्या विजयाला हातभार लावण्यासाठी खर्ची पडावे, यासाठी कंबर कसली आहे. याला मोदींचे नशीब नाहीतर काय म्हणायचे? विरोधक सत्ताधार्‍याला अफ़ाट यश मिळण्यासाठी इतकी मेहनत घेतात, त्याला नशीब याखेरीज दुसरा शब्द नाही.


27 comments:

 1. अर्धशतकाला अधांतर हे खुपच छान पुस्तक आहे. इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना करता कार्यपद्धती थोडी सारखी असली तरीही इंदिरा गांधींची नियत साफ नव्हती. भ्रष्ट, कर्तव्यशुन्य, जनमानसात स्थान नसलेल्या लोकांना जवळ केले. सत्ता आपल्या खानदानाबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली. याबाबतीत मोदीजी इंदिरा गांधी ह्यांच्या विरोधात आहेत.

  ReplyDelete
 2. सद्य परिस्थितीचे अत्यंत अचूक विश्लेषण, भाऊ! अप्रतिम लेख!! या काँग्रेसशी दुःशासनांचे आणि दुर्योधनाचे पुरेपूर वस्त्रहरण करीत राहा, भाऊ!

  ReplyDelete
 3. भाऊ काका, विरोधकांना इतकं खुळं समजु नका. हे सगळे विरोधक मुळात ज्या मुस्लिम मतपेढी वर अवलंबून आहेत ते लोक अजूनही पाकिस्तान च्या बाजूनेच आहेत आणि त्यांना खुश केलं तरंच ती मतं मिळणार हे ह्यांना पक्के ठाऊक आहे. त्यांना खुश करायला हे लोक देशालाही विकायला मागे पुढे बघत नाहीत तिथे कारवाईचे पुरावे मागून आपल्याच सैन्य दलाचं मनोबल खच्ची केलं तर त्यात नवल ते काय? इतके वर्ष आपल्याच सेने ला शिव्या घातल्या कि हे लोक खुश होऊन मतदान करायचे ती परिस्थिती फार बदललेली नाही. ती मतं मिळवायचा हा सगळा आटापिटा वाटतो.

  दुसरी गोष्ट ह्या लोकांना ते सगळे पुरावे मागल्या दराने पाकिस्तान किंवा चीन ला द्यायची घाई असावी जेणेकरून ते पुढल्या वेळी सावध असतील. असेही देशाचा एवढा मोठा डॉकलाम प्रॉब्लेम चालू असताना युवराज गुप्तपणे चिनी राजदूताला भेटलेच नसते. किंवा मणी अय्यर सारख्या खर्च केलेल्या पैश्यांचा मोबदला देण्यासाठी हे देशद्रोही असली कामं करत असतील.

  ReplyDelete
 4. भाऊ! अबकी बार 350 पार
  आणि जसा आपण अंदाज व्यक्त केला आहे की अजुन काहीतरी घडेल,
  तर मग 400 पार नक्कीच.

  ReplyDelete
 5. If you add all the defence and allied forces plus all their close relatives / friends / sympathisers, it becomes a very significant vote bank too...
  Seems opposition have lost sight of that...

  ReplyDelete
 6. हाच प्रकार उरीनंतर सर्जिकल स्ट्राइकनंतर युपी इलेक्शनवेळी झाला होता.तेव्हाचे निकाल पण अनपेक्षितच होते सर्वांना आता पण तसच चालुय

  ReplyDelete
 7. Kharach khup ardhavat aahe rahul. ani tyala mananare kon hyacha vicharach n kekela bara...

  ReplyDelete
 8. भाऊ, अतिशय उत्तम विवेचन. हे ही खरे आहे की मोदी कायम विकास आणि देशाचा मानसन्मान यावर बोलत असतात आणि विरोधक मोदींना शिव्या होय शिव्याच देत असतात. याने मोदी आणि भाजपा यांचाच प्रचार होतोय हे विसरताहेत.

  ReplyDelete
 9. भाऊ ...............ह्या अमेरिकन वर्तमानपत्रानीपण बालाकोटमध्ये काहीच झाले नाही असे सांगणे म्हणजे हा आंतरराष्ट्रीय कट आहे की काय असे वाटते. ह्या सर्व आघाडींवर डोके शांत ठेवून लढणे म्हणजे मोदी ह्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर उत्तरोत्तर वाढतच जातो.

  ReplyDelete
 10. श्री भाऊ हे बरिक खर की मोदी नशीबवान आहेत, नपेक्षा विरोधक सध्या गप्प रहाते, आणि निवडणूक जाहीर व्हायची वाट बघते, तुमचे लेख बहुधा मराठी मोदी विरोधक वाचत नसावेत

  ReplyDelete
 11. Bhau sadhya maja ashi ahe ki atireki halla zala ki dosh modincha asto ani apan lashkari karvai keli ki tyacha shreya he lashkaracha asta modincha kahi sambandha nasto!!

  Charchesathi he suddha manala tar mag jevha congress asa mhante ki Indira Gandhinni pakistan todla...tyacha artha asa ghyayla lagto ki tya swatach banduk gheun simevar jaun golibar karat hotya...

  ReplyDelete
 12. भाऊ तुम्ही Burnol घेऊनच बसलात, अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण.

  ReplyDelete
 13. अर्धशतकाचा अधांतर हा कुठे मिळेल, कृपया माहिती द्या !

  भाऊ तुम्ही कॉंग्रेस च्या नेत्यांना महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्यांना एवढे प्रचंड मुद्दे देताय तरी ह्या नेत्यांच घोडं कुठे पेंड खात हे काही समजायला मार्ग नाही, का त्यांना राजकीय आत्महत्या हौस आली आहे हे म्हणावे लागेल

  ReplyDelete
  Replies
  1. अर्धशतकाचा अधांतर हा कुठे मिळेल,
   please go to book ganga site and order on line got book in 2 days
   very prompt.

   Delete
 14. Bhau I am regularly reading your blogs they are exceptionally impartial and absolutely realistic,I hereby request you to get these blogs translated in hindi which will help reaching at all india level.

  ReplyDelete
  Replies
  1. Bhau even would like to see you on you tube regulary, I think most of us are wishing the same.

   God bless you with good health Prasanna Rajarshi

   Delete
 15. आधी वायूसेनेचे अभिनंदन केले आणि नंतर पुरावे मागितले. हा खुलचटपणा इतर मीडिया दाखवत नाही. विरोधक जनतेपासून तुटले आहेत. पण विरोधक परत काहीतरी भावनिक मुद्दा उपस्थित करतील. मीडिया मार्फत राळ उडवून देतील. जसे मुंबईत केले तसे परत मोफत वस्तूंचे गाजर दाखवतील. आता सगळेजण मोदींविरुद्ध एक झाले आहेत.
  त्यामुळे निवडणूक होई पर्यंत काय काय पाहावे लागणार कुणास ठावूक.
  विंग कमांडर अभिनंदन हा UPA च्या काळात सैन्यात दाखल झाला आणि त्याचे प्रशिक्षण झाले हे खुर्शीद यांनी सांगून टाकले आहे. अजून नीच पातळी ला किती जायचे?

  ReplyDelete
 16. तिन्ही सेना दलाची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कि पुरावे आहेत. पण ते पुरावे कधी सादर करायचे हे सरकार ठरवेल. मला वाटतंय कि सरकार मुद्दाम उशीर करत आहे पुरावे सादर करायला. जेणेकरून सर्व विरोधकांचे( त्यात पत्रकार, विचारवंत सुद्धा) पितळ उघडे पडेल. ज्यावेळेला हि मागणी शिगेला पोहचेल त्यावेळेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार पुरावे सादर करील

  ReplyDelete
 17. भाऊ विरोधी पक्ष मोदी विरोधाची काविळ झाल्यामुळे ईतक्या
  थराला गेली आहे . जाणीवपूर्वक संशयास्पद असे शंकास्पद प्रश्न ऊपस्थित करुन हे बुद्धिजीवी भारताची बाजू आतरराष्ट्रिय स्तरावर कमकुवत करत आहेत व मोदींच्या प्रयत्नावर अक्षरशः पाणी फिरवत आहेत.परीणाम सामान्य जनता आपसुकच मोदींच्या मागे खंबीरपणे एकवटत आहे . महागठबंधनचा प्रयोग बारगळणार हे आता स्पष्ट होत आहे व हताशा व्यक्त करण्याचा नादात हवाईदलाच्या कारवाईचे पुरावे मागत आहे, जनतेचा सैन्यावर विश्वास आहे पण यांचा नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरे काय?

  ReplyDelete
 18. काँग्रेसला घरघर लागली आहे याचा हा उत्तम पुरावा म्हणता येईल.

  ReplyDelete
 19. अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी Just order on book ganga, Thanks Bhau , May god bless with good health.

  ReplyDelete
 20. Why Modi will win 300 plus if there is no Mahagathbandhan and why he will win 350 plus if there is a Mahagathbandhan, an excellent scientific analysis based on hard empirical evidence.

  Bhau is a veteran Marathi journalist of many years and a very perceptive political analyst. In 2013, right before the 2014 election, he had written a book “Modich ka?” which means “How Modi?”. At that time, he had predicted that Modi would get a full majority which everyone thought was impossible but the results proved otherwise. Now, he is back with a book “Punha Modich ka” i.e. “How Modi again?”.

  He has done a detailed study of the political scenario, and written the book with lot of references to past elections, examples and political and social context and history. That is the first part of the book, the second part of the book is purely analysing the various permutations and combinations, the numbers and prediction on the basis of his theory and analysis. What I attempt here is to jot down some key points from his theories. He has predicted a seat count of 300+ for BJP only if there no Mahagathbandhan (MGB) i.e. single opposition to Modi and 350+ if there is a MGB. Latter is bizzare but explanation will come later on.

  Here goes:

  A. Fightable seats

  - Political parties put up candidates everywhere in elections like AAP did in 2014, candidates all over the country. However, they only fight with full might and determination to win in a subset of total seats. By that, it means you fight with all effort, all resources and a possibility of winning in the seat. These seats are where you come first or second.

  - BJP fought about 325 seats with full might by themselves in 2014 and allies fought another 60-70 more. They got 282 then.

  - Knowing that they had hit max in 2014 and attrition was expected, Modi and Shah worked hard in last 4 years to increase coverage and have added Bengal, Odisha, possibly Kerala, Haryana and North East to the kitty of seats where they will put all their might.

  - This has increased their fightable seat tally to 380-400. Allies would another 50-60 which means the NDA will fight at about 450+ seats through the country with full might.

  - This number was before the alliances in TN, Mah were sealed but the numbers will largely hold.

  - There was also another theory of his that there are southern states where BJP has no presence at all and parties there are non NDA so about 100 odd seats where BJP could just not contest so the 450+ number holds this way too. Now with TN alliance, the number goes up perhaps.

  - The more number of seats you contest with full might, greater chances of you winning more seats too. So 380-400 fighting seats will definitely give a large yield especially with the Modi factor (explained later).
  contd-----

  ReplyDelete
 21. B. Gathbandhans

  - 1977 elections saw a Mahagathbandhan which was a mega alliance of all opposition parties merging into one party the Janata Party – socialists, right wing all joined in. This ensured a 1 against one scenarios i.e. candidates between Congress and opposition. That ensures a straight fight and less vote cutting. Janata Party won handsomely-

  - 1989 election – Rajiv Gandhi had a brutal majority of 400+ in 1984 after Indira Gandhi’s death. In 1989, the opposition parties collaborated and there was a 1:1 candidate ratio. This had Left, Janata Dal (led by V.P.Singh) and BJP. Rajiv Gandhi came down to 200- seats and lost power.-

  - Point is, 1:1 is possible and MGB started with that idea. However, for that to happen, not only should the top align, the alignment has to go down right up to foot soldiers and this takes time hence MGB and seat adjustments should have happened by now.

  - This hasn’t happened, look at ease with which BJP is sealing alliances everywhere. MGB is nowhere in picture

  - So what we will mostly have now is a MGB led by Congress and which will be the second front and a third front.

  - Second front will have Congress + NCP + DMK + TDP + INLD (?) + JDS + RJD

  - Third front will be parties like Mamata, Naveen Patnaik, KCR, Jagan, Mayawati, Akhilesh, AAP etc.

  - Second front will put up a fight in about 350-400 seats with congress having fightable seats of 150-200.

  - Third front between them will have about 200-230 seats where they will fight. Bhau had 231 in his book but that was before the TN alliances happened.

  C. Vote blocks and why the third front

  - Voters are of different categories – those that vote their caste or religion or ideology.

  - There are core voters and there are floating voters.

  - Core voters may vote on basis of caste, religion or ideology. Floating voters will vote on basis of last minute considerations.

  - There are also another type of voter blocks. Those who vote for you because they don’t want one party in power or are against one party. Muslims and Christians do that to BJP.

  - Congress was the predominant power for last 60 years and most of the regional parties rose to prominence opposing the Congress. Large blocks of their voters are anti congress.

  - When these parties ally with Congress, these vote blocks either go to the opposition or Congress but mainly the former. This is what happened in UP when Akhilesh and Congress allied and Bengal where Communists aligned with Congress and lost to Mamata.

  - The most recent example is Telangana where last assembly elections, TRS had a simple majority. In this election, Chandrababu (CBN) aligned with Congress and others and it was a Mahatakutami or a MGB. CBN was decimated as his vote went to TRS and partly to Congress. TRS came with 2/3rd majority.

  - Therefore, parties like TRS, Mamata, BSP, SP, Jagan or even AAP are wary of aligning with Congress because their vote base either shifts to Congress or to opposite party.

  - Hence the third front is emerging and will present a challenge for dethroning BJP
  contd---

  ReplyDelete
 22. D. Modi factor

  - Modi was relatively unknown factor in 2014, he was voted in on promise and goodwill by people who were also very fed up with UPA misrule

  - Even his worst critics would say that Modi has not done bad. It is akin to a man drowning. If someone saves him, he will not crib that you didn’t put me in a 5 star hotel. He will be thankful to him for saving him.

  - Modi “saved” a drowning country and people and lot of people recognized this inside. He might not have done extremely well or there may be gaps but when people weigh him against opposition, they will be loathe to take a risk of throwing him out and bringing in instability.

  - The other factor is people have got fed up of the Lutyens tyranny, a group of tiny elite who dictate everything in the country. Modi was pure outsider and people put faith in him to destroy this old order. He has partly succeeded, people will like him to finish the job.

  E. How it will all work out

  - There will be 3 broad fronts with conflicting vote banks and at least 3 candidates for 1 seat in this Lok Sabha election

  - There will be places where all three fronts will fight, some where second and third front will fight or third and first front will

  - This will ensure vote splitting, vote block movement and completely unpredictable outcomes which Lutyens media cannot figure out

  - Many voters vote “national” in LS elections, they may have other preferences in state elections but in LS, they vote for Prime Minister and given Modi’s popularity and performance, he has an edge over others

  - BJP itself is contesting 400 odd seats and NDA another 60-70. This will increase their chances of winning seats with all the factors above considered too.

  - BJP got 31% vote share in 2014 and alliance got 40%. They have added lot many more voters in last 4 years and govt has reached lots of people. Their target vote share is 50% but a realistic target might be about 40%. This would give the seat yield desired though this needs to be tested.

  - Finally – why 350 if MGB forms (no likelihood now). To go back to Telangana example, when people see antagonists come together against a decent performing government just for the sake of it, the voters usually shift to the performing government against whom people have ganged up

  Considering all these factors, Bhau says – it will be Modi again.

  completed

  ReplyDelete