Saturday, March 30, 2019

वाराणशीतून प्रियंका

priyanka gandhi के लिए इमेज परिणाम

एक गोष्ट मानावी लागेल. प्रियंकाने राजकारणात उडी घेतल्यापासून अनेक पुरोगामी वांझोट्या पत्रकारांना डोहाळे लागण्याची पाळी आलेली आहे. राहुलने त्यांची मागल्या दहापंधरा वर्षात जी निराशा केलेली होती, त्यातून सुस्कारा सोडण्याची निदान सोय झालेली आहे. खेड्यात वा देवळात प्रियंकाचे दौरे दाखवताना आणि त्यावर चर्चा करताना सर्वच तत्सम पत्रकारांच्या चेहर्‍यावर नवा जोश आलेला आहे. त्यामुळे प्रियंकाचे कुठलेही वाक्य घेऊन रोज नवा फ़ड रंगवण्याची स्पर्धा सुरू झाली तर नवल नाही. अर्थात लोकशाहीत प्रत्येकाला त्याचा अधिकार राज्यघटनेनेच दिलेला आहे आणि अगदी अघोषित आणिबाणीतही मोदींना त्यात बाधा आणता आलेली नाही, ही पंडित नेहरूंची कृपा आहे. सहाजिकच प्रियंका काय करणार याच्या परिकथा रंगवण्याची हौस भागवून घेतली गेली, तर आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यातूनच शुक्रवारी वाराणशीत प्रियंका निवडणूक लढवण्याची कल्पना पुढे आली आणि त्यावर चर्वितचर्वण सुरू झाले. कारण वाराणशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असून तिथे प्रियंका म्हणजे मोदी पराभूतच झाल्यात जमा होतात ना? आयडिया खुप छान आहे. पण प्रियंका ते धाडस करणार का? ते अर्थात त्यांच्या मनावर अवलंबून आहे. इथे एक मोठा फ़रक कळतो. जो मोदींनी एका भाषणातून कथन केलेला आहे. कॉग्रेससहीत सर्व पक्षाच्या नेत्यांना आपण काम केलेल्या मतदारसंघात सुद्धा उमेदवारी मिळण्याची हमी नसते. त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी लागते. पण गांधी कुटुंब राजघराणे आहे, त्यांना कुठेही तिकीट वा उमेदवारी मागण्याची गरज नसते. कुठल्याही जागी त्यांनी इच्छा व्यक्त केली, की जागा मोकळ्याच असतात. त्यामुळे प्रियंकाच्या इच्छेवर आहे. ह्याला पुरोगामी नेहरूवादी लोकशाही म्हणतात. जिथे पक्ष सगळे निर्णय घेतो आणि पक्ष म्हणजे एक कुटुंब असते.

आठवते? पंधरा वर्षापुर्वी वाजपेयी सरकारने मध्यावधी निवडणूका घेतल्या आणि भाजपाला संपवायला निकालानंतर सर्व पक्ष एकवटले, तर त्यांनी एकमुखाने पंतप्रधान म्हणून सोनियांची निवड केली होती. राष्ट्रपतींना पाठींब्याची पत्रेही दिलेली होती. पण म्हणून सोनिया पंतप्रधान झाल्या नाहीत ना? त्याला नेहरूवादी पुरोगामी लोकशाही म्हणतात. पक्षाने निर्णय घेतला की सोनियांनी पंतप्रधान होऊ नये आणि सोनियांनी माघार घेतली होती. हा पक्ष कोण होता व निर्णय कोणी घेतला, त्याचाही खुलासा सोनियांनी संसद भवनाच्या बैठकीत केला होता. आपला सुपुत्र राहुल गांधी आणि सुकन्या प्रियंका यांनी विचारपुर्वक निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच आपण पंतप्रधान होण्यातून माघार घेत असल्याची घोषणा सोनियांनी केलेली होती ना? त्याला पक्ष किंवा लोकशाही म्हणतात. जिथे पक्ष म्हणजे एका कुटुंबातील मोजकी माणसे निर्णय घेतात आणि बाकीचा पक्ष नंदीबैलासारखी मान डोलावतो, त्याला पक्षांतर्गत लोकशाही म्हणतात. त्यामुळे अशा पक्षाने आदेश दिला तर प्रियंका वाराणशीतून निवडणूक लढवायला सज्ज आहेत. म्हणजे त्यांनीच तसे पत्रकारांना सांगितलेले आहे. हे जगातले एकच कुटुंब किंवा परिवार असा आहे, की तिथे पक्ष, कंपनी वा संघटना फ़क्त एका रक्ताच्या नात्याने निर्माण होत असतात. कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणिस राहुल गांधी. तेच दोघे नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र चालवणार्‍या कंपनीचे संचालक असतात आणि तेच यंग इंडियाचेही भागिदार असतात. मग हेच दोघे मिळून कॉग्रेस पक्षाच्या निधीतून ९० कोटी रुपये नॅशनल हेराल्ड चालवण्यासाठी कर्जावू रक्कम देतात आणि ती रक्कम बुडीत गेली म्हणून कंपनीच्या बुडव्या संचालकांना कर्ज माफ़ही करतात. मग तेच यंग इंडियाचे भागिदार म्हणून नॅशनल हेराल्ड विकतही घेतात. बाकी सर्वांनी बैलासारखी मान डोलवायची असते. त्याला नेहरूवादी पुरोगामी लोकशाही म्हणतात.

एकूण अशी नेहरूवादी लोकशाही जगवायची आणि टिकवायची, म्हणजे संविधानाचा बचाव असतो. देशातील राज्यघटना सुरक्षित ठेवायची असेल तर नेहरू कुटुंबाची हीच मनमानी कायम राखली पाहिजे, असा एकूण पुरोगामी सुर असतो. मग वाराणशीत प्रियंकाला उभे रहायचे असेल तर निर्णय पक्षाने घ्यायला नको काय? त्यांनी शत्रुघ्न सिन्हाला पक्षात घेतला हे खुप चांगले झाले. आपल्या ऐन उमेदीत शत्रूने एका चित्रपटात अशी ‘पक्षीय’ भूमिका पार पाडलेली होती. कुठल्या अड्ड्यात पत्ते खेळताना समोरच्या खेळाडूने तीन गुलाम दाखवल्यावर शत्रू त्याला तीन बादशहा जसे दाखवतो, तशीच एकूण कॉग्रेसमधील नेहरूशैली असते ना? तो समोरचा खेळाडू शत्रूघ्नला तीन बादशहा दाखवायला सांगतो, तर दोन पत्ते दाखवून झाल्यावर शत्रू पैसे उचलू लागतो. त्यावर समोरचा तिसरा बादशहा दाखव म्हणतो. शत्रू त्याच्या नाकावर ठोसा मारून म्हणतो, ‘अबे तिसरा बादशहा हम खुद है.’ त्याला नेहरूवादी लोकशाही म्हणतात ना? मग शत्रू योग्य जागी पोहोचला ना? असो, तर प्रिय़ंका वाराणशीतून उभी रहाणार म्हणजे निर्णय तिचा तिने घ्यायचा आहे आणि इंदिराजींसारखी दिसत असल्याने विजय पक्का आहे. मुद्दा इतकाच, की ही गोष्ट अशा एकाहून एक शहाण्या विश्लेषक पत्रकारांना इतक्या उशिरा कशाला सुचावी? मागल्या खेपेस सुचली असती, तर वाराणशीत केजरीवालांना जावे लागले नसते, की उत्तरप्रदेशात ७१ जागा भाजपा जिंकू शकला नसता. भाजपाला बहूमत मिळाले नसते, की मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते. पण तेव्हा तसे होऊ शकले नाही. कारण देशात एक चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो, हे नेहरूंचे कर्तृत्व सिद्ध करायचे बाकी होते, म्हणून तेव्हा प्रियंकांचा हुकमी पत्ता गुंडाळून झाकून ठेवलेला होता. आता तो बाहेर काढला आहे आणि मोदी शहांना उत्तरप्रदेशातून काढता पाय घेण्याची पाळी येणार आहे. कार्य सिद्धीस न्यायला सुरजेवाला समर्थ आहेत.

असो, खरेच तसे झाले तर? केजरीवाल आणि प्रियंका यात मोठा फ़रक आहे आणि सहजगत्या प्रियंकाला पाडून मोदींना निवडून येणे शक्य नाही. ते आव्हान असेल, हे मान्य करावेच लागेल. पण सवाल मोदींसाठी आव्हानाचा नसून मोदींना आव्हान देण्याचा आहे. आपला मतदारसंघ मोदी बदलण्याची शक्यता नाही. प्रियंका तिथे उभे रहाण्याचे धाडस करणार काय? असा सवाल आहे. तिथे मोदी पडतील किंवा कसे, हा विषय दुय्यम आहे. तो एक सामान्य चायवाला किंचा चौकीदार आहे. पण या गडबडीत प्रियंकाला पराभूत होणे परवडणारे असेल काय? कारण तोच आता कॉग्रेससह पुरोगामी नेहरूवादी लोकांच्या हाती उरलेला शेवटचा पत्ता आहे. वाजपेयी वा अडवाणी किंवा मायवती, मोदी हे सामान्य घरातले लोक असतात. ते पराभव पचवू शकतात. गांधी घराण्यातल्या कोणाला पराभव पचवायची कुवत असते का? इंदिरा गांधींसारखे दिसणे व त्यांच्याइतके धाडसी असणे यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. इंदिराजींनी पराभव नव्हेतर दारूण पराभव पचवला आहे आणि त्यानंतरही झुंज देऊन एकाकी लढण्याची क्षमता सिद्ध केलेली होती. नुसती गालाला खळी पाडून त्यांनी सत्ताचक्र उलटे फ़िरवले नव्हते. शिव्याशाप आणि अपमान सोसण्याची अमर्याद कुवत त्यांनी पराभवाच्या काळातही दाखवली व सिद्ध केलेली होती. किंबहूना केव्हा अबोल राहून परिस्थिती बदलण्याची प्रतिक्षा करावी, ती उपजत जाण इंदिराजीपाशी ठासुन भरलेली होती. ज्याचा लवलेश सोनिया वा त्यांच्या बाळांपाशी आढळून येत नाही. मग वाराणशीत लढायची गोष्ट सोपी रहात नाही. नुसत्या हेडलाईन बातम्या देण्यापेक्षा सामोरे यायचे असते. पक्ष ठरविल असल्या पळवाटा काढून भागत नाही. ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो, त्यांच्यासाठी इतिहास असतो आणि स्वत:वरच विश्वास नसलेल्यांना इतिहासजमा व्हावे लागते. जिंकायची जिद्द करायची तर पराभवालाही सज्ज असावे लागते.

8 comments:

  1. भाऊ प्रियांका वाराणसीत निवडणुकीला उभी राहावी म्हणून राजदीप बरखा शेखर गुप्ता असले भुरट्या लोकांचे टोळके उतावीळ झाले आहे कारण मनमोहन सिंग यांच्या काळात हीच मंडळी सरकार चालवत होती, मोदी सरकारच्या काळात हे लोक अक्षरशः भिकेला लागले आहेत आणि मोदी पराभूत व्हावेत म्हणून यांची शेवटची तडफड चालू आहे, आपण म्हणता तसे प्रियांका हा यांचा शेवटचा हुकमी एक्का आहे,उद्या हा डाव फसला तर मात्र भारत खऱ्या अर्थाने काँग्रेस मुक्त होणार आहे, त्यामुळे मोदींना पराभूत करण्या साठी या lutains मीडियाने आपले सर्वस्व पणाला लावले आहे

    ReplyDelete
  2. घराणेशाहीचा चांगला बुरखा फाडलात.

    ReplyDelete
  3. शेवटची तीन वाक्ये लाख मोलाची!

    ReplyDelete
  4. भाऊ काय लिहिलंय.. वा.. नितांत सुंदर. खरं तर
    गांधी फेमिली ही फेक फेमिली आहे. सगळंच फेक आहे. ह्या फेमिलीत कुणाची शैक्षणिक पात्रता नक्की काय आहे? हा
    राहुल ती प्रियांका वढेरा नक्की काय शिकल्यात? ह्यांचं उत्पन्नाचं नक्की सोर्स काय आहे? हे जगातील गर्भश्रीमंतांपैकी एक कसे झाले? बर हे जेन्युइन राजकारणी सुद्धा नाहीत. ह्यांचं राजकारण म्हणजे लोकसभेत डोळा मारणं.. आपल्या पिद्याना गुलामासारखं वागवून लोकसभेत
    हिडिंबासारखं खदाखदा हसायला लावणं. एक नंबरचे रिव्हेंजफूल लोक आहेत ही गांधी फेमिली. ह्यांना राजकारणामधील स्टेट्स्मन म्हणणे हा शुद्ध गाढवपणा आहे. काँग्रेस मधील पिड्डे ऐकून घेतात कारण गांधी फेमिलीच्या नावाखाली सत्ता उपभोगून ह्यांना धमाल करता येते. ह्या कुटुंबियांना भारत त्यांची प्रॉपर्टी वाटतो.. भाउ वाजवाच ह्यांना... थांबू नकाच














































































    ReplyDelete
  5. Exactly Bhau! Priyanka Wadra lacks guts be fight against Modi. I doubt she will even continue campaign for Congress in another week's time.

    ReplyDelete
  6. शालजोडीतले🙌😅😅👌👌👌

    ReplyDelete
  7. व्वा! मानल भाऊ तुम्हाला,एकाहुन एक सरस लेख. लेखणीची धार वाढतच चाललीय. धन्यवाद.

    ReplyDelete
  8. Bhau, you have great logical, crystal clear thoughts. There is no ambugity. Great person.

    ReplyDelete