Tuesday, March 12, 2019

राहुल गांधींना शुभेच्छा

kandahar ajit doval के लिए इमेज परिणाम

जेव्हा एखाद्याला समोरून येणार्‍या संकटात आपण कुठलीही मदत करू शकत नसतो, तेव्हा त्याला नशिबाच्या हवाली करण्याखेरीज काहीही गत्यंतर उरलेले नसते. कारण अशी व्यक्ती आत्महत्या करायलाच कटिबद्ध झालेली असते. म्हणूनच राहुल गांधींना आता शुभेच्छा देण्याखेरीज कोणाच्याही हाती काहीही शिल्लक उरलेले नाही. प्रामुख्याने रोज उठून पंतप्रधान मोदींच्या नावाने शिव्याशाप देण्याला ते राजकीय प्रचार समजत आहेत आणि त्यांच्या भोवती जमलेले अनुयायी कॉग्रेसजन आणि मिंधे मत्रकार बुद्धीमंत, त्याच खुळेपणाचे कौतुकही करीत आहेत. इथपर्यंत ठिक आहे. विरोधकांवर तोफ़ा डागणेही एकवेळ समजू शकते. पण त्याच्याही पलिकडे जाऊन भारतीय सुरक्षादल, हवाईदल किंवा गुप्तचर सेवांवरही शिवीगाळ करण्यातून हा कॉग्रेस अध्यक्ष आपल्यासोबत अन्य पक्षांनाही रसातळाला घेऊन चालला आहे. अन्यथा त्याने सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांच्याविरोधात ताळतंत्र सोडून गरळ ओकली नसती. त्यातून राहुलचे अज्ञानच प्रदर्शित होत नाही, तर ज्या आजीचे कौतुक सांगत हा इसम मतांचा जोगवा मागत असतो, ती आजीही त्याला अजून समजलेली नाही हे लक्षात येते. कारण ज्या कारणास्तव आजीने हौतात्म्य पत्करल्याचे भांडवल हे गांधी कुटुंब करीत असते, त्या आजीचे कर्तृत्व तरी यांना ठाऊक आहे काय? अजित डोवाल आणि इंदिराजी यांच्यातले संबंध तरी ठाऊक आहेत काय? अजित डोवाल हा भारतीय आधुनिक इतिहासातला अपुर्व गुप्तचर मानला जातो आणि किर्तीचक्र मिळालेला तो एकमेव बिगरलष्करी अधिकारी आहे. अशा व्यक्तीच्या विरोधात राहुल वाटेल ते बरळत असेल, तर त्याच्या पदाचीही प्रतिष्ठा राखण्याची गरज उरत नाही. इंदिराजींनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाई यशस्वी केली, त्यामागचा खरा शिल्पकार अजित डोवाल होते आणि म्हणूनच त्यांना अपवाद म्हणून किर्तीचक्र बहाल करण्यात आलेले आहे.

राहुलनी अझर मसूदला सन्मानाचे शब्द वापरले, म्हणून मागल्या दोन दिवसात अनेक वाहिन्यांनी दळण दळलेले आहे. पण त्याला कवडीची किंमत नाही. मसुदला कोणी सन्मानाचे शब्द वापरण्यापेक्षा डोवाल यांच्याविषयी अपशब्द वापरणे संतापजनक आहे. कारण अशी देशभक्तीने भारावलेली माणसेच देशाचे खरे सुपुत्र असतात. त्यांची नोकरी पोलिस खात्यात होती. पण लौकरच त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना गुप्तचर विभागात संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत अनेक कारवाया केल्या आहेत. इशान्येकडील बंडखोर घातपाती गटांना आवाक्यात आणण्यापासून त्यांच्यात मिसळून बातम्या काढण्यापर्यंत जीवावरची कामे या माणसाने पार पाडलेली आहेत. अमृतसर येथील सुवर्णमंदिरात खलिस्तानी दहशतवादाचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले किल्ला बनवून बसलेला होता. तेव्हा तिथे सेनादलाचे रणगाडे घुसवून कारवाई करायची होती. शिवाय अनेक अकाली व अन्य शीख नेत्यांना सुखरूप बाहेर आणायचे होते. अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून डोवाल तिथे गेलेले होते. भिंद्रनवाले याला भेटून डोवाल यांनी अशा चाव्या फ़िरवल्या, की लष्कराला तिथे घुसून किमान हानीत कारवाई उरकता आलेली होती. अमृतसरचा सामान्य रिक्षावाला म्हणून वेशांतर करून डोवाल सुवर्णमंदिरात पोहोचले आणि पाकिस्तानी आयएसआयचा हस्तक म्हणून त्यांनी जर्नेलसिंगची भेट घेतली. त्यालाही उल्लू बनवून तिथे खोटेच बॉम्ब लावले आणि बाहेर येऊन लष्कराला थेट आक्रमण करण्याचा मार्ग खुला करून दिला होता. तेव्हा तिथल्या एकाही खलीस्तान्याला शंका आली असती, तर अजित डोवाल हे नाव आपण आज ऐकलेही नसते. हे त्यांचे एकच धाडस नाही. अशी अनेक जीवावरची कामे डोवाल यांनी नेहमीच केलेली आहेत. त्यासाठीच इंदिराजींनी एक अपवाद म्हणून त्यांना लष्करी सन्मान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचे दुर्दैव इंदिराजींच्या नातवालाच डोवाल ही चीज माहिती नाही.

पाकिस्तानात वेशांतर करून अनेक वर्षे हेरगिरी किंवा अन्य बाबतीत डोवाल यांच्या कामगिरीचे डोंगर आहेत. ज्या मसूदला सोडण्याविषयी राहुल डोवाल यांच्यावर बेछूट आरोप करीत आहे, त्याला सोडण्याचा निर्णय एकट्या बाजपेयी सरकारचा नव्हता. गंमत म्हणून त्याला विमानाने कंदाहारला नेण्यात आलेले नव्हते. काठमांडू नेपाळ येथून ज्या भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण झालेले होते, त्यात सव्वाशे प्रवासी होते आणि त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी चार अतिरेक्यांच्या मुक्ततेची मागणी करण्यात आलेली होती. त्यावर निर्णय घेण्यापुर्वी पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून सल्लामसलत केलेली होती. त्यात राहुलच्या मातोश्रींचाही सहभाग होता. त्यामुळे वाजपेयी सरकारच्या कारवाईवर सोनियांनी आक्षेप कशाला घेतला नव्हता? प्रश्न मसूदला सोडण्याचा नव्हता, तर सव्वाशे निरपराध प्रवाश्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचा होता. तेव्हा राहुलसारखेच दिवटे त्या नागरिकांना सुखरूप परत आणायचा हट्ट धरून बसले होते. आणि नसते आणले तर सव्वाशे भारतीयांना हकनाक मारू दिले, असाही आरोप झालाच असता. मसूदला सोडला नसता, तर त्या प्रवाशांच्या जीवाचे मोल कोणी मोजले असते? त्या परिस्थितीत राहुल वा त्यांच्या मातोश्रींनी काय दिवे लावले असते? प्रवाशांना तसेच मरू दिले असते काय? वाजपेयी सरकारने सोडले म्हणताना, सव्वाशे प्रवाशांना सुखरूप परत आणल्याचे लपवणे; ही निव्वळ बदमाशीच नाही, तर बेशरमपणा आहे. पण तोही राजकारणात खपून जाऊ शकतो. त्यासाठी वाजपेयी वा मोदींना दोष देणेही समजू शकते. परंतु डोवाल यांचा काय संबंध? ज्या देशाशी संबंध नाहीत अशा देशातल्या सत्तेशी वाटाघाटी करायलाही परराष्ट्र खात्याकडे अन्य काही पर्याय नव्हता, तेव्हा आपल्या कर्तबगारीने जगभर मैत्रीसंबंध निर्माण करणार्‍या डोवालांची मदत घेण्यात आली. कारण अफ़गाणिस्तानशी तितकाच एक धागा भारताच्या हाती होता.

विमान अपहरण केलेल्यांना काय हवे आणि कशा वाटाघाटी कराव्यात, याचाही धागादोरा भारत सरकारकडे नसताना केवळ डोवाल यांच्या व्यक्तीगत ओळखी संबंधामुळे तो संवाद शक्य झाला होता. ख्रिश्चन मिशेल वा रॉबर्ट वाड्रा यांना कुठले तरी कंत्राट देऊन दलाली देण्याघेण्याइतका हा विषय साधासरळ नव्हता. नॅशनल हेराल्डच्या नावाने देशातल्या महानगरात मोक्याच्या जागीचे भूखंड बळकावण्याइतके हे काम कागदावरचे नव्हते. कायद्याला बगल देऊन आणि देशीपरदेशी गुप्तचरांना हाताशी धरून डोवाल यांनी त्या वाटाघाटींचा मार्ग मोकळा केलेला होता. ज्या सव्वाशे प्रवाशांचे जीव त्यातून वाचले, त्यांच्यासाठी डोवाल साक्षात देवदुत ठरलेले होते. कारण तिथे भारत सरकारही लंगडे व दुबळे ठरलेले होते. आपले अफ़गाणिस्तानशी राजनैतिक संबंधच नव्हते. राहुल गांधी पाकिस्तान वा चीनी वकिलातीमध्ये जाऊन केक बिस्कीटे खातात, तितके हे काम सोपे नव्हते. त्यांच्या डोक्यातही यातले काही शिरणार नाही. मोजक्या शब्दात सांगायचे तर डोवाल यांच्या पायाशी बसायचीही अशा माणसाची लायकी नाही. आजीला त्या माणसाची थोरवी कळली होती. म्हणून सुवर्णमंदिरात त्याला पणाला लावले इंदिराजींनी. आणि नातू दिवटा डोवाल यांच्यावर मसूदला सोडला म्हणून आरोप करतो आहे. सतत सुरक्षा कवचात लपून बसणार्‍यांना जीवावरचा धोका पत्करून देशासाठी पराक्रम गाजवण्याची कामगिरी कशी कळणार ना? पण असलेच दिवटे ज्या देशात नावारूपाला येतात, त्यांच्यापासून आधी देशाचे संरक्षण करावे लागत असते. बाहेरच्या शत्रूंचा सामना आमनेसामने करता येतो. डोक्यात मेंदूच नसलेले नेते देशासाठी सर्वात मोठा धोका असतात आणि त्यांच्यापासून देशाची सुरक्षा करणे गुप्तचरांनाही अशक्य असते. अशाच दिवाळखोरीने इंदिराजी व राजीव यांचाही बळी गेला. पण त्यांच्याच नातू-पुत्रला त्याचे भान नसेल तर त्याला पक्ष, राजकारण वा देश तरी कुठला ठाऊक असणार ना? त्याने राफ़ेलचे खेळणे उडवित रमावे.

41 comments:

  1. भाऊ संसदेमध्ये सक्षम विरोधी पक्ष नसणे हे दुर्दैव सुद्धा बघावे लागले. जून २०१९ मध्ये विरोधी पक्ष विना संसद बघावी लागेल का?

    ReplyDelete
  2. सणसणीत .. बस्स इतकेच
    .. 😂😂

    ReplyDelete
  3. भाऊ इथे एक शंका आहे.अजित डोवाल हे ऑपरेशन ब्लु स्टार मध्ये सहभागी होते की नंतर च्या ब्लु थंडर मध्ये. ब्लु स्टार मध्ये फार मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेले.डोवाल यांच्या कामगिरी मुळे कोणी सैनिक न गमावता गुरुद्वारा ताब्यात आला

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही हीच शंका आहे. ब्लॅक थंंडरमधे त्यांचा सहभाग होता. त्यामुळेच ऑपरेशन ब्लू स्टार एवढी जिवीतहानी व वित्तहानी (सुवर्णमंदिराची) झाली नाही अस वाचलं होतं.
      असो.

      Delete
  4. परखड भाउ चांगला समाचार घेतलात मुर्ख राहुलचा.

    ReplyDelete
  5. सलाम👍👍👍👌👌👌💐

    ReplyDelete
  6. भाऊ भरीस भर त्या राज ठाकरेची,त्याला‌ आता रविश कुमार,एनडी टिव्ही,द वायर चा विनोद दुआ सारखी लोकं जवळची अन् प्रेरणादायी वाटायला लागतील...राज ठाकरेच्या लाचारीची किव यायला लागली आहे आता...हा ईतका विखारी,विकृत पुर्वीपासुनचं असावा...आभार मोदींचे नोटाबंदीमुळे याचा खरा चेहरा सर्वांपुढे आला....

    ReplyDelete
  7. कंदाहार विमान अपहरण प्रकरणी वाजपेयी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने म्हटले होते की सरकारने योग्य तो निर्णय घेतला तर सरकारला पाठिंबा असेल.पण नक्की कोणत्या निर्णयाला पाठिंबा देऊ, आमच्या मते योग्य तो निर्णय कोणता हे न सांगता दोन्ही बाजूला बोलता येईल अशी वाट काँग्रेसने मोकळी ठेवली होती. जर अझरला सोडले नसते आणि दहशतवाद्यांनी प्रवाशांना मारले असते तर इतक्या लोकांचे बळी जाऊ दिल्याबद्दल सरकारवर टीका करायचा आणि दहशतवादी सोडले तर त्यावर टीका करायचा मार्ग काँग्रेसने मोकळा ठेवला होता.

    आणि अझरला जर १९९४ मध्ये पकडले असेल तर तो १९९९ पर्यत जिवंत का होता? अझर बरोबरच एका सज्जाद अफगाणीला पकडले होते. पण नंतर escape attempt मध्ये तो मेला असे सरकारने जाहीर केले.असेच अझरबाबत केले असते तर ज्या मानवाधिकारवाल्यांनी गदारोळ केला असता त्यांना आणि त्यांच्या एन.जी.ओ वाल्याना राहुलच्या आईने राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर मानाने नियुक्त केले होते. याविषयी रागांचे काय म्हणणे आहे?

    ReplyDelete
  8. मा. राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी, जे अर्वाच्य शब्दात अजित डोवलांबद्दल बोलतात, देखील हे वाचावे...

    ReplyDelete
  9. भाऊ आपल्या आजच्या लेखामुळे आम्हाला माहिती नसलेल्या बऱ्याच नवीन गोष्टी माहिती झाल्या आणि एकंदरीतच हा लेख वाचणार्‍या प्रत्येक माणसाचे डोळे खाडकन उघडले जाणार यात शंकाच नाही प्रचंड प्रसार करावा या लेखाचा मित्रांनो

    ReplyDelete
  10. आदरणीय भाऊ परवा बोलघेवडे हृदयसम्राट राज ठाकरेंनीही अजीत डोवाल यांच्या विषयी मुक्ताफळे उधळलीत.

    ReplyDelete
  11. भाऊ आजपर्यंत चा सगळ्यात उत्तम!
    अगदी कळकळीने लिहिलेला!

    ReplyDelete
  12. उत्तम विश्लेषण��

    ReplyDelete
  13. डोवाल यांच्या पायाशी बसायचीही अशा माणसाची लायकी नाही,, अगदी बरोबर

    ReplyDelete
  14. भाऊ, धो धो धुतले

    ReplyDelete
  15. ज्याची नगरसेवक पण बनण्याची लायकी नाही तो या देशाचा पंतप्रधान बनायला निघाला आहे.

    ReplyDelete
  16. सणसणीत हाणलत भाऊ

    ReplyDelete
  17. अप्रतिम विश्लेषण करून राहुल अर्थात कॉंग्रेसचा खरा चेहरा समोर आणला आहे. धन्यवाद भाऊ!

    ReplyDelete
  18. बिनडोक माणूस हा अधोगतीलाच जातो याचे आजचे उदाहरण म्हणजे रा गा...
    भाऊ नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख!!!

    ReplyDelete
  19. Apratim lekh Bhau.
    Ya lekhala ajun prasidhichi garaj ahe. Notabandichi khilli udavnyasathi fatka khisa aslele kapade ghalun janara. Garibanchya zopadit mauj mhanun janara,ani chinsobat doklamvarun yudha honyachi shakyata Astana chini vakilatit janara manus Ajit Doval jo manus pratek kamgiri jivavar udar houn karto yancyavar Tika kartoy. Ya deshat freedom far bokalle ahe. Are jivachi Kay Kimat aste te swatachaa aila Tari vichar. Fakt jiwacha vichar Karun ji bai pantpradhanpad sodte. Tila mahit ahe jiwacha Kimat Kay aste tyanchi. Doval Yanch tondat nav ghyayachi layki nahi ya mansachi

    ReplyDelete
  20. भाऊ, हा मतिमंद बाळ फारच त्रास देऊ लागला आहे. याचे पुढे काय होणार माहीत नाही. आत्तापर्यंतच्या निवडणुकीत धुळवड होत नव्हती. या बाबाने डायरेक्ट धुळवड सुरू केली आहे. याला आवरायचं कसे ?

    ReplyDelete
  21. भाऊ,तुमचे लेख मला मुखपुस्तकावर दिसत नाहीत.मी काय करावे?

    ReplyDelete
  22. Very accurate analysis. For this Gandhi ,even stupid word is not enough. He is anti Nationals. And ,all his advisers are also fools and immature.

    ReplyDelete
  23. भाऊ,अगदी मनातले बोलतात!या वेडसर राजपुत्राला वेळीच आवरले पाहिजे.त्यासाठी जनतेला पायातली वहाण हाती घ्यावी लागेल असे दिसते.

    ReplyDelete
  24. भाऊ अप्रतीम आणि अत्यंत माहितीपुर्ण लेख.
    राज ठाकरे सध्या अजित डोवाल यांच्यावर असेच आरोप करित आहेत,त्याच्या सत्यतेबद्दल काही सांगा

    ReplyDelete
  25. Sir very well written. Only thought of such idiot occupying high chair sends shivers down the spine.

    ReplyDelete
  26. राफ़ेलचे खेळणे उडवित रमावे.🤣🤣🤣

    ReplyDelete
  27. वा भाऊ सपशेल आडवा पण त्याला याचेही काही नाही तो आपला सैनिकांच्या श्रद्धांजली मध्ये मोबाईल वर खेळेल किंवा संसदेत डोळा मारेल असे कसे हे कार्टे मतिमंद निपजले

    ReplyDelete
  28. भोपाळ दुर्घटनेतील अँडरसन ला रात्री पळून जायला मदत करणारे कोण होते, हे राहुल गांधी सांगू शकतात काय?

    ReplyDelete
  29. <<<>>>
    हे कशाच्या आधारे लिहिलंय? याला काही संदर्भ आहे का?

    ReplyDelete
  30. अतिशय मार्मिक विश्लेषण

    ReplyDelete
  31. भाऊ या सगळ्याचा त्याला काही फरक पडत नाही . एकच काम नित्य नेमाने करतो रोज उठून शंख करणे . जरा कुठे काही मिळाले की सुरू ..

    ReplyDelete
  32. लेख अतिशय उत्तम.याला सर्वत्र प्रसिद्दी देणे गरजेचे .

    ReplyDelete
  33. भाऊ
    हे तुमचे उत्तम लेख टोपीकरांच्या भाषेत सुद्धा लिहावेत म्हणजे अन्य भाषिकाना चर्चेत सामिल होता येईल.

    ReplyDelete