Thursday, March 28, 2019

मोदी मागतो एक डोळा

No photo description available.

दोनतीन वर्षापुर्वी मोदी विरोधातल्या आघाडीचा विचार विरोधी पक्षात सुरू झालेला होता. तेव्हा विविध चर्चात सहभागी होणारे विचारवंत प्राध्यापक योगेंद्र यादव तमाम पक्षीयांना एक सल्ला अगत्याने देत होते. १९७० च्या काळात इंदिराजींना जो लाभ मिळाला, तो यावेळी मोदिंना देऊ नका. तो लाभ कुठला होता? तेव्हा सर्व राजकारण इंदिराजी हे नाव आणि व्यक्तीभोवती केंद्रीत झालेले होते. तुम्ही इंदिराजींचे समर्थक असू शकता, किंवा इंदिरा विरोधक असू शकता. मधली काही जागाच शिल्लक ठेवलेली नव्हती. त्याचा लाभ इंदिराजींना कसा मिळाला? तुम्हाला द्रमुक, समाजवादी वा जनसंघ वगैरे कुठला अन्य पक्ष नको असेल, तर फ़क्त इंदिराजी इतकाच पर्याय होता. अर्थात इंदिराजी नको असतील तर तुमच्यासाठी डझनभर लहानमोठे पक्ष पर्याय म्हणून उपलब्ध होते. त्याच्या परिणामी असा कुठलाही अन्य पक्ष नको असेल तर त्याला पर्याय दुसरा अन्य कुठला पक्ष नव्हताच. फ़क्त इंदिराजी! किंबहूना इंदिराजींनी मोठ्या चतुराईने तशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली होती. कुठूनही वादग्रस्त व्हायचे आणि तमाम पक्षांना फ़क्त आपल्या विरोधात बोलायला भाग पाडायचे. बोलत नसतील त्यांना आपल्या पंखाखाली घ्यायचे, ही इंदिराजींची रणनिती होती आणि त्यात त्या कमालीच्या यशस्वी झालेल्या होत्या. तशीच स्थिती मागल्या दोनतीन वर्षात मोदींच्या बाबतीत होऊ लागल्याने यादव यांच्यासारखा निवडणूक निकाल, आकडे व जनमताचा अभ्यासक विचलीत झालेला होता. त्याने सतत मोदीकेंद्रीत टिका व विरोध नको, असा आग्रह धरलेला होता. पण कोणी ऐकले नाही आणि आजकाल योगेंद्र यादवही आपला तो सल्ला विसरून गेलेले आहेत. परिणामी अवघे राजकारण मोदी व मोदीविरोधी असे विभागले गेले आहे. धुर्त मोदींना तेच तर हवे होते. थोडक्यात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तशी स्थिती आलेली आहे.

विषय कुठलाही असो, त्यातून मोदींना लक्ष्य करण्याचा अट्टाहास व प्रघातामुळे देशाचे राजकारण व सार्वजनिक जीवन मोदीवादी व मोदीविरोधी असा दोन घटकात विभागले गेलेले आहे. सहाजिकच मतदानही तसेच विभागले जाण्याला पर्याय नाही. तुम्हाला मोदी नको असतील तर डझनावारी लहानमोठे पक्ष आहेत. पण नंतरच्या काळात तेच पक्ष मोदींना रोखायला एकत्र येणार, हेही आता लोकांनी जाणले आहे. त्यामुळे तुम्हाला अशा कुठल्याही लहानमोठ्या पक्षाला सत्तेत येऊ द्यायचे नसेल वा सत्तेपासून दुर ठेवायचे असेल; तर मोदी इतकाच एकमेव पर्याय आहे. म्हणजे जे कोणी मायावतींचे विरोधक असतील आणि कुठल्याही परिस्थितीत मायावती सत्तेमध्ये नको असे ज्यांना वाटत असेल, त्यांना कॉग्रेस, समाजवादी, तेलगू देसम, तृणमूल, द्रमुक अशा कुठल्याही अन्य पक्षाच्या तोंडाकडे बघायची सोय नाही. त्यांना मायावतींना रोखण्यासाठी मोदींच्याच आश्रयाला जावे लागणार आहे. जी गोष्ट मायावतींच्या बाबतीत आहे तीच अखिलेश, लालू, ममता वा चंद्राबाबू अशा प्रत्येकाच्या बाबतीत आहे. कारण आता भले एकमेकांच्या विरोधात हे लोक लढताना दिसतील. पण नंतर ते सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार; याची भारतीयांना खात्री आहे. याच्या उलट मायावती वा ममतांच्या विरोधात भाजपा वा मोदींना मत दिले, तर ते कधीही त्यांना सत्तेत येण्यास मदत करणार नाहीत, याविषयी तोच मतदार खात्री बाळगू शकतो. मतदारांचा एक मोठा घटक असा कुणाचा विरोधक म्हणूनच अमूक एका पक्ष वा नेत्याचा समर्थक असतो. अशा या बहुतांश लहानमोठ्या पक्षांचा कडवा विरोधक या स्थितीत मग मोदींचा समर्थक होतो. किंवा तेवढ्यापुरता तरी त्यांना मत देण्याकडे वळत असतो. इंदिराजींना त्याचाच लाभ मिळालेला होता आणि आज तशीच स्थिती मोदींनी जाणीवपुर्वक निर्माण केलेली आहे.

मुद्दा इतकाच, की म्हणून राजकारण एका व्यक्तीच्या भोवती केंद्रीत होऊ द्यायचे नसते. ते टिकेच्या रुपानेही होण्यात धोका असतो. आणिबाणीनंतर इंदिराजींना लोकांनी नाकारले. पण अवघ्या तीन वर्षात बाकीचे दिवाळखोर नकोत म्हणून पुन्हा इंदिराजींना दोन तृतियांश जागाही दिलेल्या होत्या. कारण बाकीचे नंतर आपापल्या स्वार्थासाठी एकत्र येतील, पण त्यापैकी कोणालाही इंदिराजी जवळ करणार नाहीत, याची हमी होती. आज लोकांना एका गोष्टीची खात्री आहे, की मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा किंवा विरोधत अन्य कुठलाही पक्ष, अशी निवड करायची आहे. अन्य कुठल्याही पक्षाला मत म्हणजे मोदी विरोधाला मत आणि त्यापैकी कोणालाही विरोध म्हणजे फ़क्त मोदींनाच मत; अशी वेळ आणली गेली आहे. ती आपोआप आली की मोदींनी जाणिवपुर्वक तशी स्थिती निर्माण केलेली आहे? बारकाईने बघितले तर मोदींनीच मुद्दाम तशी वेळ आणलेली आहे. आपल्या विरोधात सगळे पक्ष एकसुरात बोलतील, यासाठी मोदीच मुद्दे पुरवित असतात. आंध्राचा जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे चंद्र्शेखर राव असे किरकोळ अपवाद सोडले; तर बाकी प्रत्येकाला अकारण कुठलेही खुसपट काढून मोदींवर दुगाण्या झाडण्याचा छंद जडला आहे. तो पुर्ण करताना देशाहिताला सुद्धा तिलांजली देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशा प्रत्येक खुळेपणातून मोदींविषयी लोकांचे आकर्षण आपण वाढवित आहोत, याचेही भान यापैकी कोणा नेत्याला वा पक्षाला उरलेले नाही. जितके हे लोक खुळ्यासारखे देशहिताला लाथाडून आपल्यावर शिव्याशाप वाहतील, तितकी अधिक मते आपल्या बाजूला वळत जातील, याची मोदींना खात्री आहे. म्हणून त्यांना त्यात दुप्पट लाभ दिसत असला तर नवल नव्हते. कालचीच गोष्ट घ्या. दोन दिवस राहुल गांधींच्या ७२ हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करण्याविषयी गदारोळ चालू होता. त्याचा एका क्षेपणास्त्राच्या घोषणेतून मोदींनी फ़डशा पाडला.

सगळे विरोधक श्रेय कोणाचे त्याकडे वळले आणि क्षेपणास्त्र प्रयोगावर इतके उलटसुलट बोलू लागले, की राहुलचे ७२ हजार रुपये बुडीत गेले. समजा मोदींच्या घोषणेला देशाचे यश ठरवून विरोधकांनी अधिक हवा दिली नसती. आक्षेप घेतले नसते, तर तो विषय बुधवारी संध्याकाळीच संपून गेला असता आणि पुन्हा चर्चा राहुलच्या ७२ हजार रुपयांकडे आली असती. त्यात फ़ारसे तथ्य नसले तरी आकडा भुलवणारा आहे आणि त्यावर जितका उहापोह होईल, त्याचा जनमानसावर नक्कीच परिणाम होऊ शकला असता. पण मोदींनी क्षेपणास्त्राची एक हुलकावणी दिली आणि सगळे विरोधक आपला मुद्दा विसरून मोदींना श्रेय नाकारण्यासाठी वेळ दवडायला पुढे सरसावले. आधीच पुलवामा व बालाकोटच्या घटनांनी मोदींना वजन मिळालेले होते. त्याला जोडून आता या अंतरिक्ष क्षेपणास्त्राचा विषय आला. त्यामुळे बालाकोटचा हवाई हल्ला विस्मृतीत जात असताना, पुन्हा जीवंत झाला. मोदीच्या हाती देश सुरक्षित असल्याचा भाजपाचा मरगळलेला प्रचार त्यामुळे पुन्हा शिरजोर झाला. पण मोदींनी त्याचे श्रेय घेतले नव्हते. ते श्रेय त्यांना नाकारण्यातून विरोधी मुर्खांनीच त्यांना श्रेय देऊन टाकले. त्याविषयी फ़ारशी चर्चा गदारोळ झाला नसता, तर अन्य उपग्रह प्रक्षेपणाचा विषय जसा एका दिवसात संपतो, तसाच हाही विषय मागे पडला असता. पण प्रत्येक गोष्टीला वा घटनेला मोदीचे लेबल लावून विरोधकांनी त्यांचे काम सोपे करून ठेवले आहे आणि अवघे राजकारण एका व्यक्तीच्या भोवती गुंडाळले गेले आहे. मोदींना हेच तर हवे असते आणि हवे आहे. पण त्यासाठी कोण राबत आहेत बघा. सर्व विरोधकच मोदींनी प्यादी मोहरे हलवावेत किंवा खेळवावेत, तसे वागत असल्यावर मोदींनी जिंकण्यासाठी चिंता कशाला करावी? जितके मोदींनी देवाकडे मागितलेले नाही, त्यापेक्षा अधिक विरोधकच त्यांना देत असतील, तर नशिबवान कोण म्हणायचा?

राजकारणात अनेक विषय दुर्लक्ष करून निकालात काढायचे असतात. त्यांचा लाभ आपल्या विरोधकाला मिळणार असेल, तर त्यावर चर्चाही व्हायला हातभार लावायचा नसतो. अनुल्लेखाने मारणे असे त्याला म्हणतात. कारण चर्चा झाली तर तिकडे लक्ष वेधले जाते. बंगला देशची लढाई इंदिराजी लढल्या नव्हत्या किंवा पहिला अणुस्फ़ोट त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून केला नव्हता. तरीही पंतप्रधान म्हणून त्याचे श्रेय त्यांना मिळाले व त्यांनीच घेतले होते. विविध विज्ञान संस्था नेहरूंच्या काळातच उभ्या राहिल्या; म्हणून नेहरू शास्त्रज्ञ नव्हते की संशोधक अशी त्यांची ओळख नव्हती. पण आजही त्यांना श्रेय देण्याचा आटापिटा चालतो. त्याचे कारण त्यांनी आपल्या काळत अशा प्रयत्नांना चालना दिलेली होती, प्रोत्साहन दिलेले होते. त्याला पुरक असे निर्णय घेतलेले होते. तेव्हाचे श्रेय त्यांना आजही दिले जाणार असेल तर आज पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने महत्वाच्या निर्णयाने विविध कामांना योजना वा प्रयोगांना चालना दिल्याचे श्रेय त्याला आपोआप मिळत असते. शास्त्रज्ञही देतात. मग ते नाकारण्यातून अशा मुर्ख विरोधकांनी मिळवले काय? जे श्रेय आपल्या शब्दांनी मोदी घेऊ शकत नव्हते, की भाजपा मागू शकत नव्हता, तेच आक्षेपातून अलगद मोदी व भाजपापर्यंत पोहोचते करण्याचा मुर्खपणा, हे राजकारण नाही तर दिवाळखोरी असते. चर्चा वा वादावादी झाली नसती, तर तळागाळापर्यंत हा विषय पोहोचलाच नसता. तो पोहोचवण्याची बहुमोल मदत करणारे विरोधक मोदींना मिळाले असतील, तर आंधळा मागतो एक डोळा, अशीच स्थिती नाही काय? मोदींना हवे असलेले मुद्दे आणि विषयावरच राजकीय अजेंडा चालवणारे विरोधक पाठीशी असल्यावर मोदींना कुठल्याही निवडणुका अवघड कशाला असतील? तो माणूस देवाकडे असेच विरोधक कायम मिळावेत, म्हणून नवस करणार नाही काय?

22 comments:

  1. शोलेमधला एक डाँयलाँग आठवतो भाऊ.... गब्बरके तापसे आपको एकही आदमी बचा सकता है, खुद गब्बर.... आज परिस्थिती अशी आहे की मोदी अंतरिक्ष व्यापून उरलेत... ते वलय कमी फक्त मोदीच करु शकतात...

    ReplyDelete
  2. भाऊंच्या या लेखाची वाटच बघत होतो. काल या चाचणीची बातमी आल्यानंतर माझ्या फेसबुक भिंतीवर पुढील लिहिले होते आणि भाऊ मांडतात त्यापैकी किती मुद्दे मला आधीच मांडता येतील याची पैज मी माझ्याशीच लावली होती :)

    परत एकदा पुरोगामी आणि विरोधी पक्ष मोदींनी टाकलेल्या सापळ्यात अलगदपणे अडकले. भारताने ऑपरेशन शक्ती केले आणि ते मोदींनी जाहीर केले ठीक आहे. पण त्यात नक्की काय केले याचा ९९.९९% भारतीयांना पत्ता नाही आणि त्याविषयी काहीही माहिती नाही हे नक्कीच. आपल्या वैज्ञानिकांनी अगदी मंगळावरही यान सोडले आहे तशा प्रकारचे हे आणखी एक यश आहे असेच बऱ्याचशा भारतीयांना वाटले असणार हे नक्कीच.

    मोदींनी ते जाहीर करायला हवे होते का? कदाचित होते कदाचित नव्हते. मला माहित नाही. मंगळावर यान पाठविल्यावरही मोदींनी टिव्हीवरून राष्ट्राला संबोधित करून ते जाहीर केले नव्हते. वाजपेयींनीही अणूचाचण्या घेतल्याचे असे राष्ट्राला संबोधित करून जाहीर केले नव्हते. तेव्हा असे करण्यामागे मोदींचा राजकीय डाव होता हे कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याला किंवा पुरोगाम्यांना समजले नाही?

    वास्तविक हा मुद्दा निवडणुकांवर परिणाम करायची शक्यता पूर्ण शून्य होती कारण नक्की काय केले आणि जे काही केले त्याचा उपयोग काय हेच बऱ्याचशा लोकांना समजले नाही. पण मोदींनी ते जाहीर केले ना मग करा टीका या नेहमीच्या सवयीने याची तयारी आमच्याच काळात झाली होती पण आम्ही टेस्ट केली नाही असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तर राहुल गांधींनी मोदींना जागतिक थिएटर दिनाच्या शुभेच्छा देऊन टाकल्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की आपण एकच उपग्रह पाडला त्यात काय एवढे? अखिलेश यादव म्हणाले की चीनने हे आधीच केले आहे, म्हणजे त्यात काय मोठे?म्हणजे जी गोष्ट व्हावी हे मोदींना मनोमन वाटत होते नेमकी तीच गोष्ट विरोधकांनी केली. ज्या यशासाठी आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करून विषय संपायला हवा होता त्यात नेहमीप्रमाणे मोदींवर हल्ला करून विरोधक मोकळे झाले.

    त्यानंतर झाले असे की संध्याकाळी इम्रानखानने भारताच्या मिशन शक्ती झाल्यानंतर एक हाय लेव्हल मिटिंग बोलावली आहे. म्हणजे काय की काय झाले हे कळले नसले तरी पाकिस्तानला हादरा बसेल असे काहीतरी झाले आहे एवढे जनतेला कळले. हे बिनबुडाच्या पुरोगाम्यांना काहीही वाटू दे पण पाकिस्तानला कोणत्याही स्वरूपाची चपराक बसली तरी या देशातील बहुसंख्य जनतेला आनंद होतो. एक क्रिकेट सामना पाकिस्तानविरुद्ध जिंकला तरी या देशात दिवाळी साजरी होते हे आपण अनेकदा बघितले आहे. म्हणजे आता तो मुद्दा नुसते वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यापुरता मर्यादित न राहता मोदींनी पाकिस्तानला कसा धडा शिकवला या वेगळ्याच कक्षेत गेला. आणि तसे करण्यात मोठी भूमिका कोणी बजावली? तर विरोधकांनी स्वतः होऊन मोदींवर दोषारोप करून मोदींचे नाव त्यात गोवले.

    ते झाले थोडे म्हणून डी.आर.डी.ओ चे माजी प्रमुख सारस्वत यांनी युपीए सरकारच्या काळात सरकारने या गोष्टीसाठी पुरेसे समर्थन दिले नाही असे म्हटले. नेहमीप्रमाणे रिपब्लिक चॅनेलने कुठलातरी जुना पेपर शोधून काढून याच गोष्टीची पुष्टी केली.

    म्हणजे काय की २६/११ नंतर युपीए सरकारने पाकिस्तानवर हल्ले करायची हवाई दलाची तयारी असूनही ते करायचे धैर्य दाखविले नाही पण पुलावामानंतर मोदींनी दाखविले या गोष्टीला एक महिना होतो ना होतो तोच युपीए सरकारने हे मिशन शक्ती करायला आपल्या वैज्ञानिकांना पुरेसे पाठबळ आणि स्वातंत्र दिले नाही ते मोदींनी दिले आणि मुख्य म्हणजे त्यामुळे पाकिस्तानला शॉक बसला हे चित्र उभे राहिले.

    निवडणूक इतक्या तोंडावर आली असताना असे चित्र उभे राहिले तर मोदी मनातल्या मनात आनंदाने टाळ्या पिटत असतील. आणि ते चित्र उभे करायला मदत कोण करत आहेत? तर मोदींचेच विरोधक.

    भाऊ तोरसेकर म्हणतात त्याप्रमाणे एखादा बोकड स्वतः होऊन कत्तलखान्याकडे धावत जात असेल तर त्याला कोण आणि कसे वाचविणार?

    ReplyDelete
  3. विरोधक स्वतःच्या कोंडीत आहेत, मुद्द्यांचा अभ्यास कमी आहे, ज्यांचा आहे ते परिवाराच्या नजरेत क्षुल्लक आहेत किंवा त्यांची प्रतिमा इतकी मलीन आहे की लोकांनी त्यावर विश्वास तरी का ठेवावा? मोदी सरकारच पुन्हा येणार .

    ReplyDelete
  4. भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राबद्दल शास्त्रज्ञानीच घोषणा करायला हवी होती. ही बातमी पंतप्रधान श्री मोदीजी नी देण्याची गरज काय ? असा सवाल करणाऱ्याला एका वाचकाने दिलेली प्रतिक्रिया :
    मुलगा झाल्याची बातमी बापच जगाला देतो. बाळंतपण करणारे डॉक्टर नाही देत!!

    ReplyDelete
  5. भाजपा ने सगळ्यांना मस्त उल्लू बनवले आहे ।

    ASAT ची बातमी अतिशय अभिमानाची आणि महत्वाची आहे याबद्दल शंकाच नाही । पण त्यानंतर Congressi श्रेय कोणाचं यावर वाद घालण्यात गुंतले । आता या सगळ्या मारा मारीत 4 ते 5 दिवस निघून जातील आणि हा हा म्हणता 11 एप्रिल ची सकाळ उजाडेल ।
    विरोधकांना यात पूर्णपणे कालापव्यय होतोय हे लक्षात येत नाही का 🤔

    कुठे गुंतायचं आणि कुठे नाही याचं भान ठेवणं important आहे पण तेच भान या मंडळींना नाहीये असं दिसतंय

    ReplyDelete
  6. चांगले विश्लेषण

    ReplyDelete
  7. अगदी खरं बोललात भाऊ, हे महागटबंधन नाही तर महाठगबंधन आहे हे सगळ्यांना कळून चुकले आहे आणि विरोधक आपल्या वागणुकीतून त्याला खतपाणी घालत आहेत.यावेळी मोदी बहुमताने निवडून येणार हे नक्की!

    ReplyDelete
  8. अतिशय अचूक विश्लेषण

    ReplyDelete
  9. https://twitter.com/TimesNow/status/1110844209819344896?s=19

    Ex Chief of DRDO says thanks to Modiji... What else to say more

    ReplyDelete
  10. एक नंबर विश्लेषण भाऊ. एक घाव दोन तुकडे अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे

    ReplyDelete
  11. मोदीजींकडे एक वेगळा दृष्टीकोन आहे.जो त्यांना बाकी सर्वांपासून वेगळे बनवते.

    ReplyDelete
  12. भाऊ, एक मनातून विनंती आहे बघा ,या मूर्ख देश देखील विकणाऱ्या विरोधकांना (नारद included) कृपया हे विश्लेषण सांगत जात जाऊ नका हो, खूप वर्ष या मूर्खाना सत्तेत बसवलं होत आमच्याच जुन्या पिढीनं, बाकी तुमच्या लिखिनाच वैएशिष्ट आहे की तुम्ही आताची परिस्थिती आणि जुनी परिस्थिती लक्षात घेऊन बरोबर अचूक गोष्टी हेरता. तुमचे आशीर्वाद आमच्या रेगुलर वाचकांसोबत असावेत���� पंकज

    ReplyDelete
  13. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर सपा व बसपा चे राजकीय नुकसान मोदीजी नें केले आत्ता काँगेस बरोबर राहिलेले प्रादेशिक पक्षांचे खूप राजकीय नुकसान या निवडणुकीत होईल.परिवार वाद आत्ता राहणार नाही.एका घरात कायम सगळी राजकीय पदे हे दिवस संपले...

    ReplyDelete
  14. अप्रतिम लेख. कुणास ठाऊक, ही लोकप्रियता पाहता मोदी जिनपिंगप्रमाणेच तहहयात पंतप्रधान होऊन बसतील.

    ReplyDelete
  15. 4 वर्षांत लोक भुलथापाला कंटाळले ,विरोधकाकडे कोणताही चेहरा नाही,हे मान्य परंतु पंतप्रधान पदासाठी योग्य चेहरा असणें हा काही निकष ठरू शकत नाही.आज ग्रामीण भागात विषम परस्थिती आहे,शेतमालाला योग्य भाव नाही,शिक्षित युवकाला नोकरी नाही,विकास कोठे दिसतोय,विकास हरवलाय,शहरात तरी काय आहे,तरुणांना विचारा,आज शहरी तरुण कंटाळला,त्याला हाताला काम हवे आहे,नोटबंदी 15 लाखाचा जुमला या गोष्टी त्याला अजूनही आठवतात

    ReplyDelete
    Replies
    1. वा: अगदी बरोबर. भारत गेल्या 5 वर्षात इतका अधोगतीला लागला आहे की विचारु नका. ह्या आधी आपल्या घरातुन सोन्याचा धूर येत होता आणि आता आपण गरीब आहोत.��

      Delete