Friday, March 18, 2016

कुबेरांची ‘उसंत’वाणी

असंतांचे संत
क्षमस्व! प्रिय वाचक!, ‘असंतांचे संत’ या १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. – संपादक
१८ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मध्ये एक इवली चौकट टाकून संपादक गिरीश कुबेर यांनी आपला अग्रलेख मागे घेतला आहे. त्या मोजक्या शब्दातून त्यांना काय सांगायचे आहे, असा वाचकांना प्रश्न पडला असेल. कारण ट्वीटर आदि माध्यमात तर अनेक वाचकांनी तातडीने अग्रलेखासाठी कुबेर यांचे अभिनंदन केले होते. अर्थातच ज्या विषयावर कुबेरांनी अग्रलेख लिहीला, त्या विषयाला हात घालणे किंवा त्याचे सडकून टिका करीत वाभाडे काढणे, हे भारतीय सेक्युलर माध्यमातले भयंकर पाप आहे. कारण संतपद बहाल होणार्‍या मदर टेरेसा काही हिंदू धर्मातल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या चमत्कार वा साक्षात्कारी शक्तीला कुठल्याही विज्ञानाची जोड असण्याचे कारण नाही. त्या हिंदू नाहीत इतकीच गोष्ट त्यांच्या बाबतीतले कुठलेही अतिरेकी दावे सत्य मानायला पुरेसे असतात. हे सेक्युलर सत्य कुबेर विसरले आणि म्हणूनच त्यांना माफ़ी मागण्याची नामुष्की आलेली आहे. आजवर त्यांनी अनेक हिंदू संत, बाबा किंवा महाराजांवर सडकून टिका केलेली आहे. काही प्रसंगी तर अतिरेकी टिकाही केलेली आहे. तेव्हाही हजारो वाचकांच्या भावना दुखावलेल्या होत्या आणि नजरेत भरतील अशा संतप्त प्रतिक्रीया लोकसत्तेसह सोशल मीडियातही झळकलेल्या होत्या. पण त्याला साधा प्रतिसाद वा प्रतिसाद करण्याचेही सौजन्य कुबेरांनी कधी दाखवले नाही. कारण वाचकांच्या भावना पायदळी तुडवण्यासाठीच असतात, यावर अशा पुरोगामी विचारवंतांची अगाध श्रद्धा असते. फ़क्त एक अपवाद आहे, ज्यांच्या भावना आपण पायदळी तुडवत आहोत, ते वाचक श्रोते धर्माने व जन्माने हिंदू असावे, ही ती अट आहे. त्यामुळेच आजवर कुबेरांना कधी क्षमस्व म्हणायची वेळ आली नाही. कारण भावना हिंदूंच्याच दुखावतील याविषयी कुबेर काटेकोर होते, पण गुरूवारी त्यांचा तोल गेला आणि ख्रिश्चनांच्या भावना दुखावतील असे कुबेर लिहून गेले.
म्हणूनच वाचकांच्या भावना दुखावल्या ही भाषा संशयास्पद आहे. यातले दुखावलेले वाचक कोण व त्यांच्या धर्मश्रद्धा कोणत्या, त्याचाही खुलासा कुबेरांनी करायला हवा होता. आजकाल कुठल्याही वर्तमानपत्राला परवडत नाही, इतके शब्दभांडार खुले करून कुबेर प्रदिर्घ अग्रलेख लिहीत असतात. त्याबद्दल त्यांच्या औदार्याला दाद द्यावीच लागेल. पण ते सगळे अग्रलेखी औदार्य माफ़ी मागायच्या वेळी कवडीचुंबक सावकारासारखे संकुचित कशाला व्हावे? आपल्या अग्रलेखातून कुठल्या वाचकांच्या भावना दुखावल्या? त्यांचा धर्म कोणता? कुठल्या भावना दुखावल्या? कोणत्या कारणास्तव भावना दुखावल्या? कोणते शब्द वा वाक्य अक्षम्य वेदनादायी होते, असे सर्व तपशील कुबेरांनी द्यायला नकोत का? ती त्यांची ख्याती आहे. मागे याकुब मेमनच्या फ़ाशीविषयी असेच कुबेर बरळले होते आणि त्यावरून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या. तेव्हाही त्यांना माफ़ी मागण्याची अपुर्व संधी उपलब्ध झालेली होती. पण तिथे चुक मान्य करण्याऐवजी त्यांनी ‘अन्यथा’ सदराखाली एक प्रदिर्घ लेख लिहून इस्त्रायलनेही फ़ाशी कशी कायमची रद्दबातल केल्याची अक्कल पाजळली होती. मात्र त्याही कायदा नियमाला अपवाद म्ह्णून एका व्यक्तीला फ़ाशी दिल्याचा खुलासा कुबेरांना करावा लागला होता. तसेच आताही टेरेसा यांच्या संतपदाला आक्षेप घेण्याने कोण कुठे कशाला दुखावले, त्याचा सविस्तर खुलासा द्यायला हवा. कुठल्याही विचारवंत वा बुद्धीमंताची तीच ओळख असते. नुसते दोन ओळीत क्षमस्व म्हणून अग्रलेख मागे घेण्याला पळपुटेपणा म्हणतात. कारण अग्रलेख ही एक भूमिका असते आणि खुप विचार करून संपादकाने काही लिहीले, अशी वाचकाची समजूत असते. कोणा ‘अर्धवट अतिशहाण्या’ने काहीतरी खरडले आहे, असे लोक मानत नाहीत. म्हणूनच कुबेर यांनी कुठे व काय चुकले, त्याचा खुलासा अधिक सविस्तर द्यायला हवा होता ना?
इतक्या घाईगर्दीने दुसर्‍या दिवशीच खुलासा न देता अग्रलेख मागे घेण्याचे रहस्य, म्हणूनच अधिक गडद होऊन जाते. इथे कोणा वाचकाच्या नाराजीने कुबेरांना पश्चात्ताप झालेला नाही किंवा खेद झालेला नाही. तर कुणीतरी चाप लावल्यानेच असा घाईगर्दीने खुलासा देवून अग्रलेख मागे घेतलेला आहे. किंबहूना माफ़ी मागायला हरकत नव्हती. पण जो अग्रलेख आधीच हजारो वाचकांनी वाचला आहे आणि त्याच्या तुलनेत आता आणखी फ़ारसे कोणी वाचणारही नाही, तो लेख मागे घेताना गायब करून टाकण्याचे कारण काय? कुबेरांच्या त्या लेखाने वाचक दुखावले असतील, तर कशासाठी दुखावले, ते खुलासा वाचणार्‍यांना कसे उमजावे? आपल्या माफ़ीमध्ये कुबेर तो अग्रलेख मदर टेरेसा यांच्यावर असल्याचाही धागा देत नाहीत. नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे.
या मोजक्या शब्दातले नेमके शब्द तपासणे भाग आहे. संपादक एकेरी होऊन व्यक्तीगत ‘दिलगिरी’ व्यक्त करतो आहे आणि थेट संपादकीय मागे घेतो म्हणतो आहे. यातली खोच लक्षात येते का? माफ़ी व्यक्तीगत आहे आणि झालेले नुकसान भरून येणार नाही, अशी दुखावलेल्यांना खात्री आहे. म्हणूनच कुठलाही खुलासा नको, तर थेट दिलगिरी व लेख मागे घेण्याची कुबेरांना कोणीतरी सक्ती केलेली आहे. ओवायसीच्या भाषेत कोणीतरी कुबेरांच्या ‘गळावर सुरी ठेवून’ त्यांना क्षमस्व म्हणायला भाग पाडलेले आहे. बौद्धिक मर्कटलिला नकोत आणि नकोसा विषय असल्याने त्यावर अधिक उहापोह नको, अशा रितीने संपादकाला शरणागत व्हायला कोणीतरी भाग पाडले आहे. कदाचित ती कोणी कोर्टात जाण्याची दिलेली धमकी असू शकेल, किंवा अन्य काही धमकी असू शकेल. पण त्यातून आपल्या अविष्कार स्वातंत्र्याचा ध्वज खांद्यावर घेऊन मिरवण्याची अपुर्व संधी कुबेरांना मिळालेली होती. त्यांनी या विषयावर विचारमंथन घडवून आणायला लोकसत्तेचे व्यासपीठ खुले करून द्यायला हवे होते. पण यातले काहीही होऊ शकले नाही. दोन ओळीतली नेमक्या शब्दातली माफ़ी, हजारो शब्दातल्या अग्रलेखापेक्षा जास्त बोलकी आहे. आपली बुद्धी, युक्तीवाद अक्कल कुबेरांनी कुणाच्यातरी आदेशान्वये मदर टेरेसांच्या चरणी अर्पण केलेली आहे. भले त्यांनी कुठल्या रुग्णाला आपल्या असाध्य आजारातून बरे केलेले नसेल, पण कुबेरांच्या नोकरी वा संपादक पदावर आलेली गदा टेरेसांनी उचलून बाजूला केली, इतकाच या ‘क्षमस्व’चा अर्थ आहे. बुद्धीची नशा चढली, मग भान सुटते तसेच कुबेरांचे झाले आहे. जनाची नाहीतर मनाची लाज म्हणून तरी त्यांनी आपल्या अशा शरणागतीची मिमांसा उसंत मिळाल्यावर आपल्याच वाचकांना सादर करावी. काही हजारो सुखावलेले वाचक नक्कीच अशा उसंतवाणीची प्रतिक्षा करीत असतील.

17 comments:

  1. http://epaper.loksatta.com/751680/indian-express/17-03-2016#page/9/2

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    आता बघूया असहिष्णुतेपायी कोणकोण पुरस्कार परत करतंय ते!

    आ.न.,
    -गा.पै.

    ReplyDelete
  3. एक्स्प्रेस ग्रुपचे शेठजी ' भयंकर नाराज ' !!.............आजच्या अंकात ' दिलगिरी ' हवीच हवी असा आदेश ..........काय चाललंय काय ? .........संपादक महाशय ...अहो हिंदुना कितीही लाथा घाला ...रामदेव बाबा , श्री श्री रवि शंकर यांना कुठल्याही कारणावरून ' शिव्या ' द्या ......शेठजी काहीहि बोलणार नाहीत. अहो तो तर तुमच्या ' पुरोगामित्वाचा एकमेव पुरावा आहे. ................................परंतु अहो आश्चर्यम ...हे हे असे धाडस ?? ...महापाप आहे हे !! मदर तेरेसा यांची ' पोल खोल ' ? ...राम राम राम .......ह्या पापाला क्षमा नाही. नाहीतरी एक्स्प्रेस ग्रुपच्या इंग्रजी आवृत्तीत ( दिल्ली व उर्वरित उत्तर भारत ) अनेक अतिपुरोगामी आणि ' इनटोलरंट ' व्यक्तींचा भरपूर भरणा आहेच. शिवाय एक्स्प्रेस ग्रुपला हि अमेरिकन ' एन जी ओ ' कडून काहीना काही स्वरुपात ' साहाय्य ' मिळतेच. तेंव्हा त्यांचे नको का ऐकायला ? संपादक काय कितिह्हि मिळतील.अहो वर्तमानपत्र चालवायचे म्हणजे कित्ती कित्ती खर्च असतो माहिती आहे का ?

    ReplyDelete
  4. कुबेरांनी गॅलिलिओचा आदर्श ठेवला असेल असे वाटते

    ReplyDelete
  5. कुणीतरी चाप लावल्यानेच असा घाईगर्दीने खुलासा देवून अग्रलेख मागे घेतलेला आहे.
    आपली बुद्धी, युक्तीवाद अक्कल कुबेरांनी कुणाच्यातरी आदेशान्वये मदर टेरेसांच्या चरणी अर्पण केलेली आहे.

    ReplyDelete
  6. याला मराठीमध्ये म्हणतात थुंकून चाटणे.....

    ReplyDelete
  7. आम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आब राखु इच्छितो. माध्यमस्वातंत्र्यावर येणार दबाव आम्ही झुगारु इच्छितो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी रोखु इच्छितो
    आणि याचे सामूहिक प्रतीकात्मक प्रकटीकरण म्हणून आम्ही रविवार दि.20 मार्चचा लोकसत्ता घेणार नाही
    वाचक म्हणून आमच्या या कृतीची दखल घेऊन संपादकीय मागे घेण्याची कारण जाहीर करावी."
    चला निर्धार करा !
    माध्यमांच्या हितासाठी एक दिवस Say No To लोकसत्ता.

    ReplyDelete
  8. धन्यवाद ! अशा वेळी ताबडतोब त्या विषयाला तोंड फोडणे आवश्यक असते नाहीतर पत्रकारितेच्या जगाशी परिचित नसलेल्या सर्वसामान्य वाचकाच्या मनात अनेक तर्क वितर्क उद्भवत राहतात . त्या अग्रलेखाच्या एकूण वाचकांपैकी दुखावलेल्या वाचकांची संख्या कमीच असण्याची शक्यता लक्षात घेता दोनच तर्क संभवतात . एक हे दुखावलेले वाचक फार प्रभाव किंवा उपद्रवमूल्य असणारे असतील . दुसरा तर्क , आपल्या लेखात सुचवल्याप्रमाणे वृत्तपत्राच्या मालकाने संपादकाच्या आविष्कार /अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांची जाणीव संपादक महाशयांना करून दिली असणार . कालांतराने सत्य बाहेर येईल कारण सत्याला प्रकाशात येण्याची खोड असते !

    ReplyDelete
  9. याच लोकसत्ता मधे शरद बेडेकर नामक पुरोगामी निरीश्वरवादी विचारवंताची एक लेखमाला प्रकाशित केली.. ती लेखमाला बेडेकर आणि कुबेरांनी बिनशर्त माफी मागून मागे घ्यावी

    ReplyDelete
  10. "कुबेर" आहेत ते!!!
    त्यांच्यावर टिका केल्याने संपत्ती लोप पावेल ही भीती आहे,त्यामुळे मी काही बोलत नाही.

    ॐ कुबेराय नमः

    ReplyDelete
  11. "आपल्या माफ़ीमध्ये कुबेर तो अग्रलेख मदर टेरेसा यांच्यावर असल्याचाही धागा देत नाहीत. नुसते अग्रलेखाचे शीर्षक देवून मागे घेतल्याची नोटीस देतात. इतके हे महाशय मदर टेरेसाच्या अवकृपेने भयभीत झाले आहेत. म्हणूनच मग मदर टेरेसा खरेच चमत्कारी व दैवी कुवतीच्या संत असाव्यात, यावर विश्वास ठेवणे भाग आहे. व्हॅटीकनचा पोप किंवा आणखी काही व्यवस्थेने मदरना संतपद देण्याची गरजच नाही. त्या महिलेच्या चमत्कारी क्षमतेची साक्ष खुद्द भारतीय सेक्युलर माध्यमेच देत आहेत. कुठल्याही बाबा महाराज यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात हे बुद्धीमंत जराही कचरत नाहीत. पण कुठला दर्गापीर वा मदर टेरेसाचा विषय आला, मग यांची बोलती बंद होते. तोही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही काय? आपण अग्रलेखात काय लिहीले व त्यातले काय खुपणारे होते, याची आठवणही करून द्यायला संपादकला दरदरून घाम फ़ुटत असेल, तर टेरेसा यांच्या दैवीशक्तीचा आणखी कुठला पुरावा समोर आणण्याची गरज उरते काय? खरे तर पोपने मदरला संतपद दिल्याने त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. पण कुबेरांनी ज्या पद्धतीने ‘शेपूट घालून’ माफ़ी मागितली आहे, ती मदरच्या संतपदाची खरी प्रचिती आहे." atyanta Marmik tippani !!

    ReplyDelete
  12. पूर्णपणे भारतीय असे वृत्तपत्र कोणते आहे हेच कळेनासे झाले आहे

    ReplyDelete
  13. कुबेरानं दोष देऊन काही घडणार नाही कि त्या पूर्ण ख्रिस्तिअन जंजाळास धक्का लागणार आहे, कारण इंडिअन ग्रुपचे CEO कोण आहेत हे फक्त तपासून पाहावे. बस्स झाल

    ReplyDelete
  14. kuberanni asa agralekh lihala hyache kautuk rashtravadee vyaktinee karayala nako ka bhau? Palputepana he pudhache paul aahe, tyavarachee tika rastach aahe pan tarihi ha agralekh lihun kelele he purogamee vartulateel band kautuspadach.

    ReplyDelete
  15. www.loksatta.com/aghralekh-news/mother-teresa-become-saint-1215783/

    hya link varachya comments paha

    ReplyDelete