Friday, March 4, 2016

कन्हैया बजाव बजाव मुरली

तुम्ही कुणाकडे पाहुणे म्हणून गेलेले असाल आणि त्यांच्या घरी एक लाडावलेले डांबरट पोर असेल, तर काय होते? असे पालक मोठ्या कौतुकाने आपल्या या खोडकर उद्धट उचापतखोर पोराचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत असतात. कधी त्याला कुठल्या पाचकळ चित्रपटातील नाच करायला सांगून तोच शाहरुख ॠतिक रो्शन डिट्टो कसा आहे, ते ऐकणे भाग पडते. तर कधी त्याच्या भसाड्या किरट्या आवाजातील गाणेही ऐकावे लागते. त्यावेळी आपली जी अवस्था होते, तशीच काहीशी अवस्था शुक्रवारी अनेक वृत्तवाहिन्या बघताना लोकांची झाली. नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्याला कोर्टाने तीन आठवड्यानंतर जामिन दिला आणि त्याच्या आदेशात जे काही ताशेरे झाडलेले आहेत, त्यातून अशी कारटी ही रोगट मानसिकतेची आहेत आणि त्यांच्यापासून समाजाला सुरक्षित राखण्याची गरज कोर्टाने प्रतिपादन केलेली आहे. पण या पोराचे लाड करणार्‍या सेक्युलर पालकांना त्याचा किंचितही बोध झालेला नाही. मग त्यांनी तुमच्याआमच्या घरात येऊन पोहोचलेल्या वाहिनीवर त्या कारट्याचे गुणगान सुरू केले. बहुतेक लोकांनी अशा वाहिन्यांवर आधीच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सेक्युलर मंडळींनी कितीही कौतुकाने ‘कन्हैया बजाव बजाव मुरली’ आळवले, म्हणून त्याचा परिणाम होणार नाही. कारण बुद्धीमंतांना जे समजत नाही, ते सामान्य माणसाला लौकर उमजत असते. लाडक्या पोराचे चाळे कुटुंबाने सहन केले, म्हणून बाकीचे जग मान्य करीत नसते. हे त्या पालकांच्या लक्षात कधीच येत नाही. म्हणूनच त्यांचे कन्हैयाच्या ‘ऐतिहासिक’ भाषणाने भारावून जाणे नवलाचे नाही. ज्यांना त्यात ॠतिक रोशन बघायचा असेल, त्यांना आपण रोखू शकत नाही. पण म्हणून त्यातला ऐतिहसिक पोरकटपणा दुर्लक्षित करण्याचेही काही कारण नाही. कन्हैया किंवा तत्सम लोक कसे पोरकट चाळे करतात, ते समजून घ्यायला हरकत नाही.
आपल्या भाषणात कन्हैया म्हणतो, मोदींनी क्रुश्चेव-स्टालीनची गोष्ट सांगितली, तशी हिटलरचीही सांगायला हवी होती. आता ही नावे ज्या पोराला आठवतात आणि तो इतिहासाला गवसणी घालणारे बोलत असेल, तर त्याला स्टालीन-हिटलरचा ऐतिहासिक करार समझोताही ठाऊक असायला हवा ना? त्या संदर्भातील इथल्या लाल सलाम ठोकणार्‍यांच्या कोलांट्याउड्या वा मर्कटलिलाही माहिती असायला हव्यात ना? हिटलरने आपल्या आक्रमक धोरणातून युरोपात धुमाकुळ घातला, तेव्हा सोवियत युनियन स्टालीनच्या नेतृत्वाखाली होते आणि त्या दोघांनी करार केला होता. त्यानुसार अन्य काही छोट्या देशांची ‘आझादी’ गिळंकृत करून त्यांना जर्मनीचा प्रदेश बनवण्याच्या हिटलरी महत्वाकांक्षेला स्टालीनने मान्यता दिलेली होती. त्यामुळे कन्हैयाचे इथले लाल सलाम ठोकणारे आजोबा पणजोबा हिटलरच्या फ़ासिस्ट युद्धखोरीला मुक्तीसंग्राम म्हणून लेबले लावून असेच ‘आझादी, आझादी’च्या गर्जना करीत होते. मात्र पुढल्या काळात हिटलरने आपला शब्द मोडून सोवियत युनियनवर हल्ला चढवला. तेव्हा इथले कन्हैयाचे आजोबा पणजोबा चक्रावून गेले. लगेच त्यांनी हिटलरला फ़ासिस्ट घोषित करून त्याच्या विरुद्ध लढणार्‍या ब्रिटीश सत्तेशी हातमिळवणी सुरू केली. त्या युद्धाला व त्यातल्या ब्रिटीश सत्तेला विरोध करणार्‍या महात्मा गांधी, यांच्या स्वातंत्र्य चळवळीलाही कन्हैयासह कारथ येच्युरीच्या आजोबा पणजोबांनी कडाडून विरोध सुरू केला. थोडक्यात भारतीय कम्युनिस्टांना कधी मायभूमी भावली नाही. त्यांनी सतत सोवियत युनियन वा चीनच्या इच्छेनुसार आपले हातपाय हलवलेले आहेत. त्यांचा लाल सलाम तिरंग्याला कधीच नव्हता. पण नव्याने आपला शेंबुड पुसू लागलेल्या कन्हैया किंवा त्याच्या समाजवादी समर्थकांना इतिहासाशी काय कर्तव्य असते? त्यांना आवडते ऐकायचे असते. मग ते खरे-खोटे असण्याला काय महत्व आहे?
देशद्रोह म्हणजे काय, असा विषय गेले काही दिवस चर्चिला जातो आहे. साम्यवादी कम्युनिस्टांनी त्यावर अक्लल पाजळणे समजू शकते. पण पुर्वाश्रमीच्या जुन्या समाजवादी पुरोगाम्यांची अक्कल कुठे गहाण पडली आहे? आज भाजपाने वा संघाने कोणाला देशप्रेमाची प्रमाणपत्रे देऊ नयेत, असे अगत्याने समाजवादी सांगत असतात. पण आज कन्हैयाला दत्तक घेणार्‍या या समाजवाद्यांना आपले पुर्वज एस एम जोशी, नानासाहेब गोरे किंवा बॅरीस्टर नाथ पै एकेकाळी देशप्रेम व देशद्रोहाची प्रमाणपत्रे वाटण्याच्या घाऊक व्यापारात मग्न होते, हे आठवत नाही. ह्याला म्हणतात, इतिहासाचे ज्ञान! समाजवाद्यांचे हे आजोबा पणजोबा तेव्हा ‘जनवाणी’ नावाचे एक पक्षीय मुखपत्र चालवित. ६६ वर्षापुर्वीच्या त्याच्या एका अंकात त्यांनी देशद्रोहाचे कम्युनिस्टांना दिलेले प्रमाणपत्र त्यांच्याच शब्दात वाचा. ‘एका विशिष्ट उद्दिष्टासाठी स्थापन झालेली तमाम मराठी भाषिकांची आघाडी, हे उद्दिष्ट साध्य झाल्यावरही तशीच कायम टिकवण्याचा हट्ट कम्युनिस्ट आणि त्यांचे सहप्रवासी का करीत आहेत? चीनच्या प्रश्नावरील आपली पंचमस्तंभी भूमिका, समितीच्या सल्ल्याने जनतेच्या गळी बांधण्याचा तो एक धुर्त डाव आहे.’ आज पुर्वाश्रमीच्या समाजवादी बहाद्दरांना कन्हैयाचा व त्याच्या साम्यवादाचा मोठा पुळका यायला हरकत नाही. पण तसे करून राष्ट्रप्रेम वा राष्ट्रद्रोहाची त्यांच्याच आजोबा पणजोबांनी केलेली व्याख्या तरी त्यांनी विचारात घेण्याइतका इतिहास चाळावा ना? भाजपा वा संघाने आज जी राष्ट्रद्रोहाची व्याख्या केली आहे वा तशी प्रमाणपत्रे दिल्याचा आक्षेप घेतला जातो, ती प्रमाणपत्रे मुळातच जोशी, गोरे वा बॅ. नाथ पै यांच्याच छापखान्यात मुद्रित केलेली आहेत. तेव्हा त्यांनी वाटली, आज संघवाले वाटत आहेत. ती बोगस असतील तर छापणार्‍या जोशी गोरे यांनाही भामटे म्हणायला हरकत नाही.
मेधा पाटकर यांच्यापासून पुर्वाश्रमीच्या राष्ट्रसेवा दलीयांनी पुढे येऊन एकमुखाने कन्हैयाचा जयजयकार करावा. त्याबद्दल कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण तसा जयघोष करण्यापुर्वी आपले आजोबा पणजोबा असे जे जोशी-गोरे वा नाथ पै होते, ते तद्दन मुर्ख होते; असाही निर्वाळा जाहिरपणे देवून टाकावा. दूर कुठे युरोपातल्या हंगेरी देशात इम्रे नाज या पंतप्रधानाची ‘आझादी’ची घोषणा दडपून टाकण्यासाठी सोवियत फ़ौजांनी आक्रमण केले आणि त्याला ठार मारले. त्याचा मुंबई महापालिकेच्या बैठकीत निषेध करून, भारतीय कम्युनिस्टांना पंचमस्तंभी म्हणजे सामान्यांच्या भाषेत देशद्रोही ठरवणारी बुद्धीमान मंडळी, तेच समाजवादी होते. तेव्हाचा भाजपा असलेला जनसंघ नाव घेण्याइतकाही राजकारणात मोठा नव्हता. मात्र आजच्या भाजपाची संघाची ‘राष्ट्रप्रेमाची’ भूमिका, हेच समाजवादी आग्रहाने मांडत होते. ज्यांचे आजचे वारस आपल्याच आजोबा पणजोबांच्या गोष्टी विसरून कन्हैयाचे कोडकौतुक करण्यात रममाण झालेले आहेत. कन्हैयाला तर बिचार्‍याला इम्रे नाज वा केरेन्स्की कोणी शिकवलेलाच नाही. हिटलर स्टालीनचे संबंध त्याला माहिती नाहीत. म्हणून तो टिव्हीत शिरून मोदींचा कोट ओढून हिटलरबद्दल बोलायला सांगतो. मग असलेच काही खुळचट पोरकट ऐकायला आसूसलेले आनंदित होतात. त्यांच्या आनंदात विरजण घालणे पाप आहे. ज्यांना जन्नत म्हणजे ‘नंदनवनात’ रमायला आवडते, त्यांना वास्तवाच्या जगात आणण्यासारखे पाप नाही. कन्हैया ज्या घोषणा मूठ आवळून देतो, त्याच गर्जत कारथ, येच्युरीचे केस पांढरे झाले. नंबुद्रीपाद सुंदरय्या इहलोक सोडून गेले. पण कन्हैयासारखे लोक कधीच जादूची अंगठी विकणार्‍यांपासून मुक्त होऊ शकत नाहीत. कारण त्यांना वास्तविक जगापेक्षा भ्रामक जन्नत वा ‘नंदनवन’ कमालीचे भुरळ घालत असते. आपल्याला ते असह्य होत असेल, तर त्यापासून दूर रहावे.

10 comments:

  1. Aakal naslya sarkh bolto to kahnya kumaar...

    ReplyDelete
  2. भाऊ कम्युनिझम व समाजवादी यात नेमका काय फरक आहे? भारतात या विचारसरणी कशा प्रकारे शिरल्या? या विषयावर लिहावे ही विनंती

    ReplyDelete
  3. भाऊ कन्हैयाकुमार बरोबर आहे का विरजण घालताय?

    ReplyDelete
    Replies
    1. रामायण वाचून झाल्यावर "सीता रामाची कोण?" असा प्रश्न विचारण्यासारखे आहे हे. पुन्हा भाऊंचा लेख सावकाश वाचा.

      Delete
  4. इतक सगळ व्यवस्थित सांगितल ते समजण्याची अक्कल किती जणांना असते ? काठी पाठीत बसली की केकाटत दूर जाऊन पुन्हा भुंकणारी कुत्री असतात त्या प्रकारचे हे लोक आहेत.

    ReplyDelete
  5. भाऊ अत्यंत समर्पक लेख एक आम आदमी के मन मे JNU के छात्रसंघ अध्यक्ष कन्हैया कुमार के नाम सवाल
    1. भाषण तो पूरा राजनैतिक था, तो ये पढ़ाई का ढोंग क्यों?? बाहर आईये और राजनीति में करियर चमकाईये और अपनी जगह किसी उपयुक्त छात्र को दीजिये जो पढ़ाई के नाम पर राजनीति न करे। पढ़ाई के नाम पर ये मुफ़्तख़ोरी बंद करिये, आपके राजनैतिक करियर पर टैक्स पेयर जनता का पैसा बर्बाद क्यों हो?? आफ कभी दसवी पास हुऐ कभी बारवी पास हुऐ कभी पदवी पास हुऐ? क्योंकी आफकी उम्र अभी उनतीस है क्या किया ईतने साल? की आफकी पढाई अभी तक खतम नही हुई?

    2- ग़रीबी, भुखमरी, जातिवाद, साम्राज्यवाद और पूँजीवाद ... लेकिन ये नही बताया ये समस्या कब से है ? और इसके असली जिम्मेदार कौन है ?? ज़रा बतायेंगे ये सारी समस्यायें कब से हैं ?? या ये सिर्फ पिछले 18 महीने मे खड़ी हुई हैं ?? जो पार्टी 60 सालों से राज कर रही थी उसकी जवाबदारी कितनी मानते है या उनके शासन में रामराज्य था ??आप प्रधानमंत्री की सूट पकड़ कर उनसे प्रश्न पूछना चाहते हैं तो सोनिया गांधी या राज करने वाले काँग्रेस पार्टी को प्रश्न क्यों नही पूछते/ नही पुछां??

    3- आपके बताया नहीं कि ग़रीबी, भुखमरी, जातिवाद, साम्राज्यवाद और पूँजीवाद को कैसे हटायेंगे और इसका ब्लूप्रिंट क्या है या सिर्फ़ नारों से हट जायेगी ?? आज सारी दुनिया मे वामपंथ फ़ेल हो चुका है तो ये भारत में किस तरह से सफल होगा ??

    4- आपकी पार्टी की सरकार पश्चिम बंगाल मे 35 साल तक थी, आप बतायेंगे कितनी ग़रीबी, भुखमरी या जातिवाद दूर हो गया?? आँकड़े तो इसका उल्टा ही बताते हैं तो हम क्यो विश्वास करें आपका??

    5- अगर भारत के संिवधान या लोकतांत्रिक मूल्यों में विश्वास करते हैं तो जनता के बीच जाकर, चुनाव लड़कर ईमानदारी से सिस्टम मे सुधार करते और ग़रीबी भुखमरी के खिलाफ लड़ते न कि जनता द्वारा चुनी हुई सरकार के खिलाफ ज़हर उगलते

    6. आपको पुलिसवाला अपने जैसा ही इंसान लगा अच्छी बात है पर बतायेंगे जिन पुलिसवालों को दंतेवाड़ा में आपके साथियों(DSU) ने मारा वो अपने जैसे लगते थे या नही ?? जिनकी मौत पर JNU में जश्न मनाया जाता है वो भी ग़रीब परिवार के ही थे जिन्हें लाल सलाम वालों ने मारा है

    7- आपको फ़ौजी भी अपने जैसे लगते हैं ना, तो आपके साथ कंधे से कंधा मिला कर जो नारे देते हैं 'भारत तेरे टुकड़े होंगे' कभी सोचा है उनके उपर क्या गुज़रती होगी ?? उनका मोराल कितना डाउन होता होगा ?? कभी सोचा है एक भारतीय की आत्मा तड़पती है जब JNU के ये नारे सुनते हैं "भारत की बर्बादी तक जंग रहेगी" आपको भी यही लगता तो आप कहीं विरोध दर्ज करते ना

    8- आप कहते है कि इस देश के क़ानून पर आपको भरोसा है तो कैसे आपके साथी तो आपके सामने ही नारा देते हैं ?? "अफ़ज़ल हम शर्मिंदा हैं, तेरे क़ातिल ज़िंदा हैंंंं', "कितने अफ़ज़ल मारोगे, घर घर से अफ़ज़ल निकलेगा",
    पुलिस वालों से आपको सहानुभूति है ना, कितने पुलिसवाले संसद में हुए हमले में कितने मरे मालूम है या दिल में अफ़ज़ल से आधी भी सहानुभूति है ?? ये भारत की सर्वोच्च न्यायालय का ही तो फ़ैसला था फिर ये आपका ढोंग नहीं है तो और क्या है ??

    9- रोहित वेमुला जिसका SFI से मोहभंग हो चुका था उसका येचुरी के बारे में लिखा ख़त/विचार क्यो नहीं बताया?? क्योंकि वो आपकी विचारधारा को सपोर्ट नहीं करता? क्या वो भी आफका साथी था जीसने अफजल गुरू के समर्थन मे नारे दिये थे. मरने वाला इंसान कभी झूठ नहीं बोलता और dying declaration तो कोर्ट भी मानता है, जब रोहित ने आख़िरी ख़त में किसी को भी ज़िम्मेदार नहीं बताया पर आप किसी न किसी तरह से इसका भी राजनैतिक फ़ायदा उठाना चाहते है तभी तो ये मुद्दा बार बार उठाते हैं

    आपकी असली समस्या है एबीवीपी, आरएसएस, बीजेपी और मोदी जिनसे आज़ादी चाहिये, आपको लोकतांत्रिक ढंग से चुनी सरकार नहीं चाहिये क्योंकि आपको पंसद नही, उसके जाने के बाद सब आज़ादी मिल जायेगी। जब एक से बडे दुसरा 2 जी, कोल, एशियन गेम जैसे घोटाले 4 बरस पहले कॅगने (मिडीयाने नही जो की उनसे ऊमीद आम आदमी करता है. फिर भी उस मिडिया का सहारा क्यो ले रहे हो? उनको पुछो क्या कर रहे थे वो या हिस्से दारी मिल रही थी उनको ). भाषण की जगह/साथ बस एकबार अपना ही जजमेंट ही पढ़ कर सुना देते छात्रों के सामने, ख़ुद पर शर्म आ जायेगी और सारी ग़लतफ़हमी दूर हो जायेगी
    जय हिंद जय भारत����
    Amool Shetye

    ReplyDelete
  6. parichit yuvaka sobAT BOLAT RAHA, SAMAJ man banvinarana bhetat raha . Kalai Tasme nam:

    ReplyDelete
  7. एक जोक...........

    लीजिए पढ़िए एकदम सटीक विश्लेषण ������✊

    पुलिस ��- आपने कैम्प्स में देश विरोधी नारे क्यों लगाये? क्या मिला देश से गद्दारी कर के

    कनहैया- ��क्या करता मैं गरीब घर से हूँ ... छात्र संघ का नेता होते हुए भी मरा कुत्ता भी नहीं पूछता था मुझे..
    जब से देश से गद्दारी करनी शुरू की मैंने तब से NDTV ABP और आज तक ने मुझे हीरो बना दिया ������
    राहुल जैसे राज कुमार मुझसे मिलने आये
    जिस केजरीवाल को मेरा नाम नहीं पता था, आज मेरे समर्थन में आ गए
    अब किसी ना किसी पार्टी का टिकट मिल जायेगा मुझे|

    टिकट ना भी मिला तो भी Bigg Boss वगेरह जैसे सीरियल में काम मिल जाएगा मुझे
    दिग्विजय सिंह की तरह ठाठ की ज़िन्दगी जियूँगा जी मैं

    पुलिस ��-लेकिन जिस देश का खाया उसी देश से गद्दारी क्यों की?
    कनहैया-�� अरे भाई देश की जनता भी तो बेवकूफ है। जो दस लोग सियाचीन में इस जनता के लिए मर गए उनमें से दो का नाम भी नहीं बता सकती है ये जनता ??
    लेकिन मैंने गद्दारी की तो मेरा तो नाम विख्यात हो गया|��

    पुलिस - ��लेकिन गद्दारों में नाम लिखवा कर तुम्हे क्या मिला?
    कनहैया- ��जो देश भक्ति में मर गए उन्हें भी क्या मिला? गद्दारी कर के मेरा तो करियर बन गया
    ����

    "कभी नोटो के लिए मर गए,
    कभी वोटो के लिए मर गए,
    कभी जात-पात के नाम पर मर गए, कभी आपस मे 2 गज जमीनो के लिए मर गए,..

    होते अगर आज वीर भगत सिहँ तो कहते... यार सुखदेव...
    हम भी किन कमीनो के लिए मर गए" !! ��

    ReplyDelete
  8. Bhau tumcha blog Marathi madhe Astana... lokanna Hindi madhe ka lihayla aavdte?

    ReplyDelete
  9. पुरस्कार वापसीची धुळ कुठे ऊडाली काय माहित?

    ReplyDelete