Friday, April 15, 2016

कोण हा मकरंद देशपांडे?

गाढवापुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता; असे एकेकाळी मुर्खांना म्हटले जाई. कारण गीतेमध्ये जे अध्यात्म वा तत्वज्ञान सांगितेले आहे, ते उमजण्याची बुद्धी नसेल, तर ती गीता अशा अर्धवटांसमोर गावून उपयोग नसतो. त्याच्या लेखी गावातला गोंधळ आणि गीता यात फ़रक नसतो. अर्थात आजकाल अशा म्हणी वाकप्रचार फ़ारसे चलनात नाहीत. मग त्याचा आशय तरी आजच्या शहाण्यांना कसा ठाऊक असावा? सहाजिकच त्यांनी गीता ऐकावी आणि गोंधळ घालायला सुरूवात करावी, यात नवल उरलेले नाही. दोन आठवड्यापुर्वी नाशिक येथे भाजपाच्या प्रदेश अधिवेशनाचा खुप गाजावाजा झालेला होता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी आपल्या भाषणात भारतमाताकी जय म्हणावेच लागेल, असा आग्रही सूर लावला होता. मग मुख्यमंत्री हे पद घटनात्मक असून त्यात संयमाने बोलावे, वगैरे प्रचवनांचा मोसम चालू राहिला. अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांनी व जाणत्यांनीही देवेंद्राला कानपिचक्या देण्याची संधी सोडली नाही. मग असा प्रश्न पडतो, की नाशिकला भाजपाची बैठक किंवा अधिवेशन नेमके कशासाठी झाले होते? मुख्यमंत्र्याने भारतमातेचा जयघोष करण्यासाठी दमदाटी करण्यापुरते त्या अधिवेशनाचे नियोजन होते काय? नसेल, तर तेवढा विषय सोडून त्याबद्दल अन्य काहीच बातमी कशी झळकली नाही? राज्यातला दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, येत्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई, असे कित्येक प्रश्न समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहेत. त्याविषयी भाजपाच्या त्या अधिवेशनात अवाक्षरही बोलले गेले नव्हते काय? असेल तर त्याची बातमी कुठेच कशाला आली नाही? की तिथे अनेक गंभीर विषय बोलले गेले आणि त्याचे गांभिर्यच हजर असलेल्या पत्रकार माध्यमांना उमजले नाही? मग त्यांना जेवढे काही उमजले त्यावरच थुईथुई नाचून अधिवेशनाचे वार्तांकन संपवले?
मग दोन आठवड्यांनी अकस्मात कोणीतरी लातूरला पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याची बातमी दिली. त्याच काळात कोणी तरी हायकोर्टात गेला आणि राज्यात आयपीएल सामने होणार त्यावर बंदीची मागणी करू लागला. अकस्मात लातूर हे शहर तहानेलेले असल्याचा साक्षात्कार देशव्यापी माध्यमांना झाला. ज्याच्या त्याच्या तोंडी लातूर येऊ लागले. अगदी दिल्लीतर्फ़े लातूरला प्रतिदिन दशलक्ष लिटर्स पाणी देण्याचे औदार्य दाखवण्यापर्यंत केजरीवाल यांची मजल गेली. मात्र त्यांनी देऊ केलेले पाणी लातूरला पोहोचणार कसे, असा प्रश्न कोणाही बुद्धीमंताने त्यांना विचारला नाही. जे कोणी देवेंद्रच्या भारतामाता जयघोषावर तुटून पडले होते, त्यापैकी सुद्धा कोणी केजरीवालना लातूरपर्यंत दिल्लीचे पाणी कसे पोहोचणार, असा प्रश्न विचारला नाही. शेवटी केजरीवालनाच त्याचे उत्तर द्यावे लागले. केंद्राने पाठवण्याची व्यवस्था करावी, आपण फ़क्त पाणी देऊ असे केजरीवाल म्हणाले. पण मग पुढे जाऊन केंद्र काय करणार असाही प्रश्न कुणा जाणत्या पत्रकाराला पडला नाही. दिवसभर केजरीवालनी देऊ केलेल्या दशलक्ष लिटर्स पाण्यात दिल्लीतल्या पत्रकारांनी डुंबून घेतले आणि मग इतर विषयाकडे वळले. लातूरच्या पाण्यापेक्षा आयपीएलचे सामने रद्द करण्याला इतके महत्व आले होते, की मुंबईतले शुद्ध केलेले सांडपाणीही लातूरला पाठवायला हवे, इथपर्यंअत युक्तीवाद जाऊन पोहोचला. पण पाठवायचे तर त्याची व्यवस्था काय? कोण इतक्या अल्पावधीत दिल्ली-लातुर, मुंबई-लातूर जलवाहिनी टाकून देणार होता? असले तांत्रिक प्रश्न घटनात्मक बुद्धीवादाला पडत नाहीत किंवा सुचत नाहीत. सहाजिकच त्याची उत्तरेही शोधायची गरज नसते. आयपीएल सामने रद्द झाले, मग लातूरकर पाण्यात डुंबणार होते. महलक्ष्मीच्या मंदिरात देसाई मॅडम पोहोचल्या की लातूरकरांची तहान तृप्त होणार असल्याची एक समजूत तयार केली गेली.
असे तर पाकिस्तान बंगलादेश वा आसामही लातूरला पाणी देऊ शकतात. सवाल कुठून कुठे पाणी पोहोचवायचे आणि कसे, इतकाच होता. मात्र त्याची कुठे चर्चा झाली नाही किंवा उहापोहही कुणाला करावासा वाटला नाही. म्हणून ‘गोंधळ बरा’ चालला होता. पण आपल्या देशाचे नशिब इतकेच, की अजून तरी आपला समाज बुद्धीमंत वा पत्रकारांच्या हवाली करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यापासून दूर असणारे व प्रश्न समस्यांचा स्वतंत्रपणे विचार करणारे शेकडो लोक हयात आहेत आणि वादापेक्षा कामात आपला वेळ खर्ची घालण्यात त्यांना धन्यता वाटते. म्हणून असे लोक आयपीएलच्या सामन्यांना मैदानाला लागणारे पाणी मोजण्यापेक्षा वा ते पाणी लातुरकरांना देण्याचा विचार करण्यापेक्षा, उपलब्ध असेल तिथले पाणी लातूरला कसे पोहोचू शकेल, त्यावर तोडगा काढण्यात गर्क होते. अर्थात आयपीएलचे सामने घोषित झाल्यावर अथवा माध्यमात लातूरचा गवगवा सुरू झाल्यावर नव्हे; तर त्याच्याही खुप आधीपासून असे प्रसिद्धीपासून दूर असलेले लोक लातूरच्या पाणीटंचाईवर उपाय शोधत होते. त्यापैकी एक नाव आहे मकरंद देशपांडे. अर्थात कुठल्या वाहिनीला, संपादकाला वा शोधपत्रकाराला हा माणूस ठाऊकही नसेल. कदाचित तो नाशिकच्या भाजपा अधिवेशनाला हजर असल्याचेही कोणाला माहिती नसेल. कारण खळबळजनक बोलणे वा प्रसिद्दीच्या झोतात रहाणे, त्याला साधत नाही. कुठल्या देवळात जाण्याचा अधिकार वापरण्यासाठी आधी जीवंत असायला हवे आणि त्यासाठी पाणी आवश्यक आहे, असे मानणारा तो बुद्दू माणुस आहे. त्याच्यापाशी कन्हैयाकुमार वा तृप्ती देसाईसारखी प्रसिद्धी साध्य करण्याची कलाही उपजत नाही. मग माध्यमांना तो कसा ठाऊक असेल? त्याच्यापाशी कुठला पत्रकार कशाला फ़िरकणार? तो काय करतो वा बोलतो, त्याची बातमी तरी या कानाची त्या कानापर्यंत कशी पोहोचणार ना?
जेव्हा देशातली अवघी माध्यमे देवेंद्राच्या भारतमातेच्या जयघोषाने घायाळ झालेली होती आणि मुख्यमंत्र्याला जाब विचारत होती, तेव्हा मिरजेचा मकरंद देशपांडे त्याच देवेद्राला एक किरकोळ प्रस्ताव सांगत होता. मिरज हे रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि ते लातूरपासून अवघे साडेतिनशे किलोमिटर्स अंतरावर आहे. तितके अंतर तोडायला रेल्वेच्या मालगाडीला सहासात तास पुरेसे आहेत. हे सर्व कशासाठी तर लातूर कोरडा पडलाय आणि मिरजेत पाण्याचा सुकाळ आहे. मिरज जंक्शनमधून रेल्वेच्या कित्येक गाड्या घावतात. म्हणून रेल्वेने स्वतंत्रपणे पाणीप्रकल्प उभारला आहे. त्याची क्षमता मोठी असली तरी रेल्वेची तितकी गरज नाही. म्हणूनच त्यातला मोठा हिस्सा सहासात तासात लातूरला पाठवला, तर मिरजेला फ़रक पडत नाही. गरज आहे ती लातूरपर्यंत रेल्वेमार्गाने टॅन्कर गाडी सोडण्याची. सहासात तासात पाचसहा लाख लिटर्स पाणी मिरजेहून लातूरला पोहोचू शकते. त्यासाठी राज्यसरकार, रेल्वेप्रशासन व जिल्हा यंत्रणेने संयुक्तपणे काम करायला हवे. ज्या किरकोळ गोष्टी नाहीत, त्या उभ्या करून हे साध्य होऊ शकेल. हा प्रस्ताव त्याच मकरंद देशपांडेनी नाशिकच्या पक्ष बैठकीत मांडला. तिथून या कल्पनेला चालना मिळाली. पण त्या बैठकीत असे काही प्रस्तावित केल्याची बातमी आपण वाचली होती काय? केजरीवालच्या बातम्या झळकवणार्‍यांना त्याच्या खुप आधी वास्तववादी मिरज-लातूर प्रस्ताव मांडणार्‍या मकरंद देशपांडेचे नाव तरी ठाऊक आहे काय? कशाला असेल? मकरंद गीता गातो आणि केजरीवाल गोंधळ घालतो. गोंधळातच जगणार्‍यांना गीतेची महत्ता कशी उमजायची? पत्रकारांना तरी कशा्ला दोष द्यायचा? टॅन्करची पहिली गाडी लातूरला पोहोचल्यावर आपापल्या नेत्यांचे पोस्टर झळकवणार्‍या भाजपाच्या भक्त कार्यकर्त्यांना तरी आपलाच एक सहकारी कार्यकर्ता मकरंद देशपांडे या संकल्पनेचा जनक असल्याचे कुठे ठाऊक आहे?

13 comments:

  1. सुंदर भाऊ मस्तच पण कोण मकरंद देशपांडे??? लातुरकरांसह जनतेला विलासी केजरी राज चाकूवाले ---- असलेच नेते पाहिजेत

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    प्रसारमाध्यमांना पाणी पोहोचवायचा प्रश्न न पडणे साहजिकंच आहे. त्यांच्या मते दादोबा धरणभरे यांना लातुरात नेऊन सोडा नळ म्हणून आज्ञा करायची. बास, आता लातुरात पाणीच पाणी.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. उत्तम लेख आणि ही बातमी समोर आणल्याबद्दल आभार. खरच गोंधळात डोकी ठिकाणावर नसतात आणि त्यामुळे चुकीची पावलच टाकली जातात, गोंधळ अजुन वाढतो! त्यामुळे शांत राहून अशी लोकोपयोगी कामे करणारी कमीच दिसतात. देवाच्या कृपेने थोडीफार आहेत म्हणून बरय.

    ReplyDelete
  4. कन्हैय्या तू 24 तारखेला पुण्यात येतोयेस हे ऐकून आनंद झाला. कारण एक विद्धयार्थी म्हणून जे मला तुझ्याविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी जे प्रश्न पडले आहेत ते विचारण्याची मला संधी तरी भेटेल. पण आजपर्यंत तू जिथे कोठे गेला तिथं तु कोणालाही प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही म्हणून मी तुला हे पत्र लिहित आहे .
    तू आज एक विध्यार्थी नेता म्हणून पुढे येऊ पाहत आहेस , देशामध्ये क्रांती आणायची भाषा करत आहेस. पण खरच आज पर्यंत तू किती विध्यार्थांच्या प्रश्नाला हात घातलास ? मी जेवढे तुझे भाषणं ऐकली ना त्या मध्ये फक्त तू राजकारणा विषयीच बोलताना दिसलास. सरकार वर आरोप करणे , सरकारला प्रत्येक गोष्टीविषयी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणे , भारतीय लष्कराला बलात्कारी म्हणने याच गोष्टी केल्यास ना . मग या मध्ये विद्यार्थांचे प्रश्न त्यांच्या समस्या कुठं आहेत??
    मी मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागातील विध्यार्थी आहे. सततचा दुष्काळ, पाणी टंचाई, नापिकी यासारख्या समस्यांनी माझे व माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे त्या विषयी तू का नाही रे कधी काही बोललास ? मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत ,घरातील कर्ता माणूसच गेल्याने घरातील मुलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडत आहे , त्या मुलांच्या शिक्षणाचं काय त्या विषयी तू का नाही कधी काही बोलत??
    मी ज्यावेळी लातूरहून शिकण्यासाठी पुण्यात आलो तेव्हा माझ्या पण मनात अनेक प्रश्न होते, राग होता, पण मी त्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे . कारण फक्त प्रश्न विचारून बदल घडून येत नाही किंवा कोणावर चिखलफेक करूनही बदल होत नाही.
    तुझी क्रांतीची भाषा फक्त मोदी संघ भाजपा यांना लाखोली वाहण्यापुरतीच दिसत आहे.
    तू ज्या गरिबी, भूखमारी, बेरोजगारीची भाषा करत आहेस त्या गोष्टीला जो काँग्रेस पक्ष जबाबदार आहे त्याच्याशी जवळीक साधून तू काय राजकीय स्वार्थ साधत आहेस?
    नक्षलवादाने अक्खा देश पोखरून काढला आहे, त्या भागातील लोकांच दैनंदिन जीवन पण सामान्य नाही. त्या भागात अजून सरकारी सुविधांचा अभाव आहे. ना शाळा ना इस्पितळे तरी तू नक्षलवाद आणि तेथील मुलांच्या शिक्षणाचा का प्रश्न नाही उठवलास ?? तुला नक्षलवादा पासून आझादी नको का ? नक्षलवादी तुझे काही सगे लागतात का?
    तू स्वतःला भगतसिंग म्हणवून घेतोयेस
    अरे ज्या भगतसिंग नि देशासाठी बलिदान दिले तोच देश तोडायची तू भाषा करत आहेस.
    तू तुझ्या हक्कानं विषयी बोलतोस पण देशाप्रति तुझे काही कर्तव्य आहेत त्याचा तुला विसर पडला आहे का??
    तू म्हटला कि कम्युनिस्टांनी पण स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं आहे पण त्यांनी ब्रिटिशांना दिलेली साथ जगजाहीर आहे. भारत चीन युद्धात चिनचं समर्थन याच कम्युनिस्टांनी केलं आहे.
    JNU मध्ये ज्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या त्या विषयी पण तुझी भूमिका अजून गुलदस्त्यात आहे, तर त्या घटनेला तुझा पाठिंबा होता अस समजायचं का?
    मी या देशाचा नागरिक आहे माझी राष्ट्रीय प्रतीके आहेत त्यांचा सन्मान करणे आणि दुसऱ्याला पण करायला लावणे हे मी माझे कर्तव्य समजतो पण अस करण म्हणजे नकली राष्ट्रवाद आहे अस तू कस म्हणू शकतोस ??
    तू बोललास कि तू या देशाचा जिम्मेदार नागरिक आहेस असशील यात वाद नाही मग कोणी देशविरोधी घोषणा देत असेल , विखारी प्रचार करत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखणे एक भारतीय म्हणून तुझे कर्तव्य नाही का?
    मला एक कळत नाही तू आंबेडकरवादी आहेस का कम्युनिस्ट.
    कारण तू तर आज काल डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा अनुयायी आहेस अस वागतोयेस
    पण ज्या डाव्या विचारसरणीचा तू आहेस ना ज्या CPI साठी तू काम करतो त्यांनीच बाबासाहेबांच्या विरोधात 1935 साली प्रचार केला होता कि तुम्ही तुमच्या मतपत्रिका जाळा पण बाबासाहेबाना मत देऊ नका. असा प्रचार करणाऱ्या CPI चा पण तू कार्यकर्ता आहेस आणि स्वतःला बाबासाहेबांचा भक्त पण म्हणवतोयेस तू तुझी हि दुतोंडी वृत्ती बदलून तुझी भूमिका का नाहीस स्पष्ट करत??
    आजपर्यंत कित्येक गुन्हेगारांना फासावर लटकवलं असताना तुला फक्त याकुब, मकबूल, अफझल या दहशतवाद्यांच्या फाशीचा विरोध का करावा वाटतो ?
    तू आज अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल बोलत आहेस पण तुझ्या मित्र आलोक सिंह माझ्या कॉलेज मध्ये आला असताना त्याला तुझ्या आयोजकांनी हाकलून लावलं . त्याबद्दल कधी काही बोलत नाही तू .
    बघ तुला जर तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ भेटला तर विचार कर माझ्या प्रश्नांवर.
    अक्षय गौतमराव बिक्कड
    फर्ग्युसन महाविद्यालय
    8975332523

    ReplyDelete
  5. भाऊ उथळ पाण्याला खळखळाट फार झालाय कामे करणारी रितसर करतात पण प्रसिद्धी घेणारे टाळू वरिल लोणी खात आहेत बस .....

    ReplyDelete
  6. It's starting of being human.. I'm from Miraj. I know Makarand Deshpande sir. He is simply great man.

    ReplyDelete
  7. Are abhar mananyache tari soujanya dusarya pakshani dakhavane he manuskila dharun zale asat te pan bjp nech kele tar kevadha gajahb

    ReplyDelete
  8. Media jaude, Jithe deshachi Ghatana (thodkyat Kaayda) lihinarya Ambedkaranchya janma dini ratri 12 vajlyaa pasun kaan phadnari avaaj karnare kaydyachi tingle karun Ambedkaranchech anuyayi tyancha maan rakhat nahit ani swatahach "AAPLAACH" netyacha apmaan kartat tithe media laa tari dosh denyaat kaay artha ahe

    ReplyDelete
  9. BJP madhe ashi changli loka khup aahet ji prasiddhi sathi nahi pan samaj sudharnyasathi kaam kartat....

    ReplyDelete
  10. धन्यवाद भाऊ. मकरंद देशपांडे याना योग्य प्रसिद्धी मिळवून दिल्या बद्दल

    ReplyDelete
  11. If u have done somethomg then pls put up infront of us then and then we people of maharastrian or indian will do help not only namo aamhi pan help karu

    ReplyDelete