Sunday, March 1, 2015

पादर्‍याला आवट्याचे निमीत्तमाझ्या पत्रकारितेची सुरूवात दैनिक ‘मराठा’त झाली. तिथे आचार्य अत्र्यांच्या सहवासाने भाषेवर प्रभूत्व असलेल्या लोकांची मांदियाळी होती. त्यात दत्तू आंबेरकर ह्या जाहिरात खात्यात काम करणार्‍या छायाचित्रकाराचाही समावेश होता. अधूनमधून नव्या पत्रकार बुद्धीमंतामुळे दत्तोबाची आठवण येत असते. कारण त्यांनी अशा अर्धवटरावांचे नेमके विश्लेषण वा व्याख्या सांगितली होती. सोशल मीडियावर ‘सकाळ’चे रोविंग एडीटर संजय आवटे यांनी लिहीलेल्या एका चिरकुट मजकुरामुफे दत्तू आंबेरकर आठवले. ते अशा अर्धवटरावांना  नव्याने शेंबुड खायला शिकणारा कावळा म्हणायचे. अतिशय किळसवाणा असा तो प्रकार आहे. आरंभी मला त्याचा अर्थ माहिती नव्हता. दत्तोबांशी चर्चा केल्यावर त्यांनी प्रत्यक्षच असा कावळा दाखवला. अत्यंत बुळबुळीत असा हा पदार्थ तुम्ही फ़ेकला, की कावळा त्यावर झेपावतो. पण तो सहजगत्या त्याच्या चोचीत येत नसतो. मग तो चोचीत ओढून घेण्यासाठी कावळा जी कसरत करतो, ती खरेच कितीतरी केविलवाणी असते. ‘चोरटया भाऊच्या मनात चांदणे!!!’ या शिर्षकाचा जो मजकूर आवटे यांनी सोशल मीडियात टाकला, त्यावर नजर टाकली तर दत्तू आंबेरकरच्या शब्दांची प्रचिती येते. माझ्या वय व बुद्धीविषयी आवटे लिहीतात


‘भाऊ तोरसेकर यांचे वय झाले आहे आणि काहीवेळा वृद्धापकाळात विचारप्रक्रिया विसंगत दिशेने जाण्याचे भय असते. त्यामुळे भाऊना माफ करायला हरकत नाही. पण त्यांच्या बेताल लेखनाने काही गैरसमज होऊ शकतात. ते होऊ नयेत यासाठी:’

असे म्हणत आवटे यांनी विचारप्रक्रिया वयानुसार विसंगत दिशेने जाण्याचे भय व्यक्त केले आहे. याचा अर्थ तसा त्यांचा अनुभव असावा आणि ज्या हिरीरीने आवटे पानसरे दाभोळकरांच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत, त्यावरून ते कोणाच्या संगतीत असतात, त्याचा अंदाज करण्याची गरज नाही. पण मग असा प्रश्न येतो, की वयाचाच निकष लावायचा तर ते पानसरे दाभोळकर माझ्यापेक्षा वयाने अधिकच पुढे गेलेले होते. म्हणजे आवटेच्या निकषानुसार त्यांची विचारप्रक्रिया विसंगतीच्या दिशेने गेलेली आहे, असेच त्यांना वाटत असावे. त्याचे कारण उघड आहे. आवटे ज्या दिवट्यांच्या संगतीत रहातात वावरतात, त्यावर सुसंगती-विसंगती अवलंबून असते. म्हणूनच त्यांना पानसरे दाभोळकर यांचे विचार भरकटत विसंगतीच्या दिशेने गेल्यासारखे वाटले असेल तर नवल नाही. मात्र मला तसे वाटत नाही. त्या दोघांच्या काही भूमिका व विचार असू शकतील आणि त्या इतरांना पटणार्‍या नसल्या म्हणून आवटेला विसंगतही वाटल्या असतील. म्हणून मी त्यांना बेताल वागणे म्हणणार नाही. तो आवटे यांचा निष्कर्ष आहे. अर्थातच तो गैरसमजावर आधारलेला असू शकतो. पण ज्याच्यापाशी मुळात बालीश समजही नाही, त्याच्या गैरसमजाला किती किंमत द्यायची? म्हणूनच आवटे यांना पानसरे व दाभोळकर विसंगत विचार करायचे असे वाटत असले तरी मला अजिबात तसे वाटत नाही. आपापले चिंतन मनन यानुसार त्यांनी विचार मांडले आणि कृतीही केल्या. आवटेंना त्या बेतालही वाटतात, मला नव्हे. त्यांच्याकडून चुक झालीच असेल, तर आवटेसारख्या निर्बुद्ध नासमज बेताल लिहीणार्‍या बोलणार्‍यांची संगत त्या दोघांना टाळता आली नाही, इतकेच. अर्थात अशा बेअक्कल आवट्याची दखल घेण्याचे काहीच कारण नाही, असे अनेकांना वाटेल. पण जेव्हा अशी बेताल माणसे शेफ़ारल्यासारखी अक्कल पाजळू लागतात, तेव्हा त्यांचे गाढवासारखे लांबलेले कान उपटून तोकडे करावे लागतात. आणि पादण्याला ‘आवाज महाराष्ट्राचा’ म्हणत नाहीत हे सांगणे भाग पडते.

हरकत नाही, माझी बुद्धी इतकी भरकटली असेल तर साम टिव्हीवर त्यांनी मला आमंत्रित करून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशी माझी ओळख करून देण्याचे कारण काय? त्यातून आवट्यांची बुद्धी किती भरकटली वा भ्रष्ट झाली आहे, त्याचा पुरावा आपोआपच मिळत नाही काय? यातून या बेताल माणसाचे जगाविषयी व बुद्धीविषयी किती गैरसमज आहेत याची साक्ष मिळू शकते. दुसरी बाब आवट्याच्या भरकटलेल्या बुद्धीची व कामाची. याला ‘सकाळ’ समूहाने कोणत्या पदावर नेमले आहे? रोविंग एडीटर म्हणजे काय? ज्याला कुठली जागा वा काम नेमून दिलेले नाही व त्याने कुठेही भरकटावे असा संपादक. सहाजिकच अशा भरकटलेल्या माणसाला अवघे जगच भरकटलेले वाटले तर नवल नाही. अर्थात हा माझा नुसता आरोप नाही. त्याचा साक्षात ऑडीओ व्हीज्युवल पुरावाच आवट्यांच्या दफ़्तरी नोंदलेला आहे. त्यांनी त्याचीही लिंक सोशल मीडियात टाकली, तर कोण किती भरकटलेला निर्बुद्ध आहे, त्याचा निर्णय बघणार्‍यालाच घेता येईल.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नागपूरला महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन होत असते. ते संपल्यावर साम टिव्हीने ‘आवाज महाराष्ट्राचा’ नावाच्या शोमध्ये चर्चा ठेवलेली होती. चर्चेचा विषय होता विधानसभेच्या हिवाळी नागपूर अधिवेशनाचे फ़लित. त्यात सकाळचे नागपूरचे निवासी संपादक होते, तसेच भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि कॉग्रेसचे डॉ. राजू वाघमारे सहभागी झाले होते. त्यात माझाही ज्येष्ठ विश्लेषक म्हणून समावेश आवट्यांनी केला होता. चर्चेचा पहिला भाग उरकला आणि ब्रेकनंतर वाघ आणि वाघमारे याच दोघांमध्ये तुंबळ लढाई जुंपली. पण चर्चा विषय सोडून कुठल्याकुठे भरकटली होती. कारण हे दोघे मुंबईच्या रेल्वे लोकल गाड्या व फ़लाटांच्या विकास सुविधांविषयी तब्बल पंधरा मिनीटे बोलत होते. माझ्या ‘भरकटलेल्या बुद्धी’नुसार रेल्वे हे केंद्र सरकारचे मंत्रालय असून महाराष्ट्र सरकार व विधानसभेच्या कक्षेत तो विषय येत नाही. म्हणूनच नागपूर विधानसभेच्या फ़लितामध्ये त्यावर चर्चा व्हायला नको. पण कागद नांगरीत बसलेल्या आवट्याला त्याचे भान कुठे होते? त्यांनी दोन्ही प्रवक्त्यांना मोकाट भरकटू दिले. शेवटी बेताल झालेल्या त्या चर्चेला रेल्वेच्या रुळावरून विषयाच्या रुळावर आणण्यासाठी मला ओरडून आवट्याला शुद्धीवर आणावे लागले. विषय कुठला आणि चर्चा कुठे चाललीय, असे ओरडून सांगितल्यवर पादण्यात रमलेल्या आवट्यांना भान आले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मी केलेली कॉमेन्टही अजून माझ्या स्मरणात आहे आणि दोन्ही पक्षाचे उपरोक्त प्रवक्तेही त्याची साक्ष देतील. मी आवट्यांना शुद्धीवर आणण्यासाठी म्हणालो होतो, कृपया या वाघ आणि वाघमारेंना एकाच चर्चेच्या पिंजर्‍यात कोंडू नका, अन्यथा चर्चा बाजूला रहाते आणि शिकार सुरू होते. तेव्हा कुठे आवट्यांना जाग आली. पण तोवर चर्चेचा वेळही संपत आलेला होता.

असा हा बेताल निर्बुद्ध आवटे त्याने माझी बुद्धी भरकटण्य़ाचा धोका सांगावा यातच माझी बुद्धी शाबुत असल्याचा पुरावा मिळतो. ज्याची स्वत:ची बुद्धी लाईव्ह चर्चेमध्ये भरकटलेली असते. त्याने मला बुद्धी भरकटल्याचे प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्याचे आभार मानायला नको काय? त्यांनी पादलेला दुसरा मुद्दा ‘दाभोलकर अथवा पानसरे यांचे खून शेतीच्या बांधावरच्या भांडणातून नक्कीच झाले नाहीत. त्याला असणारा संदर्भ विचार आणि विवेकाचा आहे. त्यामुळे हे खून अविवेकी शक्तीनी केले आहेत, असे म्हटले जाणे स्वाभाविक आहे.’ याचा अर्थ अन्य खुन हे विवेकी शक्ती करतात असा होत नाही काय? इतर खुन विवेकी बुद्धी वा शक्तींकडून होतो असे आवट्यांना म्हणायचे आहे. इथे या माणसाची बुद्धी किती भरकटली आहे, त्याचा पुरावा वेगळा देण्याची गरज आहे काय?

त्यांचा तिसरा मुद्दा, ‘दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही. त्यावरही चर्चा करता येईल, पण मुद्दा भरकटण्याचा डाव त्यातून यशस्वी होत जाईल!’ ज्याला एक तासाच्या चर्चेत विषय मुद्देसूद ठेवता येत नाही आणि पंधरा मिनीटे चर्चा भरकटल्याची शुद्ध नसते, त्यांनी उगाच असला पांडित्याचा आव आणायची गरज आहे काय? केंद्र आणि राज्य यांची खाती व मंत्रालये यातली तफ़ावत कळत नाही, त्यांनी मुद्दे भरकटण्याची भाषा करावी, हा विनोद नाही काय? मग आवट्यांचा मुद्दा काय आहे? त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘मुद्दा आहे आयडिया ऑफ़ इंडियाचा.’ म्हणजे ते आयडीयाच्या काल्पनिक जगात वावरत असतात आणि वास्तवातील जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. याला भ्रमिष्टावस्था म्हणतात. कारण पानसरे दाभोळकरांची हत्या वास्तवात झालेली आहे. ती नुसती आयडीया नाही. त्या हत्यांचा आयडियाशी संबंध नसून गुन्हेतपासाशी संबंध आहे. पण कल्पनेच्या विश्वात कल्पनाविलास करण्यात रमलेल्यांना वास्तवाचे भान कसे असावे?

तर मुद्दा किती व्यापक आहे असे सांगताना आवटे म्हणतात, ‘तेव्हा हा मुद्दा तथाकथित पुरोगामी अथवा डावे पक्ष यांच्याशी संबंधित नाही. (उलट शेकापसारखा तथाकथित डावा पक्ष रायगडातही बंदमध्ये उतरताना दिसला नाही!) मुद्दा त्याहून जास्त व्यापक आहे. म्हणून तो प्रत्येक भारतीय माणसाच्या चिंतेचा होणे स्वाभाविक आहे. जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे. असायला हवे. आम्ही भारताचे लोक आज अस्वस्थ असताना हा कोणी भाऊ असे पचकत असेल तर त्यांना सांगायला हवी या देशाची गोष्ट!’

हा दिवटे कुठल्या देशात रहातो ठाऊक नाही. कारण एकाच वाक्यात तो अगदी डावा असूनही रायगडातला शेका पक्ष बंदपासून दूर राहिल्या़चे सांगतो आणि त्याच वाक्यात पुन्हा ‘जो जो भारतीय, तो तो सचिंत, तो तो संतप्त असे चित्र आहे’ अशी ग्वाही सुद्धा देतो. म्हणजे जो जो संतप्त तेवढाच भारतीय बाकीचे भारतीय नसतात का? तसे असेल तर अगदी दिल्लीतले व अन्य प्रांतातील डावे पक्ष, कम्युनिस्टही भारतीय असू शकत नाहीत. कारण त्यातला कोणी नेता अस्वस्थ होऊन कोल्हापूरला फ़िरकला सुद्धा नाही. बंदमध्ये किती व कोण सहभागी झाले, त्याच्या बातम्या सकाळनेच दिल्यात. त्या तरी आवटे वाचतो काय? की रोविंग एडीटर म्हणजे घरमाशी जशी ताटावरून मैल्यावर बसत भरकटत जाते, तसे यांचे काम चालते?

‘हिंसाचाराचे समर्थन करणारी साम्यवादी आवृत्ती आणि त्याचे तपशील याचा इथे संबंध येतोच कुठे? लोकशाहीत त्याला जागा असू शकत नाही.ते सारे अवैध आहे. दाभोलकर अथवा पानसरे यांच्या हत्येला केरळ, चीन, रशिया, क्युबा असे संबंध जोडत काय सिद्ध होणार आहे, हे काही मला समजलेले नाही.’ असा प्रश्न मला विचारणार्‍या आवट्याला महाराष्ट्राचाही इतिहास माहिती नाही की इथल्या राजकारणाची ‘आयडिया’ नाही. मग समजणार तरी कसे? या अन्यत्रच्या साम्यवादी हिंसक कृत्यांचा संबंध काय असाच प्रश्न पंचावन्न वर्षापुर्वी कॉम्रेड डांगे, दाजीबा देसाई, आचार्य अत्रे इत्यादी दिग्गजांनी तेव्हाचे समाजवादी दिग्गज एसेम जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै यांनाही विचारला होता. तसा कुठलाही संबंध नसताना तेव्हाचे संयुक्त महाराष्ट्र समितीचे राजकारण नासले होते. जे उत्तर जोशी-गोरे यांचे होते, तेच माझे उत्तर आहे. ते जरा आवटे नावाच्या घरमाशीने इतिहासावर बसून वाचले तर संबंध लक्षात येऊ शकेल. पण घाणीवरच घोंगावत बसल्यावर लक्षात काय यायचे? आज आवटे वगैरे दिवटे ज्या आवेशात सनातन वा हिंदूत्ववाद्यांवर भडीमार करत असतात, त्याच भाषेत तेव्हाचे समाजवादी दिग्गज कम्युनिस्टांना खुनी प्रवृत्ती म्हणून  खिजवत होते?

असो तर त्यांच्यामुळे मला दत्तू आंबेरकरची आठवण झाली. कारण आवट्यांनीच लिहून ठेवले आहे ‘कोणी भाऊ असे पचकत असेल तर’. तर हा अत्यानंदाने शेंबुड सापडला म्हणून त्याच्यावर झेपावणार ना? नसलेली अक्कल माणुस वापरू लागला, मग असेच होते. ज्याला देश, लोक, मुद्दे, भरकटणे, पचकणे अशा शब्दांचा मुळातला अर्थच ठाऊक नाही, त्याने जीभ उचलून टाळ्याला लावली, तर वेगळे काय व्हायचे? काय लिहीतो वा बोलतो, त्याचेही भान त्याला असायचे कारण नाही. त्यांनी आपल्या त्या ‘आवाज महाराष्ट्राचा’ शोची लिंन्क मुद्दाम इथे टाकावी, म्हणजे त्यांच्या भरकटलेल्या अकलेचे छान प्रदर्शन मांडले जाईल. चोरट्याच्या मनात चांदणे असे आपले पुर्वज म्हणून गेलेत. पण त्यांनीच पादर्‍याला पावट्याचे निमीत्त असेही म्हटले आहे. असले दिवटे त्या काळात पैदा झाले असते, तर पुर्वजांनी पादर्‍याला आवट्या़चे निमीत्त अशीच म्हण रूढ केली असती ना?

23 comments:

 1. Bhau, tumhi awatyachi par watach lawalit :-)

  ReplyDelete
 2. हे दिवट साम t.v.च पोर
  साम t.v.कोणाच पोर आम्हाला माहीत आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. साम टिव्ही च्या वडीलांची अक्कल मात्र वयोमानानुसार भरकटत नाही.😁

   Delete
 3. वा...... वा…….!! मस्तच भाऊ गालात चपराक ठून दिली आहे !

  ReplyDelete
 4. Who is this Mr. Aawte?,Bhau tumchyamule kalale ki ase kahi editor pad suddha aste tya saathi dhanyawad.

  ReplyDelete
 5. I cannot use the world that you have used, but I completely agree with you Bhau.

  ReplyDelete
 6. नेहमीप्रमाणे जब्बरदस्त लगावुन दिलीत भाऊ...

  ReplyDelete
 7. BHAU ,LAY GHETLI RAO Mr. Aawate yaanchi :-) !

  ReplyDelete
 8. अशा पाखंडी,ढोंगी पत्रकारीतेचा बुरखा तुमच्याइतका चांगला कोण फोडेल भाऊ ?तुम्ही मांडता ते मुद्दे पाहुन बँरिस्टरही अचंबीत होईल.

  ReplyDelete
 9. भाऊ खुपच जोरात लाऊन दिलीत तुम्ही पण तुमचा चाहता असूनही काही ठिकाणी थोडे जास्त झाले असे मला वाटले असो लगे रहो बापूजी ( आत्ताचे आणि आमचे )

  ReplyDelete
  Replies
  1. थोडा कशाला चांगलाच घसरलो आहे. याचे कारण माझी पत्रकारिता दै. ‘मराठा’त सुरू झाली पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’पासून बहरली. तिथे अनुल्लेखाची पळवाट मला कोणी शिकवलीच नाही.

   Delete
 10. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 11. मस्त फाडलीये भाऊराव तुम्ही.

  लेखात रशियाचा अनायसे उल्लेख झालाय त्यावरून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. तीन दिवसांपूर्वी बोरीस नेमत्सोव्ह या रशियन नेत्याची हत्या झाली. ही हत्या सुपारी देऊन झाली. हा माणूस प्रमुख विरोधी नेता होता असं पाश्चात्य माध्यमे सांगताहेत, मात्र तो स्थानिकांत फारसा लोकप्रिय नव्हता. त्याच्या खुनाचं भांडवल करून पुतीन यांना खलनायकी वेशात रंगवणं चालू आहे. नेमत्सोव्ह हे पुतीन यांच्या खिजगणतीतही नव्हते. त्यांना मारणारे पुतीन नाहीत. त्यांच्या स्वत:च्याच कंपूतल्या कुणाचातरी फायदा होणार.

  आपल्याकडेही अगदी असंच घडलंय. दाभोलकरही असेच सर्वज्ञात होते, पण लोकप्रिय नव्हते. दाभोलकरांना ठार मारायची त्यांच्या वैचारिक विरोधकांना आजीबात गरज नव्हती. त्यांच्याच कंपूमधल्या कुणीतरी ही हत्या घडवून आणली आहे. जणू दाभोलकर हत्येचा आकृतिबंध जगभर प्रसृत होतोय.

  हे साम्य स्वत:ला संपादक म्हणवून घेणाऱ्यांनी जनतेला उलगडून सांगितलं पाहिजे. एकवेळ दाभोलकरांच्या हत्येचा रशियाशी संबंध जोडला नाही तरी चालेल. पण नेमत्सोव्ह यांच्या हत्येचा दाभोलकरांच्या हत्येशी निश्चितपणे समचर्या संबंध जोडता येतोय.

  परंतु हे आवट्यांना कोण समजावून सांगणार!

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 12. मला मराठी म्हण आठवली.... खाजवून आवदान

  ReplyDelete
 13. जबरदस्त भाऊ, जवळपास सर्वच वाहिन्यांवर चर्चा भरकटलेल्याच असतात. सूज्ञांना त्या चर्चा पाहायलाही नाही आवडत.

  ReplyDelete
 14. बरं केलंत ... तेही त्याच्या स्तरावरुन गरजेचंच .... 👌👍

  ReplyDelete
 15. मला तर तुम्ही जोडे शेबंडात बुडवून मारल्या सारखे वाटलं.. ...जबरदस्त भाऊ

  ReplyDelete
 16. त्या चर्चेची व्हिडीओ लिंक मिळेल का.. मी बरीच शोधली पण मिळाली नाही ..

  ReplyDelete