Saturday, March 28, 2015

‘स्मार्ट मित्र नव्हे, पिसाळलेलं कुत्रं.’आधी मला वाटले होते, समर खडसने मलाच शिवीगाळ केलेली आहे. पण एका पत्रकार मित्रानेच समर कायम कोणावरही भुंकतच असतो याचा पुरावाच पाठवून दिला. तो सोबत इथे सादर केला आहे. सलमान रश्दी यांनी भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी गैरलागू शब्द वापरले, त्याचा वैचारिक प्रतिवाद म्हणून समरने कोणती सभ्य भाषा वापरली? एखाद्या मान्यवर वृत्तपत्राचा सहसंपादक अशी शिवराळ भाषा कशाला वापरतो? उपरोक्त शिवीगाळ महाराष्ट्र टाईम्सच्या सह्संपादकाने केलेली आहे. त्याने अशी भाषा कशाला वापरावी, असा कोणाला प्रश्न पडू शकेल. म्हणुन मटाने तब्बल अठरा वर्षापुर्वीच त्याचा खुलासा करून ठेवलेला आहे. अशा लोकांना खरा राग आला, मग शिव्याही सुचत नाहीत, असेही त्या रोगनिदानात नमूद केले आहे. प्रा मे. पुं. रेगे सरांचे हे रोगनिदान महाराष्ट्र टाईम्सने आपल्या संपादकीय कुटुंबात भविष्यकाळात येऊ घातलेल्या आजारपणाचे भान राखून आधीच प्रसिद्ध केलेले असावे. २३ मार्च १९९७ रोजी हा रोगनिदानाचा लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्या रोगनिदानात रेगेसरांनी काय काय लिहीले ते काळजीपुर्वक वाचले. तरच समर खडसच्या भाषेचे आकलन होऊ शकेल. हळुहळू अशीच भाषा महाराष्ट्र टाईम्समध्येही आपल्याला वाचायला मिळेल ही आपण अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आणि त्या दिशेने वाटचाल करताना त्या वृत्तपत्राने आपली बिरूदावलीही बदलून घ्यायला हरकत नाही. ‘स्मार्ट मित्र नव्हे, पिसाळलेलं कुत्रं’ कशी बिरूदावली आहे? असो, आधी रोगनिदान वाचून घ्या, मग पुढले बोलू.

‘समाजाच्या काही थरात शिव्यागाळी माणसांच्या तोंडात बसलेल्या असतात. संबोधने, विशेषणे, क्रियाविशेषणे व क्रियापदे म्हणून त्यांच्या बोलण्यात शिव्या सतत येत असतात. सततच्या वापराने त्या झिजून गुळगुळीत झालेल्या असतात. त्या शिव्या अशा वाटतच नाहीत. तो केवळ त्यांच्या आत्माविष्काराच्या शैलीचा भाग असतो. अशा माणसांवर जेव्हा शिव्या देण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा त्यांना खास कल्पकता दाखवावी लागते. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातील शिव्या केवळ उत्स्फ़ुर्त असतात.’

‘पौगंड वयात अनेकदा मुलांना सभ्यपणा हे ढोंग वाटते. माणसाच्या लैंगिकतेची चाहुल त्यांना लागलेली असते. त्याचा अनेकप्रकारे स्वत:ला अनुभव येत असतो. या स्वरूपाच्या व्यवहारात प्रौढ माणसे गुंतलेली असतात. पण आपल्या जीवनाची ही बाजू ते झाकून ठेवतात. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असा आव आणतात. असे त्यांचे प्रौढांविरुद्धचे गार्‍हाणे असते. या ढोंगाचा प्रत्यय त्यांना स्वत:मध्येही येत असतो. लैंगीक जीवनाविषयी असलेली उत्कट आस्था, कुतूह्ल. या व्यवहारात गुंतण्याची तीव्र इच्छा सभ्यपणाच्या संकेताच्या दडपणाखाली त्यांना स्वत:लाही झाकून ठेवावी लागते. त्या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे लैंगिकतेला भाषेच्या माध्यमातून वाट मोकळी करणे. एकमेकांसोबत रांगड्या अश्लील, इ. शब्दप्रयोगांचा वापर करून बोलण्यातून लैंगिक उर्मीचे काही प्रमाणात समाधान होते असा अनुभव तर येतोच, पण असे बोलून आपण प्रौढांच्या दांभिकतेविरुद्ध आणि त्यांनी आपल्या केलेल्या गळचेपीविरुद्ध बंड करीत आहोत असे समाधानही मिळते. मुले वाढतात, जबाबदार सामाजिक व्यवहारात सहभागी होतात, सभ्यतेच्या संकेतांची अनिवार्यता त्यांच्या गळी उतरते आणि हा ‘विद्रोह’ शमतो. पण काही माणसे जन्मभर पौगंडावस्थेच्या मानसिकेतून बाहेर येत नाहीत.’

‘सभ्यपणे बोलण्याचे-वागण्याचे जे संकेत समाजात रुढ असतात, तो ढोंगाचा प्रकार नसतो. आपण इतरांशी सभ्यपणे वागतो तेव्हा तुमच्या प्रतिष्ठेची कदर मी करतो, तुमच्याशी सामंजस्याने, सुसंवादाने वागावे अशी माझी इच्छा आहे, असा संदेश आपण त्यांना देत असतो. दोन माणसे परस्परांशी सभ्यतेने वागत असली तर त्यांच्यात मतभेद होऊ शकेल, वाद होईल, पण भांडण होणार नाही. भांडताना जाणूनबुजून अपशब्द वापरण्यात येतात. हे शब्द वर्णनपर म्हणून घेतले तर बहुतेकदा ते अयथार्थ ठरतील. पण वर्णन करणे हा त्यांच्या वापरामागील उद्देशच नसतो. आपण भांडणाच्या पवित्र्यात आहोत, भांडायला सज्ज आहोत, हे जाहिर करणे एवढाच त्याचा हेतू असतो. सभ्यपणाचे संकेत पाळण्यात जी समंजस, संवादी वृत्ती व्यक्त होत असते; ती केवळ लोकशाहीलाच नव्हे ते सामाजिक एकतेला, समाज हा समाज म्हणून एकत्र रहायला आधारभूत असते. माणसाच्या शारिरीक बाजूचा शारिरीक प्रक्रियांचा निर्देश करण्याविषयीचे जे भाषिक संकेत असतात, त्यांनाही काही अर्थ आहे. त्यातून माणसाच्या खाजगीपणाविषयी कदर व्यक्त होते. माणूस म्हणजे केवळ शारिरीक प्रक्रियांची व्यवस्था नव्हे, त्याच्यापलिकडे जाणारे मानसिक जीवन जगणारी व्यक्ती आहे, आणि त्याच्यात तिची त्याची प्रतिष्ठा आहे. हा भावही त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे शिव्या या बहुतेकदा शारिरीक प्रक्रियांच्य वर्णनावर आधारलेल्या असतात. एखाद्याला शिवी देऊन त्याला केवळ एक पशू या पातळीवर आपण आणतो; त्याचे मानवी व्यक्तीमत्व हिरावून घेत असतो.’

एकूणच अलिकडल्या काही वर्षात महाराष्ट्र टाईम्सच्या संपादक मंडळात भरती करण्यात आलेली बहुतांश मंडळी अजून पौगंडावस्थेतून बाहेर पडलेली नाहीत, याचा हा पुरावा मानता येईल. अर्थात तो माझा आरोप नाही, तर खुद्द त्याच वृत्तपत्राने फ़ार पुर्वी करून ठेवलेले रोगनिदान आहे. आणि अशा लोकांच्या सहवासात राहिले, मग इतरांनाही त्याची बाधा होणारच. आपल्या शिव्यांचेही दारिद्र्य समरने त्यात लपवलेले नाही. त्याबद्दल त्याची पाठ थोपटायला हवी. त्याला शिव्या सुचत नाहीत, म्हणून तो इतरांना काही ‘सर्जनशील’ शिव्या सुचवण्याचे आवाहनही करतोय. जेव्हा मानवी प्रचलित भाषा व सभ्यपणाची भाषा बोलता येत नाही, तेव्हा आपण संवाद करू शकत नाही, तर भांडणाला सिद्ध आहोत, असेच सुचवले जात असते, त्याची ही प्रचिती. मग जेव्हा भांडायचे असते, तेव्हा शब्द दुय्यम आणि आवाज चढवुन भुंकण्याचा अविर्भाव महत्वाचा होऊन जातो. इथे मुद्दाम त्याचा पुरावाच दिला आहे. मला शिवीगाळ करताना भाऊ या शब्दाचा अविष्कारही ‘भौ’ असा कशाला झाला त्याचाही खुलासा आपोआप होऊ शकतो.

रेगे सरांनी केलेले रोगनिदान किती अचुक आहे ते लक्षात घेतले, तर मला समर सारख्या पिसाळलेल्याची चिंता का वाटते, त्याचा अंदाज वाचणार्‍याला येऊ शकेल. जेव्हा पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने माणसाला बाधा होते, तेव्हा अशा रोगबाधित माणसाच्या सहवासाने अनेकांना आणखी बाधा होऊ शकते. किंबहूना महाराष्ट्र टाइम्सला अशी बाधा झाल्याची लक्षणेही दिसू लागलेली आहेत. सहाजिकच त्यावर सार्वजनिक सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना करावीच लागणार. त्यामुळेच महाराष्ट्र टाइम्स हल्ली कुठे व किती पिसाळल्यागत लिहीत-भुंकत असेल, त्याचाही आढावा घ्यावा लागणारच. स्मार्ट मित्र म्हणवून घेणार्‍या या वृत्तपत्राला किती आणि कशी रोगबाधा झालीय, ते लपवून ठेवणे सार्वजनिक आरोग्याला अपायकारक नाही काय? मग तो अपाय रोखण्याचे काम करावेच लागणार ना? त्यासाठी महाराष्ट्र टाईम्स आणि अशा पिसाळलेल्यांच्या सहवासाने रोगबाधित झालेल्या इतर काहीजणांना सुरक्षेचा उपाय म्हणून चौदा नाही तरी तीनचार इंजेक्शने द्यावीच लागणार. बघू किती इंजेक्शने होतात.   (अपुर्ण)

(बातम्यांपासून अग्रलेखापर्यंत महाराष्ट्र टाईम्स किती पिसाळल्यागत वागतो, त्याचे सविस्तर पोस्टमार्टेम क्रमाक्रमाने करूया)


ज्यांना रेगेसरांचा मूळ संपुर्ण लेख वाचायचा असेल त्यांनी पुढील दुव्यावर जावे
http://jagatapahara.blogspot.in/2014/12/blog-post_50.html


4 comments:

 1. Yogya Nidan !! Hya kutrala vesan ghalavich lagel...

  ReplyDelete
 2. हा आधीपासूनच अत्यंत अहंकारी माणूस आहे. शिवाय मोठ्या वृत्तपत्राना आपले फार मोठे धर्मनिरपेक्षपण दाखविण्यासाठी असले लोक पदरी ठेवायची सवय लागलेली आहे त्यामुले अजुनच माज येतो. याने शब्दांची कितीही कसरत केली तरी मनातून हा अतिरेकी आणि धर्मांध लोकांचा पक्का सहानुभूतीदार आहे हे कधीच लपलेले नाही. तो नेहमी मुस्लीम अतिरेक्यांच्या बाजूनेच बोलत असतो. गंमत अशी आहे की ही विषवल्ली माध्यमात फोफावत असताना बिनडोक राष्ट्रवादी लोक काय करीत होते त्यांनी चांगली माणसे का पेरली नाहीत निदान या विषावर उतारा म्हणून तरी ? पण ते तेंव्हाही गाफीलच होते आणि आजही सत्तेच्या माजामुळे गाफीलच आहेत हेच समाजाचे दुर्दैव आहे.

  ReplyDelete
 3. अजुनही शिरजोर आणि समाजकंटक़ पत्रकारांना tit for tat साठी योग्य दर्जाचे आणि संख्येने पत्रकार आणि माध्यमे ऊभी करता येऊ नये हा over confidence म्हणायचा ताठा हेच समजत नाही.

  ReplyDelete
 4. महाराष्ट्र टाईम्स केव्हाच बंद केला. एकंदरीतच तो मराठी पेपर असल्याची लाज वाटते. रेगे साहेबांचा लेख मात्र अप्रतिम.

  ReplyDelete