Monday, March 23, 2015

त्यांच्या खांद्यावर डोकेच नाही मग........गेले काही दिवस अनेक सेक्युलर पत्रकार पिसाळल्या कुत्र्यासारखे मला चावे घ्यायला गुरगुरत आहेत. त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. कारण पिसाळलेल्या कुत्र्यांना त्यापेक्षा अधिक काहीच करणे शक्य नसते. मला कींव कराविशी वाटते, ती त्यांच्या बुद्धीची. एकदा माणूस कशाच्याही आहारी जाऊन सुडाने द्वेषाने प्रवृत्त झाला, मग त्याची सारासार बुद्धी निकामी होत असते. पिसाळलेल्या कुत्र्याची अवस्था त्यापेक्षा वेगळी नसते. ते कुत्रे आपली प्रकृती वा जडलेला रोग बरा करण्यापेक्षा चावत सुटते आणि त्यातच त्याचा शेवट सामावलेला असतो. अशाच एका दिवट्याने म्हणे आपल्या पिसाळलेल्या सहकार्‍याला सल्ला दिला की भाऊसारख्याला आपले माध्यम व्यासपीठ म्हणून देवू नये. क्या बात है? यांचे व्यासपीठ मी कधी मागायला गेलो? आज बहुतेक माध्यमे आणि व्यासपीठे हेच लोक बळकावून बसले आहेत आणि सगळीकडे त्यांचा खोटेपणा उजळमाथ्याने चालू आहे. तुलनेने माझापाशी आहेच काय? कुठले मोठे, प्रस्थापित वा प्रचलीत वृत्तपत्र किंवा वाहिनी मला संधी देत नाही. एकप्रकारे गेली काही वर्षे मी माध्यमात बहिष्कृत पत्रकार आहे. मी कधी त्याबद्दल तक्रार केली नाही. मग हे बावळट भाऊला व्यासपीठ देण्याची भाषा कशाला बोलतंय? गेल्या दोन वर्षात ब्लॉग व फ़ेसबुक अशा सोशल माध्यमातून मी माझे विचार व भूमिका मांडत असतो. त्याची कोणी मुख्यप्रवाहातील माध्यमे दखल घेत नाहीत. मग ह्या दिवट्यांना माझी दखल घेण्य़ाची गरज काय? संजय आवटे असोत की समर खडस, असे लोक प्रस्थापित मोठ्या खपाच्या माध्यमात बसलेत. तुलनेने माझ्या वाचकांची संख्या नगण्य असेल. मग त्यांनी माझी दखल घ्यावीच कशाला? बरळू देत कोण मुर्ख बोलतोय ते, म्हणून ते माझ्याकडे काणाडोळा कशाला करू शकले नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांचे दुखणे दडलेले आहे. यांच्या प्रस्थापित माध्यमे, वृत्तपत्रे वा वाहिन्यांपेक्षा माझ्या क्षुल्लक ब्लॉग व फ़ेसबुक लेखनाची विश्वासार्हता अधिक असल्याने हे हवालदिल झालेत. इतकाच त्याचा अर्थ होतो. कारण आजवर ज्यांनी त्यांच्या खोटेपणासाठी कोंबडे झाकून ठेवले, त्यांना सोशल माध्यमांनी दाद दिलेली नाही. या नव्या माध्यम स्वातंत्र्याने प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी संपवली. मोजक्या लोकांपर्यंत का होईना, सत्य पोहोचू लागल्याने या भामट्यांची गाळण उडाली आहे. असे लोक मला व्यासपीठ देवू नये असले सल्ले देतात, तेव्हा हसू येते.

कोणी मागितले आहे तुमचे व्यासपीठ? तुमच्यापाशी कुठले व्यासपीठ आहे? भांडवलदार काळेपैसेवाले किंवा कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने पैसे मिळवलेल्यांच्या उंबरठ्यात आपली मीठभाकरी शोधत लाचारीने बसलेल्यांनी, व्यासपीठाच्या गप्पा माराव्यात? त्यांना भाऊच्या ब्लॉग वा फ़ेसबुक विरोधात मांडायची भूमिकाही तिथल्या लाचार व्यासपीठावर मांडता येत नाही. त्यासाठी पुन्हा सोशल माध्यमाचे दार ठोठावण्याची अगतिकता घेरून बसली आहे, त्यांच्या व्यासपीठाचे मोल ते काय? मला लिहायचे ते मी सोशल माध्यमासोबत उपलब्ध वृत्तपत्रातही बिनधास्त मांडतो. तिथून मिळणार्‍या मोबदल्यासाठी लाळ घोटावी लागत नाही. ज्या वृत्तपत्र मालकाला माझे लिखाण छापायची हिंमत नसेल, तिथे लिहायचे बंद करतो. त्याच्या हुकूमाची लाचारी मला पत्करावी लागलेली नाही. म्हणूनच अमुकतमूक अशा ओळखीचा पट्टा मला गळ्यात बांधून घ्यावा लागत नाही. आवटे-खडसांना ती लाचारीची चाकरी करावी लागते. तेव्हा मला व्यासपीठ नाकारण्याची गोष्ट सोडून द्या. मुद्दा सगळीच्या सगळी प्रस्थापित व्यासपीठे यांच्याकडे असून माझ्या नगण्य प्रभाव पडणार्‍या माध्यमाने हे इतके विचलीत कशाला होतात? माझ्या बेताल लिखाणाने संजय आवटे इतके विचलीत झाले असतील, तर समाजहितासाठी त्यांनी आपल्याला जे सांगायचे, ते दैनिक ‘सकाळ’मध्ये कशाला लिहीले नाही? कारण सोपे आहे, त्यात कुठलेही समाजहित नाही, याची आवटे यांना खात्री आहे. म्हणूनच सकाळमध्ये असे काही लिहीले, तर ढुंगणावर व्यवस्थापनाकडून लाथ बसण्याचे भय आहे. मग भिक्षांदेही करत दुसर्‍या दारात उभे रहायच्या भयाने भेदरलेले आवटे समाजहिताचा आव आणून सोशल मीडियात पादरेगिरी करणार. समर खडसला रिबेरोंवर भाऊ भुंकतोय असे वाटत असेल, तर त्याला शेण खायचे असेल, ते महाराष्ट्र टाईम्समध्ये खायला काय हरकत होती? तिथे शेपूट पुरती ‘आत’ घालून उदात्त शब्द लिहायचे आणि सोशल मीडियात येऊन पादापादी करायची. असे लोक व्यासपीठ देण्या नाकारण्याच्या वल्गना करतात, त्याचे हसू येते. कींव कराविशी वाटते. पण त्याला दुसरी बाजूही आहे आणि ती इथे मांडणे अगत्याचे आहे. यापैकी प्रत्येकाला स्वत:चा हुकमी वाचक नाही, म्हणून कुठल्या तरी नामवंत माध्यमाच्या धर्मशाळेत पथारी पसरावी लागते. पोट जाळण्यासाठी खैरातीच्या लंगरमध्ये फ़ुकटच्या पंगतीत जाऊन आपले नीरस निरर्थक लिखाण खपवावे लागते. माझे तसे नाही. माझा ब्लॉग कुणा काळेपैसेवाल्या किंवा शेठजीचा ओशाळा नाही. मला सामान्य वाचक व लोकांनी आधार व बळ दिलेले आहे. त्यामुळेच अशा आश्रित लाचारांना माझ्या सोशल माध्यमातील लेखनाची दखल घेणे भाग झाले आहे. ‘सांगता येत नाही आणि सहन होत नाही’ अशा दुखण्याने पछाडलेले हे चारित्र्य-‘संपन्न’ लोक, म्हणूनच माझी दखल घेत त्यावर फ़ुसक्या सोडत असतात. त्यांना आपल्याच खोटेपणाने पछाडलेले आहे. आपण खोटे आहोत याची मनोमन असलेली खात्रीच, मग तो खोटेपणा उघड होण्याच्या भयाने सतावत असते. ती थापेबाजी भाऊच्या सामान्य ब्लॉगने उघडी पडण्याचे भय त्यांची झोप उडवते. अन्यथा त्यांनी इकडे ढुंकून बघायचे दुसरे कारण काय?

अशाच एका दिवट्याने माझ्या भिंतीवर येऊन, ‘भाऊ उजव्या विचारांची चाकरी करतो’ असाही आक्षेप घेतलाय. याचा दुसरा अर्थ हे डावे विचारवंत कुणाची तरी चाकरी करण्यातच जगतात याची कबुली आहे. कॉम्रेड पानसरे यांचे दुर्दैव इतकेच, की त्यांची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणार्‍या असल्या अर्धवटांच्या खाद्यांवर स्वत:चे डोकेच नाही. असते तर पानसरे यांच्या नावाने अश्रू ढाळण्याआधी त्यांनी निदान पानसरे वाचला असता आणि समजून घेतला असता. तो समजून घेतला असता तर त्यांना आपल्या खांद्यावर (धडावर) आपलेच डोके असावे असे पानसरे म्हणतात, त्याचा अर्थ तरी उमगला असता आणि त्यांनी कुणा काळेपैसे उधळू शकणार्‍या शेठजीच्या जनानखान्यात बौद्धिक रखेल होण्याचे दु:ख तरी दाखवले असते. पण इथे त्याचेच कौतुक आहे. आपल्या जनानखान्याच्या कुणाला येवू द्यायचे नाही, त्याचे सल्लामसलती चालू आहेत. आपण कुठे फ़सलोत आणि वापरले जात आहोत, ते पानसरे उघड करून सांगतात, तेही ज्यांना आजवर समजू शकलेले नाही, त्यांच्या वैचारिक कुवतीचे काय सांगावे? कुठल्या मोठ्या प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या माध्यमात डाव्या बुद्धीवादाचे फ़ुटके, गळती लागलेले हौद भरत बसलेल्यांची भामटेगिरी कॉ. पानसरेंनी आपल्या (परिवर्तनाच्या दिशा) पुस्तकातून उघड करताना लिहीले आहे. ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ तमाम मोठ्या माध्यमातून डाव्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या पत्रकार, संपादक व विचारवंतांच्या खांद्यावर त्यांचे स्वत:चे डोके आहे काय? असते, तर त्यापैकी एकाने आपल्या मनासारखे लिहीण्याची हिंमत केली असती. त्यासाठी सोशल माध्यमात येऊन भाऊवर दुगाण्या झाडायची लाचारी त्यांच्यावर कशाला आली असती? गरीबांच्या नावाने गळा काढून गरीबांचाच संघर्ष हे कमकुवत करत असतात. या एका परिच्छेदात त्यांच्या पुरोगामी लढवय्येगिरीचा बुरखाच पानसरेंनी फ़ाडून टाकलाय. मग ते वास्तव लोकांसमोर आणणारा भाऊ तोरसेकर व त्याचा इवला ब्लॉग अशा भामट्यांना खुपत असेल, तर नवल कुठले?

मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकजण ताबडतोब माझ्या लेखणीला त्याचे श्रेय देवून मोकळे होतील. तसे अजिबात नाही. माझ्या लेखणीत इतकी शक्ती असती, तर अशा भामट्यांनी मला कधीच व्यासपीठ दिले असते. आपल्यात सामावून घेतले असते. कारण शेवटी हे व्यापारी दुकानदार आहेत. त्यांना कुठल्याही बुद्धीवाद प्रामाणिकपणा यांच्याशी कर्तव्य नाही. तरीही त्यांना माझी दखल घेण्याची अगतिकता आज आलेली आहे, त्याचे श्रेय माझ्या ब्लॉगला मिळालेला तुमचा उदंड प्रतिसाद इतकेच आहे. वाचकाला आम्ही गळी मारू तेच त्याने घ्यावे, वाचावे नाहीतर गप्प बसावे, ही माध्यमांची मुजोरी सोशल माध्यमांनी संपुष्टात आणल्याचा हा सज्जड पुरावा आहे. म्हणून तर अशा दिवाळखोरांना आपल्या लेखण्या व बुद्धी कुणा काळपैसेवाल्या, भांडवल बुडवू शकणार्‍या शेठजीच्या पायाशी गहाण ठेवाव्या लागल्या आहेत. शंभर रुपयात वर्षभर वा सहा महिने घरपोच वृत्तपत्र पोहोचते होईल, अशी दिवाळखोरी चालणार्‍या रद्दीच्या माध्यमात जे बुद्धीवादाचे सोंग करतात, त्यांचे माध्यमच मुळात वृत्तपत्र नाही, ते प्रतिष्ठीत हॅन्डबिल असते. जे घरपोच फ़ुकटात देण्यासाठी वाचक किरकोळ रक्कम नोंदणीसाठी भरतो. रस्त्यावरचा वडापाव दहा रुपये आणि कटींग चहा सहासात रुपये झालेला असताना, ज्यांना सोळा वीस पानी वृत्तपत्र पाचसात रुपयात विकायची हिंमत उरलेली नाही, त्यांनी पत्रकारितेचा टेंभा मिरवण्यात कुठले हंशील? शेवटच्या काळात कुठल्या तरी गर्दीत दिसणारा भारतभूषण याने आपण हिरो असल्याचा टेंभा मिरवावा, तसाच हा हास्यास्पद प्रकार नाही काय? रद्दी लिहून छापून देण्यासाठी नेमलेल्यांनी पंडिताचा आव आणत गठ्ठे उचलण्यातला केविलवाणा अभिनय अधिक दयनीय असतो. दमडाही खर्च केल्याशिवाय मला मिळालेला ब्लॉगचा वाचक यांच्या रद्दी व्यासपीठापेक्षा लाखमोलाचा आहे. कारण त्यानेच अशा भेठजीच्या दारी चाकरी करणार्‍यांना भयभीत करून सोडले आहे. त्या सोशल मीडियातील माझ्या प्रत्येक वाचक सहकारी व आश्रयदात्याला साक्षात लोटांगण. तुमच्यावरून असे हजारो आवटे-खडस-केतकर-वागळे ओवाळून टाकावेत मित्रांनो.

25 comments:

 1. kyaa baat hai. lai bhari bhau.

  ReplyDelete
 2. अप्रतिम लेख भाऊ.
  भामट्या पुरोगाम्यांना चांगले उघडं पाडलंत.

  ReplyDelete
 3. कॉम्रेड पानसरे, दाभोलकर आणि सतीश शेट्टी यांच्या हत्या रहस्य बनवण्यासाठी आपली सध्याची परिस्थिती कारणीभूत आहे. कोण्यात्याही दलितावरिल हल्ला हा फक्त सवर्णच करतात . देशातील अल्पसंख्य हे अतिशय समजूतदार धर्मनिरपेक्षवादी आणि समंजस असून त्यांच्यावर फक्त हिंदूच अत्याचार करतात देशातील फक्त चर्च आणि मशिदवरच हल्ले होतात आणि त्याविरुद्ध फक्त आम्हीच बोलू शकतो . आमच्यावर कोणी कोणताही आरोप करू शकत नाही आम्ही मात्र कोणावरही कोणताही आरोप करण्यासाठी मुक्त आहोत आणि तो आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. मिळालेल्या व्यासपीठाचा उपयोग प्रत्येक घटनेत संघ बीजेपी आणि इतर यांच्यावर कोणतीही शहानिशा न करता बोम्बाबोम करणे यावरच आमचा चरितार्थ चालतो. समाजातील अजूनही अल्पशिक्षित असलेला वर्ग. ज्यांचा बुद्धीशी विचारांशी प्रामाणिकपणाशी दुरान्वयेही संबंध नसतो कष्ट करून पोट भरताना त्यांच्यावर माध्यमातील आपल्याला मिळालेल्या संधी व जागेचा उपयोग करून त्यांची माथी भडकावणे त्यांचे संस्कार धुळीत घालणे हे सर्व संम्भावीत पणे समाजवादाच्या नावाखाली करून संपूर्ण देशाला विकृत मनोवृत्तीचे बनविणे हे एकाच धेय्य आहे. असे कुत्रे हे पिसाळलेले आहेत हि वस्तुस्थिती आपण समर्पक मांडलीत या बद्दल धन्यवाद !!

  ReplyDelete
 4. khot far divas tiknar nahi bhau, ibn lokmat [ IBN7] yache sambhag jya veli etar bhartiya udyag sauhani vikat ghetale tya veli hebhdotri patrakar navenave channels shodhat firtat he ughad satya ahe .

  ReplyDelete
 5. अप्रतिम लेख भाऊ.
  ग्रेट आहात तुम्ही...

  ReplyDelete
 6. Bhau....apratim lekh.....sau sonar ki....ek lohar ki..

  ReplyDelete
 7. भाऊ,
  चांगली चपराक मारलीत ह्या भामट्या, दांभिक पुरोगाम्यांवर
  दुसर्याची हुजरेगिरी करण्यात आयुष्य गेलीत ह्यांची

  ReplyDelete
 8. "सकाळ" बद्दल चा मुद्दा तंतोतंत बरोबर....
  तिथे तुम्ही अतिशय सभ्य शब्दात सुद्धा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे ह्याच्यावर केलेली टीका खपून घेतली जात नाही.... लोकांनी ह्या दांभिक लोकांवर लाथ मारून हाकलून दिले पाहिजे

  ReplyDelete
 9. तुमचा आज पर्यंत वाचलेला सर्वात जबरदस्त लेख आहे हा भाऊ !!!!!!!!!!!!!!!!!!!!
  असेच लिखाण करत राहा आणि या हलकट माकडांची अशीच पोलखोल करत राहा ………………………
  (मला तुमच्या Facebook च्या page ची लिंक द्या …………. )

  ReplyDelete
 10. अगदी मनातल्या भावना मांडणारा लेख! मी आपले लेख वर्षभरापासून वाचतो आहे. त्याआधी आपले नाव सुद्धा ऐकले नव्हते! बघा मक्तेदारी माध्यमांचा प्रभाव! आता मात्र लाजही वाटते आणि तुम्हाला धन्यवाद सुद्धा द्यावेसे वाटतात तुम्ही आमच्यापर्यंत कुठल्याही मक्तेदारी असलेल्या आणि प्रस्थापित माध्यमाशिवाय पोचल्याबद्दल. आपण ह्या लेखात व्यक्त केलेल्या भावना मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. अर्थातच आपले वय, अनुभव, आणि आपल्याला करावा लागलेला संघर्ष कितीतरी अधिक असेल. तरीही आपणाला भेटण्याची आणि प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची तीव्र इच्छा आहे. ते जमेल का ते कृपया सांगावे. तुमच्यामागे आमच्यासारखे कैक आहेत हे कधीही न विसरता लिहित रहा.

  अभिराम घडयाळपाटील

  ReplyDelete
 11. This blog create its own space in my BOOKMARK list and story begin...

  ReplyDelete
 12. भाऊ,
  एका मित्राने facebook वर तुमचा एक लेख share केला होता तो वाचला...मग तुमच्या ब्लॉग वर आलो आणि खूप सारे लेख वाचले.... अतिशय मुद्देसूद, सरळ विषयाला हात घालणारे, सत्य सांगणारे लेख आहेत तुमचे.... कुणी काही बोलेल ह्याची तिळमात्र पर्व करू नका.... अहो आम्ही हजारो लोक तुमचे वाचक आहोत...
  असे म्हणतात ना "हाथी चाले अपनी चाल, कुत्ते भौके पचास हजार"
  असेच परखड लिहित जात जा

  आमच्या शुभेच्छा...

  ReplyDelete
 13. तुमच्या सगळ्या लेखामधला एक चांगला लेख...ज्याची गरज सुद्धा होती...बोंब मारणार्यांना बोंब मारून देत...भुंकणारे आहेत त्यांना भून्कुदेत...

  ReplyDelete
 14. Dear Bhau
  kindly open new institution for future journalists.
  Please guide more youth who will have their own head on their own body.
  Thanks
  Samadhan

  ReplyDelete
 15. अगदी बरोबर भाऊ,
  लेख परखड आहे...सणसणीत चपराक लावलीत भामट्या लोकांना
  आम्ही तुमच्या बरोबर आहोत...आज हजारो वाचक आहे...उद्या लाख होतील...
  नक्की लिहा....आम्हाला सत्य दाखवा...

  धन्यवाद!

  ReplyDelete
 16. bhau,

  comments warun bagha, ki tumche bharech wachak ahet...!
  lokancha vichar ajibaat karu naka...

  thanks for all the articles depicting "TRUTH"

  ReplyDelete
 17. Good one bhau.
  Keep it up

  ReplyDelete
 18. अप्रतिम लेख भाऊ.

  ReplyDelete
 19. काळ्या पैशांवाल्यांच्या (अवैध व देशद्रोही सत्तापिपासूंच्या ) जनानखान्यातल्या रखेल्या व त्यांचे भाडे...
  भाऊ असेच देत रहा साल्यांना.. आम्ही आहोत तुमच्या सोबत..

  ReplyDelete
 20. खूप सुंदर लेख भाऊ...अतिशय परखड आणि स्वच्छ मांडले आहे जे सर्वांना सहज समजू शकते.. धन्यवाद

  ReplyDelete