Wednesday, December 2, 2015

सवाल राष्ट्रगीताच्या सन्मानाचा नाहीच!

 

कुठल्या तरी चित्रपटगॄहात राष्ट्रगीत सुरू असताना काही मुस्लिम प्रेक्षक तिथे हजर होते आणि उभे राहून त्यांनी राष्ट्रगीताचा सन्मान राखला नाही म्हणून इतर काही प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला. या लोकांनी त्या चौघांना जाब विचारला आणि अन्य लोकही त्यात सहभागी होऊन वादाचा भडका उडाला. शेवटी त्या मुस्लिम प्रेक्षकांना बाहेर काढूनच चित्रपटाला सुरूवात झाली. अर्थात त्याची बातमीही कुठे आली नाही. कोणा अन्य प्रेक्षकाने त्याचे चित्रण आपल्या मोबाईलवर करून सोशल मीडियात टाकल्याने गवगवा झाला आणि म्हणून मग बातमीही आली. पण बातमीचा सूर असा होता, की ज्यांनी राष्ट्रगीताचा सन्मान करण्याचा आग्रह धरला, तेच गुन्हेगार आहेत आणि त्यांनी तमाशा केला. किंबहूना आजच्या भाषेत बोलायचे तर अशा राष्ट्रप्रेमाचे प्रदर्शन मांडणार्‍यांनी आपल्या असंहिष्णूतेचे प्रदर्शन केले. असल्या भाषा व युक्तीवादाचा अर्थ थोडा समजून घेतला पाहिजे. कुठल्याही देशात गेलात तर तिथले राष्ट्रगीत हे सन्मानाचे व अभिमानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे त्याचा सन्मान राखणे वा त्याला अन्मान देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण आपला धर्म त्याला मान्यता देत नसल्याने आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहिलो नाही, असा मुस्लिम प्रेक्षकांचा युक्तीवाद आहे. अर्थातच ते मुस्लिम असल्याने व इस्लामचा हवाला देत असल्याने त्यांची भूमिका, आपल्या देशात पुरोगामी वा सेक्युलर ठरत असते. कारण आता आपल्या देशात कुठल्याही कायदे वा नियमांना इस्लामची मान्यता असावी लागते. त्यामुळेच मुस्लिम प्रेक्षकांचा नकार पुरोगामी व योग्य असतो आणि कायद्यानुसार राष्ट्रगीताचा सन्मान राखण्याचा आग्रह गुंडगिरी असते; अशी आपल्या पत्रकार माध्यमांची समजूत झाली आहे. तसे असेल तर बिचार्‍या त्या मुस्लिम प्रेक्षकांना दोष कसा देता येईल? म्हणून म्हटले समस्या थोडी समजून घ्यावी लागेल.

कालपरवा पॅरीसमध्ये मोठ्या घातपाती घटना घडल्या. त्यामागे जिहादी होते हे लपून राहिले नाही. तर त्या घातपाती हिंसाचाराचे समर्थन करताना पुरोगामी बुद्धीमंत व कॉग्रेसनेते मणिशंकर अय्यर कय म्हणाले होते? फ़्रान्सने तिथे मुस्लिम महिलांना बुरखा वापरण्यावर बंदी लागू केली, त्याचा हा परिणाम आहे. कारण बुरखा घालणे ही इस्लामने आपल्या महिलांसाठी सांगितलेले कर्तव्य आहे. म्हणूनच फ़्रान्स सरकारने बुरख्याला बंदी घालणे हा गुन्हा होता, त्याची शिक्षा मग फ़्रेंच जनतेला भोगावी लागली. इतका अय्यर यांच्या विधानाचा सरळ अर्थ आहे. याची दुसरी बाजू अशी, की आपल्याला अन्याय वाटेल तिथे आपण कायदा हाती घेऊन स्वत:च न्यायनिवाडा करू शकतो व त्यातील शिक्षेची अंमलबजावणी करू शकतो, असाही मुस्लिमांना आपोआप अधिकार मिळालेला असतो, असेच अय्यर म्हणत आहेत. जगात कुठला असा देश आहे जिथे मुस्लिम सुखाने व तिथल्या कायद्याचा सन्मान राखून गुण्यागोविंदाने नांदतात, हे तरी एखादा पुरोगामी सांगू शकेल काय? नसेल तर त्या मुस्लिमांची तिथली समस्या तरी काय असते, याचा खुलासा कोणी देवू शकेल काय? जगात प्रत्येक देशात जिथे मुस्लिम आहेत आणि त्यांना जे नागरी अधिकार तिथल्या कायद्याने दिलेले आहेत, तिथून त्यांची समस्या सुरू होते. पण जिथे वा ज्या देशात कुठलेच आधुनिक नागरी स्वातंत्र्याचे अधिकार कायदा देत नाही, तिथे मात्र मुस्लिम लोकसंख्येची कायद्याशी कुठलीच समस्या असलेली दिसत नाही. सौदी, दुबई वा तत्सम अरबी देशात कुठलेही प्रचलीत नागरी अधिकार कुणालाच नाहीत. तिथे बहुसंख्य मुस्लिम आहेत आणि त्यापैकी कुणाचेही कायद्याशी कसलेच भांडण होत नाही. बाकी जगात मात्र मुस्लिमांचा कायद्याच्या राज्याशी सतत संघर्ष चाललेला दिसेल. म्हणूनच ही समस्या व तिचे मूलभूत स्वरूप जरा समजून घेतली पाहिजे.

ही समस्या सर्वत्र सारखीच आहे. कुठल्याही देशात, संस्थेत वा कार्यक्रमात मुस्लिम आपला धर्म घेऊन जातात. मग तिथे जे काही नियम, प्रथापरंपरा असतील, त्यामध्ये मुस्लिमांच्या इच्छा व धर्म यांचे पालन व्हावे, असा त्यांचा आग्रह असतो. राजकारणापासून सांस्कृतिक कुठल्याही बाबतीत मुस्लिमांचा आग्रह असतो, की त्यांच्या धर्माचे व त्यातील प्रतिकांचे पालन झाले पाहिजे. तसे होत नसेल तर मग तो मुस्लिमांना अन्याय वाटतो. सहाजिकच ते त्या कार्यक्रम वा प्रथेला विरोध करू लागतात. तिथून खरी समस्या सुरू होते. आज भलतेच वादग्रस्त झालेले निवृत्त न्यायमुर्ति मार्कंडेय काटजू सुप्रिम कोर्टात कार्यरत असताना, त्यांच्या समोर एक प्रकरण आलेले होते. त्यात चर्चप्रणित एका शाळेच्या मुस्लिम विद्यार्थ्याचा खटला होता. आपल्याला धर्मपालनाचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे आणि त्यात शाळा आडकाठी आणते, असा त्या मुलाचा दावा होता. ही आडकाठी कुठली? तर त्याला दाढी वाढवायची होती आणि धर्माने मुस्लिम पुरूषावर दाढी वाढवण्याचे कर्तव्य सोपवलेले आहे. पण शाळेच्या संचालकांनी दाढी काढण्याची सक्ती केल्याने आपल्यावर धार्मिक अन्याय होतो, असे ते प्रकरण होते. त्याच्या वकीलांनी तसा धार्मिक युक्तीवाद मांडला, तेव्हा काट्जूंनी त्याला उलट सवाल केला होता. मुस्लिमाला धर्मासाठी दाढी वाढवणे सक्तीचे असेल, तर मुस्लिम असूनही त्या वकीलानेच दाढी कशाला राखलेली नाही? इथे एक गंमत लक्षात येते, की धर्माचा आडोसा घेऊन तिथे तिथे असलेले नियम पायदळी तुडवण्याची मानसिकता आहे. त्या मुलावर त्या ख्रिश्चन शाळेत जाण्याची कोणी सक्ती केली नाही किंवा या चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते, तिथेच जाण्याची सक्ती कोणी त्या मुस्लिम प्रेक्षकांवर केलेली नाही. पण तिथे जायचे आणि मग तिथले नियम कायदे प्रथा मोडण्यासाठी धर्माचा मुखवटा चढवायचा, हा आडमुठेपणा नाही काय?

जगभर मुस्लिमांचे अन्य बिगरमुस्लिमांशी असलेले भांडण यापेक्षा वेगळे दिसणार नाही. युरोपात तुम्ही आपल्या आर्थिक भल्यासाठी व अन्य स्वार्थासाठी जाणार आणि मग तिथल्याच प्रस्थापित कायद्याला झुगारण्यासाठी धर्माचा आडोसा घेणार. खरेच धर्म व त्याचे काटेकोर पालन इतकेच सर्वाधिक प्राधान्याचे असेल, तर आपल्या मूळच्या इस्लामी देशात ही मंडळी कशाला थांबत नाहीत? त्या देशात असा कोणी अन्यधर्मिय वा नास्तिक पोहोचला, तर त्याला असे आपले आग्रह धरण्याचा अधिकार आहे काय? तिथले इस्लामी नियम व प्रथांचे सक्तीने पालन करावे़च लागते ना? मग समस्या कुठून सुरू होते? मुस्लिम देशात मुस्लिम धर्मनियमांचे पालन झालेच पाहिजे. पण जिथे बिगरमुस्लिम वा सेक्युलर निधर्मी राज्य असेल, तिथेही इस्लामचेच काटेकोर पालन करण्याची सक्ती असली पाहिजे. इतरांनी इस्लामचा आदर केला पाहिजे आणि अन्य कुठल्याही श्रद्धा वा कायदे असतील, ते पायदळी तुडाण्याचा मुस्लिमांना जन्मदत्त अधिकार आहे. त्यात पृथ्वीतलावरचा कुठला कोणाचा अन्य कायदा हस्तक्षेप करू शकत नाही, ही मुस्लिमांची भूमिका जगभरची समस्या आहे. हे अर्थातच आमचे मत नाही, तर त्या दुखण्यावर इस्लामचे गाढे अभ्यासक मौलाना वहिउद्दीन यांनीच काही वर्षापुर्वी बोट ठेवलेले आहे. जोपर्यंत हा हेकेखोरपणा मुस्लिम सोडत नाहीत, तोवर जगातल्या कुठल्याही बिगरमुस्लिमांशी त्यांना सुखाने व गुण्यागोविंदाने नांदता येणार नाही. किंबहूना अशा वागण्यातूनच प्रत्येक बिगर मुस्लिमाला मुस्लिम समाज आपला शत्रू बनवत चालला आहे. मात्र ते मानायची कुणा पुरोगाम्याची तयारी नाही आणि म्हणूनच जगाची विभागणी क्रमाक्रमाने मुस्लिम व बिगरमुस्लिम अशी होत चालली आहे. त्याचा कडेलोट होईल, तेव्हा हा संघर्ष थेट मुस्लिम व बिगरमुस्लिम अशा हिंसक टोकाला जाणारा आहे आणि तो दिवस फ़ार दूर नाही.

18 comments:

 1. Bhau.. ekdum muddesud lihila aahe.. Loksattachya aajchya hyach vishayavaril veglya angane lihilelya agralekhala he sadetod pratyuttar!!

  ReplyDelete
  Replies
  1. नशीब आपण त्या लेखाचा उल्लेख केलात.
   त्यात शब्द'कुबेर' गिरीश कुबेर 'एखाद्यावर राष्ट्रगीत मारणे' असा वाक्प्रचार वापरतात.

   आता राष्ट्रगीत म्हणजे काय ? सडकी अंडी कि सडके टमाटर????

   Delete
 2. जर हिटलर ज्यूंचे शिरकाण करण्यात यशस्वी झाला असता तर ... Israel आणि Palestine चा ७० वर्षे कुजत पडलेला मुद्दाच निर्माण झाला नसता ...... मग आता विचार करा तिथे ज्यूंच्या ऐवजी दुसरे कोण असते तर ... आत्ता चालू असलेले किती प्रश्न मुळात सुरु होण्याच्या आधीच निकालात निघाले असते :P

  ReplyDelete
 3. This incidence shows how common people are being proud of their nation.This is Modi effect.He is making up the minds of people- We Indians!!

  ReplyDelete
 4. एकच नं बर !@@👍👍

  ReplyDelete
 5. मला गुलाम अली च्या जागी आता गुलफाम हसन दिसू लागलाय

  ReplyDelete
 6. Javed Ahmad Ghamidi ह्या पाकिस्तानी वंशाच्या इस्लामी चिंतकाचा हा विडियो बोलका आहे https://www.facebook.com/javedahmadghamidi/videos/988843541159597/?video_source=pages_finch_trailer

  इस्लाम ने ज्या गोष्टींना दंडार्ह ठरवलेले आहे त्या गोष्टीं जगाच्या पाठीवर कुठेही आढळलयास त्या व्यक्तिला मृत्युदंड देण्याचा मुसलमानांना अधिकार आहे असा मुसलमानांचा सोयिस्कर समज आहे ह्याकडे घमिदी लक्ष वेधतात.

  मुसलमानात एक दुटप्पीपणा दिसून येतो. आता ह्या गोष्टींवर गैर मुस्लिम आवाज उठवतात म्हटल्यावर तेही त्यांच्या सुरात सुर मिसळून बोल लावतात. पण ते म्हणजे - ऐकत नाही हो, आमच्या हाताबाहेर गेलाय आता - असा सूर असतो . पण ' तुमच्या हाताबाहेर गेलाय तर आम्ही वठणीवर आणतो' म्हटल्यावर तो सूर बदलतो.

  ReplyDelete
 7. https://www.youtube.com/watch?v=Vp_1JvRsCYE

  ReplyDelete
 8. भाऊ, आजच्या लोकसत्ताचा अग्रलेख आहे "बिनडोकांची राष्ट्रभक्ती" ज्यात सन्मानीय/आदरणीय श्री गिरीश कुबेरसाहेब ह्यांनी राष्ट्रगीताच्या सन्मान राखण्यासाठी आग्रह धरलेल्या लोकांवर तुफान हल्ला चढवला आहे. इतकच नाही तर त्यांचा असाही दावा आहे की "मुळात राष्ट्रगीत, तेदेखील चित्रपटाच्या पडद्यावर, सुरू असताना उभे राहायला हवे असा कोणताही कायदा वा नियम नाही"

  एकंदरीतच ह्या माणसाकडून दुसरी काही अपेक्षा नाही पण तरी देखील अस काही वाचल कि किळस येते की चीड येते की घृणा येते सांगणे कठीण आहे.

  ReplyDelete
 9. राष्ट्रगिताचा अवमान सामान्य भारतियांच्या दृष्टीने अतिशय गंभीर अपराध आहे , या प्रवृत्तीला लगाम घातला नाही तर या राष्ट्रीप्रेमी जनतेचे मानसीक खच्चिकरण होणे क्रमप्राप्त आहे.अशा परिस्थीतीत शासनाने आपली सुस्पष्ट
  भुमिका जाहीर करणे अगत्याचे आहे.

  ReplyDelete
 10. भाऊ... माज़्या वाचनात् एकदा एक लेख आला होता त्यात अस्ट्रोलिअन मुख़्य मंत्र्यांनी मुस्लमान जमातीला जाहिर सांगितले होते " तुम्ही इथे आलात तुमच्या मर्जीने आम्ही तुम्हाला बोलवले नाही, त्यामुळे इथे आम्हाला जे पाहिजे ते होईल तुम्हाला ते पटत नसेल तर तुम्ही इथे राहवे अशी आमची जबरदस्त नाही" आजचा तुमचा लेख अगदी ह्याच विषयावर बोट ठेवतो पण आपल्याकडे कोणी ऎसे खमके नाही बोलायला हेच दुख आहे। ..बाकी मुस्लिम विरुद्ध बिगर मुस्लिम हे युद्धा आता अटल दिसते।

  ReplyDelete
 11. मी लोकसत्ता वाचत नाही. तसेच लोकमत हे वृत्तपत्र सुद्धा अपवादानेच वाचतो. लोकसत्ता बदल कल्पना नाही पण लोकमत मात्र कॉंग्रेसचे मुखपत्र आहे आणि सांप्रतचे मोदी सरकार व भा ज प ला बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. डुकराच्या चित्रावर काही उर्दू सदृश ओळी लिहिल्याबद्दल लोकमतकारांनी क्षमायाचना केली हे ऐकून हसु आले. त्याना वृत्तपत्र स्वातंत्र्यावर यापुढे बोलण्याचा अधिकार राहिला नाही. तो त्यानी स्वतः गमावला आहे.

  ReplyDelete
 12. अप्रतिम विवेचन.

  ReplyDelete
 13. I am surprised to observe that Islam does not permit standing at time of National ANTHEM. Then muslims will never stand even during Parade. I have read legal opinion on Google & it is opined that one should not disrespect by hooting or other action & not standing need not necesarilyamounts to disrespect. But by commonsense they should have stood up as respect particularly when others had requested them to do so.

  ReplyDelete
 14. जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

  ReplyDelete
 15. बरोबर आहे..आपला देश बहुजातीय आहे अन सगळ्यानी प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे अन सर्वांनी देशाचा..। जर तसे होत नसेल तर खुशीने islamic country मध्ये जाऊन राहावे..कुणीच अडवणार नाही

  ReplyDelete
 16. Again beautiful analysis, Bhau
  Milind Revalkar

  ReplyDelete
 17. अमेरिकेत त्यांचे नागरिक झेंड्या पासून टोप्या चड्डी रुमाल काहीही शिवतात घालतात . पण त्यांच्या झेंड्याचा अपमान होत नाही . ५० वर्षे संघाने झेन्दावंदन केले नाही त्याचे काही नाही . पण …… माणसाने काही केले कि देशद्रोह होतो

  ReplyDelete