Tuesday, December 8, 2015

इंदिरा गांधी आणि त्यांची ‘सून’



आपल्या विरोधात दाखल झालेल्या अफ़रातफ़रीच्या खटल्यात आपली बाजू कोर्टात मांडण्याची टाळाटाळ करणार्‍या सोनिया गांधी, यांनी त्याच खटल्याबाबत अजब खुलासा मात्र माध्यमांसमोर केला आहे. आपण इंदिराजींची सून आहोत आणि आपण कोणाला घाबरत नाही, असे त्यांचे विधान आहे. वरकरणी ते विधान नेहमीचे वा पोकळ फ़ुशारकी वाटेल. पण वास्तवात अतिशय धुर्तपणे सोनियांनी ते विधान केलेले आहे. ते राजकीय विधान आहे आणि म्हणूनच त्यामागचा राजकीय संदर्भ लक्षात घेणे अगत्याचे आहे. कारण त्यातच त्यांची कायदेशीर संकटावर मात करण्याची रणनिती दडलेली आहे. आपण आपल्यावर आलेल्या कायदेशीर खटल्याच्या संकटाला कायदेशीर मार्गाने नव्हेतर राजकीय मार्गाने सामोरे जाणार आहोत, अशी ती घोषणा आहे. अर्थात त्याची सुरूवात त्यांनी विनाविलंब आपल्या अनुयायांच्या कृतीतूनच केलेली होती. पहिल्या दिवसापासून या खटल्याच्या बाबतीत राजकीय सूडबुद्धीचा आरोप कॉग्रेसने केलेला आहे. पण त्यातल्या कुठल्याही मुद्दे वा आक्षेपांना कायदेशीर उत्तर अजिबात दिलेले नाही. अफ़रातफ़र झालेली आहे आणि म्हणूनच त्याविषयीचा खुलासा पुरेसा आहे. पण तेवढे सोडून कॉग्रेसजन सर्वकाही बोलत असतात. त्यामुळे त्यातली कायदेशीर भामटेगिरी तिळमात्र लपत नाही. पण कायदेशीर भाषा व कार्यप्रणालीचा सामान्य माणसाला गंध नसतो. सामान्य माणसे भावनेनुसार चालतात व जगतात. म्हणूनच अशा राजकीय डावपेचात कायद्यापेक्षा भावनात्मक मुद्दे पळवाटेसारखे उपयोगात आणता येतात. म्हणूनच सोनियांनी तोच मार्ग चोखाळला आहे.  त्यांनी राजकीय सुडबुद्धी हा शब्द वापरतानाच आता ‘इंदिराजींची सून’ असल्याचा उल्लेख मोठ्या धुर्तपणे केला आहे. तो त्यांच्या पुढल्या खेळीची चाहुल देणारा आहे. इंदिराजींनी काय केले असते वा केले होते?

१९७७ सालात आणिबाणी उठल्यावर जनता सरकार आले आणि त्यांनी आणिबाणीच्या अनेक अत्याचाराची चौकशी करणारे अनेक आयोग नेमले. त्यात इंदिराजी आरोपी होत्या. तरीही त्यांना अटक करण्याची वेळ आलेली नव्हती. तसे केल्यास त्यातून इंदिराजी आपल्याभोवती सहानुभूती उभी करतील, असे पंतप्रधान मोरारजी देसाई जाणून होते. म्हणूनच चौकशीचे शुक्लकाष्ट इंदिराजींच्या मागे लावून मोरारजींनी त्याकडे पाठ फ़िरवली होती. पण तापट डोक्याचे गावंढळ राजकारणी गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांना ते मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी मोरारजींना अंधारात ठेवून एका फ़ालतू प्रकरणात एफ़ आय आर दाखल केला आणि इंदिराजींना अटक करण्याचे फ़र्मान जारी केले. तेव्हा इंदिराजी जवळपास नामोहरम होऊन गेल्या होत्या. किंबहूना राजकारणातून निवृत्त व्हायचा विचार करीत होत्या. अशावेळी चरणसिंग यांनी आतताईपणा केला. इतक्या फ़ालतू कारणास्तव अटकेचे नाट्य रंगवले, की एक दिवसही इंदिराजींना गजाआड ठेवणे शक्य झाले नाही आणि जनता सरकारची पुरती नाचक्की होऊन गेलेली होती. कोंबडी चोरल्याचा आरोप माजी पंतप्रधानावर ठेवण्याचा खुळेपणा त्याला कारणीभूत होता. पण त्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना इंदिराजींनी असे खेळवले होते, की त्याचा तमाशाच होऊन गेला. आजच्यासारखा माध्यमांचा पसारा तेव्हा नसतानाही ती देशभर खळबळ माजवणारी घटना ठरली. पोलिसांसोबत जाण्याची तयारी करण्यासाठी सवड मागून इंदिराजींनी आपल्या अनुयायांना निवासस्थानी येऊन निदर्शने करण्याचा (फ़ोनद्वारे) आदेश दिला. तिथे गर्दी जमली तेव्हा त्या घराबाहेर पडल्या आणि बेड्या ठोकूनच घेऊन जाण्याचा आग्रह धरून त्यांनी रस्त्यातच बैठक मारली. मग पोलिस पथकाची तारांबळ उडाली आणि खुलासे देताना जनता सरकारच्या नाकी नऊ आलेले होते. कोर्टात विचका झाला तो वेगळाच!

सोनियांनी आपल्या सासूची आठवण करून देण्यामागे हा ऐतिहासिक संदर्भ आहे. पण त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत जमिनअस्मानाचा फ़रक आहे. तेव्हाची कारवाई सरकार म्हणजे पोलिसांनी केलेली होती आणि आजचा प्रसंग कोर्टाच्या न्यायालयिन कामकाजाचा भाग आहे. तेव्हाचे आरोपच मुळात कोर्टात टिकणारे नव्हते तर आजचा मामला कोर्टाने आरोप व कागदपत्रे तपासून घेतलेला निर्णय आहे. शिवाय आज कोणी इंदिराजींच्या सूनेला अटक करायला आलेले नाही किंवा कोर्टानेही तसा आदेश दिलेला नाही. कोर्टाने त्यांना आपली बाजू मांडायला कोर्टात हजर व्हायला आमंत्रण दिलेले आहे. ते वारंटही नाही. त्यामुळे सोनियांच्या अटकेचा विषय अजून तरी उदभवलेला नाही. त्याच्याही पुढली गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधातले आरोपच नव्हेतर पुरावे आणि कागदपत्रे तपासून कोर्टाने मगच बचाव मांडायला बोलावले आहे. त्याचा अर्थच त्यांच्या विरोधातले पुरावे गुन्हा सिद्ध करण्यास प्रथमदर्शनी पुरेसे असल्याची खातरजमा कोर्टाने केलेली आहे. शिवाय हे एकाच कोर्टात झालेले नाही. तर कनिष्ठ कोर्टासह हायकोर्टानेही छाननी केल्यावरच समन्सचा पाठपुरावा केला आहे. तेव्हा अटकेचा तमाशा होण्याची अजिबात शक्यता नाही. इंदिराजींनी कुठल्या कोर्टात हजर रहाण्यास नकार दिला नव्हता, की चौकशी आयोगाकडे जाण्याची टाळाटाळ केलेली नव्हती. त्यांच्या विरोधात झालेली कारवाई खरोखरच मुर्खपणाची वा सुडबुद्धीची होती. पण आपल्या राजकीय हेतूसाठी इंदिराजींनी त्याचा धुर्तपणे पुरेपुर वापर करून घेतला होता. आज तशी परिस्थिती नाही, की तसा मुर्खपणा सरकारनेही केला नाही. म्हणून इंदिराजींच्या त्या नाट्याची पुनरावृत्ती होण्याचीही अजिबात शक्यता नाही. पण सोनिया मात्र त्याच मार्गाने आपण जाऊ असे सांगत आहेत. तेव्हा त्याच मार्गाने म्हणजे तरी काय, ते समजून घेणे अगत्याचे आहे.

तेव्हा माध्यमेही आणिबाणीत भरडली गेलेली असल्याने इंदिराजींना माध्यमांची सहानुभूती नव्हती. आज उलटी स्थिती आहे. तमाम माध्यमे व पत्रकार मोदी सरकारचे मुख्य राजकीय विरोधक आहेत. म्हणूनच सोनियांच्या चुकांचेही समर्थन होऊ शकते आणि सरकारच्या योग्य कृतीचाही विपर्यास केला जात असतो. म्हणूनच सोनियांसह कॉग्रेसकडे कुठलेच माध्यम मुळच्या खटल्यातील तपशीलावर बोलायला तयार नाही. पण त्यांनी पिकवलेल्या अफ़वा कंड्यांना वारेमाप प्रसिद्धी दिली जात असते. खटला सरकारने भरलेला नाही. डॉ. स्वामी भले आज भाजपात असतील, पण त्या पक्षात जाण्याच्या आधीपासून त्यांनी हा खटला दाखल केलेला आहे. सोनिया गांधीप्रणित युपीए सरकार सत्तेत असताना ह्या खटल्याची कनिष्ठ कोर्टात सुनावणी सुरू झालेली होती. मग ती आजच्या मोदी सरकारची सूडबुद्धीची कारवाई कशी ठरू शकते? असे मोक्याचे प्रश्न माध्यमांनी मुद्दाम विचारलेले नाहीत. थोडक्यात सोनियांना जो भ्रम निर्माण करायचा आहे, त्याला माध्यमे हातभार लावत आहेत. तेवढीच सरकारची अडचण आहे. माध्यमे व सोनिया कॉग्रेस सूडबुद्धीने सरकारलाच यात गोवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच सोनियांचे विधान गांभिर्याने घेतले पाहिजे. आपण इंदिराजींची सून आहोत असे आज सांगणार्‍या सोनिया असे म्हणत आहेत. म्हणजे महिला असून मोदी सरकार आपल्यावर अन्याय करीत असल्याचा आभास आपण निर्माण करू, अशी ही धमकी आहे. ज्यातून जनमानसात राजकीय सहानुभूती निर्माण व्हायला लागेल असे काहीही आपण करू, इतकाच त्याचा अर्थ आहे. कायद्याची भाषा, कार्यशैली सामान्य माणसाला कळत नाही, त्याच्या डोक्यात गैरसमज भरवून सहानुभूती मिळवण्याचा सगळा डावपेच आहे. त्यात किती फ़सायचे वा किती समर्थपणे हा डाव उधळून लावायचा, याचा भाजपा व मोदींना गंभीरपणे विचार करावा लागेल. कारण मोदी सरकार व भाजपाला सध्या अतिशहाणे व वाचाळवीरांनी ग्रासले आहे. त्यांच्याच बळावर सोनिया व अन्य विरोधक मोदीलाट कोसळून पाडण्यात यशस्वी झालेत आणि सोनियांनी खरी मदार मोदीभक्तांच्या मुर्खपणावरच आहे, हे विसरता कामा नये.

15 comments:

  1. एकदम ठीक विश्लेषण .

    ReplyDelete
  2. भाऊ,

    सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी राजकीय वैमनस्य आहे असे म्हणणे म्हणजे उच्च न्यायालयाचाआणि कनिष्ट न्यायालयाचा अपमान नाही का ?
    आपल्या कडे न्यायव्यवस्था अजून तरी उघड उघड राजकीय पक्षाची अंकित नाही, तेव्हा अश्या प्रकारे संसदेचा वेळ घेतल्या साठी भाजप वाले का कॉंग्रेस च्या मागे लागत नाहीत ?

    धन्यवाद,
    मनिष नेहेते

    ReplyDelete
  3. भाऊ, शेवटची वाक्ये फिर महत्वाची आहेत, ती भाजप नेतृत्वाने गंभीरपणे घेतली तर याही परिस्थितित कॅांग्रेसवर मात करणे निश्चित शक्य होईल असे वाटते----------नंदन पेंडसे

    ReplyDelete
  4. शेवटचा परिच्छेद लाख मोलाचा...

    सध्या एवढा सुंदर मराठी ब्लॉग दूसरा माझ्या पाहण्यात नाही

    ReplyDelete
  5. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
    न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।

    ReplyDelete
  6. भारत हा देश वंशपरंपरा , घराणे-राजेशाही , जन्मजात-वर्णव्यवस्था यांमुळे पाठी राहिला... त्यामुळे या सगळ्या गोष्टी वाईट असून त्या संपवायला हव्या ...
    पण इंदिरा गांधींची सून असल्यामुळे एक महिला वाट्टेल तेवढा आरोप असला तरी कोर्टात जायचे टाळू शकते !!
    #फुरोगामीलॉजिक

    ReplyDelete
  7. Bhau, Modi sarkar Lok sabha ani Rajya sabhe che sayunkta baithak gheun bill pass ka karat nahi; that kahi adchan ahe ka?

    ReplyDelete
  8. भाऊ, तुम्ही आणीबाणीची आठवण करून दिलीत. निर्विवादपणे आणीबाणी हा भारताच्या इतिहासातला एक अत्यंत घृणास्पद आणी लाजीरवाणा भाग आहे. इतर कुठल्याही प्रगत देशात इंदिरा गांधी आणी त्यांचे सुपुत्र संजय तुरुंगात असते किंवा कदाचीत फासावरही चढले असते इतके त्यांचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते. २००२ च्या गुजरातवर 'पोटतिडकीने लिहिणारा' एकही पत्रकार आणीबाणीवर लिहिताना दिसत नाही की एखाद channel चर्चा करताना दिसत नाही. २००२ बद्धल अश्रू सांडणार्याना तुर्कमान गेट वर हजारो निरपराध मुसलमानांवर गोळीबार झाल्याची आठवणपण नाही. सर्व विरोधकांना तुरुंगात कोंबण्याची कृती असो की व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असो वा वृत्तमाध्यामांची censorship नी केलेली मुस्कटदाबी असो ह्यावर देशातील कुठल्याही विचारवंताना पुरस्कार परत करावासा वाटला नाही.

    आणी भारतीय मतदारांबद्धल काय बोलायचं? आणीबाणीच्या अमानवी अमानुष अत्याचारांनंतर अवघ्या ३० महिन्यात ह्याच इंदिरा-संजयना त्यांनी घसघशीत बहुमतांनी निवडून दिले. जनता सरकार नालायक निघाले ही गोष्ट कितीही खरी असली तरी आणीबाणीतील अत्याचार नी गुन्हे माफ करण्यासारखे होते का? कदाचित आपल्या देशाचेच हे दुर्भाग्य आहे आणी ‘संभवामी युगे युगे’ म्हणत गांधी कुटुंब ह्या देशाचा सर्वनाश करतच राहणार.

    ReplyDelete
  9. एकदम बरोबर

    ReplyDelete
  10. this is of prime importance ..... people just just just forget this and start commenting publically on various delicate issues .... as like they are official representatives of the party....

    ReplyDelete
  11. In the piece, Swamy wrote, "It is on the record in the Maharashtra Assembly proceedings that the then RSS chief, Balasaheb Deoras, wrote several apology letters to Indira Gandhi from inside the Yerawada jail in Pune disassociating the RSS from the JP-led movement and offering to work for the infamous 20-point programme. She did not reply to any of his letters.” (The 20-point programme and Sanjay Gandhi's five-point the Congress regime cited to justify the imposition of the Emergency, in its endeavour to regenerate India.)

    Indira. Gandhi, however, replied to Vajpayee, who, Swamy claimed, too wrote apology letters to her. "In fact for most of the 20-month Emergency, Mr. Vajpayee was out on parole after having given a written assurance that he would not participate in any programmes against the Government,” Swamy declared.

    ReplyDelete
  12. What has been true of every anniversary of the Emergency will also be of the 40th – RSS-BJP leaders will recount tales of resistance they mounted against the authoritarianism of Indira Gandhi. But what they will not talk about, or counter, are the accusations Subramanian Swamy made against their leaders in the past.

    In a piece for the Hindu newspaper, dated 13 June 2000, a fortnight before the 25th anniversary of the Emergency, Swamy claimed then RSS chief Balasaheb Deoras and former Prime Minister AB Vajpayee betrayed the anti-Emergency movement by writingletters of apology to Indira Gandhi. Swamy is now a member of the BJP's national executive

    ReplyDelete
  13. Swamy surely is an unguided missile. Remember back in 1999, the sudden bonhomie between Swamy, Sonia Gandhi & Jayalalitha at a tea party hosted by Swamy. This was an attempt to bring down the Atal Bihari Vajpayee government. Today both these "Ladies" are on his target! 1 inside & other is about to join her

    ReplyDelete