Tuesday, December 1, 2015

ये कहॉ आगये हम, युही बात करते करते? //// महायुद्धाची छाया (५)



"Shall we expect some transatlantic military giant to step the ocean and crush us at a blow? Never! All the armies of Europe, Asia, and Africa combined, with all the treasure of the earth (our own excepted) in their military chest, with a Bonaparte for a commander, could not by force take a drink from the Ohio or make a track on the Blue Ridge in a trial of a thousand years. At what point then is the approach of danger to be expected? I answer. If it ever reach us it must spring up amongst us; it cannot come from abroad. If destruction be our lot we must ourselves be its author and finisher. As a nation of freemen we must live through all time or die by suicide."  - Abraham Lincoln

स्वातंत्र्यप्रेमी समाज वा देशाचा शत्रू कुठून, परदेशातून येत नसतो. अवघ्या जगाची सेना एकवटली आणि जगातला महान योद्धा जरी त्या सेनेचा सेनापती असला, तरी त्याला सार्वभौम राष्ट्र पादाक्रांत करता येत नसते. स्वयंभू समाजाचे राष्ट्र कधी परकीय शत्रूकडून संपवले जात नाही. त्याला संपवण्यासाठी त्याच समाजात विध्वंसक दगाबाज पैदा व्हावा लागतो, अशी ग्वाही अब्राहम लिन्कन यांनी दिलेली आहे. तो इशारा शतकापेक्षा अधिक काळ आधी या महापुरूषाने दिलेला आहे आणि तो इशारा केवळ अमेरिकेलाच लागू होत नाही. जगातल्या कुठल्याही देशाला, समाजाला व कुठल्याही कालखंडाला लागू पडतो. कालपरवा भारतात काही देशद्रोही हेर वा पाक हस्तक पकडले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी मनात राग धरू शकतो. पण त्यांच्यामुळे देशाचे फ़ारसे नुकसान होत नाही, इतके छुपे हस्तक उजळमाथ्यने आपल्यातच वावरतात, ते करीत असतात. कारण ते भारतीयांच्या मनात दुफ़ळी, असुरक्षितता व गैरसमज निर्माण करून शत्रूला हातभार लावत असतात. आज चारपाच परकीय हस्तक विविध जागी पकडले म्हणून आपण रागावलेले असू शकतो. कारण त्यांच्याकडून पाकला काही महत्वाची माहिती मिळाली आहे. भारतावर कुठे कसे हानिकारक हल्ले करावेत, याची माहिती शत्रूला मिळाली म्हणून आपल्याला राग येतो. ह्या माहितीचा उपयोग कसा होतो? सीमेवर कुठून जिहादी घुसखोरी करू शकतील, ती माहिती पाकला मिळाली. सहाजिकच त्याचा वापर घातपाती करणार आणि तेव्हा आपले सैनिक सुरक्षा दले गाफ़ील असणार, याचा राग आला ना? पण आपण किती गाफ़ील आहोत त्याचा पत्ता आहे? नित्यनेमाने कोणीतरी गाफ़ील ठेवून शत्रूच्या तोंडी देतो आहे, त्याचे आपल्याला किती भान असते? शत्रूला हाकलून लावण्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे आपले हितचिंतक असतात की शत्रू?

दोनच महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? शिवसेनेने त्याला विरोध केल्यावर गदारोळ माजवला गेला. पण गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता.

१९९० च्या दशकातली ही गोष्ट आहे. पुढे अटलबिहारी वाजपेयी हे कविमनाचे पंतप्रधान भारताला लाभले आणि त्यांच्याच कारकिर्दीत शांतता व सांस्कृतिक देवघेवीच्या नावाखाली पुन्हा गुलाम अलीला भारताचे दरवाजे खुले झाले. अर्थात अटलजींनी स्वेच्छेने असे काही केले नाही. पण त्यासाठी कोणीकोणी प्रयत्न केले असतील, त्यांची नावे देण्याची इथे गरज नाही. मागल्या पंधरावीस वर्षात भारत-पाक मैत्री संबंध वा नागरिकांचा आपसात संवाद घडवण्यासाठी जे लोक प्रयत्नशील असतात, त्यांची नावे इथे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. शिवसेनेने त्यावर प्रतिबंध लावायचा म्हटल्यावर खवळून कोण कोण रस्त्यावर आले, ते तपासले की इथे गुलाम अलीचे समर्थक कोण आहेत आणि पर्यायाने पाकिस्तानचे पुरस्कर्ते कोण आहेत, ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्यांचे काम हेच असते. गुलाम अली आणि पाक सरकार यात फ़रक असल्याचे तुमच्या आमच्या डोक्यात भरवायचे. सीमेवर सैनिकांची होणारी कत्तल आणि भारतातल्या कलाजीवनाचा काडीमात्र संबंध नाही, असे गैरसमज आपल्या डोक्यात भरवणारे आपल्याला गुलाम अलीपासून गाफ़ील ठेवत असतात. गुलाम अली भारतीय संस्कृतीवर इथल्या माणसावर किती प्रेम करतो, असे हेच लोक आपल्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पण गुलाम अलीला भारताविषयी इथल्या माणसांविषयी कसे ‘कसाब’प्रेम आहे, त्याची साक्ष त्याने तेव्हा विमान प्रवासात दिलेली आहे. अर्थात हे आपल्यापर्यंत आणण्याचे काम कोणाचे असते? पत्रकार, शोधपत्रकारिता करणारे अभ्यासक किंवा माध्यमांची असते ना? मग त्यांनी गुलाम अलीचा असा खरा भेसूर चेहरा आपल्यासमोर कशाला आणला नाही? त्यांनी हा भयंकर गुलाम अली आपल्यापासून लपवण्याचे कारणच काय? तर तीच त्यांची ‘ड्युटी’ म्हणजे कर्तव्य असते. कुठल्याही परकीय हस्तकाचे हेच तर काम नसते का?

सुभाष सरीन नावाचे भारतातील पाक-अफ़गाण विषयक जाणकार आहेत. त्यांनी हा किस्सा व घटना सोशल माध्यमात मुद्दाम उधृत केली. शिवसेनेने गुलाम अलीचा कार्यक्रम बंद पाडला, तेव्हाच सरीन यांनी हा किस्सा व गुलाम अलीवर भारतात लागलेला प्रतिबंधाचा जाहिर खुलासा केला. पण कुठल्याही मुख्य प्रवाहातील माध्यमाने, वाहिनी वा वृत्तपत्राने त्याचा फ़ारसा उहापोह केला नाही. शोभा डे यासारख्या बेअक्कल बाईची प्रतिक्रीया विचारणार्‍या वाहिन्यांना, याविषयात सुभाष सरीन यांची मुलाखत प्रतिक्रिया घ्यावी असे कशाला वाटले नाही? अन्यथा कुठल्याही नामवंताच्या शौचालयातही कॅनेरा घेऊन घुसणार्‍यांची सुभाष सरीन विषयक अनिच्छा थक्क करणारी नाही, तर हेतुपुरस्सर होती. कारण त्यांना गुलाम अली भारतावर व भारतीयांवर प्रेम करतो, असा भास निर्माण करायचा होता. तर सुभाष सरीन त्याच गजल गायकाचा भारतद्वेष सिद्ध करणारे पुरावे समोर आणण्याचा धोका होता. म्हणूनच कुठल्याही माध्यमाने सरीन यांनी समोर आणलेले सत्य दडपण्यात धन्यता मानली. उलट सर्व माध्यमे व पत्रकार शिवसेनेवर दुगाण्या झाडण्यात आघाडीवर होती. ते आपले कलाप्रेम दाखवत होते. पण त्याच कलाप्रेमी मुखवट्याआड लपलेला पाक हस्तकाचा चेहरा बाहेर येऊ नये, म्हणून मग सरीन यांनी उघड केलेले सत्य दडपणे भाग असते. त्याचा परिणाम असा होतो, की आपण घातपाती असलेल्या पाक हस्तकांविषयी गाफ़ील होऊन जातो. एकदा असे गाफ़ील झालो, मग आपल्याला सीमेवर पाकिस्तानकडून मारल्या जाणार्‍या सैनिकाच्या प्राणापेक्षा गुलाम अलीचे गाणे आवडू लागते. आपल्या खर्‍या सुरक्षेपेक्षा आभासी संस्कृती गुंगवू लागते. जेव्हा समाज असा गाफ़ील व बेसावध केला जातो, तेव्हा मग कसाबच्या टोळीचे अर्ध्याहून अधिक काम सोपे होऊन जाते. परकीय हस्तक हा म्हणूनच कुठल्याही रुपात, कुठल्याही क्षेत्रातला असू शकतो. लिन्कन काय वेगळे सांगतो? आपल्या इतके क्रिकेटप्रेमी वा गुलाम अलीचे चहाते असल्यावर बाहेरून धोका येण्याची गरज आहे काय? (अपुर्ण)

9 comments:

  1. Hats off Bhau. We would not have come to know this about Mr Gulam Ali.

    ReplyDelete
  2. He vachun agadi sarfarosh cinema chi athvan zali...

    ReplyDelete
  3. This fact is well understood by only one person- Narendra Modi.He will use all the means to win this battle.

    ReplyDelete
  4. Bhau gulam hukmavar chalto tyache thik ahi pan tyala sath denyaralya choukat fatke deon BENITO MUSOLINI ani PATSI sarkha mrutudand dila paije

    ReplyDelete
  5. http://greenlifes.net/news/1158-the-un-officially-declared-the-beginning-of-world-war-iii.html

    ReplyDelete
  6. कतार या देशाने सिरीयाकडे युरोप पर्यंत तेलवाहू नलिका प्रकल्पासाठी वाट मागितली ती सीरियाने नाकारली. सध्या युरोपला तेलवाहिनी द्वारे रशिया उर्जापुरवठा करतो. हिवाळ्यात गोठणा-या युरोप करीता तो महत्वाचा असतो. त्यात रशियाला प्रतिस्पर्धी (कारण कतार च्या मागे अमेरिका !) नको होता. नंतर वर्षभरातच इराण मधुन सिरीया मार्गे युरोप ला तेल पुरवठ्याचा प्रस्ताव आला. तो रशियाला चालला. थोडक्यात युरोप वर उर्जा वर्चस्व रशिया इराण मार्गे सिरीया या गटाचे रहाणार आणि हे दुभते गिर्हाईक अमेरिकाचे अंकित असलेल्या अरब राष्ट्र गटाला मिळणार नाही त्यामुळे त्या तेल विक्रीचा जो पैसा अमेरिकन ट्रेझरी बिले आणि बॉंड मार्केट ला आला असता तो येणार नाही असा सगळा कालवा(कालव) आहे. सध्या इसीस हपापाचा माल गपापा करून तेलाची तस्करी करते आहे आणि त्या वाहतुकीसाठी तुर्कस्तान मलई मारतो आहे. कुर्दिस्तान मधेच नवे झाले तर मलई मध्ये एक देश आणखी वाटेकरी होणार.

    ReplyDelete