Sunday, December 13, 2015

बाटलीतले भूत बाहेर येणार काय?


डेव्हीड कोलमन हेडली याने माफ़ीचा साक्षिदार व्हायचे ठरवले आणि पुरोगामी बाटलीत बंद असलेली अनेक भूते बाहेर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण हेडली बोलू लागला, तर नको तितक्या गोष्टी उघड्या होण्याची शक्यता आहे. शेवटी हेडलीची साक्ष भले २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबधित व्हायची असली, तरी त्या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर संघटना व त्यांचेच हस्तक असलेल्या विविध संशयितांशी जोडण्य़ाचा त्यातून प्रयत्न केला जाणार आहे. हेडलीची साक्ष कुणा ताब्यात असलेल्या आरोपीच्या संदर्भात व्हायची आता शक्यता नाही. कारण कसाबवरचा गुन्हा सिद्ध होऊन तो कधीच फ़ाशी गेला आहे. म्हणजेच आता जी सुनावणी व्हायची आहे, त्यात पाकिस्तानला गोवण्याला प्राधान्य आहे. मग त्यात पाक गुप्तचर संघटना व त्यांनीच पोसलेल्या मुजाहिदीन वा तोयबा अशा संघटनांचे भारतातील हस्तक यांचा विषय त्यातून चघळला जाणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान हाच आजकालच्या जागतिक जिहादी हिंसेचा मूळ आरोपी आहे असा भारताचा आरंभापासूनचा आरोप आहे. त्यातली महत्वाची कडी जोडण्यासाठीच हेडलीची साक्ष होणार आहे. त्यामध्ये हल्लेखोर संघटना लष्करे तोयबा असेल, तर तिच्याविषयी तपशीलवार उहापोह हेडलीच्या साक्षीतून केला जाईलच. त्यामुळे २६/११च्या हल्ल्यापुर्वीपासूनचा अनेक गोष्टी त्यात उलगडल्या जाणार आहेत. त्यात मग इशरत जहानची अहमदाबाद येथील चकमक देखील येणे अपरिहार्य ठरते. हेडलीचे तोयबाशी किती घनिष्ठ संबंध होते आणि त्या संघटनेशी कोण कोण कसे संबंधित आहेत, त्याचा उहापोह होण्याला पर्याय रहात नाही. तसे होण्याची भिती पाकच्या इथल्या हस्तकांना वाटली तर नवल नाही. पण त्या हस्तकांखेरीज अनेकजण असे आहेत, की ज्यांनी आपापल्या राजकीय मतलबासाठी गफ़लती केल्यात. त्यांचेही धाबे म्हणून दणाणले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

म्हणूनच हेडलीच्या साक्षिदार होण्याबरोबर इशरतचे भूत बाटलीतून बाहेर आलेले आहे. अन्यथा गेल्या आठवड्यात हेडलीला कोर्टाने माफ़ीचा साक्षिदार करून घेतला, ही बातमी आल्यानंतर अकस्मात इशरतचे प्रकरण ऐरणीवर येण्याचे काही कारण नव्हते. कारण २६/११च्या हल्ल्यापेक्षाही आधीपासून इशरतची चकमक गाजते आहे. २००४ च्या जुन महिन्यात अहमदाबादच्या वेशीवर गुजरात पोलिसांच्या पथकाने चार जिहादींना मारले. त्यात इशरत जहान ही ठाण्याची मुलगी असल्याने खळबळ माजली होती. वास्तविक ही तरूण मुलगी चार दिवस घरातून बेपत्ता होती, तरी कुटुंबाने तिच्याविषयी कुठली पोलिस तक्रार केलेली नव्हती, की शोधाशोधही चालविली नव्हती. ही बाबच मोठी शंकास्पद आहे. पण त्याचा विचारही कोणी केला नाही. पण चकमकीत मारल्या गेलेल्या मुलीची ओळख पुढे आली आणि विनाविलंब चकमक खोटी असल्याचा गदारोळ सुरू झाला. महाराष्ट्राचे तात्कालीन गृहमंत्री आर आर आबा पाटिल यांनी तात्काळ चौकशीचे आदेशही दिले. पण ठाण्याची मुलगी गुजरातच्या राजधानीपर्यंत कशी पोहोचली वा कोणी तिला उचलून नेले; याचा उहापोह कधी झाला नाही. गुजरातचे पोलिस महाराष्ट्रात येऊन कोणालाही परस्पर अटक करू शकत नाहीत. त्यांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. किंवा बाहेरच्या पोलिसांनी विनंती केलेली असल्यास अशा संशयिताला इथले पोलिस ताब्यात घेऊन पलिकडे ताबा देत असतात. तेव्हा इशरतला ठाण्यातून अहमदाबादला कोणी पोहोचवले, याचा शोध आवश्यक होता. पण पुरोगमी बुद्धीमत्ता अशा व्यवहारी तर्काला मान्यता देत नाही. पुरोगामी डोक्यात नुसती शंका आली, तरी तो पुरावा असतो आणि म्हणूनच तो खराही असतो. सहाजिकच गुजरातच्या हिंदूत्ववादी मोदी सरकारने इशरतला पळवले आणि तिथे तिला निर्घृणपणे ठार मारले असा तर्क तात्काळ काढला गेला.

त्या घटनेनंतर तोयबानेही आपल्या वेबसाईटवर इशरत आपली हस्तक असल्याचा व ती शहिद झाल्याचा निर्वाळा दिलेला होता. पण त्याची कुणाला फ़िकीर होती? असले पुरावे कोर्टात लागतात आणि पुरोगाम्यांचा कोर्टाशी संबंध नसतो. त्यांचा संशय पुरेसा असतो. पण योगायोग असा, की तेव्हा केंद्रातही पुरोगामी सरकार होते आणि त्याही सरकारने इशरत तोयबाशी संबंधित असल्याचा निर्वाळा दिला. पुढले पाचसहा वर्षे हाच प्रकार सुरू राहिला आणि मोदी सरकारच्या पोलिसांचे समर्थन दिल्लीतले पुरोगामी युपीए सरकार करीत होते. पण मुंबई हल्ल्यानंतर स्थिती बदलू लागली. भले युपीए सरकारला पुन्हा सत्ता मिळाली, तरी आघ्या दोन वर्षात चित्र पालटू लागले आणि पुढल्या काळात नरेद्र मोदी हाच नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार होण्याची चिन्हे दिसू लागली. त्याची कोंडी करण्याचे डावपेच दिल्लीत सुरू झाले. मग त्यासाठी देश बुडाला वा उध्वस्त झाला तरी बेहत्तर; इथपर्यंत सर्वांची मजल गेली. दरम्यान २६/११ च्या मुंबई हल्ल्यात हेडली गुंतल्याचे उघडकीस आले व त्याची जबानी घ्यायला केंद्रातर्फ़े एनआयए या तपाससंस्थेचे काही अधिकारी अमेरिकेला जाऊन आले. त्या जबानीत हेडलीने इशरत तोयबाची हस्तक असल्याचे कथन केलेले होते आणि तसा अहवाल गृहमंत्र्यांनाही देण्यात आला होता. पण २०१३ नंतर म्हणजे चकमकीला दहा वर्षे उलटून गेल्यावर युपीए सरकारला इशरतचा कळवळा आला आणि तिच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी सोनियाप्रणित सरकारने भारतीय हेरखात्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यापर्यंत मजल मारली. गुजरात राज्यात नेमणूक असलेले केंद्रातील गुप्तचर अधिकारी राजेंद्रकुमार यांना इशरतच्या चकमकीचे आरोपी म्हणून गोवण्याचा उद्योग गृहखात्याने आरंभला. त्याला दुजोरा मिळण्यासाठी मग हेडलीची तात्कालीन साक्ष दडपण्यात आली. 

थोडक्यात भारत सरकार चालवणार्‍यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी तोयबाच्या हस्तकाला शहीद बनवून हेडलीच्या साक्षीचे भूत बाटलीत बंद केले. त्याने इशरतबद्दल जे कथन केलेले होते, ते कोर्टात आणायलाही नकार दिला आणि उलट तोयबा विरोधात कारवाया करणार्‍या आपल्याच अधिकार्‍याला गुन्ह्यात गोवण्याचा उद्योग केला. किंबहूना त्यासाठी भारत सरकारचे कोर्टात आधी सादर केलेले प्रतिज्ञापत्रही फ़िरवले आणि इशरतची पाठराखण सुरू केली. युपीए सरकारने मोदी विरोधात जाण्यासाठी थेट तोयबाच्या हस्तकाचे समर्थन करण्यापर्यंत जे उद्योग केले, ते बाटलीत बंद असलेले भूत होते. हेडली तसा बोललेलाच नाही आणि म्हणुन त्याविषयीचा अहवाल इशरत खटल्यात लागू पडत नाही, असे अनेक युक्तीवाद केले गेले. त्याला कोणी आव्हानही देऊ शकला नाही. कारण तो अधिकृत अहवाल कोणापाशी नव्हता आणि सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून नेमके इशरत संबंधीचे दोन परिच्छेद गायब करण्यात आलेले होते. आता कोर्टात हेडली साक्ष देईल. तिथे कुठल्याही वकिलाने वा खुद्द न्यायाधीशांनी त्याचे तोयबाशी असलेले संबंध स्पष्ट करण्यासाठी तपशीलवार माहिती मागितली तर त्याला इशरतविषयी बोलावे लागणार. ते बोलणे हे अधिकृत व जाहिर असेल. ते भाजपाचा वा युपीएचा गृहमंत्री नाकारू शकणार नाही, की झाकून ठेवू शकणार नाही. म्हणजेच इशरतबद्दल जी माहिती युपीए सरकारने नाकारली वा लपवली; ती उघड होण्याचा धोका नाही काय? चिदंबरम आणि सुशीलकुमार शिंदे असे त्या कालखंडातील दोन गृहमंत्री मग गोत्यात नाही का येणार? हेडलीच्या साक्षीची बाटली अशी किती अशी भुते बाहेर काढणार आणि ती कोणाला पछाडणार, हा भयगंड म्हणूनच महत्वाचा ठरणार आहे. तिथे संसद बंद पाडून कुणी आपली कातडी बचावू शकणार नाही, की पुरोगामीत्वाची कवचकुंडले कामाची नाहीत.

14 comments:

  1. Waaaah!!!Konache paap aani punya kadhi samor ubhe rahil he konalahi sangata yenar nahi.

    ReplyDelete
  2. भाऊ या देशबुडवेंपासुन कधी सुटका मिळणार? यावर काय उपाय आहे काय?

    ReplyDelete
  3. राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षांनी इशरतला ' महाराष्ट्र ' सरकार तर्फे वीरचक्र वाहिले होते. धन्य तो महाराष्ट्र. ...................एकाच वेळी अनेक बाटल्यातली भुते बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तथाकथित पुरोगामी / धर्मनिरपेक्ष बांडगुळाना ' घाम ' फुटला आहे. त्यामध्ये हि ' खानावळ ' मंडळी हि आहेत. पुढील महिन्यात ' सुभाषबाबू ' / नेशनल हेराल्ड / हेडली आणि अजून बरेच बाहेर यावयाचे आहे. या महिन्या अखेरीस पंतप्रधानाची रशियाला भेट आहे. अध्यक्ष पुतीन यांना विनंती करून ' सुभाष बाबूंची ' काही कागदपत्रे मिळण्याची शक्यता आहे. ............................हेडली विडीओ ' वरून ' कितपत माहिती देईल याची शंकाच आहे...............कारण परत त्यात अमेरिकेचा सहभाग किती होता हेही उघडकीस येईल.

    ReplyDelete
  4. व्होट बँकेची राजनितीसाठी कुठल्या स्तरावर हे लोक जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे हे यावेळी जर सत्तांतरण झाले नसते तर या परिवार पुरूस्कृत युपीए शासनाने कोणा कोणाचे बळी घेतले असते ते देवच जानो. हेरॉल्ड प्रकरण, इशरत जहां प्रकरण, वाड्रा प्रकरण गांधी नावाची पार इभ्रत या लोकांनी घालवली मुळात गांधी या शब्दाचा दुरूपयोग जेवढा या परिवाराने सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी केला तेवढा कोणीच केला नसेल नथुरामांनी गांधीची हत्या केली परंतु या परिवाराने गांधी विचारांची हत्या केलेली आहे या परिवाराचा भारतीय संस्कृतीशी दुरदुरचा संबध नाही सेक्युल्युजरम चा नावाखाली फक्त साम दाम दंड भेद सर्व हत्यारे वापरून फक्त सत्ता हवी सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाही मुळात पुरोगामी शब्दापेक्षा फक्त बहुतांशी परिवाराची चापलुसी करण्यातच मग्न आहेत यांना पुरोगामी हा शब्द सुद्दा लागु होत नाही नकली गांधी परिवारापासुन जनतेने वेळतच सावध होणे बरे

    ReplyDelete
  5. ज्यांचे हितसंबंध सर्वच वाईट गोष्टीत नेहमीच होते असतात आणि जे कधीच सापडत नाहीत त्यांच्या महाआरत्या नुकत्याच करून झाल्या, त्यात मोदींच्या हातातही आरतीचे ताट दिसले होते बर का भाऊ ! अगदी उघडेबब उभे राहून, गाभा-यात घुसून, आरती म्हटली साहेबानी खडया सुरात! त्यामुळे काही धोका नाही ! मग कशाला धाबे दणाणणार ?

    ReplyDelete
  6. एक अगदी छोटा बारकावा राहिला, भाऊ. ठाण्याचे महान 'छोटे साहेब' इशरतच्या घरी जाऊन तिला तिच्या महान कार्यासाठी स्वत:च्या हाताने एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती देऊन आले होते. त्यांचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे ना ?

    ReplyDelete
  7. खरे तर आधीचे सगळे चोर, पुराव्यानिशी कायमचे पकडले जाऊ शकतात आणि पुढची २०/२५ वर्षे देशहितवादी सरकार राहील याची बेगमी करता येऊ शकते. परंतु त्यासाठी एका जागी महिन्यातून निदान आठवडाभर तरी बसून काम करायला हवे आहे. गेली ६६ वर्षे मोक्याच्या जागी 'विश्वासाची माणसे' बसवून कॉन्ग्रेसवाल्यांनी लोकशाहीचे फुल्ल माकड करून टाकले होते. अगदी न्यायालयेही तुरळक निवाडे वगळता, त्या सरकारवरच्या 'कोणत्याही' खटल्यांबद्दल 'अनुकूल' निर्णय देत असत. मग पोलीस, प्रसारमाध्यमे तर विचारूच नका. हे सगळे 'इन्फेक्शन' देशाच्या एकंदर व्यवस्थेतून काढून ती आधी स्वच्छ करायला हवी आहे. तिथे चांगली, देशहिताचा विचार करणारी माणसे आणायला हवीत. हे दीर्घ पल्याचे आणि शांतपणे करायचे काम केवळ आकाशवाणीवर आणि परदेशात आपलेच लोक भर चौकात जमा करून जाहिरात तज्ज्ञांकडून लिहून घेतल्यासारखी पंच टाकलेली भाषणे करून होणार नाहीच. काहीतरी दूर पल्याचे, नॉन-ग्लॅमरस कामसुद्धा तर करावे लागेल की. पण घंटा कोण बांधणार म्हणा ??

    ReplyDelete
  8. आता खरी लढाई सुरू होईल कारण सगळ्या खर्‍या गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत.

    ReplyDelete
  9. सकाळ झालेली आहे व पाहटेची किरणे पडत आहे.पुर्ण सुर्य अजुन उगवायचा आहे.
    ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते ।
    पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

    ReplyDelete
  10. माझ्या माहिती प्रमाणे ऎशरत मेल्यावर कळव्याला का मुंब्र्याला तिच्या घरी मदत म्हणून धनादेश देण्यासाठी ठाण्याचे वसंत डावखरे गेले होते, का व कश्यासाठी? त्या वेळेची वर्तमान पत्र वाचावी. पक्ष कोणता ते सर्वाना माहित असायलाच हव.हे खरेच देशभक्त ? का देश भडवे .
    विधान चुकीच असल्यास क्षमा असावी.

    ReplyDelete
  11. भाऊ,पापं बाहेर येतायत, झुंडीनं येतायत. नाकबुल करतानां नाकी नऊ येणारेत. फक्त कुठल्याही कारणासाठी रेटा कमी पडला नाही पाहिजे शासनाचा. रालोआची हीच खरी कसोटीची वेळ आहे .

    ReplyDelete
  12. शेवटी निष्पन्न काहीही होणार नाही. कुणालाही शिक्षा होणार नाही. आपली लोकशाही ह्यातीलच काहींना निवडूनही देईल

    ReplyDelete
  13. Congress Musalmanparast asunhi tila 60 varshe satatyane nivdun denaryanni ata chuk punha karu naye.

    ReplyDelete
  14. हे भूत काॅग्रेसला घोळसून घोळसून मारणार.

    ReplyDelete