Wednesday, January 3, 2018

समाजहितासाठी खोटेपणा?

pawar के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. या ऐतिहासिक लढाईच्या स्थळाला दिर्घकाळ अनेक लोक सदभावनेने भेट देत आलेले आहेत आणि यावर्षी त्या लढाईला दोनशे वर्षे पुर्ण होत असल्याने, अधिक संख्येने लोक येतील ही अपेक्षा होती. म्हणूनच तिथे सावधानतेचे उपाय योजायला हवे होते. इथपर्यंत पवारांची भाषा योग्य आहे. पण पुर्ण सत्य बोलणे वा दिशाभूल न करणे, ही पवारांच्या स्वभावातील गोष्ट नाही. म्हणूनच जाता जाता त्यांनी वढू गावाचा संदर्भ देऊन दडपून खोटे बोलून घेतले आहे. स्वत: चार वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार प्रशासनाच्या व सरकारच्या मर्यादा चांगल्या ओळखतात. म्हणूनच त्यांच्याकडून अशा संकटकाळात समतोल वक्तव्याची अपेक्षा असते. पण उचापतखोरी अंगी बाणवलेल्या नेत्याकडून तशी अपेक्षा बाळगणे गैरलागूच नाही काय? स्वत: राज्य करताना अद्डपून खोटे बोलत जनतेची साफ़ दिशाभूल करण्याला समाजहिताचे नाव देणार्‍या पवारांनी म्हणूनच मागल्या दोन दशकात आपली विश्वासार्हता गमावली आहे. अन्यथा त्यांनी महाराष्ट्रात भडकू बघणार्‍या जातीय तेढीतही आपला राजकीय लाभ शोधला नसता. आजपासून दोन दशके मागे राज्यात युतीची सत्ता होती आणि तेव्हाही असाच हिंसाचार माजलेला होता. नेमक्या त्याच जागी यावेळीही तसाच हिंसाचार माजावा, याला योगायोग मानता येणार नाही. तेव्हा रमाबाई आंबेडकर नगर येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती आणि पुढले दोनतीन दिवस हिंसक जमावाने मुंबईभर थैमान घातलेले होते. याचे पवारांना स्मरण नाही काय? तेच तिसर्‍यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अवघ्या आठवड्याभरात मुंबईच्या विविध भागात बॉम्बस्फ़ोटाची मालिका झाली, त्याचे श्रेय कोणाचे होते?

१२ मार्च १९९३ रोजी दुपारपासून मुंबईच्या विविध भागात मिळून अकरा बॉम्बस्फ़ोट झालेले होते. त्यापुर्वी मुंबईत लागोपाठ दोनदा दंगली उसळल्या होत्या. किंबहूना त्यामुळेच पवारांना दिल्ली सोडून पुन्हा महाराष्ट्रात यावे लागलेले होते. आधीचे त्यांचेच लाडके मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना दंगली हाताळता आल्या नाहीत, म्हणून पवार अस्वस्थ झालेले होते. त्यांच्याच आग्रहाखातर नाईकांना बाजूला व्हावे लागलेले होते. मग पवार आल्यावर मुंबई किती सुरक्षित झाली होती? अवघ्या आठ दिवसात मुंबईत अकरा बॉम्ब फ़ुटले आणि दोनशेहून अधिक निरपराध माणसे जीवाला मुकली होती. शेकड्यांनी जखमी व जायबंदी झाले होते. त्यानंतर काही तासातच दुरदर्शनच्या पडद्यावर मुख्यमंत्री पवार झळकले आणि लोकांना शांततेच आवाहन करण्याची जबाबदारी बाजूला ठेवून, त्यांनी दिशाभूल करण्याची संधी साधलेली होती. मुंबईने अकरा बॉम्बस्फ़ोट अनुभवले असताना पवारांनी बारावा बॉम्बही फ़ोडला होता. केवळ हिंदू वा बिगरमुस्लिम भागातच बॉम्बस्फ़ोट झालेले असताना, मुस्लिमांच्या भागातही स्फ़ोट झाल्याची लोणकढी थाप पवारांनी काही तासात ठोकलेली होती. दोन समाजात दुफ़ळी माजून हिंसेला चालना मिळू नये म्हणून आपण जाहिरपणे असे खोटे बोललो होतो, याची कबुली पुढल्या काळात पवारांनीच दिलेली होती. ज्यांना आपण मुख्यमंत्री असताना निरागस मुंबईकरांना जनहितासाठी खोटे बोलण्याची गरज वाटली, त्यांनी आता महाराष्ट्रात दंगली पेटल्या असताना किती खरे बोलावे? अर्थात आज मराठी समाजाच्या भिन्न घटकांमध्ये तेढ माजलेली दिसत असताना शरद पवार त्यात आणखी वैमनस्य निर्माण व्हावे असे विधान का करावे? तेही जनहिताचे असणार हे आपण गृहीत धरले पाहिजे. कारण पवार हे जाणता राजा आहेत ना? आपले हेतू साध्य करण्यासाठी सोयीनुसार खरे खोटे करण्याचा अधिकार त्यांना आपोआपच मिळालेला असतो ना?

महाराष्ट्रातील सत्ता व लोकप्रियता गमावल्यापासून पवार यांना खुप बेचैनी आलेली आहे. सतत विविध समाज घटकांना एकमेकांच्या विरोधात खेळवण्याचेच राजकारण करण्यात पवारांची हयात गेलेली आहे. त्यामुळे त्यांना ओळखायला महाराष्ट्राला खुप वेळ लागला, हे मान्य करायलाच हवे. पण ती ओळख पटल्यावर कितीही चलाखीचे डावपेच खेळूनही त्यांना गमावलेली राजकीय पत पुन्हा मिळवणे शक्य झालेले नाही. त्यातूनही ही बेचैनी आलेली आहे. इतकी वर्षे जी सामाजिक तेढ माजवण्याची जादू पवारांनी यशस्वीरित्या चालविली होती, तिचा प्रभाव क्षीण झालेला आहे. तरीही त्यांना अजूनही तीच जादू कामी येईल असे वाटत असावे. म्हणून अधूनमधून त्यांनी तिचे प्रयोग चालू ठेवलेले असतात. काही वर्षापुर्वी कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजी राजे यांची भारत सरकारने राज्यसभेत मनोनित सदस्य म्हणून नेमणूक केलेली होती. तर राज्यात ब्राह्मण जातीचा मुख्यमंत्री असल्याचा संदर्भ घेऊन पेशव्याने छत्रपतींना वस्त्रे दिल्याचा हिणकस आरोप पवारांनी केला होता. तेव्हाच त्यांच्या खर्‍या चेहर्‍याचे प्रदर्शन झालेले होते. तेही कमी पडाले म्हणून की काय, त्यांनी कोकाटे नावाच्या कुणाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे प्रयोजन साधले. आपण जातपात मानतो आणि जातीय संघटनेतही सहज मिसळून जाऊ शकतो, याची ग्वाही दिलेली होती. मात्र त्यामुळे फ़ारसे काही साधले नाही. कारण ग्रेट मराठा वा स्ट्रॉग मराठा म्हणून दिर्घकाळ मिरवलेल्या पवारांचा खरा चेहरा आता मराठ्यांनीही ओळखलेला आहे. म्हणून तर मध्यंतरी मूक मोर्चे निघाले, त्यापासूनही साहेबांना दूर ठेवण्यात आले होते. पवारांच्या धरसोडवृतीमुळेच मराठा समाजाची होरपळ झाल्याची ती साक्ष होती. मात्र अजून हा विक्रमादित्य आपला हट्ट सोडायला तयार नाही. तो पुन्हा पुन्हा वेताळाचे प्रेत खांद्यावर घेऊन धावण्याचा खेळ खेळतच राहिला आहे.

कुठलाही कर्तबगार माणूस उमेदीच्या काळात आपले कर्तृत्व गाजवत असतो आणि जितक्या उंचीवर पोहोचतो, त्या उंचीची प्रतिष्ठा त्याला पुढल्या काळात जपावी लागत असते. पुढल्या काळात अशी माणसे उच्चस्थानी नसली तरी त्यांच्या कर्तॄत्वाला लोक म्हणूनच मान देत असतात. क्लिंटन, ओबामा, बुश असोत किंवा देवेगौडा वगैरे असोत. त्यांनी पुढल्या काळात आपल्या पदाची शान राखण्यासाठी अलिप्तपणे जगाकडे बघण्याचा शहाणपणा दाखवला आहे. पवारांची गोष्ट वेगळी नाही. वयाची ऐंशी वर्षे होत आल्यावर त्यांनी आपल्या शब्द व विधानात एक जबाबदारीचे वजन राखण्याची गरज आहे. त्याचे भान त्यांना उरलेले नाही. म्हणून कुठल्याही बाबतीत बेताल बोलण्याचा प्रकार वारंवार होऊ लागला आहे. यांच्यापेक्षा पुतणे अजितदादा शहाणे म्हणायचे. त्यांनी सत्ता गमावल्यापासून आपल्या बोलण्याला खुप मर्यादा ठेवल्या आहेत. आताही भीमा कोरेगावचा विषय पेटला असताना पवार कुठल्या हेतूने बिनबुडाची विधाने करीत आहेत? पुण्यातल्या काही संघटनांनी वडू वा भीमा कोरेगावच्या गावांमध्ये जाऊन जातीय तेढ माजवली असे त्यांना ठाऊक होते, तर त्यांनी शासनाला कळवण्याचे कर्तव्य कशाला पार पाडले नाही? राज्यात नव्हेतर आपल्याच पुणे जिल्ह्यात धुमसू घातलेल्या आगडोंबाचा थांगपत्ता पवारांना नव्हता काय? नसेल तर ते जाणता राजा कशाला म्हणवून घेतात? थट्टामस्करी व थिल्लरपणा करण्याचे वय आपण केव्हाच ओलांडले आहे आणि आपण अतिशय नाजूक अशा संवेदनाशील वातावरणात काम करतो, याचेही भान त्यांना उरलेले नाही काय? कधीकाळी मराठी माणूस ज्याच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघत होता, त्याचे असले चाळे बघून मराठी माणसाचे मन किती खट्टू होत असेल ना? सुनील गावस्कर विराट कोहलीला शहाणपण शिकवण्याचा आगावूपणा का करत नाही, हे क्रिकेटशी संबंधित पवारांना इतर कोणी सांगायला हवे काय?

21 comments:

  1. "थट्टामस्करी व थिल्लरपणा करण्याचे वय आपण केव्हाच ओलांडले आहे आणि आपण अतिशय नाजूक अशा संवेदनाशील वातावरणात काम करतो, याचेही भान त्यांना उरलेले नाही काय? कधीकाळी मराठी माणूस ज्याच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून बघत होता, त्याचे असले चाळे बघून मराठी माणसाचे मन किती खट्टू होत असेल ना?"

    खरय भाऊ. पवार तर फक्त याला कसा मारला, त्याची कशी जिरवली या राजकारणातच गुंतलेले आहेत असं दिसतंय (हे म्हणण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी सुरु झाल्यापासून च महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ वाढली आहे, आणि पवारांचा बराचसा वेळ त्याबद्दलच्या राजकारणात जात असावा). म्हणूनच कदाचित पवारांच्या नंतर आलेले बरेच लोकं खूप पुढे निघून गेले.

    ReplyDelete
  2. Bhau one thing is very clear since Mr. Phadanvis has taken over as CM and the way he is handling politics these people are loosing their ground

    ReplyDelete
  3. Wagle tar aksharsha betalpane 100 tweet karun agit tel oatayat ani nirlajjapane tyache samrthan kartayat

    ReplyDelete
  4. Mast Bhau
    Shevti kay Karave tase bharave.
    Aata bhog aahe te bhogavech Lagnar.

    Mhantat Na "Jityachi Khod ....."

    Ha khel pan khup diwas nahi chalaycha, Lokana yacha veet yetoy. Jyala samajale to kam karel aani toch pudhe rajya karu shakel.

    Baki outdated lok aani outdated davpech.

    ReplyDelete
  5. काही लोकं आपण निरागस आहोत हे दाखवण्यासाठी बोबडे बोलतात.

    ReplyDelete
  6. भाऊ एक लिंक खाली देतोय कृपया त्याची सत्य असत्यातता तपासून एखादा लेख लिहावा अशी विनंती..
    https://thewire.in/209824/myth-bhima-koregaon-reinforces-identities-seeks-transcend/

    ReplyDelete
    Replies
    1. This link is owned and run by the Communists so whatever they write is not true. They write to further the commi and liberal agenda. So it best to read and forget.

      Delete
  7. यामागेही हा गंजता राजा असला पाहिजे...!
    एवढं खालच्या पातळीवर येऊन राजकारण करणं ह्यांच्या शिवाय कोणाला करता येईल!?
    नाही का?

    ReplyDelete
  8. अरेरे.. भाऊ हे अती झालं... थोडे तरी कपडे ठेवायला पाहिजे होतेत.. :-D

    ReplyDelete
  9. पवारांनी आता राजकरण सोडावे आणि निवृत्त व्हावे.

    ReplyDelete
  10. https://www.facebook.com/sanket.s.kulkarni

    भाऊ संकेत कुलकर्णी यांच्या प्रोफाईल वर भीमा कोरेगाव लढाईबद्दल ७ लेख आहेत. लेखक स्वतः लंडनमध्ये राहतात. त्यांनी तेथील ब्रिटिश लायब्ररी मधील अस्सल कागदपत्रांच्या आधारे ते लिहिले आहेत. त्यावेळी ती लढाई मराठे विरुद्ध इंग्रज अशीच होती. जातीचा रंग देण्यात काही अर्थ नाही.

    मुद्दाम हे इथे देत आहे म्हणजे आपल्या ब्लॉग चे वाचक पण वाचतील.

    ReplyDelete
    Replies
    1. स्वराज्यानंतर तर मग मोगलाई यायाला पाहिजे पण पेशवाई कस काय आली...जिकली पेशवे व हारले कि मराठे अस आता चालनार नाही भाऊ...तर लढाई ही इंगज विरुध्द बाजीराव पेशवा 2 या मध्ये झाली...तर पेशव्याचा पराभव झाला होता..

      Delete
  11. एवढ्या खालच्या पातळीवर जाणे हे फक्त त्यांना जमू शकत. राष्ट्रीय लेव्हलला कोणी विचारत नाही आणि याचे मन देखील महाराष्ट्राच्या बाहेर रमत नाही. महाराष्ट्रात सुद्धा काही ठराविक ठिकाणी यांचं जमतं. एवढे जाती पातीचे राजकारण करून काही उपयोग होत नाही.
    आता सर्वांना यांचे खरे रूप समजले आहे. इतकी वर्ष राजकारण करून स्वबळावर महाराष्ट्र जिंकता येत नाही साधे 2 आकडी खासदार निवडून आणता येत नाहीत आणि गप्पा तर राष्ट्रीय राजकारणाच्या.
    आम्ही तर एक time pass म्हणुन त्यांच्या बातम्या वाचतो.

    ReplyDelete
  12. सध्या पवार साहेबाना काही काम धंदा नसल्यामुळे हे साहेब अशा रीतीने टाइम पास करत असतात. एकादा मुळात हुशार असलेला माणूस आपल्या दुष्ट आणि अवसानघातकी कर्मांनी कुठे पोचू शकतो ह्याचे हे पवार साहेब म्हणजे उत्तम उदाहरण.साहेब..एक विनंती.आपण आता आपले म्हातारपण शांतपणे घालवा ..लोकांनी नंतर आपल्याबद्दल थोडे चांगले बोलावे असे तुम्हाला का वाटत नाही ??

    ReplyDelete
  13. जबाबदारी व पवार ? अहो भाऊ जे नावात वेलांटी अनुस्वार इत्यादी ची जबाबदारी घेत नाहीत ते इतर गोष्टींची जबाबदारी कशी घेणार

    ReplyDelete
  14. भिमा कोरेगाव प्रकरणाचा माओईस्ट अंगल खालिल लिक
    वर दिलाय, वाचक व तुमच्यासाठि.

    या पैलुवर आपण प्रकाश टाकावा.


    https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/naxal-india-government-prakash-ambedkar/articleshow/20472408.cms

    ReplyDelete
  15. bhau mage eka lekha madhe tumhi mhatla hotat ki supriya sulencha tumhala call ala hota.. tumcha lekh vachun.. mag pawar saheb vachatch astil ki tumche lekh ani tari te sudhrat nahi mhatlyavr kay .. aso

    ReplyDelete
  16. भाऊ पवासाहेबांनी आपला पक्ष चालवताना अनेक जातीय संघटणा पोसल्या स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्रात अशा संघटणाच्या माध्यमातून विष कालवले हे सत्य आहे. या जाणत्या नेत्याने अनेकदा नेनतेपणाची वक्तव्य करून आपल्या व्यक्तीमत्वाच्या मर्यादा दाखवल्यात....

    ReplyDelete
  17. सर्व जीवनात पवार साहेब मनातल्या मनात तरी खरे बोलले असतील का हो/

    ReplyDelete