Monday, June 22, 2015

खरे बोलतात, हा तावडेंचा गुन्हा आहे.




विनोद तावडे हा माणूस आम्हाला कधीही आवडला नाही. किंबहूना तो भंपक नेता आहे असाच आमचा पुर्वग्रह राहिलेला आहे. त्यात आजही किंचीत बदल झालेला नाही. आजवर ह्या माणसाच्या संदर्भात काही चांगले चार शब्द लिहील्याचे आम्हाला आठवत नाही. पण गेल्या दोनचार दिवसापासून शिक्षणमंत्री म्हणून त्यांच्यावर जी राळ उडवली जाते आहे, त्यात त्यांचा दोष वा गुन्हा कोणता हा प्रश्न पडल्याने त्यांची बाजू समजून घेणे भाग पडले. त्यांनी कुठेही आपण पदवीधर इंजिनीयर असल्याचा दावा केलेला नाही. आपले विद्यापिठ मान्यताप्राप्त असल्याचा दावा आजवर केलेला नाही. ज्या विद्यापिठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्याचे नाव बोगस दिलेले नाही, किंवा कुठून त्यांनी बोगस विद्यापिठाचे पदवी प्रमाणपत्र विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर नाही. मग गदारोळ नेमका कशासाठी आहे? ज्या ज्ञानेश्वर विद्यापिठात तावडेंनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे, ते विद्यापिठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेले असेल, तर तो तावडेंचा गुन्हा कसा असू शकतो? आजही देशात अनेक खाजगी विद्यापिठे अशी आहेत, ज्याची मान्यता नंतर काढून घेतली जाते, तेव्हा तो तिथल्या विद्यार्थ्यांचा गुन्हा असतो काय? दुसरी गोष्ट शंभर वर्षापेक्षा अधिक मोठी परंपरा असलेल्या मुंबई विद्यापिठाचा कुलगुरूची. खोटी कागदपत्रे व पात्रता दाखवून त्या अधिकार पदावर तो बसून राहिला, त्याला अंतिम निकाल लागेपर्यंत कोर्टानेही राजिनामा देण्यास भाग पाडलेले नव्हते. अशा देशात तावडे यांचा राजिनामा मागण्याचा अट्टाहास कितीसा न्याय्य मानायचा? शिवाय कालपरवाच मुंबई विद्यापिठाच्या कालिना परिसरात एक कोणी टपरीवाला बोगस गुणपत्रिका मिळवून देण्य़ाच्या भानगडीत पकडला गेला. त्या मुंबई विद्यापिठाची विश्वासार्हता तावडेंच्या ज्ञानेश्वर विद्यापिठापेक्षा अधिक कशी? केवळ अनुदान आयोगाने त्याला मान्यता व अनुदान दिले म्हणून?

समस्या काय आहे? एखाद्या माणसाने निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज भरताना जी विविध प्रकारची माहिती प्रतिज्ञापत्र म्हणून दाखल करायची असते, त्यामधली माहिती आपल्या समजूतीप्रमाणे खरी असल्याचे मान्य करावे लागते. ती खोटी असली तर तो गुन्हा असतो. दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण पदवीधर असल्याचे सांगून खोटी प्रमाणपत्रे जोडली होती. त्यांनी सांगितलेले विद्यापिठ खरे आणि त्याच्यातर्फ़े मिळाले म्हणून सादर केले ते प्रमाणपत्र बोगस होते. म्हणून तो गुन्हा आहे. त्यांनी तसे बोगस प्रमाणपत्रच मिळवले व खरे म्हणून सादर केले होते. तावडे यांनी प्रतिज्ञापत्रासह सादर केलेली तमाम कागदपत्रे खरी आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन जे प्रमाणपत्र मिळवले, ते खरे आहे. त्या अभ्यासक्रमाला सरकार वा अनुदान आयोगाची मान्यता असायलाच हवी, अशी कुठल्या निवडणूक कायद्याची सक्ती आहे? नसेल, तर तावडे यांचा गुन्हा कोणता? निव्वळ खरे बोलले व सत्याधिष्ठीत प्रतिज्ञापत्र सादर केले, ह्याला गुन्हा म्हणायचे आहे काय? गदारोळ कशासाठी चालू आहे? राजिनामा कशासाठी मागितला जात आहे? ज्यांना इतका गदारोळ करण्याची उबळ आलेली आहे, त्यांनी कधी केंब्रिज विद्यापिठातून सोनिया गांधींनी ‘मिळवलेल्या’ शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्रांविषयी कल्लोळ केला होता काय? त्यावर मागली दहा वर्षे डॉ. सुब्रमण्यम स्वामी सातत्याने रान उठवत राहिले. स्वामी अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत गेले. त्यांच्या त्या गौप्यस्फ़ोटाला कुठल्या वृत्तपत्र वा वाहिनीने कधीतरी ब्रेकिंग न्युज कशाला बनवलेले नाही? अगदी कोर्टात खोटे उघडे पडल्यावर पुढल्या निवडणूकीत सोनियांनी प्रतिज्ञापत्र बदलण्यापर्यत मामला गेलेला आहे. पण कोण हरीचा लाल त्यावर बातमी द्यायला राजी नाही, की ब्रेकिंग न्युज बनवत नाही. यांचा सेक्युलर खरेपणा किती खोटारडा असतो ना?

सोनियांचा खोटेपणा स्वामी यांनी कोर्टात जाऊन चव्हाट्यावर आणल्यानंतरही जे ‘भूई’मूग गिळून गप्प बसले, त्यांना तावडेंच्या ज्ञानेश्वर विद्यापिठाच्या मान्यतेचा आणि प्रमाणपत्राचा खोकला कशासाठी होतो? तावडे यांनी सोनियासारखा खोटारडेपणा केला नाही हीच पोटदुखी आहे, की तावडे खरे बोलतात याचा पोटशूळ आहे? माध्यमे आणि आजकालचे पत्रकार किती खोटारडेपणाच्या आहारी जाऊन मुर्खपणा करू लागलेत, त्याचे प्रमाणपत्रच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सादर केले म्हणायचे. अन्यथा या बाबतीत इतका गदारोळ करायचे काहीही निमीत्त नाही की कारण नाही. पहिली गोष्ट म्हणजे, निवडणूक लढवण्यासाठी आयोगाने वा घटनाकारांनी कुठलीही शैक्षणिक पात्रता घातलेली नाही. कामराज, वसंतदादा, किसन वीर, यासारखे दांडगे राजकीय नेते या देशात होऊन गेले, त्यांची शैक्षणिक पात्रता काय होती? देशामध्ये दिर्घकाळ सत्ता राबालेल्या इंदिरा गांधी वा राजीव गांधी यांची शैक्षणिक पात्रता काय होती? त्यांना कुठल्या विद्यापिठाने पदवीची प्रमाणपत्रे बहाल केलेली होती? म्हणजे विनोद तावडे यांच्या शैक्षणिक पात्रतेचाही विषय वादाचा होऊ शकत नाही. मुद्दा आहे तो त्यांच्या प्रतिज्ञापत्राचा नाही किंवा त्यांच्या प्रमाणपत्रांचाही नाही. त्यांना पदवी प्रदान करणार्‍या विद्यापिठाच्या मान्यतेचा आहे. म्हणजेच आक्षेप घ्यायचे असतील, तर त्या विद्यापिठाविषयी घेता येतील. भारताला स्वस्तातला संपुर्ण देशी बनावटीचा सुपर कॉम्प्युटर अविष्कृत करून देणारे विजय भटकर ज्या विद्यापिठाचे कुलगुरू म्हणून काही वर्षे होते, असे हे विद्यापिठ आहे. त्याला अनुदान आयोगाची मान्यता नाही, म्हणून तिथले शिक्षण गुन्हा असतो काय? समस्या काय आहे? समस्या सोपी साधी सरळ आहे. विनोद तावडे संघाचे स्वयंसेवक आहेत, भाजपाचे नेते आहेत आणि म्हणूनच ते गुन्हेगार आहेत. बाकीचा तपशील दुय्यम असतो.

इंग्रजीमध्ये एक उक्ती खुप प्रसिद्ध आहे. जर एखाद्या व्यक्तीला वा समाजाला आपण कुठली गोष्ट पटवून देऊ शकत नसलो, तर त्याच्या मनाचा गोंधळ उडवून देणे हा उत्तम डावपेच असतो. सध्या अनेक बाबतीत नेमकी तीच खेळी भाजपा वा मोदी विरोधक खेळत आहेत. मग सुषमा स्वराज व ललित मोदीचा वाद असो किंवा योगादिनी मोदींनी परिधान केलेले तिरंगी उपरणे असो. त्याबद्दल लोकांच्या मनात संशयाचे पिल्लू सोडून देण्याचा उद्योग जोरात सुरू आहे. दिसत नसला तरी नाकाला वास येतो म्हणून धूर आहे असा दावा आधी करायचा आणि तुम्ही समाधानासाठी वास येतो हे मान्य केले, की धूर आहे, म्हणजे आग असणारच; इतके धडधडीत खोटे रेटून बोलायची स्पर्धा माध्यमात लागलेली आहे. अन्यथा तावडे यांच्या बाबतीत उंदिर पोखरून डोंगर काढण्याचे काही तर्कसंगत कारण दिसत नाही. उमेदवाराने आपल्या बाबतीत सत्य माहिती लोकांपुढे ठेवावी, असा दंडक आहे. अगदी अनेक खुनाचे व बलात्काराचे गुन्हे असलेले लोकही तशी माहिती देत असतात. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला पात्र उमेदवार मानले जात असते. तावडे यांनी तर म्हणावा असा कुठला दखलपात्र गुन्हाही केलेला नाही, की प्रतिज्ञापत्रात कुठलाही खोटेपणाही केलेला नाही. मग तमाम अविष्कार स्वातंत्र्यवादी न्यायाधीशाच्या भूमिकेत येऊन शिक्षा फ़र्मावण्याचा तमाशा कशाला करीत आहेत? त्यांच्या अशा न्यायाधीश होण्याला कुठल्या ‘अनुदान’ आयोगाने प्रमाणपत्र वा मान्यता दिलेली आहे? आरोप ठेवायचा आणि तोच पुरावा म्हणून काहूर माजवायचे. मग गुन्हा सिद्ध झाला म्हणून थेट फ़ाशी लटकवायला निघायचे. ह्याला कुठल्या अर्थाने सुसंस्कृत बुद्धीजिवी म्हणता येईल? मात्र फ़ुले आंबेडकर शाहूंच्या भाषेत याला ब्राह्मण्य नक्की म्हणता येईल. हा सगळा बामणी कावा नक्कीच आहे. पुरोगामी चळवळीचा सेक्युलर बामणांनी घेतलेल्या बळीचा हा उत्तम दाखला नक्कीच आहे. (अपुर्ण)

सोनियांचे शिक्षण- पुढील व्हिडीओ बघा
https://www.youtube.com/watch?v=-BfdiWpICo4


8 comments:

  1. नेहमीप्रमाणेच आपले परखड स्पष्ट विचार विचारपूर्वक आणि निःपक्षपाती आहेत ह्यात संदेह नाही पण ह्याबरोबर एका महिलेचा फोटो आला आहे तो कशासाठी असा विचार आला धन्यवाद,

    ReplyDelete
    Replies
    1. लेखामध्ये सोनिया गांधींच्या शैक्षणिक पात्रतेचा विषय आला आहे म्हणून त्यांचा फोटो आहे.

      Delete
  2. अगदी योग्य आणि समर्पक भाऊ! तावडेसाहेबांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. फक्त एक सांगावेसे वाटते की आपली पत वाढवण्यासाठी का होईना, त्यांनी या पदवीचा वापर केला असेलतर त्यांनी पुढे अशा पदवीचा उल्लेख टाळावा. कारण ते आता शिक्षणमंत्री आहेत.

    ReplyDelete
  3. जेवताना TV बघू नये. उलटी होण्याची शक्यता असते.

    ReplyDelete
  4. Tya mahileni kelela tichya shikshanabaddalcha daavaa wachakani tapasun pahava ashi lekhakachi iccha asavi

    ReplyDelete
  5. ज्ञानेश्वर विद्यापीठ ट्रस्ट ही संस्था कशी चांगली आहे याबद्दल ही बरेच ऐकायला मिळाले . मुळात तावडे यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या दर्जा बद्दल वाद नाहीच मुळी . वाद आहे तो त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या चुकीच्या तपशीलाचा . ते म्हणतात संस्थेला विद्यापीठाचा दर्जा नाही , अभ्यासक्रमाला सक्षम प्राधिकरणाची मान्यता नाही हे मला माहित होते मग २०१४च्या आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी B . E . असे लिहिणे ही पहिली चूक दुसरी एक महत्वपूर्ण चूक त्यांच्या हातून घडली आहे ती म्हणजे संस्थेचे नाव लिहिताना ते ज्ञानेश्वर विद्यापीठ (ट्रस्ट ) असे लिहिण्या ऐवजी त्यांनी ज्ञानेश्वर युनिव्हर्सीटी असे नमूद केले आहे(त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात पान ८ वर ) , यातून ती संस्था विद्यापीठ आहे असे भासवण्याचा प्रयत्न झाला आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे . संस्थेच्या नावाचं निम्या भागाचे असे भाषांतर त्यांनी का केले ?
    विनोद तावडे एक कार्यक्षम मंत्री आहेत. शिक्षणा बद्दल त्यांचे विचार ही प्रागतिक आणि पुरोगामी आहेत असे असताना B . E . या अधिकृत रित्या न मिळवलेल्या उपाधीचा मोह त्यांना का पडावा ?











































































    ReplyDelete
  6. मात्र फ़ुले आंबेडकर शाहूंच्या भाषेत याला ब्राह्मण्य नक्की म्हणता येईल. हा सगळा बामणी कावा नक्कीच आहे. पुरोगामी चळवळीचा सेक्युलर बामणांनी घेतलेल्या बळीचा हा उत्तम दाखला नक्कीच आहे. (अपुर्ण)
    या मध्ये जात कुटून आली हे सांगू शकाल. कि काही वाई झाले कि ब्राम्हनावर खापर फोडायचे

    ReplyDelete
  7. bramhanya mhanale ki goshti baddal man sahaj kalushit karta yet na pawar saheb...
    ata tumhi pawar mhanlyawar bramhan ekal ki aag lagnar he upajatach aal he amhi samju shakto...

    shahu, fule, ambedkar yanchi nav ghyaychi ani bramhanabaddal baralat rahayach hach tumchya sarkhyancha udyog..

    pan asa kahi baralnyachya adhi swatantrya chalawalitle barech krantikari bramhan hote he visarlat...
    barech samaj sudharak bramhan hote he hi visarlat..
    barech lok (thode jastcah) scietist hote ani ahet he hi visarlat..

    aso tumcya kadun apeksha hi nahi karan he sagal samajnyasathi satsat vivek buddhi jagrut thevavi lagate, ti apeksha kalach buddhichi olakh zalelyankadun kashi karavi...

    ReplyDelete