भर गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी आठ ते अकराच्या सुमारास तुम्ही दादर वा तत्सम कुठल्या रेल्वे स्थानकाच्या फ़ुटओव्हर ब्रीजवरून जात असाल, तर एक धमकावल्यासारखा आवाज कानी पडतो. विनाविलंब इतक्या गर्दीतही लोक अंग चोरून पांगतात आणि त्या आवाजाला रस्ता मोकळा करून देतात. मुंबईकरांना तो आवाज आणि ते शब्द चांगलेच परिचित आहेत. ‘मच्छीका पानी’ हेच ते शब्द होत. त्याचा अर्थ मागून वा समोरून कोणी तरी मासळीची टोपली घेऊन वेगाने येतो आहे आणि वेळीच बाजूला सरकले नाही, तर त्या मासळीचे दुर्गंधीयुक्त पाणी तुमच्या अंगावर सांडेल, अशी ती एकप्रकारची धमकीच असते. त्यालाही पर्याय नसतो. डोक्यावर ओझे आणि मुंगी शिरायला जागा नाही, अशा गर्दीतून असा माल वाहून नेताना कोणाच्या तरी अंगावर ती दुर्गंधी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच ते ओझे वाहून नेणारा इशारेवजा आवाज देत असतो. मात्र त्यामुळे आपला वचक वा धाक प्रवासी पादचार्यांना असल्याच्या भ्रमात तो भारवाहक नसतो. उगाच लोकांना त्रास नको आणि आपल्यालाही अवजड ओझ्याचा त्रास नको, म्हणून ती युक्ती वापरली जात असते. त्याबद्दल कोणी तक्रारही करीत नाही. पण उद्या त्यामुळे त्या भारवाहकाने आपणच मुंबईचे वा त्या स्थानकाचे अनभिषिक्त बादशहा आहोत असा आव आणला, तर लोक त्याला वेड्यात काढणार ना? तिथेच कशाला इतरत्र तसे वागणार्याकडे लोक त्याच नजरेने बघणार. यापेक्षा काही वेगळे होत नसते. निखील वागळे याच्या युट्युबवर अपलोड करण्यात आलेल्या ऑडिओ टेपचे संभाषण अनेकांनी आग्रह केल्यामुळे मुद्दाम वेळ काढून ऐकल्यावर माझी हीच पहिली प्रतिक्रिया आहे. आपल्या ओरड्याने लोक गप्प होतात. म्हणून नित्यनेमाने आगावूपणा करणार्या निखीलची माध्यमातील गुणवत्ता वा दरारा, त्या ‘मच्छीका पानी’वाल्या भारवाहकापेक्षा अधिक नाही. मात्र त्या हमालाकडे जितका प्रामाणिकपणा वा समजूतदारपणा आहे, त्याचा लवलेशही निखीलमध्ये आढळत नाही. म्हणूनच पादचारी प्रवाशांकडून मच्छीवाल्याने मार खावा, तशी निखीलची अधूनमधून चंपी होत असते. तो लोकांच्या तिरस्काराचे प्रतिक होऊन जातो. अर्थात त्यामागेही त्याची एक पदधतशीर योजना व हेतू असतो. तो हेतू कुठला त्याचा सविस्तर खुलासा निखीलचा जुना सहकारी व माजी पत्रकार कपिल पाटील याने केलेला आहे.
आपल्या उथळ व सनसनाटी माजवण्याच्या हव्यासामुळे निखील काही प्रमाणात लोकांचे लक्ष वेधून घेतो. पण जेव्हा त्याच ओरडाआरड्यात तोचतोचपणा येऊ लागतो, तेव्हा लोकही तमाशाला कंटाळतात आणि निखीलकडे पाठ फ़िरवतात. मग काहीतरी करून पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेण्य़ासाठी निखील कुरापत काढतो आणि मुद्दाम वाद अंगावर ओढवून घेतो. त्यातही यश आले नाही, मग ‘मच्छीका पानी’ कुणाच्या तरी अंगावर सांडून आपल्यावर हल्ला होईल, अशी योजना निखील शिजवतो आणि अंमलात आणतो. अलिकडेच त्याच्या ‘मी मराठी’ वाहिनीवरील कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि निखील परत शेफ़ारला. सहाजिकच त्याकडे लोक दुर्लक्ष करू लागले. मग पुन्हा लोकांची सहानुभूती वा लक्ष खेचण्यासाठी निखीलचे नाटक सुरू झाले आहे. हे निखीलतंत्र काय आहे? कपील पाटिलच्या शब्दात सांगायचे तर...‘वाद अंगावर ओढवून घेण्य़ात वागळेंना मजा येते. त्यातील नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हेही सांगितलेच पाहिजे.’ अठरा वर्षापुर्वी कपिल पाटिलचा ‘आज दिनंक’ बंद पडला, तेव्हा त्याच्या दु:खावर चोच मारण्यातला विकृत आनंद घेताना निखीलने लिहीलेल्या लेखाला उत्तर देणारा लेख ‘सांज दिनांक’ या नव्या दैनिकात कपीलने लिहीला होता. त्यात त्याने निखीलचे संपुर्ण वस्त्रहरण करून टाकले होते. त्यातच उपरोक्त विधान आलेले आहे. पण पुढे खुलासा करताना निखीलने त्याचा कधीच प्रतिवाद केलेला नव्हता. इथेही जे कोणी अनिरुद्ध जोशी आहेत, त्यांच्याशी बोलताना कोण मुद्दाम खाजवून खरूज काढतो आहे व अंगावर घ्यायला उतावळा झालेला आहे, त्याचे प्रत्यंतर सहज येऊ शकते. त्यात ‘मच्छीका पानी’ घेऊन कोण अंगावर जातो आहे, ते नुसत्या शब्दातून लक्षात येऊ शकते. मध्यंतरी ‘मी मराठी’ वाहिनी पहिल्या क्रमांकावर पोहोचलेली होती आणि त्याचे श्रेय अर्थातच निखीलने ‘पॉइंन्ट ब्लॅन्क’ आपल्याकडे घेतल्यास नवल नाही. पण त्यामुळे शेफ़ारला आणि अतिरेक सुरू केल्यावर लोकांनी तिकडे पाठ फ़िरवली. परिणामी त्या वाहिनीची घसरगुंडी झाली. मागल्या आठवाड्यातच पहिल्या पाच मराठी वाहिन्यातही मी मराठीचा नंबर नव्ह्ता. मग निखील आपल्या मू्ळ स्वभावाकडे आल्यास नवल कुठले? वाद व हल्ले ओढवून घ्यायचे आणि त्यातून प्रसिद्धीझोतात रहायचे, हीच निखीलची मागल्या दोन तीन दशकातील कारकिर्द राहिली आहे. कपिल त्याच्या सोबत तीन वर्षे महानगरी पत्रकारीता केल्यावर लिहीतो.....‘महानगरचा खप प्रचंड घसरला आहे. हे मुंबईतला कोणताही पेपेरस्टॉलवाला सांगेल. खपाचा आकडा घसरला की वागळे वाद उकरून काढतात.’
ह्याला निखीलतंत्र म्हणतात. आजवर निखील वागळे यांनी वैचारिक प्रबोधनाला हातभार लागेल असे कोणते लिखाण वा पत्रकारिता केली, त्याचा शोध घेतल्यास निव्वळ वाद उकरून काढण्यापलिकडे काहीच हाती लागणार नाही. ‘लोकमत’ वाहिनी असो किंवा महानगर सांजदैनिक असो, त्यावरच्या हल्ल्यामुळे निखील वागळे नाव लोकांपर्यंत पोहोचले. कुठल्या एका लेखामुळे वा भूमिकेमुळे सामाजिक अभिसरणाला हातभार लागला असे कोणी दाखवू शकणार नाही. पण ज्यांना अशाप्रकारे शिवसेना वा भाजपा संघ अथवा हिंदूत्ववादी यांच्याशी दोन हात करता येत नाहीत, इतके दौर्बल्य आलेले आहे, त्यांच्यासाठी निखील लाडका होऊन गेला. गलितगात्र झालेल्या आंबटशौकी लोकांमध्ये लैंगिक सुख घेण्य़ाची वा अनुभवण्याची कुवत उरलेली नसते. असे लोक हावर्या नजरेने तरूणीचे निरीक्षण करतात किंवा पौगंडावस्थेतील मुलेही अश्लिल चित्रे-चित्रपट बघायला धावतात. त्यापेक्षा निखीलच्या डाव्या पुरोगामी पत्रकारितेला अधिक महत्व नाही. शिवसेनेशी दोन हात करायची संघटनात्मक ताकद गमावून बसलेल्या अशा पक्ष संघटनांना मागल्या दोन दशकात निखीलवरील हल्ल्याच्या निमीत्ताने एकत्र येण्याची संधी मिळत गेली. निखीलही खप वा टिआरपी घसरली, मग अशा आंबटशौकीनांचा आपल्या व्यापारासाठी मोठ्या चतुराईने वापर करून घेत आला. त्यासाठी कुरापत काढणे, मुद्दाम कुणाला डिवचणे वा अपमानित करणे हेच त्याचे साधन राहिले आहे. उपरोक्त ध्वनीमुद्रण ज्यांनी ऐकले आहे, त्यांनी बारकाईने निखीलची भाषा, सूर व शब्द ऐकावेत. त्यात भांडायला कोण उतावळा झालेला आहे, त्याची प्रचिती सहज येते. त्यासाठी कोणा तज्ञ जाणकाराचे मत घेण्याची गरज नाही. हा जो कोणी अनिरुद्ध जोशी आहे, तो आपल्या परीने सातत्याने आदरार्थी व संयमी भाषा बोलतो आहे आणि निखील त्याला पदोपदी कायद्याची व फ़ुले आंबेडकरांची सभ्यता अतिशय अर्वाच्य भाषेत ऐकवतो आहे. विचारांनी प्रवृत्त झालेल्यांना कधीच अर्वाच्य भाषा व शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत. पण निखील एकही वाक्य संयमाने बोलू शकत नाही, तो त्याचा स्वभाव आहे आणि मग त्याचीच प्रचिती अनेकदा त्याच्या कल्लोळ चर्चेत येत असते. ज्याचा थाट त्या रेल्वेपुलावरच्या ‘मच्छीका पानी’सारखा असतो. जवळ आलात वा अंगाला हात लावलात तर तुमच्याही अंगाला दुर्गंधीच येईल, असा धमकी त्यात असते. अशा माणसाने अनिरुद्ध जोशीला कायद्याची धमकी द्यावी, हा विनोद नाही काय? असो बिचार्या त्या अनिरुद्धने खुप आधीच कपिल पाटिलचा तो जुना लेख काळजीपुर्वक वाचला असता, तर निखीलच्या वाट्याला गेलाच नसता. कपीलने निखीलशी जवळीक वा सलगी म्हणजे काय, त्याचा खुलासा स्वानुभवातून १९९६ सालातच करून ठेवला आहे. जोशी वा अन्य कोणी तत्सम असतील त्यांच्यासाठी कपीलने दिलेला तो इशारा महत्वाचा आहे. त्यातच निखीलच्या दबदब्याचे सार सामावलेले आहे. काय म्हणतो कपिल?
‘निखील वागळे यांच्या तोंडाला तोंड लावणं म्हणजे स्वत:ला एडस लावून घेणं. म्हणून वागळेंच्या तोंडाला कोणी लागत नाही असं म्हणतात.’
हा आवडला भाऊ! ".....त्यापेक्षा निखीलच्या डाव्या पुरोगामी पत्रकारितेला अधिक महत्व नाही."
ReplyDeleteकडक! मी-मी-मी-मी खिल वट-वागळे
निखिल वागळे सोबत आता कुमार केतकरांचे नाव सुद्धा जोडणे आता योग्य होईल. कालच त्यांच्या चॅनल वर एक कार्यक्रम पाहिला. आमंत्रित वक्त्यांना आधी डिवचणे, नंतर त्याचे प्रत्युत्तर देण्याची संधी न देणे, कुत्सितपणे व अपमानास्पद बोलणे असा काहिसा प्रकार होता. आश्चर्य म्हणजे केतकर सुद्धा यामध्ये सामिल होते. ते सुद्धा वागळेंच्या पातळीवर उतरले आहेत. केतकरांबद्दल उरलासुरला आदर आता संपला. हे दुर्दैव आहे.
ReplyDeletemhanaje ajunahi tya Ketkara baddal aadar hota ki kay?
DeleteBhau ek no mast...
ReplyDeleteभाऊ ,वागळ्यांच्या टाॅकशो बद्दल एक निरिक्षण नोंदवले आहे..
ReplyDeleteआपण थोडा यावर प्रकाश टाकावा...
हे ग्रहस्थ सर्वज्ञपणाचा आव आणत चर्चेच्या प्रत्येक सेगमेंट नंतर चर्चाविषयावर पोल जाहिर करतात ज्यामध्ये सकारात्मक वा नकारात्मक मतांची केवळ टक्केवारी सांगितली जाते परंतु एकूण प्राप्त मतांची तसेच सकारात्मक वा नकारात्मक मतांची संख्या मात्र सांगितली जात नाही..
यामधेही एक चलाखी अशी असते की प्रत्येक पोलगणिक वागळे त्यांना सोईस्कर ,योग्य वाटणार्या प्रतिसादाची टक्केवारी वाढलेली दर्शवतात त्यातून माझ्या चर्चेतून जनमानस किती प्रभावित होत आहे ;असा अहंगंडात्मक सूर आळवत उपदेशाचे डोस पाजत असतात.
खरे तर वादग्रस्त चर्चांचे संचालन करताना संचालकाची भूमिका ही तठस्थ असायला हवी मात्र पूर्वग्रह ठेऊन वैचारिक/विनोदी टोमणे मारणे,वेड्यात काढणे,दटावणे, अडचणीच्या मुद्याना वेळ न देणे इ.कृप्त्या वापरून तसेच आपल्या आविर्भावात्मक बेरकी डोळ्यांच्या हलचालीतून वागळे महाशय आपले सर्वसमावेशक नसलेलीे एककल्ली दुराग्रही विचारसरणी समाजावर थोपवण्याचाच प्रयत्न करतात की काय?अशी शंका येते.
अर्थात ही सर्व धडपड समजल्यावर पाँईट ब्लँक हा टॉकशो न रहाता बिग बाॅस चे वैचारिक पुरोगामी पण काॅमेडी वर्जन म्हणून एन्जॉय करण्यात काहीच हरकत नाही(वेळ असेल तर)!!!
वागळे आणि केतकर एकाच माळेचे मणी आहेत
ReplyDeleteभाऊराव,
ReplyDeleteतुम्ही म्हणता ते संभाषण बहुधा इथे आहे : http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
निखील वागळे या माणसाच्या वागण्याचा ताळतंत्र सुटला आहे.
वागळे ५ मिनिटे १० सेकंदांनी म्हणतात की मी मेलो तरी भूत बनून तुमच्या मागे लागेन. दाभोलकरांना अव्द्ल्म असतं का हे वक्तव्य?
वागळे २ मिनिटांनी म्हणतात की, 'मी माझी जात आणि धर्म केव्हाचा सोडला आहे. आता आंबेडकरांप्रमाणे दुसऱ्या धर्मात जाईन तेव्हा तुमचे डोळे उघडतील.' आयशप्पत मेलो हसून हसून. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभट्टाची तट्टाणी. कुठे आंबेडकर आणि कुठे वागळे! वागळ्यांना तातडीने वेड्यांच्या इस्पितळात दाखल करायला पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
डावखुऱ्या गलितगात्रांसाठीचा पोर्नस्टार ... चपखल वर्णन भाऊ! व्वा, मान लिया ~
ReplyDeletenikhil veda zala ahe sir.
ReplyDeleteनिखिल वागळेंनी पत्रकारतेला एक नवा मापदंड दिला हे नाकारता येत नाही. निखिल वागळेला गुणदोषांसकत स्वीकारावे लागते. लोकांना निखिलचे हे गुण दोष माहित असल्यामुळे त्याला डिवचून मग त्याचे रेकॊर्डिंग करायचे असे काही झाले असावे. निखिल काही पत्रकारितेतला आदर्श नाही. त्याला प्रसिद्धीच तंत्र उमगले आहे हे नक्की!
ReplyDeleteभाऊ, आपण आशा बोगस माणसा वर लेख लिहिला हे आश्चर्यजनक आहे असो सुंदर लिखाण
ReplyDeleteभाऊ, हेच निखिल वागळे अनेक चॅनेल बदलून आले
ReplyDeleteBhau Mikhail ha swatachich Timmki
ReplyDeletevajaoto
भाऊ,किती योग्य शब्दात "वागळे की दुनिया"चा पट उलगडलात. आपल्या या धाडसाबध्दल धन्यवाद.वागळेंंची भाषा,त्यांंची देहबोली.,..अक्षरशः वीट आला तेव्हा पाहणे व ऐकणे सोडून दिले.पत्रकारिता कशी नसावी व पत्रकार कसा नसावा याचे उत्तम व आगळेवेगळे उदाहरण म्हणजे वागळे!!
ReplyDeleteएखाद्या मूर्ख दारुड्याचे गर्विष्ठ पणे बोलणेही संयमित वाटेल वागळे च्या विश्लेषण पद्धतीच्या तुलनेत. हल्ली कीव येते त्याची.
ReplyDeleteBhau you rock, Nikhil will roll!
ReplyDeleteकाहीतरी कोणावर बोलायचं म्हणून बोलत रहावं यापलिकडे निखिल वागळे यांना कळत नाही. विनाकारण स्वतःचे तोंड खराब करवून घेण्यात वागळे पटाईत आहेत. अशी मानस पत्रकारितेला लागलेली कीड आहे.
ReplyDelete