Thursday, December 10, 2015

‘गळेपडू’ विश्वासघाताचा सज्जड पुरावा

Shortly before he sent the messages he also posed for a series of pictures with strangers carrying a placard that read: 'I am Muslim, I am labelled a terrorist, I trust you, do you trust me enough for a hug?'

हल्ली एक गोष्ट माझ्यासाठी खुप सोपी झाली आहे. रोज ब्लॉग लिहीताना मला फ़ारसे कष्ट पडत नाहीत. मला सर्वच बातम्या शोधत बसाव्या लागत नाहीत. सातत्याने माझे ब्लॉग लेख वाचणारा वाचक बराच जागरुक झाला आहे आणि तोच मला अनेक विषय पुरवित असतो. विषय चांगल्या सुटसुटीत भाषेत मांडण्यापुरती मला मेहनत करावी लागते. महेश पाटिल हा असाच एक फ़ेसबुक मित्र आहे. त्याने मला उद्देशून एक पोस्ट बुधवारी टाकली. त्याला माझ्या एका जुन्या लेखाचा संदर्भ होता. पॅरीसच्या घातपाती बॉम्बस्फ़ोटानंतर तिथे जमलेल्या गर्दीत एक मुस्लिम तोंडावर आवरण घेऊन उभा राहिला होता. ‘आपण मुस्लिम असलो तरी दहशतवादी नाही आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ अशा अर्थाचा फ़लक घेऊन तो त्याच चौकात उभा होता आणि अनेक फ़्रेंच नागरिकांनी विश्वासाने त्याला आलिंगन दिले. तेव्हा अशी बातमी झळकली होती. तो संदर्भ घेऊन मी मुंबईतील एका दोन महिने जुन्या घटनेशी ती जोडली. मुस्लिमांनी अन्य धर्मिय वा बिगर मुस्लिमांचा विश्वास असा संपादन करण्यापेक्षा कृतीतून काही करावे, असा माझा मुद्दा होता. कारण आज जगाची स्थिती मुस्लिमांवर अविश्वास दाखवावा अशी आहे आणि त्याला मुस्लिमांविषयी इतरांचा गाफ़ील विश्वासच कारणीभूत असल्याचे मी स्पष्ट शब्दात मांडले होते. असल्या स्वरूपाचे आवाहन वा कृती विश्वास संपादनापेक्षा कांगावखोरी आहे, असाही आक्षेप मी घेतला होता. त्याला परिस्थिती कारणीभूत आहे. तो माझा पुर्वग्रह नाही किंवा अन्य कुणाचाही मुस्लिम द्वेष त्याचे कारण नाही. जगभरच्या मुस्लिमातील बहुतांश लोकांचे वर्तन त्याला कारण आहे. हा दावा इतक्या लौकर खरा ठरेल, अशी माझी अपेक्षा नव्हती. पण महेश पाटिल या जागरूक वाचकाने त्याचा पुरावाच समोर आणला.

मी लिहीतो तेव्हा मला आधी काही गोष्टी ठाऊक असतात, की बातम्या पेरण्याचे काम मी करतो, असे पाटिल यांनी आपल्या पोस्टमधून विचारले आहे. त्याचे उत्तर सोपे आहे. मला बातम्या आधी कळत नाहीत, तर प्रत्येक बातमीतून मी काही बोध घेत असतो आणि पर्यायाने तोच वाचकासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. याही बाबतीत वेगळी गोष्ट नव्हती. आजवरच्या बातम्यांच्या आधारे मी अशा आलिंगनाच्या प्रयत्नाला कांगावा ठरवले होते. आणि त्याची साक्ष लंडनच्या एका मुस्लिमाने दिली आहे. पॅरीसच्या घटनेनंतर पाश्चात्य देशात सिरीया व एकूणच जिहादविषयी कमालीची कटूता निर्माण झाली आणि आपापल्या देशावर सिरीयातील आयसिस जिहादींवर हल्ले करण्याचे दडपण यायला सुरूवात झाली. फ़्रान्सच्या अध्यक्षांनी तर विनाविलंब हल्ले सुरू केले आणि अन्य देशांनी तशी तयारी सुरू केली. ब्रिटीश सरकारने त्यासाठी संसदेची संमती मागितली, त्यावर लोकमत विभागले गेले. त्याच्या आधी महंमद मुजाहिद नावाच्या मुस्लिमाने ब्रिटनमध्ये नेमका असाच खेळ केला होता. ‘आपण मुस्लिम असून तुमच्यावर विश्वास ठेवतो मला आलिंगन द्या’ म्हणून तमाशा मांडला होता. मात्र संसदेत हा विषय आल्यावर त्याचा नूर बदलला. त्यात हल्ले करण्याच्या बाजूने मत देणार्‍या हुजूर पक्षाच्या महिला सदस्याला त्याने थेट बॉम्ब फ़ेकून मारण्याची धमकी देण्य़ापर्यंत मजल मारली. हा चेहरा खरा मानावा की त्याच्याआधी फ़लक झळकवून आलिंगन मागणारा त्याच व्यक्तीचा चेहरा खरा मानावा? मुद्दा स्पष्ट आहे. तुम्ही विश्वास ठेवाल तिथपर्यंत ठिक आहे. पण तुमचा विश्वास नसेल तर काय? सिरीयासाठी तोच मुस्लिम थेट स्वदेशी संसद सदस्याच्या घरावर बॉम्ब फ़ेकण्याची धमकी देण्यापर्यंत जातो? यातल्या कोणावर आपण विश्वास ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे.

माझा दावा खरा ठरला असे मला अजिबात म्हणायचे नाही. कारण तीच वस्तुस्थिती आहे. आणि तसाही पुन्हा माझा दावा नाही. विवेकबुद्धी शाबुत असलेले अनेक मुस्लिमही त्याचीच ग्वाही देत असतात. काही दिवसांपुर्वी मी सौदी अरेबियातील खलाफ़ अल हरबी याची साक्ष काढली होती. त्याच्याही आधी म्हणजे बारा वर्षापुर्वी अब्दल रेहमान अल रशीद नावाच्या सौदी पत्रकारानेही तेच म्हटले होते. न्युयॉर्कच्या हल्ल्याला एक वर्ष पुर्ण होत असताना बिटनमधून प्रसिद्ध होणार्‍या अल शिर्क या नियतकालिकात रशीदने लेख लिहिला होता आणि तोच लेख दिर्घकाळ सौदीच्या ‘अरब न्युज’ या वेबसाईटवरही दिसत होता. त्याचे शिर्षकच थक्क करणारे होते. मुस्लिमांना आवाहन करणार्‍या त्या लेखाचे शिर्षक होते, ‘जागे व्हा! जवळजवळ सगळेच दहशतवादी मुस्लिम आहेत.’ जगातले सगळे मुस्लिम दहशतवादी नाहीत. पण जवळपास सगळे दहशतवादी तर मुस्लिम आहेतच ना? असे स्पष्ट शब्दात मांडताना रशीद यांनी रशियापासून अफ़गाण, युरोप, अमेरिका व आशियातील अनेक देशातल्या घातपाती हिंसाचाराचे दाखले दिलेले होते. त्यात कुठे बिगर मुस्लिमांचा समावेश नव्हता. जगातल्या आजच्या घडामोडी बघितल्या, तर किती टक्के हिंसाचार व दहशतवादी कृत्ये बिगरमुस्लिमांनी केलेली आपण दाखवू शकतो? भारतात तुम्ही हा विषय काढा, मग तुमच्या तोंडावर मालेगावची एक घटना मारली जाते. अधिकच झाले तर समझोता एक्सप्रेस वा कुठल्या तरी दंगलीचे दाखले दिले जातात. पण त्याचे प्रमाण कोणी सांगत नाही. त्यामुळेच सामान्य मुस्लिमाच्या नावावरही जिहादींचे कृत्य चिकटत असते. जगातल्या बहुतांश दहशतवादी घटना करणार्‍यात मुस्लिमच आपल्या धर्माचा झेंडा घेऊन पुढे येताना दिसत असतील, तर तोच निष्कर्ष काढला जाणार. तो पुसून काढायची जबाबदारी म्हणूनच सामान्य मुस्लिमांची आहे.

हा कलंक वा आरोप पुसून टाकायचा असेल, तर आलिंगनाचे नाटक पुरेसे नाही. त्यापेक्षाही पुढे जाऊन आपण जिहादी मुस्लिमांशी संबंधित नाही, याची साक्ष मुस्लिमांनी देण्याची गरज आहे. त्यासाठी धर्मामुळेच आपल्यावर अन्याय होतो असले कांगावे बंद करावे लागतील. हाच लंडनचा मुस्लिम घ्या. एका बाजूला तो विश्वासाच्या गोष्टी करतो आणि दुसर्‍या क्षणी थेट बॉम्बहल्ला करायची धमकीही देतो. ब्रिटीश नागरिक असून त्याला सिरीयातील मारल्या जाणार्‍या मुस्लिमांची चिंता आहे. पण मारला जाणारा मुस्लिम इसिसकडून मारला गेल्याची त्याला अजिबात फ़िकीर नाही. तो मुस्लिमांना मारणार्‍या व बेघर निर्वासित करणार्‍या इसिसला दोष देत नाही. पण त्याच इसिस नावाच्या जिहादी सैतानावर ब्रिटीश सेना हल्ला करणार म्हटल्यावर त्याला फ़िकीर वाटते आहे. तो लगेच बॉम्ब हातात घ्यायला निघाला आहे. कालपर्यंत त्याच्या गळ्यात गळे घालायला गेलेल्यांच्या विश्वासाचे आता काय? त्यांनी कोणाला आलिंगन दिले? मृत्यूला की विश्वासाला आलिंगन दिले? चांगुलपणा हा दुर्गुण नाही. पण गाफ़ील चांगुलपणा सर्वात जवळचा शत्रू वा शत्रूचे हत्यार असते. म्हणजेच आपल्या मारेकर्‍याला सर्वात भेदक हत्यार आपणच गाफ़िल विश्वासातून सोपवत असतो. डोळे सत्य दाखवत असतात. पण बुद्धी ठिकाणावर असली तरच त्याकडे बघता येते, विवेक शाबुत असला तरच आपला बचाव करता येतो. पण गाफ़िल चांगुलपणा यापैकी काही करू देत नाही. कुठल्याही देखाव्याला भुलून आपण आपल्याच संकटाला आमंत्रण देत असतो. ब्रिटनच्या या ‘गळेपडू’ प्रेमळ मुस्लिमाने त्याचीच साक्ष दिली आहे. म्हणून त्याला अटकही झाली आहे. त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे. अशा मुस्लिमांना रोखून व त्यांचे नाटक उघडे पाडून बाकीचे मुस्लिम इतरेजनांच्या मनात खरा विश्वास निर्माण करू शकतील. कारण अन्य कोणी मुस्लिमांवर विश्वास ठेवण्याची गरज नसून मुस्लिमांनी इतरेजनांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवण्याची गरज आहे. ते आलिंगनातून शक्य नसून आपल्याच आसपास वावरणार्‍या जिहादी व घातपाती मानसिकतेचे धर्मबंधू पकडून देण्याची कृती अधिक विश्वासार्ह ठरू शकेल.

http://www.dailymail.co.uk/news/article-3349803/Muslim-convert-faces-jail-threatening-bomb-MP-s-house.html

12 comments:

  1. सर, सलमान खटल्यावरील तुमचा लेख वाचण्यासाठी सारखं हे पेज रिफ्रेश करतो आहे मी!लवकरच येईल अशी अपेक्षा आहे!! :)

    ReplyDelete
  2. कोणत्या ही धर्मात असेच शिकवले जाते की शत्रु ला ग़ाफ़िल ठेवा नाहीतर जे दुर्गुण आहेत अपल्यात ते कोणा विरुद्ध वापरणार? क्रूरता कोणा वर दाखवणार ?
    म्हणूनच श्री कृष्णा ने अखंड सावधानते चा सल्ला दिला आहे.... हेच समजत नाही कोणाला...अणि शत्रु सतर्क असताना कोणीच त्याच्यावर हल्ला करायला जात नै गेला तर स्वतःच मार खाऊन येईल ना म्हणून जरसन्धा ची गोष्ट सर्वानी नेहमीच लक्षात ठेवयलाच हावी..

    ReplyDelete
  3. अत्युतम लेख, आणखी एक !!

    ReplyDelete
  4. http://www.nytimes.com/interactive/2015/12/10/nyregion/muslims-in-new-york-react-to-donald-trump.html?smid=fb-nytimes&smtyp=cur

    घ्या आता.. न्यूयॉर्क टाईम्सला आपल्या भारतीय मीडिया ने चावलं बहुतेक! फुकट दुनियादारीचे डोहाळे लागले!!

    ReplyDelete
  5. भाऊ .........सुंदर लेख !!! माय नेम इज खान आणि ' मी अतिरेकी नाही ' ........त्यानंतर श्रीयुत शाहरुख खान यांनी ओढून ताणून दाखविलेला ' निष्पाप ' ( ???? ) चेहरा ............अरे वा !! कित्ती कित्ती छान !! ........................................पेरिसच्या स्फोटानंतर तिथे उभा राहून ' मी अतिरेकी नाही ' असे साळसूद पणे म्हणणारा बघितल्यावर ' अफजलखान ' च आठवतो. या आणि आलिंगन द्या आणि मी तुमचा गळाच कापतो. ...................हिंदुस्तान मध्ये राहून ' धर्मनिरपेक्षतेचा आव आणणारे ' आणि विवेकबुद्धी शाबुत असल्याचे दाखविणारे ' पेज ३ ' मुसलमान सुद्धा मनातून ' मुस्लिम इथे बहुसंख्य झाले तर कित्ती कित्ती मजा येईल ' याच मानसिकतेत असतात.................काही वर्षांपूर्वी लिबिया चा कर्नल गडाफी जिवंत असताना त्याची ' बी बी सी ' वर मुलाखत झाली होती जी मी स्वतः बघितली होती आणि माझ्या पूर्णपणे ती स्मरणात आहे................तो म्हणाला होता कि आम्हाला आता ' अतिरेक्यांची ' गरजच भासणार नाही कारण युरोप वा अमेरिकेत आमची लोकसंख्या इतकी वेगाने वाढते आहे कि आम्ही तेथील प्रशासन ...........२०२० पूर्वीच ताब्यात घेऊ. याचा प्रत्यय पुढील १ ते २ वर्षात येईलच.

    ReplyDelete
  6. http://saudigazette.com.sa/world/secularism-the-beauty-of-india/

    ReplyDelete
  7. Bhau. This is very practical blog. Thanks for putting facts. Everybody must learned what is jihad.jihad is against every non muslim. And we are as a non muslim must fight against jihadi muslims.

    ReplyDelete
  8. मुस्लिमांनी कट्टरतेतुन बाहेर पडणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना भविष्यात फार मोठ्या संकटात सापडणार. .... विश्वास तर गमावला आहे. पण प्रत्यक्ष कृती मुस्लिमेतर करतील तेव्हा?

    ReplyDelete
  9. वर कोणीतरी एक ' सौदी मनुष्याच्या विधानाची लिंक पाठवली आहे ' धर्मनिरपेक्षता हीच हिंदुस्तानची सुंदरता आहे '...........वाचायला खूप छान वाटते. ...........वस्तुतः आखाती देशांना एक चिंता सतावते आहे. तेलाचे साठे अजून १० एक वर्षात संपून जातील. त्यानंतर तिथे काम करणारे सर्व इतर देशी काम करणारे आपापल्या देशात परततील. आताचे सर्व आखाती देशांचे राजे एके काळी ' सागरी चाचे / लुटेरे ' होते. अबू धाबी या आखाती देशातील एकाने नुकतेच तिथे ' नुकलीअर पॉवर प्लांट ' उभारला आहे. या सर्व देशांनी आफ्रिका व इतर देशांमध्ये लागवडीखालील जमिनी विकत घेऊन ठेवल्या आहेत. या सर्वांचा हिंदुस्तानवर डोळा आहेच. त्यामुळे येथे मुस्लीम बहुसंख्य होत नसतील तर किमान ' धर्मनिरपेक्ष ' तेचे भूत उभे करून काही ' जयचंद ' बनवून ठेवायचा हा प्लान आहे. नाहीतरी तेल सापडण्य़ापूर्वी या आखातातील राजांना ' येथील निजाम कडून भली मोठी आर्थिक रसद मिळत असे. त्यामुळे यापुढे हे ' आर्थिक आक्रमण 'असेल. पूर्वी महमंद घोरी पासून हिंदुस्तान वर आक्रमण करणारे मोठ मोठे सैन्य आणून येथे आक्रमण करीत असत.

    ReplyDelete
  10. Bhau tumche articles English madhe translate karta aale tar bagha. Jastit jast lokanparyant pohochayla madat hoil.

    ReplyDelete
  11. Ekdum kharay Bhau... Aho mazya office madhle muslim loka suddha itke vichitra ani krur vicharanche ahet... Vishwas basat nahi ki itke shiklele muslim loka pan ase kase vichar karu shaktat..!!

    ReplyDelete
  12. मा.लेखक महोदय तुमचा ब्लॉग च्या टॅग लाइन बद्दल अक्षेप नाही .पण तुमचे विचार ही कुनिकडे झुकलेले नसावेत एवढी सामान्य मानुस अपेक्षा ठेवतो,आणि तुमच्या कडून टी पूर्ण होतेय असे वाटत नाही.

    ReplyDelete