Friday, July 14, 2017

रोडगा वाहिन तुला

amarnath attack के लिए चित्र परिणाम

“Some ideas are so stupid that only intellectuals believe them.”   ― George Orwell

आपण प्रतिभावंत किंवा अलौकीक बुद्धीसामर्थ्याने प्रगल्भ झालो आहोत, अशी एकदा खात्री पटली, मग त्या सूज्ञपणाचे पोरकट प्रदर्शन मांडण्याची अनिवार आसक्ती माणसाला होत असते. बहुधा अशी माणसे सार्वजनिक जीवनात संपादक वा विचारवंत म्हणून प्रसिद्धी पावत असतात. सहाजिकच त्यांना जगातल्या सर्व समस्या व प्रश्नांचे जालीम उपाय ठाऊक असतात. पण मानव जमातीचे सुदैव असे असते, की सहसा अशा प्रतिभावान आत्ममग्न व्यक्तींच्या हाती सत्तासुत्रे जात नसतात. तशी ती गेली, मग त्या देशाचा व संस्कृतीचा र्‍हास अपरिहार्य असतो. त्यातही काही सूज्ञ लोक तर कुबेराच्या खजिन्यालाही लाजवील इतका पोरकटपण घेऊन जन्माला येतात आणि त्याचे जागोजागी प्रदर्शन मांडत असतात. वास्तविक आपल्या बुद्धीसामर्थ्याला कुठे म्हणून वापरण्याची संधीच मिळत नाही, अशा न्युनगंडाने त्यांना पछाडलेले असते. अन्यथा अशा लोकांनी सातत्याने सामान्य माणसाची निंदानालस्ती करण्यात आपला अहंगड कशाला जोपासला असता? आता अमरनाथ यात्रेवर जिहादी हल्ला झाला, तेव्हा एका शहाण्याला धोड्याला शेंदूर फ़ासण्याचा मोह आवरलेला नाही. म्हणून की काय त्याने मागल्या शतकातील असाध्य आजार, साथीचे रोग व महायुद्धे इत्यादीत मरण पावलेल्यांच्या तुलनेत यात्रेकरूंच्या हत्याकांडाचा विषय नेवून बसवला आहे. जणू यात्रेला असे लोक गेलेच नाहीत, तर जिहादी हल्ले थांबणार असावेत. अशा दिवट्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, की २००८ सालात मुंबईत कसाब टोळी आली व तिने जी सार्वत्रिक कत्तल केली, तेव्हा त्यात बळी पडलेल्यांनी कुठल्या पवित्र धर्मकृत्ये वा धर्मयात्रेसाठी मुंबईत प्रवेश केलेला नव्हता. धर्माच्या कुठल्याही कार्यात गुंतलेले नसतानाही त्यांचे हत्याकांड झालेले होते. त्याच्याही आधी मुंबईत बॉम्बस्फ़ोट मालिका घडली, तेव्हाही कोणी मृत धर्मकृत्यात मग्न नव्हता.

मुंबईच्या स्फ़ोट मालिकेतला घातपाती याकुब मेमन याला रितसर खटला चालवून फ़ाशी फ़र्मावण्यात आली, तेव्हा अशा दुबळ्या अशक्त व्यक्तीला फ़ाशी लटकावण्यात कुठला पुरूषार्थ आहे, असाही सवाला ज्यांना पडला होता, त्यांना आता अमरनाथ यात्रेला जाण्यात मुर्खपणा दिसतो आहे. किंबहूना असली अक्कल पाजळण्यापेक्षा कुबेरी बुद्धीसंपन्नता अवगत असलेल्या या सूज्ञ लोकांनी, जरा शहाण्यासारखे जगणे म्हणजे तरी काय, त्याची यादीच एकदा लिहावी. मुंबईच्या रस्त्यावर कामानिमीत्त फ़िरणेही ज्या देशात सुरक्षित राहिलेले नाही आणि कामावर जाताना वा कामावरून परत घरी येतानाचा रेल्वेप्रवास सुरक्षित राहिलेला नाही, त्या देशात श्वास घेणे तरी सुरक्षित असू शकते काय? मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाले तेव्हा ज्यांचा बळी गेला, त्यांना कुणा धर्ममार्तंडाने पवित्र कार्य म्हणून घराबाहेर पडायला सुचवलेले नव्हते. तरीही त्यांचा बळी गेलाच आणि त्यांचा बळी घेणार्‍याच्या जीवासाठी काही आधुनिक विचारमार्तंड अश्रू ढाळत होते. फ़ाशी ही क्रुर शिक्षा आहे म्हणून अश्रू ढाळणार्‍यांनी कधी दहशत माजवणार्‍या हिंसाचार्‍यांना शिकवण्याचाही वसा घ्यावा. फ़ाशीची शिक्षा कृर असते आणि कुठल्याही गुन्ह्याशिवाय माणसांना किडामुंगीसारखे मारणारे ‘अशक्त’ असतात, ही ज्यांची प्रतिभा आहे, त्यांच्याकडून कुठल्या समजदारीची अपेक्षा करता येईल? अयुब नावाचा एक पोलिस अधिकारी श्रीनगर येथे जुम्मा मशिदीत जमावाकडून मारला गेला. तो अमरनाथ यात्रेला गेला नव्हता, की हाजयात्रेलाही गेलेला नव्हता. तरी त्याला माथेफ़िरूपणाचे बळी व्हावे लागलेले आहे. त्यामुळेच धर्माच्या नावाने यात्रेला जाणे ही समस्या नसून, हत्याकांड करणारी वृत्ती व तिला पाठीशी घालणारा विकृत बुद्धीवाद ही समस्या असते. पण ते समजावणार कोण? पुढल्या काळात असे प्रतिभावंत निपजतील, हे ओळखूनच बहुधा जॉर्ज ओर्वेलने उपरोक्त विधान करून ठेवलेले असावे.

एकदा माणूस आपल्या प्रतिभेच्या आहारी गेला, मग त्याला विवेक रहात नाही. कुठल्याही संकल्पनेचा गुलाम झालेल्यांना तो शापच असतो. त्यांना वास्तवाचे भान रहात नाही, की अनुभवातून काही शिकता येत नाही. किंबहूना असे लोक शिकण्याच्या पलिकडे पोहोचलेले ‘पहुचे मुर्ख’ असतात. त्यांना समस्या समजून घेता येत नाही, तरी त्यांच्याकडे समस्येचे जालीम उ्पाय सज्ज असतात. अन्यथा गिरीशाने हिमालयात जाऊच नये असा सल्ला कशाला दिला असता? मुंबईतही असे हल्ले झालेले आहेत. मग त्यांनी आपल्या घरातून उठून कार्यालयात अग्रलेख खरडायला येण्याचा धोका तरी कशाला पत्करावा? तसा सल्ला त्यांना कुणा धर्ममार्तंडाने दिलेला आहे काय? मुंबई तरी श्रीनगर काश्मिरपेक्षा कितीशी सुरक्षित आहे? त्यांनी तरी कशाला आपल्या कार्यालयात यावे? कुठेही कोणीही मारला जाऊ शकतो. आज दहशतवाद इतका शिरजोर झाला आहे, की कायद्यापेक्षा त्याची विश्वासार्हता वाढलेली आहे. त्यामुळे जगण्यातला व्यवहारी धोका म्हणूनच लोक प्रवास करीत असतात किंवा जत्रा यात्रेला जात असतात. त्यांच्या वेदना यातनांमध्ये सहभागी होणे शक्य नसेल, तर आपल्या बुद्धीचे मीठ जखमांवर तरी चोळू नये. इतका विवेक तरी असायला हवा ना? पण बुद्धीचे अजीर्ण झाले, मग दुर्गंधीयुक्य ओकार्‍या केल्याशिवाय चैन पडत नसते. ज्यांना एका संत साध्वीवर लिहीलेल्या परखड टिकात्म संपादकीय लेखासाठी ठामपणे उभे रहाता आले नाही, त्यांनी इतरांना शिकवण्यात काय अर्थ असू शकतो? मदर टेरेसा यांच्यावर दोन शब्द परखड लिहीले आणि शेपूट घालून पळ काढणा‍र्‍यांच्या वैचारिक सामर्थ्यापेक्षा, आपल्या धर्मश्रद्धा व भावनांसाठी आपले प्राण वेचण्याची निष्ठा अधिक प्रभावी असते. ज्याच्यावर विश्वास आहे, त्याच्यासाठी या यात्रेकरूंनी आपले प्राण पणाला लावण्याची हिंमत दाखवली. रोजगार पणाला लावायची कुवत नसलेल्यांनी त्यांना शहाणपण शिकवण्यात कुठला सूज्ञपणा आलाय?

व्याभिचार झा निव्वळ शारिरीक नसतो, तो वैचारिक व बौद्धीकही असतो. त्यातला दुसरा अधिक हीन दर्जाचा असतो. कारण शारिरीक व्याभिचाराची प्रेरणाच मुळात बौद्धीक व्याभिचारातून आलेली असते. जगण्यातले पावित्र्य व चारित्र्य एकदा लाभासाठी सोडून दिले, मग कशाचा धरबंद रहात नाही. आपल्या कमरेचे अब्रु झाकणारे वस्त्र निसटले असतानाही दुसर्‍यांच्या कंबरेखाली नजर लावून बसण्यासारखा तो प्रकार असतो. खरे तर ही न्युनगंडाची दुसरी बाजू असते. आपल्या अंगभूत नाकर्तेपणाला झाकण्यासाठी सतत इतरांवर दोषारोप करण्याची गरज अनावर होत असते. आपल्यात यात्रेला जाऊन जीव धोक्यात घालण्याची हिंमत नाही. आपल्यात सीमेवर जाऊन लढायचे धाडस नाही. आपल्यात कुठलेही कर्तृत्व नाही. आपण आपल्याही सुरक्षेसाठी काही करू शकत नाही. अशा नाकर्तेपणाची बोच इतकी प्रभावी होते, की आपणही शूरवीर असल्याचा आभास निर्माण करण्याची निकड भासू लागते. मग आपला भित्रेपणा व्यवहारी ठरवण्याचे युक्तीवाद जन्म घेत असतात आणि इतरांच्या कुठल्याही निष्ठा श्रद्धांची हेटाळणी अपरिहार्य होऊन जाते. ओर्वेलने अशा मुर्खांचे वर्णन नेमक्या शब्दात केलेले आहेच. पण अशा निष्कीय लोकांचे वर्णन संत एकनाथ महराजांनी आपल्या एका भारूडातही करून ठेवलेले आहे. सगळ्यांना शिव्याशाप देत जगणारी ती म्हातारी म्हणते ना? रोडगा वाहिन तुला! आजकाल सामान्य लोकांना नाकर्ते व नालायक ठरवण्याची जी स्पर्धा देशातल्या प्रतिभावंतांमध्ये चालू आहे, त्यांचेच गुणगान नाथ महाराजांनी त्या भारुडात केलेले नाही काय? अमरनाथ यात्रेतील बळींची हेटाळणी करणार्‍यांचे दारिद्र्य यापेक्षा अधिक काय सांगायचे? त्या हल्ल्यानंतरही पुढे जाणार्‍यांची हिंमत अशा शहाण्यांमध्ये असती, तर माध्यमांना कुणाच्या भांडवलावर उसनवारीची बौद्धीक लढाई कशाला लढावी लागली असती?

10 comments:

  1. Girish Kuberani tikade tadfadun pran sodla asanare!!
    Todfod lekh!

    ReplyDelete
  2. हळू हळू यांच्या वाहिन्या व पेपर दुसर्या मालकाने विकत घेतले कि यांचा गोंगाट थांबेल.

    ReplyDelete
  3. भाऊ
    गिरीश भिकारी चा लोकसत्ता मधील अग्रलेख वाचून खूप वाईट वाटले होते.परंतु तुम्ही सुंदर शब्दात तुम्ही गिरीश कुबेर,नव्हे विचारांनी भिकारी ,या माणसाचा प्रतिवाद केलात,वाचून बरे वाटले

    ReplyDelete
  4. भाऊ
    गिरीश भिकारी चा लोकसत्ता मधील अग्रलेख वाचून खूप वाईट वाटले होते.परंतु तुम्ही सुंदर शब्दात तुम्ही गिरीश कुबेर,नव्हे विचारांनी भिकारी ,या माणसाचा प्रतिवाद केलात,वाचून बरे वाटले
    सुयोग फणसळकर

    ReplyDelete
  5. भाऊ,हा भिकारी संपादक नक्की कोणाच्या इशा-यावर नाचतो ? मीच काय तो एकमेव शहाणा ,बाकीचे मूर्ख जणू आपल्या सल्ल्यासाठी तरसत आहेत असा आव हा आणत राहतो.मोदींच्या प्रत्येक निर्णयात हा खोट काढतो.नोटबंदी हे कसे फसलेले बवंडर आहे,जी.एस.टी.कसा चुकीचा निर्णय आहे,हे सांगण्यात याचा बोरू खरडत असतो.संजय राऊतलाही न्यूनगंड वाटावा इतक्या सवंगपणे गिरीश कुबेर आपल्या अकलेचे दिवाळे लोकांनी खर्च केलेल्या पाच रुपये किंमतीच्या लोकसत्तेत वाजवत राहतो.छान जागा दाखवलीत या पढतमूर्खाला!

    ReplyDelete
  6. Bhau here you are at your best.

    ReplyDelete
  7. बर झाल समाचार घेतलात हातात पेन आहे म्हनुन कुबेर काहीही बरळतो

    ReplyDelete
  8. Bhau hee parabhoot manovruatti aahe. Mazya deshat malaa mazya devachya bheteelaa jaataanaa jar kuni aadawe yet asel tar tyaachaa mee nayanaat karoon taakeen ashee vijigishu vrutti khare tar jaagrut houn pratikriyaa apekshit aahe tya aivaji yatra band karaa asaa salla denarya Kuberanchi aapan changaleech thechaleet. Dhanyavaad

    ReplyDelete
  9. आदरणीय भाऊ,
    अतिरेक्यांचे जाहीर समर्थन आपल्या वृत्तपत्रातून करणाऱ्या या संपादकांना व त्याच्या मालकांना खरे म्हणजे न्यायालयात खेचले पाहिजे. तसेच बुद्धिभेद करणाऱ्या या वृत्तपत्रांवर बहिष्कार टाकण्यास हवा. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास मी पूर्वी हे वृत्तपत्र घरी घेत होतो, पण हे सर्वज्ञ विद्यमान संपादक पदावर आल्यानंतर मी ते घेणे बंद केले आहे.

    ReplyDelete
  10. तीर्थी धोंडा पाणी.........
    अप्रतिम, खरंच कीव करावी अशी अवस्था आहे आपली,
    लेखक सुचवतायेत (सुनावतायेत) की
    "लाखो लोकांना उद्युक्त केलं जातयं"
    हा निव्वळ विनोद आहे. भारतीय लोक कधीच कुणाकडून ही उद्युक्त होत नाहीत. होत असते तर अनाहुत हल्ला करणारे "दहशतवादी" आणि "विशिष्ट धर्माच्याच धर्ममार्तडां" जाहीर धर्म शिकवणारे याभुमीत वावरूच शकले नसते.
    दुसरे म्हणजे "नियंत्रण" हे कोण सांगतय???
    ज्यांचे स्वतःच्या "लेखणीवर" नियंत्रण नाही ते??
    महत्त्वाचे म्हणजे
    "हिमालय" तोळामासा आहे???
    लेखकाला साष्टांग दंडवत
    "जे न देखे रवी
    वह देखे कवी"

    ReplyDelete