Thursday, May 24, 2018

दोन ओसाड एक वसेचिना

HDK swearing in के लिए इमेज परिणाम

बुधवारी कर्नाटकची राजधानी बंगलोर येथे जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते कुमारस्वामी यांचा त्या राज्याचे चोविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पर पडला. तोच मुहूर्त साधून बिगर भाजपा किंवा प्रामुख्याने मोदीविरोधी पक्षांनी जे ऐक्याचे प्रदरर्शन मांडले. त्याने अनेकांचे डोळे दिपलेले आहेत. त्याहीपेक्षा शपथविधी संपल्यावर बहुतांश नेत्यांनी एकमेकांचे हात गुंफ़ून उचावल्याने अनेकांना भाजपा शंभरीही २०१९ सालात गाठू शकणार नसल्याची खात्री पटलेली आहे. हात उंच उंचावले आणि पाय जमिनीवर नसले मग यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. कारण ज्या विरोधी मतांची बेरीज हे गणितज्ञ मांडत आहेत, ती कुठल्या राज्यात होणार व भाजपाला कसा शह मिळणार, याची जमिनी वस्तुस्थिती त्यापैकी अनेकांच्या गावीही नाही. जितके नेते त्या मंचावर जमलेले होते आणि त्यांनी एकजुटीची ग्वाही दिलेली असली, तरी त्यांच्या एकत्र येण्याचा भाजपावर काय परिणाम होऊ शकतो, याचे गणित कोणी मांडलेले नाही. मागल्या लोकसभेत भाजपाने २८२ जागा जिंकल्या व मित्रपक्षांनी आणखी पन्नास जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी भाजपाच्या जितक्या जागा आहेत, त्यात विरोधकांच्या एकत्र येण्याने काय फ़टका बसू शकतो? कुठल्या राज्यात धक्का बसू शकतो? बारकाईने अभ्यास केला तर विरोधकांच्या एकजुटीने एक उत्तरप्रदेश सोडला तर भाजपाला जवळपास अन्य कुठल्याही राज्यात धक्का बसण्याची बिलकुल शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंबहूना उत्तरप्रदेश सोडल्यास भाजपाच्या कुठल्याही प्रभावक्षेत्रात मंचावरील नेते व पक्षांचा काडीमात्र प्रभाव नाही. आपल्या प्रभावक्षेत्रात कॉग्रेसच भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. आणि उर्वरीत राज्यात कॉग्रेस हाच उपस्थित पक्ष व नेत्यांचा खराखुरा प्रतिस्पर्धी आहे. हे अतिशय बारकाईने व आकडेवारीने समजून घेता येऊ शकते. अर्थात स्वप्नरंजनातून बाहेर पडायची इच्छा असली तर!

मायावती व अखिलेशचा समाजवादी पक्ष हे उत्तरप्रदेशातील मोठे पक्ष आहेत आणि त्यांच्या मतांची बेरीज भाजपाला आव्हान दोऊ शकते. पण त्यासाठी त्यां पक्षांनी एकदिलाने व परस्पर समजुतीने मोदी विरोधात एकवटले पाहिजे. त्यात कॉग्रेसही सहभागी झाली तर भाजपाला मोठा दणका देऊ शकतात. कारण तिथल्या ८० पैकी ७३ जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या. त्यापैकी पन्नासहून अधिक जागी भाजपाला धोका होऊ शकतो. थोडक्यात २८२ वरून भाजपा थेट सव्वादोनशे इतका खाली घसरू शकतो. हा उत्तरप्रदेश सोडला तर भाजपाचे प्रभावक्षेत्र असलेली राज्ये कोणती? आसाम, बिहार, गुजरात, हरयाणा, हिमाचल, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड व दिल्ली. या राज्यात असे कोणते दांडगे पक्ष कालच्या शपथविधीला उपस्थित होते आणि त्यांच्याशी हातमिळवणी केल्यास भाजपाला पाणी पाजता येऊ शकेल? तिथे हात उंचावून उभे असलेल्या एकेका नेत्याची व त्याच्या पक्षाच्या प्रभावक्षेत्राची झाडाझडती काय आहे? अशा उत्सवात अगदी हुरळल्यासारखे सहभागी होणारे सीताराम येच्युरी २००८ पासून अनेक मंचावर असेच हात उंचावत राहिले आहेत. पण दरम्यान दहा वर्षात त्यांनी दोन राज्यातली सत्ता गमावलेली आहे आणि तिथे त्यांचे नामोनिशाण उरलेले नाही. बंगालमध्ये आज त्यांना तोंड दाखवायला जागा नाही आणि तिथल्याच मुख्यमंत्री ममता मंचावर हजर असताना येच्युरींकडे ढुंकून बघायला राजी नव्हत्या. बंगालामध्ये आता भाजपा दुसर्‍या क्रमांकाच पक्ष होत चालला आहे. ओडिशाची स्थिती काहीशी तशीच आहे. पण त्या राज्याचे प्रभावी नेते नविन पटनाईक या कुंभमेळ्याला हजर राहिले नव्हते. बाकी जे कोणी उपस्थित होते, त्यांच्या राज्यात भाजपा त्यांचा प्रतिस्पर्धी नाही तर कॉग्रेस त्यांचा विरोधी पक्ष आहे. मग अशा बेरजेचा उपयोग तरी काय?

आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, ओडीशा, व बंगाल अशा राज्यातून कुठल्याही मतविभागणीचा लाभ उठवून भाजपाला मागल्या लोकसभेत इतक्या जास्त जागा मिळाल्या नव्हत्या. तर आज मतविभागणी टाळून वाघ मारण्याचा आव कशाला आणला जात आहे? आंध्रप्रदेश २, तेलंगणा १, ओडिशा १, बंगाल २, तामिळनाडू १ आणि केरळ ०; अशा जागा भाजपाने जिंकलेल्या होत्या. या सहा राज्यातून लोकसभेत १६५ सदस्य निवडून जातात आणि भाजपाने मिळवल्या अवघ्या ७ जागा. त्यातल्या दोन पुन्हा चंद्राबाबूंच्या कृपेने आंध्रातल्या आहेत. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३७८ जागांतून भाजपाने आपल्या २७५ जागा जिंकलेल्या आहेत आणि त्याला भाजपाचे प्रभावक्षेत्र म्हणता येईल. त्यामुळे नामशेष झालेले मायावती, अखिलेश, अजितसिंग, शरद पवार, येच्युरी वा देवेगौडा अशा लोकांनी चंद्राबाबू वा ममताशी हात गुंफ़ले, म्हणून त्या ३७८ जागी किती फ़रक पडणार आहे? उत्तरप्रदेशात पवार काय करू शकतात? गुजरातला ममता काय दिवे लावणार? थोडक्यात हात उंचावून मंचावर मिरवणार्‍यांना भाजपा जिथे लढू शकत नाही वा त्याची ताकदच नाही, तिथे मोदींना लोळवायचे आहे. तसे २०१४ च्या लढतीमध्येही भाजपा व मोदी त्या क्षेत्रात जमिनदोस्तच झालेले होते. तिथे भाजपाने बहुतांश जागी अनामत रक्कमही गमावलेली होती. म्हणजेच हात उंचावणारी टोळी जिथे मोदीं आधीच पराभूत झालेले आहेत, तिथेच नेस्तनाबुत करायचे मनसुबे रचून बोलत आहेत. अपवाद फ़क्त उत्तरप्रदेशाचा आहे. तिथे काही जागा तरी भाजपाला मतविभागणीमुळे झालेला लाभ आहे आणि म्हणूनच त्या मंचावरच्या अखिलेश मायावतींच्या एकत्र येण्याला महत्व आहे. बाकी सगळा कचरा होता. त्यांना मोदींशी लढण्याचे कारण नाही की त्यांची मोदींशी राजकीय लढाईच नाही. मुद्दा आहे तो भाजपाचे ३७८ प्रभावक्षेत्र असलेले मतदारसंघ आणि त्यात अशा हात उंचावणार्‍यांची मते मिळवण्याची क्षमता! 

यापैकी म्हणजे १६५ मतदारसघात मागल्या चार वर्षात भाजपाने अमित शहांच्या मेहनतीने संघटना उभारली आहे. ज्या पद्धतीने बंगालमध्ये ममता व केरळात डावी आघाडी भाजपाच्या कार्यकर्त्यांशी हिंसक संघर्ष करते आहे, त्याअर्थी या दोन राज्यातील किमान ३०-४० जागी भाजपाने आपला प्रभाव वाढवलेला आहे. त्याखेरीज ओडिशामध्ये भाजपाने कॉग्रेसला मागे टाकून दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. अनेक जिल्ह्यात नविन पटनाईक यांच्या पक्षाला मागे टाकणारे यश स्थानिक संस्था मतदानात मिळवलेले आहे. म्हण्जे एकत्रित केल्यास २०१४ मध्ये आपल्या आवाक्यात नसलेल्या आणखी ६०-७० जागी भाजपाने आपला प्रभाव नव्याने निर्माण केला आहे. याच चार वर्षात हात उंचावणार्‍या टोळीतील नेत्यांनी आपले प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी काही नवे केले आहे काय? नसत्या मोदी विरोधाला प्रोत्साहन देताना ममता बानर्जीं व डाव्यांनी बंगाल व केरळात हिंदू धृवीकरणाला हातभार लावून भाजपाला नवा मतदार मात्र मिळवून दिला आहे. भाजपाचे आधीचे ३७८ मतदारसंघातले प्रभावक्षेत्र व नव्याने त्यांनी शिरकाव केलेल्या ६०-७० जागा येथे लढाई महत्वाची आहे. तिथे कॉगेस कितपत समर्थपणे लढणार आणि त्यात हात उंच करणार्‍यांचा किती हातभार लागू शकतो, याला निर्णायक महत्व आहे. अशा जागा ४३० पर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत आणि आपले प्रभावक्षेत्र भाजपा विस्तारत असताना हात उंचावणारे मात्र शिळोप्याच्या गप्पा मारीत महागठबंधनाचे प्रवचन करीत फ़िरत राहिले आहेत. अशा दोन डझन प्रवचनकार व माध्यमातील त्यांच्या किर्तनकारांच्या मदतीने मोदी वा भाजपाला कसे रोखता येणार? या शुद्ध गणिताला महत्व आहे. त्याचे साधे समिकरणही मांडायची अशा दिवाळखोरांना गरज वाटलेली नाही. आपल्यातून असेच हात उंचावणारा नितीशकुमार का निघून गेला, त्याचाही विचार करायची या दिवट्यांना गरज वाटलेली नाही. हा सगळा तमाशा बघून संत ज्ञानेश्वराचे भारूड आठवले.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें, दोन ओसाड एक वसेचिना !

13 comments:

  1. लक्ष्यभेद भाऊ.... पण वाळूत तोंड खुपसून बसलेल्यांना वादळाचा सामना करायचाच नसतो त्याचे किय?

    ReplyDelete
  2. भाऊ काका , तुमचं विश्लेषण तर्कशुद्ध आहे.... पण मला वाटते ती काळजी वेगळीच आहे . ती म्हणजे आपली सामान्य जनता. तुम्ही नेहेमी म्हणता कि कुणी पर्याय नसेल तर जनता असेल ते बदलणार नाही वगैरे जनता तितकी सुद्न्य असते वगैरे पण माझा ह्या गोष्टींवरचा विश्वास उडत चालला आहे. कारण लोकांना प्रामाणिकपणे काम करणारा मोदी नकोय त्यांना खाओ खिलाओ वाला कुणीतरी हवाय...मग तो राहुल च असेल असं नाही..ममता, मायावती कुणी पण चालेल....तसाही कडक शिक्षक कुणालाच आवडत नाही....म्हणून जनतेचं कपालकरंटेपण निवडणुकीत दिसेल असं सारखं वाटत राहतं ... मोदी शहा कितीपण मेहनत घेऊ देत पण लोकांना भिकेचेच डोहाळे असतील तर त्याला कोण काय करणार? त्यातूनही जातीयवाद हा यशस्वी ठरतोय हे गुजरात मध्ये काँग्रेस ने दिलेल्या लढतीवरून दिसलंच आहे त्यामुळे त्याचा वापर हा जास्तीत जास्त होणार.... कर्नाटक मध्ये पण बहुमत भाजप ला न मिळण्यात काँग्रेसी जातीयवादाचा थोडाफार हातभार तरी नक्कीच होता..... एवढं सगळं असताना त्याला प्रामाणिकपणा, मेहनत वगैरे कसे काय तोंड देऊ शकतील? आरक्षणाच्या गाजरावर आपल्याकडे दशकानुदशके निवडणूक जिंकल्या गेलेल्या आहेत... तमाम पुरोगामी बाजारबुणग्यांनी एकत्र येऊन खाजगी क्षेत्रात आरक्षण एवढं आश्वासन दिलं तरीही खूपशी मतं फिरतील... आणि भाजप चा जो मतपेढी म्हणून मनाला गेलेला मतदार आहे तो इतका तुटपुंजा आहे कि तो कधीच ह्या झुंडशाहीला तोंड देऊ शकणार नाही... तेव्हा काय होईल? तुम्हाला काय वाटतं ?

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम खरे आहे जनता शहाणी नाही आणि मुख्य मुद्दा सगळे समजणारे मतदार जे शहाणे आहेत ते मतदान करत नाहीत। शहण्याची उदासीनता हीच मोठी काळजी आहे। त्यातूनच चुकीचे लोक निवडून येतील कदाचित

      Delete
  3. by writing all this you are giving input to their followers, ofcoarse what they will learn out of it is a big question

    ReplyDelete
  4. मुळात हा फोटो पण एका हरलेल्या ठिकाणी हात उंचावण्याचा आहे . खरंच या लोकांवर मोदींनी हि वेळ आणलीय कि पराभवाचा पण उत्सव साजरा
    करतायत . या लोकांना आतून काय वाटत असेल याची कल्पना येते . मराठीत ऋण काढून सण साजरे करणे म्हणतात याला. कदाचित मोदींना हेच अपेक्षित असावं ,काँग्रेस जर कर्नाटक मध्ये बहुमत ना येत नुसता मोठा पक्ष ठरला असता तरी या फोटोला काही किंमत असती ,नवीन पटनाईक फार हुशार म्हणायचे म्हणून तर २० वर्षे सत्तेवर आहेत .

    ReplyDelete
  5. सगळे विरोधी एकत्र आले तर काॅन्ग्रेस सगळ्यांना घेऊन बुडेल. आणि अपक्ष उमेदवार भाव खाऊन जातील.

    ReplyDelete
  6. भाऊ तुम्ही अगदी योग्य विश्लेषण केले आहे अगदी उत्तर प्रदेशात सुद्धा पाहिले तर 1991 मध्ये तिथे राम मंदिराचा विषय होता तेव्हा भाजपच्या 51 जागा होत्या 1996 आणि 1998 मध्ये तिथे वाजपेयींची लाट होती तेव्हा भाजपचे 56 आणि 58 खासदार निवडून आले होते.मात्र 1999 मध्ये तिथे कल्याणसिंग यांना अपमानास्पद पध्दतीने घालवून देण्यात आले आणि भाजपची घसरगुंडी सुरू झाली.2004 आणि 2009 च्या लोकसभेत उत्तर प्रदेशात भाजपचा दारुण पराभव झाला तसेच राज्यात मुलायम मायावती आणि अखिलेश यांच्या राजवटी सुरू झाल्या.या लोकांनी अतिशय ओंगळवाणे असे तुष्टीकरण जातीवाद आणि गुंडगिरी यांचे राजकारण सुरू केले.2012 च्या सुमारास मोदींनी उत्तर प्रदेशात चाचपणी करण्यासाठी अमित शहा यांना पाठविले आणि नंतरचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे अखिलेश आणि मुलायमच्या राज्यात यादव आणि मुस्लिम यांच्या ध्रुवीकरणा विरोधात अन्य सगळे एकवटले आणि मोदींनी एकहाती 73 जागा मिळवल्या आत्ता सुद्धा दलित आणि मुस्लिम यांच्या तुष्टीकरणाविरोधात उलट ध्रुवीकरण झाले तर मोदींना 2014 पेक्षाही मोठे यश उत्तर प्रदेश देऊन जाईल महामुर्ख पुरोगाम्यांची वाटचाल सध्या त्याच दिशेने चालू आहे

    ReplyDelete
  7. 2 दिवसांपूर्वी मी फेसबुकवर याच आशयाची एक पोष्ट लिहिली होती...आपण आज विस्तृत म्हणणे मांडून त्यावर शिक्कामोर्तब केलेत..माझी पोष्ट खालीलप्रमाणे होती
    २०१९ कडे बघताना.

    राहुल गांधी व एकूणच विरोधी पक्ष २०१९ ला मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या एकजुटीचा फुगा फुगवण्यात व्यस्त आहेत,परंतु विविध प्रमुख राज्यांमधील परिस्थिती बघता या विरोधीएकजुटीचा फुगा किती पोकळ आहे याची जाणीव होते..या एकजुटीचे सत्य काय आहे याचा मागोवा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.

    गुजरात,राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड,हिमाचल प्रदेश आणी नॉर्थ ईस्ट येथील राज्यांमध्ये विरोधी एकजुटीचा संबंधच नाही कारण भाजपा व काँग्रेस मध्ये इथे सरळ लढाई आहे..यातील राजस्थान ची विधानसभा निवडणूक अजून व्हायची आहे परंतु इतर ठिकाणी भाजपाने आपले अस्तित्व सिद्ध केलेलेच आहे.

    बिहारात काँग्रेस आधीपासूनच राजद बरोबर युती करून लढत आलेली आहे..पश्चिम बंगाल मध्ये तर काँग्रेस नसल्यातच जमा आहे तिथे ममता व डाव्यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याने ते एकत्र येण्याची सुतरामही शक्यता नाही..महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची युती वर्षानुवर्षाची आहे यातही नवीन असे काही नाही..तामिळनाडूत काँग्रेस-डीएमके यी युती पूर्वीपासूनची आहे यावेळी तेथे रजनीकांत यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ते वेगळा पक्ष काढणार की हे समजलेले नसले तरी वेगळ्या पक्षामार्फत किंवा भाजपात येऊन ते मोदींसाठीच बॅटिंग करणार असल्याचे स्पष्ट आहे.

    कर्नाटकात जे काही नाटक घडले त्याचा पुरेपूर फायदा भाजपा २०१९ ला उठवणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही..उडीसा मधील राजकीय परिस्थिती बघता तेथे बीजद बरोबर काँग्रेस ची युती होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही..आंध्रात चंद्राबाबू नायडुंबरोबर काँग्रेस ने युती केली तरी त्याचे प्रत्युत्तर YSR च्या रूपाने भाजपाजवळ तयार आहे..तेलंगणा व केरळात भाजपाचा असाही प्रभाव नाही तिथे काही जागा निवडून आल्याचं तर तो बोनस असेल.

    या सगळ्यात उरते ते एक राज्य जिथे सर्वाधिक लोकसभेच्या जागा असून विरोधकांना एकजुटीचा फायदा होऊ शकतो ते म्हणजे उत्तर प्रदेश.
    परंतु ते समोर दिसते तेवढे सोप्पे वाटत नाही कारण पोटनिवडणुकांमध्ये जरी मायावतींनी आपले उमेदवार उतरवले नसले तरी मुख्य निवडणुकीत जागांवरून वाद विवाद होने निश्चित आहे..या धामधुमीत मायावती परत एकदा NDA बरोबर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही..बाकी उत्तरप्रदेशात राममंदिराबद्दल कोर्टाच्या लागणाऱ्या निकालाचा प्रभाव राहीलच त्याचबरोबर योगींच्या क्षमतेचाही कस लागनार हे नक्की आहे...तरीही समजा इथे भाजपाच्या जागा कमी झाल्याच तरी ती कमतरता नॉर्थ-ईस्ट,उडीसा,पश्चिम बंगाल,केरळ,तामिळनाडू येथून आरामात भरून निघू शकते.

    जाता जाता एक अशी गोष्ट सांगू इच्छितो ज्यावर सहसा कोणी राजकीय विश्लेषक किंवा वृत्तवाहिन्या बोलत नाहीत ती म्हणजे.....यापूर्वी विविध राज्यांमध्ये जाऊन मोदिंनी आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसाठी मते मागितली व जनतेनेही त्यांना दोन्ही हाताने भरभरून प्रतिसाद दिला आहे...२०१९ ला मोदी जेंव्हा स्वतःसाठी मते मागतील तेंव्हा काय होईल?..स्वतःच विचार करा.

    ReplyDelete
  8. Best analysis thanks from botam of my heart

    ReplyDelete
  9. "२०१९ ला मोदी जेंव्हा स्वतःसाठी मते मागतील तेंव्हा काय होईल?..स्वतःच विचार करा."

    आत्तापर्यंत बरेच वाचत आलोय. फक्त वरचा एवढाच मुद्दा मला पुरेसा वाटतो.

    ReplyDelete