Friday, August 25, 2017

पुरोहित नावाचे आरडीएक्स

colonel purohit के लिए चित्र परिणाम

आरडीएक्स नावाचे एक भयंकर घातक स्फ़ोटक रसायन आहे आणि अलिकडल्या काळात तो शब्द भारतीयांना चांगला़च परिचित झालेला आहे. कारण १९९३च्या मुंबई स्फ़ोट मालिकेत त्याचा प्रथम वापर झालेला होता. त्यानंतर देशभर झालेल्या अनेक घातपातामध्ये त्याचा सरसकट वापर झाल्याचे अढळून आलेले आहे. म्हणूनच तो शब्द बातम्यातून झळकत राहिला आणि सर्वतोमुखी झालेला आहे. मालेगाव स्फ़ोट मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठी हिंदू दहशतवादी टोळीने घडवून आणला, असा एक संशय घेऊन त्याच्या तपासाला २००८ सालात वेगळे वळण देण्यात आलेले होते. आधीच त्या प्रकरणी काही मुस्लिम संशयितांना अटक झालेली होती. पण मुस्लिम संघटनांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एटीएस पथकाचे प्रमुख बदलले. रघुवंशी नावाचे अधिकारी बदलून त्यांच्या जागी हेमंत करकरे यांना आणले गेले. सहाजिकच मालेगावचे तपासकाम त्यांच्याकडे आले आणि आठ महिन्यात त्यांनी आधीचा तपास चुकीचा ठरवून तो स्फ़ोट हिंदू दहशतवादी लोकांनी केला असा शोध लावला. त्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांना ताब्यात घेतले आणि अन्य काही हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही अटक केली. या लोकांनी अभिनव भारत नावाची संघटना चालवून मुस्लिम वस्त्यांमध्ये धमाके करण्याचे कारस्थान रचल्याची माहिती खुद्द करकरे यांनीच त्यावेळी दिलेली होती. त्यानंतर देशभरच्या माध्यमात व पुरोगामी राजकारणात हिंदू दहशतवाद हा परवलीचा शब्द झाला. आधी त्यात सनातन संस्थेने केलेल्या निरर्थक स्फ़ोटाचे दाखले दिले जात होते. पण करकरे यांनी अशा आरोपकर्त्यांच्या हाती मालेगावचे कोलितच देऊन टाकले. मात्र त्याला पुढल्या महिन्यात नऊ वर्षे पुर्ण होणार असली, तरी अजून त्यापैकी कुठलाही पुरावा कोर्टासमोर आलेला नाही. तरीही पुरोहित नावाचे आरडीएक्स उघड्यावर आलेले आहे.

पुरोहित यांना आरडीएक्स इतक्यासाठी म्हणायचे, की या माणसाकडे त्य स्फ़ोटकापेक्षाही भयंकर राजकीय भूकंप घडवू शकेल अशा गोपनीय माहितीचे कोठार साठवलेले आहे. ती स्फ़ोटक माहिती उघड होत जाईल, तेव्हा कुठले कुठले राजकीय व सत्तेचे मनोरे जमिनदोस्त होत जातील, त्याचा अंडाजही करणे अवघड आहे. कारण पुरोहित हा कोणी सामान्य लष्करी अधिकारी नाही. तो चेहरा व वेशभूषा बदलून अनेक संस्था संघटनांमध्ये गुप्तहेर म्हणून अखंड काम केलेला सेनाधिकारी आहे. भारतामध्ये जिथे म्हणून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, त्याचा गुपचुप शोध घेऊन माहिती जमा करणे व सेनादलाला त्याची पुर्वसुचना देणे, हेच त्याच कर्तव्य होते. सहाजिकच अगदी घातपाती व अतिरेकी संघटनांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या संपर्कात रहाणे हेच त्याचे नित्यकर्म होते. यातून त्याने मिळवलेली नाजूक व स्फ़ोटक माहिती वेळोवेळी आपल्या वरीष्ठांना दिलेली आहे आणि त्याच्या अशा घुसखोरीची लष्कराच्या वरीष्ठांना पुर्ण कल्पना होती. किंबहूना लष्करी आदेशानुसार पुरोहित अशी धोका पत्करावी लागणारी कामे करीत होते. सहाजिकच त्यांना भरपूर स्फ़ोटक माहिती व संबंधांचा गुंता पक्का ठाऊक आहे. इतकी वर्षे निव्वळ कर्तव्य पार पाडण्यालाच गुन्हा ठरवून अशा माणसाला छळलेले असेल, तर पुरोहित बोलू लागतील तेव्हा मालेगावपेक्षाही मोठे भयंकर स्फ़ोट होऊ लागतील यात शंका नाही. कारण नऊ वर्षात या माणसाने आपले मौन पाळलेले आहे. कितीही यातना दिल्या गेल्या वा छळ केला गेला, तरीही त्यांनी कुठल्या अन्य माध्यमातून आपल्या मनात साठवून ठेवलेल्या स्फ़ोटकासम माहितीला उघड होऊ दिलेले नाही. त्यामुळे एकप्रकारे पुरोहित यांचे मौन हे आरडीएक्सपेक्षाही विध्वंसक ठरण्याची दाट शक्यता आहे. त्याची चुणूक त्यांनी कुठल्या एका वाहिनीला दिलेल्या त्रोटक माहितीतून दिलेली आहे.

दाऊदचे भारतीय माओवादी, राजकारणी व जिहादी यांचे संबंध, खोट्या नोटा व त्यांची हालचाल, राजकारणातील लोकांचे देशविघातक धंदे; अशा अनेक गोष्टींचा मागोवा आपल्या कामाच्या निमीत्ताने पुरोहित यांनी घेतलेला आहे. त्यामुळे त्यातले तपशील त्यांच्या मनात घट्ट जमा होऊन राहिलेले आहेत. ज्याप्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत, ती कामे त्यांनी देशासाठी कर्तव्य म्हणून पार पाडलेली आहेत. ते करण्यामागे शासनाचा व व्यवस्थेचा कुठला सहभाग असतो, त्याचीही बाब उघड झालेली नाही. पण ज्याअर्थी आपल्या अशा गुप्तचर कामाचा अहवाल पुरोहित नित्यनेमाने वरीष्ठांना पाठवत होते, त्याअर्थी ती कामे त्यांच्याकडून सरकारी आदेशानुसार होत असणार हे उघड आहे. किंबहूना त्यामुळेच अनेक राज्यकर्त्यांनी धाबी युपीए काळात दणाणलेली असणार आणि त्यावरचा उपाय म्हणून पुरोहित यांची मुस्कटदाबी झालेली असणार, ही साधी गोष्ट आहे. अन्यथा नऊ महिने आपली बाजूही मांडू दिल्याशिवाय त्यांना गजाआड डांबून ठेवण्याचा आटापिटा युपीए सरकारने केला नसता. आताही एका अहवालावरून त्यांना जामिन मिळू शकला आहे. जो अहवाल २००९ सालात तयार झाला होता. पण कितीही प्रयास करून पुरोहितांच्या पत्नीला त्याची प्रत दिली गेली नाही. सत्तांतर झाल्यावर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री असताना ती प्रत दिली आणि पुरोहितांच्या जामिन अर्जाला वजन आले. याचा अर्थ युपीएच्या सरकार व संरक्षणमंत्र्यांनी मुद्दाम ती प्रत मिळू दिली नाही आणि खटल्याशिवाय पुरोहितांना तुरूंगात डांबण्याची पळवाट शोधलेली होती. एका सामान्य सेनाधिकार्‍याला युपीए सरकार इतके घाबरलेले असेल, तर त्याच्याकडे असलेला मालमसाला नक्कीच आरडीएक्सपेक्षा भयंकर असला पाहिजे. आपण जमा केलेली माहिती व तपशील सरकार दरबारी असून कोर्टही तपासून बघू शकते, असा पुरोहितांचा मुलाखतीतला दावा आहे.

म्हणजेच पुरोहित यांची सुटका दुय्यम असून त्यांच्या खटल्याची सुनावणी अधिक भयंकर विषय आहे. मागल्या नऊ वर्षात ती होऊ शकली नाही, कारण गुन्हा सिद्ध करण्यासारखा कुठलाही पुरावा एटीएसकडे नव्हता किंवा एन आय ए कडेही नाही. म्हणून नुसते आरोपाचे बुडबुडे उडवण्याचे राजकारण खेळले गेले. त्यावर तपासयंत्रणा बोलण्यापेक्षा तथाकथित पुरोगामी व कॉग्रेसने सतत घोषणाबाजी केलेली होती. हिंदूत्वाचा आरोप करण्याची सोय म्हणून माजवलेला हा बागुलबुवा होता. पण पुरोहितांची बाजू समोर येत नसल्याने या खोटारडेपणाला मोकाट रान मिळालेले होते. आता हा आरोपी बाहेर आलेला असून, तो वेगाने सुनावणीची मागणी करू शकतो आणि ती करावीच लागणार आहे. कारण खुप उशिर झाला असून कसलेही सज्जड पुरावे नसल्याचा खुलासा एन आय ए या तपास यंत्रणेनेही केलेला आहे. किंबहूना करकरे यांनी केलेला तपास व नोंदलेल्या गोष्टींमध्ये कितीतरी विरोधाभास असल्याची कबुली याच तपास यंत्रणेने दिलेली आहे. थोडक्यात पुरोहित यांच्यावर बालंट आणून हिंदूत्व वा हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा माजवण्यात आलेला होता. काही खोटी वा बनावट कागदपत्रे व पुरावेही निर्माण करण्यात आलेले आहेत. अशा सर्वांचा पर्दाफ़ाश पुरोहित करू शकतात, ही गोष्ट साफ़ आहे. सहाजिकच २००८ पासून हे थोतांड माजवणार्‍यांची आता घाबरगुंडी उडालेली असेल, तर त्याचे कारण एकच आहे. त्यांना प्रथमच खर्‍याखुर्‍या आरडीएक्सचे स्फ़ोट कसे असतात आणि त्यात किती लबाड्या उध्वस्त होतील, त्याच्या कल्पनेनेच अशा लोकांना घाम फ़ुटलेला आहे. कारण जामिन मिळाल्यानंतरचे पुरोहित यांचे एकच वाक्य मोठे सूचक आहे. ‘आपण तिरंगा ध्वज आणि राष्ट्रपतीच्या सेवेत आहोत. बाकी कुठला ध्वज किंवा नेत्याशी आपल्याला कर्तव्य नाही. याला म्हणतात महा आरडीएक्स!

17 comments:

  1. मागच्या नउ वर्षात कोनी इस्लामी दहशतवादाचा विषय काढला तर विश्वंभर चौधरी सारखे पुरोगामी? लोक लगेच वेळ न दडवता मालेदावचे नाव घ्यायचे.तेव्हा खुप चीड यायची.आता तरी त्यांची तोंडे बंद झाली असतील.

    ReplyDelete
  2. महाराष्ट्रामधल्या ' मैद्याचे पोते ' उर्फ ' खणता राजा ' यांच्याबद्दलही बरीच स्फोटक माहिती कर्नल पुरोहितांकडे असणार हे निश्चित........!!

    ReplyDelete
  3. Vadla purvi chi shantata. Age Age dekho hota hey kya. Bhaunche lekh hech RDX aahet.

    ReplyDelete
  4. भाऊ
    करकरे जसे अचानक ATS प्रमुख झाले तसेच अचानक संशयास्पद रित्या शहीद कसे झाले हे ही शोधपत्रकारितेला आव्हान आहे.

    ReplyDelete
  5. त्यांना एक मिनिटही सुरक्षा देण्यात ढील चालणार नाही.

    ReplyDelete
  6. युपीए सरकरमधील शिंदे ,चिद्धम्बरम व सोनिया नच कायं सहभाग होता पुरोहित ना अडकवण्यात ह्याची चौकशी मोदी सरकारने अवश्य करायला हवी व जाणते की जाणत्या राजाचे नाव घेणारे आणि स्वतः महा च्या राजकारणातले लवासामहाराज, सगळयात धूर्त व भ्रष्ट ह्या नेत्याची पण चौकशी होऊ द्या

    ReplyDelete
  7. कर्नल पुरोहितांना माहीत असलेली सर्व राजकीय माहिती सार्वजनिक केली पाहिजे , जेणेकरून काँग्रेसचा खरा चेहरा समोर येईल .....

    ReplyDelete
  8. तिसऱ्या परिच्छेदात नऊ वर्षांऐवजी चुकून नऊ महिने आले आहे - "अन्यथा नऊ महिने आपली बाजूही मांडू दिल्याशिवाय त्यांना गजाआड डांबून ठेवण्याचा आटापिटा युपीए सरकारने केला नसता." बाकी नेहेमीप्रमाणे लेख उत्तम आहे.

    ReplyDelete
  9. भाऊ whats app वर पुरोहित व हमीद अन्सारी आणि पुरोहित व भुजबळ अशी तुलना करणारे संदेश फिरत आहेत. खरोखरच नऊ वर्षे (विनाकारण?) तुरुंगवास आणि छळ सहन करून आलेला माणसाचा चेहरा इतका प्रसन्न कसा काय असू शकतो? तुमच्या लेखातच याचं उत्तर दडलेल आहे.पूर्ण निर्दोष सुटल्यावर 'कर नाही त्याला डर कसली' या म्हणीसाठी पुरोहितांच उदाहरण देत येईल.
    जाता जाता वर्षभर तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीचा फोटो आठवला.

    ReplyDelete
  10. https://www.pgurus.com/purohit-points-finger-at-congress-president/?amp_markup=1

    ReplyDelete
  11. यामुळे कर्नल पुरोहितांचे जीवित असुरक्षित झाले आहे का? ते जेलमध्येच सुरक्षित होते असे म्हणायची पाळी तर येऊ नये.त्याना खात्रीशीर सुरक्षाव्यवस्था मिळाली पाहिजे.

    ReplyDelete
  12. भाऊराव,

    लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांनी सिमीत शिरकाव केला होता. जवळजवळ उद्ध्वस्तच केली होती म्हणा ना. थोडी आजून काही वर्षं दिली असती तर पुरोहितांनी भारतातला संपूर्ण इस्लामिक दहशतवाद खणून काढला असता. म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने विनाचौकशी ६ वर्षं तुरुंगात डांबलं. नंतरची ३ वर्षं मोदी सरकारने खबरदारी म्हणून तुरुंगात ठेवलं.

    आजही पुरोहितांना पूर्ण निर्दोष घोषित केलेलं नाही, कारण की त्यांच्यावरचे आरोप आजूनही निश्चित नाहीत. यावरून सरकार बदललं तरी प्रत्यक्ष सत्ता बदलायला वेळ लागतो हे दिसून येतं.

    असो.

    पुरोहित सावरकरांसारखे कणखर आहेत म्हणून इतक्या हालअपेष्टा भोगू शकले. काँग्रेस सावरकरांचा का दु:स्वास करते ते यातून कळतं.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  13. या देशात कर्नल पुरोहितांसारखी नस्ल पैदा होत असते हे या देशाचे भाग्य आहे.आणि कुठल्या देवत्व असणार्याला हाल चुकलेत इथे. फरक एवढाच की गद्दार कितीही मोठे असले तर मेल्यावर नामोनिशाण राहत नाही.आणि या जाबाज अधिकाऱ्यांच्या नावाचा सुगंध त्यांच्या नंतरही देशभर दरवळत राहतो.

    ReplyDelete
  14. अप्रतिम विश्लेषण...

    ReplyDelete
  15. [8/23, 15:38] Sunil Vaidya: After 9 years, Lt Col Purohit walks out of jail. http://google.com/newsstand/s/CBIwooeH5zU
    [8/23, 15:38] Sunil Vaidya: so according to col. purohit he was acting as a "mole" for army...in other words he was infiltrating the organisation to get info. for the army . which means he was acting as a double agent! and sometimes double agents need to do certain things to gain confidence....so purohit name did not come out if nowhere!
    so we cant really blame ATS and karkare. .what col purohit got is called as occupational hazard
    [8/23, 15:38] Sunil Vaidya: in other words even the army believed that abhinav sanstha was indulging in such activities that they needed to send a "mole" inside the organisation. so karkare was on rge right track after all!

    ReplyDelete
  16. http://m.hindustantimes.com/mumbai/raghuvanshi-had-a-rocky-ride-as-ats-chief/story-0JNiAuvpLfHfZvJSWUkFEP.html

    ReplyDelete
  17. http:///indianexpress.com/article/india/colonel-shrikant-purohit-claims-he-kept-army-in-loop-army-blew-his-cover-4810786/lite/

    ReplyDelete