Wednesday, August 16, 2017

स्वातंत्र्याचा अर्थ

trash on road के लिए चित्र परिणाम

हळुहळू संपुर्ण भारताचाच काश्मिर होतो आहे किंवा काय, अशी शंका येऊ लागली आहे. काश्मिर याचा अर्थ बेजबाबदार अधिकार असा आहे. सध्या ३५(अ) क्लमावरून गदारोळ चालला आहे. या एका तरतुदीमुळे काश्मिरात आज पाकवादी प्रवृत्ती फ़ोफ़ावलेली आहे. त्याला नाके मुरडणारे किती भारतीय आपल्या परीने भारतासाठी काही करायला तयार असतात? काश्मिरातील काही राजकारणी वा घातपाती स्वातंत्र्याचा गैरफ़ायदा घेतात, हे सत्य आहे. त्यांच्यासाठी कायद्याने दिलेले स्वातंत्र्य पवित्र आहे आणि त्यात कोणी बाधा आणता कामा नये. पण त्याच राज्यघटना व कायद्यानुसार नागरिक म्हणूनही काही जबाबदार्‍या येतात. त्याचे पालन किती काश्मिरी लोक मान्य करतात? दोन वर्षापुर्वी काश्मिरात अतिवृष्टीने महापुराची स्थिती निर्माण केलेली होती. तेव्हा तिथे धाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता. नंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनाही तिथे धाडले. पुढले काही दिवस केंद्रीय गृहसचिव काश्मिरात ठाण मांडून बसलेले होते. त्या प्रसंगात भारतीय सेना व तिचे सैनिक अहोरात्र संकटातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयास करीत होते. आपला जीव धोक्यात घालून काश्मिरींना वाचवण्याचा आटापिटा चाललेला होता. तेव्हा या सैनिकांवर कोणी दगड मारलेले नव्हते. उलट जिथून तिथून त्याच भारतीय सैनिकांना आपल्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन, संकटात सापडलेले काश्मिरी करीत होते. त्यापैकी एका मुजोर काश्मिरीने तर ‘आम्हाला भारतीय सेनेची मदत नको अल्लाच आमचे रक्षण करील’ अशीही दर्पोक्ती केलेली होती. मात्र अल्ला त्याच्या मदतीला धावला नाही, तेव्हा त्यानेही सेनेलाच आमंत्रण दिलेले होते. यातली मस्ती लक्षात घेतली पाहिजे. पण त्यासाठी काश्मिरी नेते व चळवळ्यांना दोष देणारे आपण तरी किती प्रामाणिक भारतीय आहोत, याचेही थोडे आत्मपरिक्षण आवश्यक आहे.

गेल्या आठवडाभरात उत्तरप्रदेशच्या गोरखपूर भागात आणि पुर्व उत्तरप्रदेशात एका भयंकर बालरोगाने थैमान घातलेले आहे. त्यात दोन दिवसात मिळून ३० मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग यांना लक्ष्य बनवण्यात आले. एकूणच असा सूर लावला गेला, की जणू याच दोघांनी त्या प्राणघातक आजाराचे विषाणू त्या परिसरात आणून टाकलेले आहेत. त्यामुळे बालकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे. संकट भयंकर आहे आणि त्याची व्याप्ती गंभीर आहे. त्यात सरकारी यंत्रणेची दिरंगाई व हलगर्जीपणा नक्कीच झालेला आहे. पण हे संकट नवे नाही आणि आज ज्यांनी त्यासाठी टाहो फ़ोडलेला आहे, त्यांना यापुर्वी असे काही भयंकर संकट असल्याचा सुगावाही कधी लागलेला नव्हता. अशा काळात म्हणाजे मागल्या सोळा सतरा वर्षात त्याच भागातले खासदार म्हणून योगी आदित्यनाथ यांनी त्यावर संसदेत सातत्याने आवाज उठवलेला होता. चर्चा घडवून आणलेल्या होत्या. त्या चर्चेची किती माध्यमांनी व आरोपकर्त्या शहाण्या लोकांनी दखल घेतलेली होती? जे मागली कित्येक वर्षे ह्या समस्येकडे वा संकटाकडे ढुंकून बघायला तयार नव्हते, तेव्हा एकच माणुस त्यासाठी आक्रोश करीत होता. तर त्यालाच या आजाराचा पत्ता नसल्याचा कांगावखोरपणा चालला आहे. मुद्दा इतकाच, की मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री म्हणून अशा आजाराचे निर्मूलन करणे व प्रतिबंध घालणे ही नक्कीच आदित्यनाथ यांची जबाबदारी आहे. पण दुसरीकडे आपल्या मुलाबाळांना अशा आजाराची बाधा व्हावी, ही सामान्य नागरिकांची जबाबदारी वा कर्तव्य आहे काय? या पालकांनी आपल्या बालकांच्या आरोग्यासाठी आजवर कोणते प्रयत्न केलेले आहेत? की त्यापैकी बहुतांश नागरिक अशा आजारांना आमंत्रण देण्यात पुढे असतात? देश निष्क्रीय व नाकर्त्या नागरिकांमुळे सार्वभौम होत नसतो, की स्वावलंबी होत नसतो.

दोन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधूनच स्वच्छ भारताची घोषणा केलेली होती. त्यात त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व कचर्‍याचे नियोजन करण्यासाठी आवाहन केलेले होते. किती नागरिक त्याला प्रतिसाद देऊन पुढे आलेले आहेत? रोगबाधा झालेल्या नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहेच. पण आपल्या प्रयत्नातून आपण निरोगी रहाणे, हे नागरिकाचेही कर्तव्य नाही काय? आपला परिसर शक्य तितका स्वच्छ राखला, तर रोगराई पसरणार नाही. त्यात सामान्य नागरिक जितके योगदान देऊ शकतो, तितकी सरकारी यंत्रणाही काम करू शकत नाही. मागली चार दशके गोरखपूर व पुर्व उत्तरप्रदेशात हया रोगाची साथ पावसाळ्यात येत असेल तर त्यापुर्वीच कचर्‍याचे नियोजन करून रोगबाधेला प्रतिबंध घालण्याचे कर्तव्य नागरिकांचे नाही काय? त्यांच्या मुलांना आजाराची बाधा झाल्यावर डॉक्टरपडे घेऊन जाण्यापुरते पालकांचे कर्तव्य असते काय? मुळातच बाधा होऊ नये, म्हणून सरकार प्रतिबंधक डोस देण्याच्या मोहिमा चालवते. पण या रोगाचा प्रादुर्भाव घाण व उकिरड्यातून होत असेल, तर त्यालाच आवर घालण्यातून अधिक परिणाम मिळू शकतात. हे नागरिकांचे कर्तव्य नाही काय? की घाण कचरा करणे व त्याचे ढिग उकिरडे उभे करण्याचे अधिकार आपल्याला मिळालेले आहे? रोगाला आमंत्रण त्यातून मिळते हे कोणी सांगावे? इतक्या आवेशात इस्पितळ वा सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने पुढल्या वर्षी हाच आजार बालकांचे बळी घेणार नाही, अशी कोणाची समजूत आहे काय? ते कटूसत्य लोकांना समजावून सांगण्यापेक्षा सरकारच्या माथी खापर फ़ोडण्यातून पुढल्या वर्षी अशाच रितीने बालकांचे बळी घालवण्याची हमी मिळू शकते. सवाल रोगाच्या प्रतिबंधाचा आहे आणि त्यात नागरिक मोठी भूमिका पार पाडू शकतात.

दुर्दैव असे आहे, की मागली दोन वर्षे पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची टिंगल टवाळी करण्यात माध्यमांचा वेळ अधिक खर्च झाला. कोणी मंत्री वा पुढारी आडोसा बघून लघवी करत असल्याची चित्रे दाखवण्यात धन्यता मानली गेली. दिल्लीसारख्या राजधानीत माजलेला कचरा दाखवण्यावर कित्येक तास खर्ची घालण्यात आले. पण सामान्य नागरिकाने आपल्या परीने परिसरात स्वच्छता राखण्यासाठी काय करावे? सामुदायिकरित्या स्वच्छता मोहिमा कशा राबवाव्यात, त्याचे मार्गदर्शन कोणाही माध्यमाने केले नाही. त्या विषयातल्या सरकारी जाहिराती दाखवणार्‍यांनी नागरिकाला स्वच्छ निरोगी जगण्याविषयी दोन शब्द सांगण्यात कंजुषी कशाला होते? कर्तव्याचा बोजा डोक्यावर घेऊनच अधिकार येतो, ही शिकवण मागल्या सत्तर वर्षात किती दिली गेली? कचर्‍याचे ढिग हे कधी शिवसेना वा कधी आम आदमी पक्षावर खापर फ़ोडण्यासाठी दाखवले गेले? म्हणून रोगराईला आळा घातला गेला होता काय? त्या विषयातील नागरिकांचे कर्तव्य शिकवण्याची जबाबदारी माध्यमांचीही आहे. त्याविषयी आपणही तितकेच गाफ़ील व नाकर्ते आहोत, याची कबुली कोणी दिली आहे काय? रोगाची बाधा व्हायला हरकत नाही, पण आजारावर उपचार मात्र वेळच्या वेळी झालाच पाहिजे, ही मानसिकताच रोगट आहे आणि त्यालाच आजकाल बुद्धीवाद वा शहाणपणा मानले जात आहे. स्वातंत्र्याचा हा विकृत अर्थच सामाजिक व नागरी आजाराचे कारण होऊन गेलेला आहे. बेजबाबदार नागरिक आणि नाकर्ते प्रशासन, ही आपल्या स्वातंत्र्याला लागलेली किड आहे. त्यात शेवटी आपलाच बळी पडतो याचीही कोणाला फ़िकीर राहिलेली नाही. कोणाच्या तरी डोक्यावर खापर फ़ोडण्यात धन्यता मानली जाते आणि पुढल्या वर्षीच्या संकटाची बेगमी केली जात असते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीत गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धाव घेणार्‍या बोकडाला कोण वाचवू शकतो? काश्मिरी उचापतखोर आणि भारतीय मानसिकता यात कितीसा फ़रक आहे?

7 comments:

  1. भाउ मस्तच.पुण्या मुंबइ सारख्या शहरात पन नागरीक किती गलिच्छ वागतात ते दिसतै. युपीत काय मग.आपल्याकडे स्वच्छतेची संस्कृती नाही.व केोणी रुजवली पन नाही.लोकसत्ता सारखा अतिशहाणा पेपर योगिक बालकांड सारखा बालिश लेख लिहितो.ही इथल्या पुरोगामी म्हनवणार्याची अवस्था.नेहमी सरकारला दोष देउन उपयोग नाही.

    ReplyDelete
  2. अतिशय परखड! साधे रस्त्यात थुंकू नये हि गोष्ट किती लोक पाळतात ? आपण घाण करायची आणि सरकारने साफ करायची अशीच आपली मनोवृत्ती आहे काय ?

    ReplyDelete
  3. देश प्रगती नक्कीच करील
    आधी आपण
    1) लाच देणे घेणे थांबवू या
    2) अनुदान घेणे थांबवू या
    3) आपला परिसर स्वच्छ ठेवू या
    4) प्रामाणिकपणे सर्व कर भरू या
    5) जात धर्म बाजूला ठेवून पहिला देशाची प्रगती कशात आहे हे बघू या
    6) घटणेने दिलेले *अधिकार* वापरण्यापूर्वी आपली *कर्तव्ये* पार पाडू या

    करून बघा

    अच्छे दिन आनेवाले है।

    ReplyDelete
  4. भाऊ

    भारतीय नागरी स्वच्छता म्हणजे काय शहरातला कचरा गावाकडील कचरा डेपो मध्ये नेऊन टाकणं, थोडक्यात आपला कचरा दुसऱ्याचा दारात..... पूढे काय तर त्या गावातील जनतेच्या आरोग्याशी खेळ....

    अपवाद म्हणून तरी काही ....

    ReplyDelete
  5. या असल्या घटनांमधूनही हे माजलेले ' फुरोगामी ' तण.....त्या दवाखान्यातील एक ' मुसलमान ' डॉक्टर कसा मदतीसाठी धावून आला हे सांगण्यात पुढे होते. .. नंतर एक दिवसांनी तो डॉक्टर कसा ' बोगस ' व ' लंपट ' होता हे बाहेर आले............अगदी अशीच घटना अमरधाम यात्रेदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत ...तेंव्हाही त्या गाडीचा मुसलमान ड्रायवर कसा सगळ्यांना वाचविण्यात पुढे होता ह्याचीच पहिले दोन दिवस चर्चा होती आणि यात पुढे होते तेच परत ' फुरोगामी ' .. नंतर दुसऱ्या दिवशी कळाले कि त्या यात्रेकरुंच्या गाडीला ७ वाजल्यानंतर प्रवास करायला परवानगी नसतानाही हा ड्राइवर प्रवाशांना घेऊन गाडी चालवत गेला. एवढा ' बेजबाबदारपणा ' दाखवूनही परत त्या ड्रायव्हरचे ' कौतुक ' कारण तो ' मुसलमान ' होता.

    ReplyDelete
  6. Wah bara vatala ha lekh vachun ...khara gambhir vishay Mandalay Jo roj sagale anubhavatat..nahitar Delhi t Kay challay ani Kashmir madhe Kay challay he konala padliye ethe...sarkar ani court he haluhalu cheshte che vishay honar ahet yat vaad nahi

    ReplyDelete
  7. सगळेच सोयीनुसार opportunist आहेत...

    ReplyDelete