Friday, August 11, 2017

हमीदभाईंना जाग आली

हमीद अंसारी के लिए चित्र परिणाम

शुक्रवारी व्यंकय्या नायडू यांचा राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी पार पडला. नंतर राज्यसभेचे नवे अध्यक्ष म्हणूनही त्यांचा स्वागत समारंभ साजरा झाला. आधी गुरूवारी मावळते उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती म्हणून हमीद अन्सारी यांचा निरोप समारंभ पार पडला. आपल्या पुर्वायुष्यात अनेक महत्वाची सत्तापदे व जबाबदार्‍या पार पाडलेल्या अन्सारी यांनी या घटनात्मक पदावरून केलेले अखेरचे भाषण त्यांच्याच नव्हेतर अनेकांच्या स्मरणात राहिल. कारण त्यांनी अखेरच्या क्षणी आपण कसे एका विशिष्ट धर्माचे आहोत, त्याचा दाखलाच या महत्वाच्या पदावरून बोलताना दिला. मागली दहा वर्षे हे गृहस्थ भारताचे उपराष्ट्रपती होते आणि त्या काळात त्यांना कधी मुस्लिमांची भारतात आबाळ होते आहे, असे वाटलेले नव्हते. पण अखेरच्या भाषणात त्यांनी तशी खंत व्यक्त केली. मुस्लिमांना या देशात असुरक्षित व अस्वस्थ वाटते आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. ते खरे असेल तर दहा वर्षे त्यांनी हे दुखणे कशाला बोलून दाखवले नव्हते, असाही प्रश्न निर्माण होतो. अर्थात आधीची सात अर्षे देशात युपीए वा कॉग्रेसचे राज्य होते आणि म्हणून मुस्लिम बहुधा जगात सर्वाधिक सुरक्षित होते, असाच त्यांचा समज असावा. पण शेवटची तीन वर्षेतरी देशात मोदी वा भाजपाचे राज्य आहे. त्याही काळात त्यांनी कधी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे सूचितही केलेले नव्हते. मग अखेरच्या क्षणी त्यांना हा साक्षात्कार कुठून झाला? कुठला देवदुत कानाशी येऊन गुणगुणला आणि यांना एकदम मुस्लिम असुरक्षित असल्याचे जाणवले? बहुधा त्यांना अधिकारपद सोडत असल्याने असुरक्षित झाल्याचे भान आलेले असावे. ही केवळ त्यांची वा भारतीय मुस्लिम नेत्यांचीच धारणा असल्याचा अनेकांचा आरोप असतो. पण त्यामध्ये तथ्य नाही. ही जगभरची मानसिकता आहे. कारण जे काही हमीदभाई बोलले, तेच जगभरचा मुस्लिम सदासर्वत्र बोलत असतो.

कालपर्यंत उपराष्ट्रपती असलेल्या व्यक्तीचा हमीदभाई असा काहीसा एकेरी उल्लेख अनेकांना खटकू शकतो. पण जेव्हा आपल्या पदाची शान व जबाबदारी विसरून कोणी व्यक्तीगत समजूतीनुसार वक्तव्य करू लागतो, तेव्हा त्याच्या घटनात्मकतेची महत्ता संपुष्टात आलेली असते. म्हणूनच हमीदभाई असा उल्लेख करणे भाग आहे. हमीदभाई कुठल्या मदनपुरा वा अलिगडच्या मोहल्ल्यात व्यासपीठावर उभे राहून बोलत नव्हते. असाउद्दीन ओवायसीप्रमाणे हमीदभाई हैद्राबादच्या गल्लीबोळातच फ़क्त वावरलेले नाहीत. त्यांची हयात उच्चभ्रू भारतीय व जगभरच्या मुत्सद्दी माहोलमध्ये खर्ची पडलेली आहे. भारतीय राजदूत वा अन्य महत्वाच्या पदावरही त्यांनी चारपाच दशके काम केलेले आहे. तिथे त्यांना कोणी मुस्लिम म्हणून वागवलेले होते काय? अपमानास्पद वागणूक वा असुरक्षिरपणे वागवले जाण्याचा प्रसंग त्यांच्यावर कधीच आलेला नाही. असे असताना त्यांनी ही भाषा करावी, याचे नवल वाटत नाही. जे पोटात असते ते ओठावर आल्याची ती खूण आहे. भारतात आधिकार हवे असले म्हणजे नेहमी संविधानाचे हवाले देण्यात मुस्लिम नेते पुढे असतात. पण जेव्हा त्याच संविधानाच्या चौकटीत जबाबदारीचा विषय येतो, तेव्हा त्यांना धर्माचे कौतुक अधिक आहे, याची जाणिव होते. सोयीचा असेल तेव्हा धर्म आणि सोयीचे असेल तेव्हा संविशान, ही दुटप्पी खेळी बहुतांश मुस्लिम नेते खेळत आलेले आहेत. बाजूच्या पाकिस्तानात दोन दशकांनंतर कुणा हिंदू अल्पसंख्यांकाची मंत्रीमंडळात अर्णी लागल्याची बातमी अवघ्या दोन दोन दिवसांपुर्वी आलेली होती. ती हमीदभाईंनी वाचलेली सुद्धा नसेल काय? अल्पसंख्यांकांना शेजारी मुस्लिम देशामध्ये किती पक्षपाती वागणूक मिळते आणि तशी वागणूक देणारे मुस्लिमच आहेत, याची लाज हमीदभाईंना कधी वाटलेली आहे काय? नसेल तर त्यांनी अशी मुक्ताफ़ळे दहा वर्षे सत्ता उपभोगल्यावर उधळणे त्यांच्याच पदाला शोभणारे नसते.

हिंदूबहुल देश असून तीन राष्ट्रपती मुस्लिम झाले आणि पदोपदी मुस्लिमांना महत्वाची पदे इथे दिली गेलेली आहेत. त्याच्या तुलनेत कुठल्या मुस्लिम देशामध्ये बिगर मुस्लिमाला काही अधिकार मिळालेले आहेत काय? कुवेतच्या एका माजी मंत्र्याने बारा वर्षापुर्वी एका लेखात याचे उदाहरण अगत्याने दिलेले होते. जगातला कुठला अरबी वा मुस्लिम देश असा दाखवा, जिथे घराणे वा लष्करी बळावर मुस्लिम सत्ता बळकावून बसलेला नाही? भारत असा एकमेव देश आहे तिथे हत्याराशिवाय लोकमताने एक मुस्लिम राष्ट्राचा प्रमुख म्हणून विराजमान झालेला आहे. अशा शब्दात त्या अरबी मुस्लिम नेत्याने डॉ. अब्दुल कलाम यांच्या अधिकारपदाचे कौतुक केले होते. तितकीही सभ्यता हमीदभाई दाखवू शकलेले नाहीत. कारण त्यांना पुरोगामीत्व, संविधान वा अन्य कुठल्याही वैचारिक भूमिकेपेक्षाधी आपल्या धर्मांधतेतून कधी बाहेर पडता आलेले नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. तसे नसते तर जगभर राजदूत म्हणून फ़िरलेल्या हमीदभाईंना मुस्लिम कुठल्याही देशात सुरक्षित नसतो, हे समजू शकले असते. भारत सोडाच, जगातला असा कुठला देश हमीदभाई दाखवू शकतील, जिथे मुस्लिम स्वत:ला सुरक्षित मानतो? याचेही उत्तर हमीदभाइंनी द्यावे. अमेरिका वा बिगर मुस्लिम देश सोडून द्या. जिथे मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे आणि जिथे इस्लामधिष्ठीत राजसत्ता आहे, तिथे तरी मुस्लिमांना कधी सुरक्षित राहिले आहेत काय? कट्टर इस्लामी खिलाफ़तीचे राज्य मानल्या जाणार्‍या इसिसच्या राज्यात तर सर्वाधिक कत्तल मुस्लिमांचीच झालेली आहे. हमीदभाईंची विवेकबुद्धी जागी वा शिल्लक असती, तर निवृत्तीच्या दिवशी असली उफ़राटी भाषा ते बोलले नसते. आधी मुस्लिम आणि नंतर इतर काही असल्याची जी समजूत आहे, त्यातून बाहेर पडता आले नाही, तर शिक्षण वा बुद्धी कामाची नसते. ओवायसी व हमीदभाई यांच्यात तसूभर फ़रक रहात नाही.

पाकिस्तान हा मुस्लिमांचाच देश म्हणून वेगळा झाला ना? तिथे नित्यनेमाने शिया वा अहमदीया म्हणून कोण बळी घेतो आहे? त्या अहमदीया वा शियांना हमीदभाई मुस्लिम मानतात काय? असते तर त्यांना भारतात मुस्लिम किती सुरक्षित आहेत, त्याचा थोडाफ़ार अंदाज आला असता. पाकिस्तानात शिया वा इराणमध्ये सुन्नी मुस्लिमांना सुरक्षित वाटत नसेल. पण अशा दोन्ही पंथाच्या मुस्लिमांना त्यापेक्षा भारतात अधिक सुरक्षितता मिळालेली आहे. गेल्या दोन दशकात मुस्लिमांचे अधिकार हा जगाच्या ऐरणीवर आलेला विषय आहे आणि त्यातल्या बारीकसारीक घटनांचा अभ्यास केला, तर मुस्लिम असणे म्हणजेच असुरक्षित असण्याच्या भावनेला सतत खतपाणी घातले गेलेले आहे. आपण मुस्लिम आहोत म्हणून कुठल्याही कायदा, व्यवस्था किंवा राज्यशासनाच्या विरोधात कांगावखोरी करण्याला आता मुस्लिम असे छोटे नाव मिळालेले आहे. कधी दाढी, तर कधी बुरखा यांच्यावरचा आक्षेप ज्यांना असुरक्षित करतो, त्याला आजकाल जगभर मुस्लिम म्हणून ओळखले जाते. किंबहूना कुठल्याही कारणाने वा कोणत्याही देशात तक्रार करत रहाणार्‍यांना आजकाल मुस्लिम असे संबोधले जाते, म्हटल्यास वावगे ठरू नये. इतके उच्चशिक्षण व प्रदिर्घ अनुभव घेऊन जग बघितलेल्या या गृहस्थांना अजूनही भारतातला मुस्लिम असुरक्षित असल्याचे जाणवत असेल, तर त्यांना मुस्लिम समजलेला नाही वा जगही समजलेले नाही. कुठल्याही गल्ली मोहल्ल्यात जन्मलेल्या सामान्य हनीफ़ वा दाऊदपेक्षा ते वेगळे असू शकत नाहीत. त्यांच्या मनातली भिती कुठला कायदा किंवा सरकार कशाही मार्गाने दूर करू शकत नाहीत. कारण आजार दुखण्यावर उपाय असतो. भ्रमातच जगणार्‍यांसाठी कुठला उपाय नसतो की उपचार नसतो. उपराष्ट्रपती म्हणून दहा वर्षे खर्ची घातलेला माणूस अखेरीस हमीदभाई ठरला, याची म्हणूनच खंत वाटते.

13 comments:

 1. मोदीनी उत्तर पन तसेच दिलेय.

  ReplyDelete
 2. मुस्लिम लोक असुरक्षितच आहेत...!
  जो मुस्लिम आज काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याला इस्लाम विरोधी ठरवण्यात मुस्लिम लोकच पुढे असतात.
  मग ते बुद्धिबळ खेळणं असो अथवा वाढदिवसाला केक कट करणे असो.
  अगदी आपल्या पत्नीसोबत फोटो काढणे सुद्धा इस्लामविरोधी ठरवण्यात येत...
  आता अश्या वातावरणात मुस्लिम घाबरणारच ना..

  ReplyDelete
 3. अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का ।
  सबको मंजिल का शौक है
  और मुझे सही रास्तों का।
  ये दुनिया इसलिये बुरी नही है
  के यहा बुरे लोग ज्यादा है ।
  बल्कि इसलिए बुरी है कि
  यहा अच्छे लोग खामोश है।

  हे असले लोक माझ्या देशाचे भारतीय राजदूत वा अन्य महत्वाच्या पदावरही होते म्हणुन'च' माझा देश थोडासा मागे राहिलाय

  ReplyDelete
 4. पंकज जोशीAugust 12, 2017 at 12:05 AM

  नमस्कार भाऊसाहेब, मी आपला एक नियमित वाचक आहे,मागील दिड वर्षा पासून.असेच * दिसमाजी दिस लिहीत जावे...* हि विनंती.

  ReplyDelete
 5. हमीद ची बातमी बघुन माझी प्रतिक्रिया - पुढील प्रमाणे
  कृपया हि comment नक्की post करावी, हि विनंती

  https://youtu.be/aHbWHnGV-lM

  ReplyDelete
 6. तुटलेल्या कोल्हापुरी चपलेला मारलेला खिळा काढून त्याच तूटक्या चपलेने शेलातला जोडा मारलाय हमीद् भाई सारख्या संधीसाधू ना ...

  भाऊ तोरसेकर साहेब अप्रतिम लेख पोस्ट करून सर्वसामान्यांच्या मनातलं कागदावर आणलंय तुम्ही

  ReplyDelete
 7. पूर्वी मोठ्या प्रमाणात धर्मपरिवर्तन करून राजे लोक असले प्रश्न सहज सोडवायचे. हल्लीच्या लोकशाहीत ते शक्य नाही. स्विस च्या राजाने इतिहासात असे केले आहे.

  ReplyDelete
 8. जात दाखवली मुसलमानाने.

  ReplyDelete
 9. http://mahamtb.com/Encyc/2017/8/10/article-on-hamid-ansari-statement-of-unease-among-Muslims.html

  Sir maza lekh aahe vachun pratikriya athava suchana kalava...

  ReplyDelete
 10. भारताला त्याच्या निधर्मी असण्याची आणि ते सिद्ध करायला लावण्याची बचावात्मक भूमिका सतत घ्यायला लावण्याची मुस्लिम नेत्यांचीच नव्हे तर सर्वसामान्य मुस्लिम माणसाची स्ट्रॅटेजी असते ., त्याचेच उदाहरण म्हणजे हमीद अन्सारींचे वक्तव्य आहे . स्वतःला अजिबात अपराधी न वाटू देता त्याकडे लक्ष न देणे ही आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे .

  ReplyDelete
 11. अति सुंदर व वास्तववादी लेख.

  ReplyDelete
 12. " भारतात आधिकार हवे असले म्हणजे नेहमी संविधानाचे हवाले देण्यात मुस्लिम नेते पुढे असतात. पण जेव्हा त्याच संविधानाच्या चौकटीत जबाबदारीचा विषय येतो, तेव्हा त्यांना धर्माचे कौतुक अधिक आहे, याची जाणिव होते. "

  वाह...!��

  ReplyDelete
 13. दुनिया(मुस्लिम राष्ट्रेसुद्धा) योग्य दिवस साजरे करीत होती, पण आपले हमीदभाई त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक योग्य दिवसाला आजरपणाचे कारण देऊन लांब असायचे.

  ReplyDelete