Monday, May 28, 2018

कॉग्रेस कृपेकरून

kumaraswami cartoon के लिए इमेज परिणाम

गेल्याच्या गेल्या मंगळवारी कर्नाटक विधानसभेची मतमोजणी झाली आणि तात्काळ कुठल्याही चर्चेशिवाय कॉग्रेसने आपला पाठींबा कुमारस्वामी या जनता दल सेक्युलर पक्षाच्या नेत्याला देऊन टाकला होता. त्यानंतरच्या काळातला तमाशा आपल्यासमोर आहेच. सात जागांनी बहूमत हुकलेल्या भाजपाने औटघटकेचा मुख्यमंत्री बसवला आणि कॉग्रेसनेच मध्यरात्री सुप्रिम कोर्टाला कौल लावून त्या येदीयुरप्पांना राजिनामा देण्याची वेळ आणली. हे सर्व करताना बिचारा भावी मुख्यमंत्री कुठे होता आणि काय करत होता? तेही कोणाला सांगता येणार नाही. सगळी लढाई कॉग्रेसचेच नेते लढवित होते आणि त्यांना पुरोगामी कर्नटकासाठी जनता दलाचा मुख्यमंत्री सत्तेत बसवायचा होता. सहाजिकच स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांचा उत्साह उतू गेल्यास नवल नव्हते. हा जनमत कौल कसा भाजपाच्या विरोधातला आहे आणि म्हणून तो कुमारस्वामी यांच्या बाजूचा आहे, त्याचे युक्तीवाद करताना पुरोगाम्यांचा उत्साह संपत नव्हता. पण आता तो कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन व बहूमत सिद्ध करून मोकळा झाल्यावर काय म्हणतो आहे? आपल्याला जनतेने कौल दिलेला नाही आणि म्हणूनच आपण जनतेला बांधील नसून केवळ कॉग्रेसच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झालेले आहोत. आपल्याला जनतेच्या इच्छाआकांक्षांची फ़िकीर करण्याचे कारण नसून, कॉग्रेस व पर्यायाने राहुल सोनियांची मर्जी संभाळत कारभार करावा लागणार आहे. पुरोगामी लोकशाहीचा इतका नेमका अर्थ भाजपालाही कधी सांगता आला नाही की जनतेला पटवता आलेला नाही. कुमारस्वामी कसे छान सरकार चालवणार याची वर्णने मागला आठवडाभर आपण ऐकून झालेली आहेत. आघाडीची सरकारेही स्थीर असू शकतात, त्याचे हवाले आपल्याला पुरोगामी माध्यमांनी दिले आहेत. पण कुमारस्वामींचा निकटचा सहकारी उपमुख्यमंत्रीच त्यावर शिकामोर्तब करायला तयार नाही.

माध्यमातील पुरोगामी पत्रकार संपादक व प्रायोजित विचारवंतांची नेहमीच अशी नाचक्की होत असते. आताही खुद्द कुमारस्वामींनी हा विजय आपला नसल्याचे सांगून अशा विचारवंतांना दणका दिला आहेच. जनतेला या आघाडीच्या प्रयोजनात कुठलेही स्थान नसल्याचेही स्पष्टपणे सांगून टाकलेले आहे. आपण सर्व जागा लढवताना जनतेकडे स्वच्छ बहूमत मागितले होते आणि आपला कार्यक्रम राबवण्यासाठी आशीर्वाद मागितला होता. पण जनतेने आपल्याला कौल दिलेला नाही. तर कॉग्रेसमुळेच आपण मुख्यमंत्रीपदी बसलो आहोत, असे कुमारस्वामी म्हणतात. ते त्यांनी तोंडाने बोलण्याची काहीही गरज नव्हती. सर्व सामान्य अडाणी जनतेलाही ते दिसते असते आणि केवळ माध्यमातील अभ्यासक संपादकांना कळत नसते. त्यामुळेच कुमारस्वामींना हा खुलासा शहाण्यांसाठी करावा लागला आहे. बाकी जनतेला त्यातली सत्तालोलुपता आधीच दिसलेली आहे. ती दिसत असल्याने पुरोगामी म्हणून जे नाटक चालते त्याचा सगळीकडे बोजवारा उडवित मतदाराने नवी राजकीय रचना उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे. मोदी त्याला कॉग्रेसमुक्त भारत म्हणतात. पण वास्तवात कॉग्रेसमुक्त भारत म्हणजे एका कॉग्रेस पक्षाला नामशेष करायचे नसून कॉगेस नावाची सत्तालोलूप प्रवॄत्ती निकालात काढणे असा अर्थ आहे. इतक्या सोप्या गोष्टी शहाण्यांना कळत नाहीत. जनतेला सहज कळतात आणि ती त्यानुसार कामालाही लागते. पण त्या अकलेच्या स्पर्धेत शहाणे मागे राहू नयेत, म्हणून मग कुमारस्वामींना स्पष्ट शब्दात असे काही समोर येऊन सांगावे लागते. अर्थात म्हणून अभ्यासक जाणकारांना तितके सोपे कळण्याची बिलकुल शक्यता नाही. कुमारस्वामी सरकारचा कपाळमोक्ष झाल्याखेरीज हा नवा मुख्यमंत्री काय म्हणत होता, ते संपादक पत्रकार शहाण्यांना अजिबात कळणार नाही. सहाजिकच त्यांना बाजूला ठेवून आपण या विधानाचा उहापोह करणे आवश्यक आहे.

अर्थात ह्यात नवे काहीच नाही. २००४ सालातही कॉग्रेस वा त्याच्या युपीए आघाडीला बहूमत मिळालेले नव्हते. पण त्यांच्याच विरोधात निवडणूका लढवलेल्या डाव्या आघाडीने असेच बुद्धीमान युक्तीवाद करीत भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कॉग्रेस-युपीएला बाहेरून पाठींबा दिलेला होता. त्यात मनमोहन सिंग यांना जनमताने सत्ता मिळालेली नाही, तर डाव्यांच्या कृपेने सत्ता मिळाली हे अभ्यासकांना कुठे समजलेले होते? त्यासाठी आणखी चार वर्षे जावी लागली. जेव्हा अणुकराराचा विषय आला, तेव्हा मनमोहन कोणाच्या कृपेने सत्तेत आले, त्याचा शोध शहाण्यांना लागला होता. कारण डाव्यांचे नेते प्रकाश कारत यांनी राष्ट्रपतींना भेटून पाठींबा काढून घेतला होता. बहूमताचा आकडा सिद्ध करताना मनमोहन सिंग यांना मुलायमच्या गुहेतील अमर नावाच्या सिहाची मदत घेऊन बहूमताची जुळवाजुळव करावी लागलेली होती. ती कसरत बघितली तेव्हा पुरोगामी एकजुटीची महत्ता माध्यमातील जाणत्यांना उमजली होती. फ़रक इतकाच, की मनमोहन यांनी तेव्हा डाव्यांच्या कृपेकरूनच आपण पंतप्रधान झाल्याची भाषा बोललेली नव्हती. कुमारस्वामी त्यांच्यापेक्षा प्रामाणिक आहेत. पण मनमोहन त्यातून अजिबात सुटलेले नव्हते. दुसर्‍या युपीए काळात त्यांनाही वेगळ्या शब्दात या कृपाप्रसादाचा खुलासा करावाच लागलेला होता. २जी घोटाळ्यात फ़सलेल्या ए. राजा नावाच्या मंत्र्याला हाकलून लावायची इच्छा असूनही मनमोहन तेवढे धाडस करू शकले नाहीत. राजिनामा मागूनही राजा दाद देत नव्हता. तेव्हा मनमोहन म्हणाले होते, ही आघाडीच्या राजकारणाची अगतिकता आहे. म्हणजेच पुरोगामी वगैरे भंपक भाषा असते. चोरी पकडली गेल्यावर गयावया करणार्‍या गुन्हेगारापेक्षा त्यात वेगळे असे काहीही नसते. पण आपला तो बाब्या असल्या सिद्धांतावर बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र मिळवलेल्यांकडून कुठली वेगळी अपेक्षा बाळगता येते?

आताही विधानसभेत बहूमत सिद्ध करून आठवडा पुर्ण होत आला आहे. पण नव्या पुरोगामी मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्यांची नाव निश्चीत होऊ शकलेली नाहीत, की त्यांचा शपथविधी होऊ शकलेला नाही. कॉग्रेसला किती मंत्रीपदे व जनता दलाला किती मंत्रीपदे, यांचा सौदा व्हायचा आहे. त्याला कानडी पुरोगामी भाषेत ‘विधान सौदा’ म्हणत असावेत बहुधा. अन्यथा इतके दिवस त्यावरून घोळ झाला नसता. एकदा पक्षाला मिळणार्‍या पदांची संख्या निश्चीत झाली, मग त्यात कोणाची वर्णी लागणार हा वाद शिल्लक असतोच. त्यात कुठे पुरोगामीत्वाचा विषय येऊ शकत नाही. त्यात कोणाला कुठले खाते मिळाणार वा नाही मिळणार, यावर देशाच्या पुरोगामी लोकशाहीचे भवितव्य विसंबून आहे. कारण असल्या भांडणार्‍या खडकावर पुरोगामी कानडी आघाडीचे तारू फ़ुटले, की त्यावर हात उंचावून उभे राहिलेल्यांना गटांगळ्या खाण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही. मजेची गोष्ट म्हणजे अशा डळमळणार्‍या जहाजातून पुरोगामीत्व पैलतिरी घेऊन जाण्याची हमी देणार्‍या माध्यमातील शहाण्यांचे काय होणार? कारण त्या शपथविधीच्या मंचावर नुसते हात उंचावून दोन डझन नेते उभे काय राहिले, तर इथे वाहिन्यांवर संपादकीयातून अनेकांचे अंग मोहरून आलेले होते. त्यातही कॉग्रेसकृपा बघायची शुद्धही कोणाला नव्हती आणि आता कुमारस्वामी काय म्हणत आहेत, तेही समजण्याची अक्कल नाही. अशा राजकारणात पुर्गामीत्वाचे काय व्हायचे ते होईलच. पण अशा पोरखेळातून माध्यमांची व पत्रकारितेची विश्वासार्हता मात्र दिवसेदिवस रसातळाला गेलेली आहे. तिकडे उद्या कुमारस्वामी उजळमाथ्याने भाजपाशी सत्तावाटपही करून जातील. पण तोंड लपवण्याची पाळी माध्यमात मिरवणार्‍या बुद्धीमंतर पुरोगाम्यांवर येणार आहे. कारण कुमारस्वामीना अब्रु नसते. अशा दिवाळखोरांची हमी घेणार्‍याचे मात वस्त्रहरण होत असते.

7 comments:

  1. क्या बत है भाऊ. एकदम सिक्सर मारली की कुमारस्वामीनी. प्रामाणिकपणे कबूल करून टाकले की मी मुख्यमंत्री काँगेसच्या हट्टाने झालो, जनतेने मला नाकारले आहे. आता कर्नाटकचे लोक सुद्धा पुढच्या मतदानात विचार करून मत देतील. 2019 ची सुरवात तरी चांगली झाली आहे.

    ReplyDelete
  2. अशा कुमारस्वामींना अब्रू नसते पण दिवाळखोरांची "हमी घेणाऱ्यांचे मात्र वस्त्र हरण होते"
    भाऊ, super conclusion!!👍👍

    ReplyDelete
  3. बिहार नंतऱ नितीशना मोदिंचे करदनकाळ मानणारे आता नितीशना नावे ठेवतायत उद्या कुमारस्वमी भाजपबरोबर गेले तर त्यांना पन नावे ठेवतीलजनपथभक्तांचाएककलमीकार्यक्रमआहे

    ReplyDelete
  4. कुमार स्वामी आज मोदीना भेटून आले। पुढे कदाचित ते काँग्रेसचे उपकार वापस करून मोदी कडे जातील। जसे नितीशजी गेले

    ReplyDelete
  5. अतिशय खरे आहे,स्वतः कुमारस्वामी असे म्हणतात आता जनता गेली उडत

    ReplyDelete
  6. राजदीप सरदेसाई कुमार केतकर शेखर गुप्ता असल्या भुक्कड पत्रकारांच्या जीवावर काँग्रेस आणि पुरोगामी एकमेकांशी आघाडी करून मोदी आणि शहा यांना हरवणार आहेत पुरोगाम्यांनी मोदींच्या द्वेषापायी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला कोण काय करणार

    ReplyDelete
  7. भाऊ, लेख छान - पण लेखात शुद्धलेखनाची पार ऐशी-तैशी केली आहे हे खटकतय. भाषेची जरा तरी बूज राखली जावी असं प्रकर्षाने वाटतं.

    ReplyDelete