Thursday, May 31, 2018

शतप्रतिशत वाताहत?

bypoll results gondia के लिए इमेज परिणाम

सोमवारी झालेल्या पोटनिवडणूकीच्या मतदानात भाजपाची शतप्रतिशत वाताहत झाली, हे कोणी नाकारू शकत नाही. अर्थात पोटनिवडणूकांमध्ये नेहमीच सत्ताधारी पक्षाला अपयश येत असते, हे आजवर अनेकदा दिसलेले आहे. म्हणूनच अशा निकालावर आधारीत २०१९ च्या लोकसभेची गणिते मांडणे गैरलागू ठरू शकते. आता कर्नाटकात भाजपाचा हुकलेला विजय आणि पाठोपाठ आलेले हे ताजे निकाल एकत्र करून, मोदीलाट संपल्याचेही निष्कर्ष काढले गेले तर नवल नाही. कारण लागोपाठ लोकसभा पोटनिवडणूकांत भाजपाने आधी जिंकलेल्या अनेक जागा गमावलेल्या आहेत. मित्रांच्या सहाय्याने २८२ जागा भाजपाने मिळवल्या होत्या. पण त्यातल्याच दहा जागा चार वर्षात पोटनिवडणुकातून गमावलेल्या आहेत. आजच त्यामुळे लोकसभेतील भाजपाचे संख्याबळ बहूमताच्या काठावर येऊन उभे राहिलेले आहे. पण त्यावरून लोकसभेच्या आगामी निवडणूकीची स्थिती सांगणे अतिरेकी आहे. हे खरे असले तरी विरोधक त्याचा तसा वापर करणारच आणि त्यात काही चुक नाही, शेवटी निवडणुकांची लढाई व राजकारण संकल्पनेवर चालत असते. अशा पराभवातून जनमानसात एक समज रुजवण्यात विरोधकांना रस असतो. मोदीच निवडणूका जिंकून देतात, असा तो समज आहे आणि त्याची प्रचिती नुकतीच कर्नाटकात आलेली आहे. तिथे भाजपाला पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्याला मोदीच कारणीभूत झाले आहेत. जिंकण्याची मोदींची क्षमता संपली असती, तर कॉग्रेसला मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले नसते. पण तसे झाले आहे. मग विरोधी पक्ष एकवटले तर भाजपा मोदींचा पराभव होऊ शकतो, हा सिद्धांत पुढे आणला गेला. त्याला दुजोरा देण्यासाठी हे निकाल वापरले गेले तर चुक कसे असेल? मात्र युक्तीवाद म्हणून ते मान्य केले तरी त्यामुळे विरोधी पक्ष एकजुट झाल्याने २०१९ ला भाजपा संपला, अशा भ्रमात रहाणे धोक्याचे ठरेल.

सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकात मोठा फ़रक असतो. पोटनिवडणूकीत वातावरण निर्मिती फ़ारशी होत नाही आणि मतदानावरही परिणाम होत असतो. जितके उत्साहात लोक सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाला घराबाहेर पडतात, तितके पोटनिवडणूकीच्या वेळी येताना दिसत नाहीत. आताही झालेल्या सर्व मतदानाचे आकडे थोडे तपासले, तर त्याचीच ग्वाही मिळू शकते. गोरखपूर फ़ुलपूर वा कैराना या जागांसाठी २०१४ साली झालेले मतदान व आज झालेले मतदान, यात मोठी तफ़ावत आहे. त्यावेळी वातावरण तापलेले असते आणि व्यापक यंत्रणा राबवली जात असते. तीन आठवड्यापुर्वी कर्नाटकात झालेले मतदान व आता सोमवारी त्यापैकी राहिलेल्या एका मतदारसंघातील मतदान, यांची टक्केवारी त्याचीच साक्ष आहे. सहाजिकच त्यात जनमानसाचे नेमके प्रतिबिंब पडत नाही. पोटनिवडणूकीत येणारा मतदार आपल्या त्या भागातला आमदार नगरसेवक किंवा खासदार निवडण्यासाठी येत असतो. पण सार्वत्रिक निवडणूकीत त्याचा उत्साह सरकार निवडण्याच्या बाबतीतला असतो. ताज्या निकालांनी केंद्र वा राज्यातील सरकारची निवड झालेली नाही वा सरकार बदलण्याची वेळ आलेली नाही. त्याचाच परिणाम मग मतदानाच्या प्रमाणावर होत असतो. पण म्हणून सत्ताधारी पक्षाने त्या निकालाकडे दुर्लक्ष करण्याइतकाही तो नगण्य निकाल नसतो. दीड वर्षापुर्वी दिल्ली विधानसभेच्या एका जागी पोटनिवडणूक झाली होती आणि त्यातही सत्ताधारी आम आदमी पक्षाचा पराभव झाला होता. पण आठ महिन्यांनी तसेच मतदान झाले, तेव्हा त्याच पक्षाने आपली जागा राखलेली होती. आताही भाजपाने पालघर राखताना गोंदिया व कैराना या लोकसभेच्या दोन जागा गमावलेल्या आहेत. पण तेवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. कर्नाटकनंतर विरोधकांनी एकजुटीच्या गर्जना केलेल्या असल्याने, ह्या निकालाचे वेगवेगळे अर्थ लावले जाणार आहेत.

अर्थात आज विजेते ठरलेल्यांना असले काही ऐकून घेण्याची गरज नाही. त्यांना आजचा विजय साजरा करायचा असतो. त्यामुळे विजयातला धडा शिकण्याची गरजही वाटत नाही. महाराष्ट्रात युती मोडली गेली आणि त्यानंतरही भाजपाने १२२ जागा जिंकल्या, तेव्हा युती मोडण्यातले दुरगामी तोटे मी सडेतोडपणे मांडले होते. पण किती भाजपावाल्यांना ते रुचले होते? कारण तेव्हा भाजपा विजेता होता आणि युती मोडण्यातला हंगामी लाभ त्या पक्षाला झालेला होता. पण त्यातल्या मतविभागणी वा मतांच्या टक्केवारीचे वैचित्र्य किती लोकांनी लक्षात घेतले होते? आज मोदी वा भाजपाला ३१ टक्क्यातच बहूमत मिळाल्याचे अगत्याने सांगितले जाते. पण महाराष्ट्र विधानसभेत भाजपा १२२ जागा मिळताना किती मते होती? सेनेला १९ व भाजपाला २७ टक्के मते होती. म्हणजे दीडपट मतांच्या बळावर भाजपाने दुप्पट आमदार मिळवले होते. त्यात कॉग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढतानाही जवळपास ३५ टक्के एकत्रित मते मिळवून गेले होते. पण त्यांच्या जागा मात्र ८२ होत्या. हीच तर मतविभागणी व सर्वात अधिक मते मिळवून जिंकण्यातली जादू असते. युती मोडल्याने राज्याची सत्ता मिळाली व सेनेला खेळवता आले, तरी पुढल्या लोकसभेत त्याची किंमत भाजपाला मोजावी लागेल, असा इशारा मी तेव्हाच दिलेला होता. पण तो भाजपाला भावणारा नव्हता आणि म्हणूनच आजच्या पोटनिवडणूकांच्या निकालात असलेला इशाराही विरोधकांना रुचणारा असू शकत नाही. विजयाची व यशाची झिंगच अशी चमत्कारीक असते, की सत्य डोळ्यासमोर असून बघता येत नाही. अवघ्या ६३ जागा जिंकलेल्या शिवसेनेला सत्ता हुकल्याचे दु:ख तेव्हा होते. पण स्वबळावर मिळवलेल्या १९ टक्के मतांची महत्ता तेव्हाही उमजली नव्हती. मग आजच्या निकाल व आकड्यातली क्षमता वा त्रुटी कोण कशाला लक्षात घेणार?

या निकालांत भाजपाने आणखी दोन लोकसभेच्या जागा गमावल्या आहेत. पण त्याचवेळी भाजपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी व प्रमाण निर्णायक महत्वाचे आहे. तिन्ही जागी भाजपाने स्वबळावर लढत दिलेली आहे आणि त्यात त्याला दोन जागी मिळालेली मते टक्कर देणारी आहेत. इतकी मते त्याआधी भाजपा स्वबळावर या तिन्ही जागी मिळवू शकला नव्हता. कैराना वा फ़ुलपुर अशा जागी भाजपाचा पराभव जरूर झाला, पण २०१४ सालात मिळालेल्या मतांचा मोठा हिस्सा भाजपा टिकवू शकला आहे आणि अशा प्रत्येक जागी त्याने आपल्या मतांची एक पेढी निर्माण केलेली आहे. जागा कोण किती लढवतो, त्यापेक्षा किती जागी लढत देऊ शकतो, ह्या आकड्याला महत्व असते. कारण जिंकण्यासारख्या जागा त्यातच लपलेल्या असतात. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, बंगाल, ओडीशा अशा जागी भाजपाला चार वर्षापुर्वी लढायचीही शक्ती नव्हती. आज तितकी दुर्दशा राहिलेली नाही. त्याच्या विरोधात सर्व पक्षांना एकत्र येण्याची ओढ लागलेली आहे. म्हणजेच १९५०-८० च्या काळातील कॉग्रेस इतकी मजल मागल्या चार वर्षात भाजपाने मारलेली आहे. विरोधकांना व प्रामुख्याने कॉग्रेसला ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच सर्व पक्षांना एकत्र यावे लागणार असेल, तर त्यात कुठलीही किंचित फ़ाटाफ़ूट वा बेबनाव, भाजपाच्या यशाचीच हमी देणारा असू शकतो. म्हणून या पराभवातही भाजपासाठी समाधान असू शकते. तर आपल्यातील सगळे मतभेद व बेबनाव बाजूला ठेवण्याइतकी लवचिकता प्रत्येक बाबतीत व प्रत्येकवेळी दाखवण्याची सक्ती या निकालांनी विरोधी पक्षांवर केलेली आहे. ती सक्ती हा त्यांच्यासाठी धडा आहे. तो शिकायची त्यांची किती तयारी आहे, त्याची साक्ष आपल्याला येत्या काही महिन्यातच मिळणार आहे. यापेक्षा या निकालांचा फ़ारसा मोठा अर्थ लावण्याची गरज नाही.


11 comments:

  1. mala tar asa watatay ki modi shah bluff kartayat virodhakana ,je yuddhat waparal jate,tyatun te kuthparyant jau shaktat he kalat,ani ya niwadnukit matdan kami zal hot ani bjp cha matdar baher padla nahi ki kadhla nahi,2019 madhye kaleach khar kay te

    ReplyDelete
  2. पण भाऊ ह्यातून भाजपाने मित्रपक्शांकडे परत एकदा मैतर्ीचा हात पुढे केला पाहीजे. भाजपने पडते घ्यायला काहीच हरकत नाही...

    ReplyDelete
  3. भाऊ फार छान लीहाले आहे. भाजप ला सेना बरोबर न आल्याने फटका बसू शकतो येणारया विधानसभेत.कारण काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत असे वाटते

    ReplyDelete
  4. एक तर कैरणा मध्ये 80% मुस्लिम समाज त्यात लढत मुस्लिम आणि बिगर मुस्लिम उमेदवार यांच्यात. अजून भर तो बिगर मुस्लिम उमेदवार भाजपचा. निकाल तर स्पष्ट होताच त्यात जर विरोधी पक्ष हुरळून जात असेल तर झालेच. एक दोन सीट वर त्याग करणे अवघड नाही मात्र 10 पेक्षा जास्त जागा वर मात्रगोंधळ माजेल. त्यात सर्वानाच अस्तित्व टिकवण्याची घाई झालेय ममता सोडून. हिंदू मते थोडी जरी एकटवली तरी पुरेसे.

    ReplyDelete
  5. हाच अहंकार गोतास काळ होणार आहे....
    देशहितासाठी अहंकार स्वार्थ बाजूला ठेवून सत्तेवर यावे लागते. समाजातील काही वर्गात हा अहंकार शेकडो वर्षे आहे. देशाचे नुकसान यामुळे होत आले आहे. जनता स्वार्थी व विरोधी पक्षाचे सरकार अहंकारी. मिडियावाले देशहित विरोधी याचे अजब मिश्रण भारता सारख्या खंडप्राय देशात पहायला मिळेते.
    अशेच कडबोळे हायकंमाड भोवती जमलेले आहे. त्यामुळे शतप्रतीशत भाजपची हवा डोक्यात शिरवली गेली आहे. मोदी सारखे विरोधी पक्षाचे नेतृत्व शतकतुन एकदा देशाला मिळते. अंत्यंत काळजी पुर्वक एकदा ही शब्दांचे तारतम्य न घालवता मोदी मॅरेथॉन भाषणे व Rally करत आहेत. व बेस्ट गव्हरनंस करत आहेत. पण राज्य लेव्हला नमते घ्यायला काॅम्परमाईज करायला तयार नाहीत. याचे गंभीर परिणाम देशाला भोगायला लागतील ... व लागत आले आहे... महाजनाचे (महाजात) फिल गुड शायनिंग इंडिया प्रमाणे परत भोगायला लागतात का हे पहायला लागेल. हे बघून वैषम्य येते.. ओनली गाॅड कॅन सेव्ह धिस कंट्री. देव सुबुद्धी देओत. कारण साठ वर्षेची घाण देवाला सुद्धा पाच वर्षांत करायला जमणार नाही.
    Aks

    ReplyDelete
  6. भाऊ एकदम सही
    UP आणि बिहार जाती पाती खुप मॅटर करतात. नीतेशजी कोलांटीउडी मारतात बिहार मध्ये भाजपला भरपूर सेट बॅक मिळेल. आणि हे अत्यंत घातक आहे..
    मोदी शहा शत प्रतिशत भाजप हे भारता सारख्या खंडप्राय व स्वार्थी जनता असलेल्या देशाला मानवणार नाही येथे मल्टी पार्टी डेमाॅक्राॅसी आहे. व स्थानिक मुद्दे खुप फरक पाडतात. प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षा चा बोलाबाला असतो त्यांना चुचकारुन गटबंधन करणे आवश्यक आहे. हे मोदी शहांना कोणी सांगायचे? तसे प्रयत्न चालु आहेत का हे भंडारी साहेबांनी साहेबांनी सांगितले आपल्या गृपला पाहिजे.
    मोदी जीनी बिहार राज्य सरकार निवडणूकीत कितना पैसा चाहिये 10 हजार करोड 20 हजार करोड पण काही ऊपयोग झाला नाही.
    भारतीय जनता शिघ्र विसराळु आहे. युपीए चा भ्रष्टाचार व नाॅन गव्हर्नन्स विसरले.
    मिडियावाले भाजपचे विरोधी आहेत. मोदींच्या सभा टीआरपी साठी दाखवतात पण डिबेट मध्ये ते बिजेपी ला विरोधी भुमिका मांडतात व जनमत फिरवतात. त्यांना वाटत की म्हणुन तर सरकार लोकांनी बदललंय. याचा अर्थ पाच वर्ष शिक्षा झाली आता परत काँग्रेस सत्तेवर आणायला पाहिजे. पण काँग्रेस व इतर पक्षांनी केलेल्या लुटीचा मुद्दा मांडत नाहीत. कारण त्याना स्वच्छ सरकार नको आहे तर भ्रष्टाचारात भागिदारी देणारं सरकार पाहिजे आहे.
    या खंडप्राय व जाती पाती राज्य पातळी वरील राजकारणाचा खुप मोठा वाटा आहे. स्वार्थी जनता देशहित कधीच लक्षात घेत नाही. जयचंद चे आवलाद शतकानुशतके भारत मातेला विकत आले आहेत.
    केवळ मोदींच्या सभेला गर्दी झाली म्हणुन मत मिळतील असे गृहीत धरणं घातक आहे.
    तसेच शासकीय अधिकारी व काँग्रेसचे साटेलोटे अनेक दशकांचे आहे ते पण या सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना बदली व बढती पण वर्षांनु वर्षे काँग्रेस ने दिली आहे. त्यामुळे ते मांडलीक आहेत. या सरकार मुळे त्यांची गोची झाली आहे. ग्राम सेवक पण प्लास्टिकच्या बंदी व सरकारी योजना आमल बजावणीवर सहज म्म्हणतात राज्य कराव काँग्रेस ने.
    प्रत्येक वेळी पेट्रोल डिझेल भरताना नेतृत्वाची आई बहिण काढताना दिसतील. कारण असे पसरवले जाते आहे की सरकारने लुट चालवली आहे. कीती लाजीरवाणे आहे पहा की थोडे सुद्धा काॅप्रमाईज करत नाहीत.
    जेटली मोदींच्या हातात परत किटली देणार ईतक्या खालच्या पातळीवर जाताना दिसतात.
    पण हे सर्व मोदी पर्यंत पोहचु दिल जात का? हा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. का हुकमशाही चालू आहे असे अनेक नागरिक बोलताना दिसतात. पण यासाठी लोकल बस मधुन प्रवास केला तर समजेल. रेल्वे स्टेशनला पुरेसे फॅन नाहीत या ऊष्ण कटीबंध देशात हे आवश्यक आहे. पंधरा डब्यांच्या लोकल आणणेची व्यवस्था करणे बुलेट ट्रेन पेक्षा आवश्यक आहे. यासाठी जपान कर्ज देणार नाही. कारण विदेशी नेहमीच आपला माल खपवून प्राॅफीट कमवतात त्याच बरोबर त्यासाठी कर्ज देऊन व्याज कमवतात. डबल फायदा पाहिजे असतो हे मोदींना कोण सांगणार? आहे माय का लाल? कारण माधव भंडारी किंवा अन्य कोणी हे सांगायची हिम्मत दाखवील का? नुसतं बुथ मॅनेज करुन चालणार नाही हे मेहनती चे काम आहे ईतर पक्ष पण करु शकतील पण लोकलुभावन टक्के फिरवणारे निर्णय घ्यायला खरी छप्पन ईचका सिना चाहिये.
    अजुन वेळ गेलेली नाही. भाजप चे थिंक ट्यँक नक्कीच जागे होईल का? हे काळच सांगेल.
    एकेएस

    ReplyDelete
  7. एकदम बरोबर भाऊ
    देश हितासाठी गठबंधन काही प्रमाणात आवश्यक आहे

    ReplyDelete
  8. Giving here below a message received by me.
    *न बासी बचे न कुत्ता खाये*

    भाजपा पढ़े-लिखे मूर्खों की पार्टी है । जब भी भाजपा की सरकार बनती है वह पाँच साल तक देश के खजाने को भरने में लगी रहती है । खजाना तो डबडबा जाता है पर सुविधाभोगी आम जनता परेशान हो जाती है । परेशानी की मानसिक दशा में वह कांग्रेस या विपक्षी गठबंधन को जिता देती है । फिर कांग्रेस भाजपा द्वारा अर्जित कोष का जमकर उपभोग करती है । कुछ मुफ्त के नाम पर जनता को परोसती है तो कुछ घटक-नारायण कर जाती है । इस तरह पाँच साल जनता भी खुश और पार्टी भी मदमस्त । खुशी के मारे पुनः पाँच साल के लिए कांग्रेस को चुनती है । पर तब तक खजाना डोल चुका होता है । पाँच साल में जनता इतनी त्रस्त हो जाती है कि फिर भाजपा को चुनती है और वह फिर देश का मुद्रा कोष भरने लगती है ।

    वाजपेयी जी के समय से यही हो रहा है । देश के खाली पड़े खजाने को उन्होंने विदेशी प्रतिबन्धों (परमाणु विस्फोट के कारण) के बावजूद भरा । वित्तीय अनुशासन को सुविधाभोगी लोग सह न पाए और UPA को चुन लिया । UPA ने वाजपेयी जी के कमाए दौलत को उड़ाकर पाँच साल लोगों को मौज करवाया और पुनः सत्ता में आए । पर तब तक खजाना खाली हो चुका था और मनमोहन सिंह जी को कहना पड़ा था कि पैसे पेड़ पर नहीं उगते । देश में संसाधनों की कमी हो जाने के कारण विभिन्न समूहों में उसे हासिल करने की होड़ बढ़ गई जिसके कारण मनमोहन सिंह जी को फिर बयान जारी करना पड़ा था कि देश के संसाधनों पर पहला हक अल्पसंख्यकों का है । अंत में जनता परेशान होकर मोदी जी को चुना और मोदी जी फिर देश की वित्तीय स्थिति सुदृढ़ करने में लगे हैं और सुविधाभोगी लोग परेशान हो रहे हैं । सुविधाभोगियों की पिपासा इतनी बढ़ चुकी है कि वह हजार-पाँच सौ से शान्त होने वाली नहीं । उन्हें तो भई पूरे पन्द्रह लाख चाहिए वो भी बिना हाथ-पैर हिलाए । अगर मोदी जी सिर्फ कमाने में ही लगे रहे तो हारेंगे ही और पुनः दस साल तक सत्ता UPA के पास रहेगी ।

    *तो मोदी जी, खजाना भर गया । अब खर्च कीजिए ।* *अपने समय में जो कमाए उसे अपने समय ही खर्च कर पब्लिक को आनन्द का अनुभव कराईये । नहीं तो मौज अगला मारेगा । याद रखिये कि सोम के धन शैतान खाय ।*
    *अगर आप कंजूसी करके देश का खजाना भर भी देंगे तो उसे आने वाला शैतान ही खाएगा ।*
    *अतः इस नीति को छोड़िये और मेरी नीति को अपनाइये ।*
    मेरी नीति है - *न बासी बचे न कुत्ता खाये ।*

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच समर्पक.हे असेच आहे.

      Delete
  9. bhau palghar baddal aaple vichar manda

    ReplyDelete