Monday, June 25, 2018

पापमुक्तीचा मार्ग

प्लास्टीक बंदी हळुहळू वादग्रस्त ठरू लागली आहे. असे अनेक प्रतिबंध नेहमी वादग्रस्त ठरलेले आहेत. कुठल्याही बदलाला सामान्य समाज कधीच तात्काळ प्रतिसाद देत नसतो. जैसेथे ही मानवी प्रवृत्ती असते. त्यामुळेच मुळात असे प्रतिबंध घालावे लागत असतात. लोकांना अनेक गोष्टी व्हाव्या असे नक्की वाटत असते. पण त्या गोष्टी आपल्याला करायला लागू नयेत आणि इतरांनी मात्र कराव्यात, असा आग्रह असतो. त्यामुळे मुंबई वा कुठल्याही महानगरात किंवा छोट्य़ा शहरामध्ये स्वच्छता नसल्याच्या तक्रारी करण्यात सामान्य माणूसच पुढे असतो. त्यात कचर्‍याच्या ढिगापासून तुंबणार्‍या सांडपाण्यापर्यंत अनेक तक्रारी असतात. कारण स्वच्छता सफ़ाई वा नागरी सुविधा सज्ज राखणे, ही सरकार वा पालिकांची जबाबदारी असते. यविषयी आपण फ़ार जागरुक असतो. मात्र त्यात आपली काही जबाबदारी असते, त्याचे साधे भान आपल्याला नसते. जो कचरा वा सांडपाणी दाट वस्तीच्या परिसरात निर्माण होते, त्याचे निर्माते आपण सामान्य जनताच असतो. पालिका कर्मचारी भले नालायक असतील. म्हणून आपण सामान्य नागरिक किती गुणवत्तेचे पुतळे असतो? दिसेल तिथे हातातला कचरा फ़ेकून मोकळे होणारे आपण, दुसर्‍याकडे बोट दाखवायला कायम सज्ज असतो. किंबहूना आपल्या घरातला कचरा बाहेर फ़ेकला म्हणजे आपली जबाबदारी संपली, ही आपली ठाम भूमिका असते. थोडक्यात कुठेही कचरा करणे आणि त्यातून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणे, हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याची एक धारणा आपल्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यातून मग प्लास्टीक बंदीसारख्या कारवायांची अपरिहार्यता वाढत असते. सरकार अशी बंदी लादते. पण तशी सक्ती करण्याची नामुष्की सरकारवर आपण बेजबाबदार नागरिकांनी आणलेली नसते काय? प्लास्टीक बंदीच्या निमीत्ताने चाललेला कल्लोळ म्हणूनच समजून घेतला पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टीकचा अतिवापर योग्यच आहे आणि त्यावरील बंदी अयोग्य आहे, असे कोणीही म्हणू शकत नाही. याचा अर्थच सरकारचे प्लास्टीक बाबतीत घेतलेले धोरण चुकीचे असल्याचा कोणाचाही दावा नाही. पण त्याचा त्रास वा झळ आम्हाला बसू नये, ही आपली खरी इच्छा असते. त्यामुळे रिकाम्या हातांनी दुकानात जाऊन भरभरून पिशव्यांनी सामान आणण्याच्या आपल्या आळशी वृत्तीला वेसण घातली जाते, त्यावर आक्षेप आहे. साधारण तीन चार दशकापुर्वी अशा खरेदीचे सामान कुठल्या मार्गाने घरोघरी पोहोचत होते? हातात घरातलीच पिशवी घेऊन बाजाराला लोक जात होते आणि प्लास्टीकचा कचरा इतका सार्वत्रिक नव्हता. जसजशा पिशव्या आयत्या मिळू लागल्या, तसतशी आपली कापडी पिशवी वापरण्याची सवय गेली आणि खरेदीसाठी जाताना जवळ पिशवी बाळगण्याचे आपण विसरून गेलो. दुकानदाराने पिशवी द्यावी हा आपला अधिकार झाला आणि आपण अधिकचे पैसे द्यायला तयार असताना दुकानदाराने किमान किंमतीतल्या पिशवीची सोय करावी, हा जन्मसिद्ध अधिकार होऊन गेला आहे. ती पिशवी किंवा सामान घरी पोहोचल्यावर त्याचे वेष्टन कसे नष्ट करायचे, ही आपली डोकेदुखी नाही. ते काम सरकारचे आहे. त्यामुळे असे प्लास्टीक आपल्या घराबाहेर फ़ेकून देण्यातून आपण मोकळे होतो. जागोजागी असा कचरा साचत जातो आणि त्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात. असला कचरा नाशीवंत नसल्याने तो एकूण निसर्गात विकृती निर्माण करतो आणि त्याला मग पुन्हा सरकार जबाबदार असते. आपली कुठलीच जबाबदारी नसते. थेट आपल्याच आरोग्याची जपणूक करण्याचे कामही आपण सरकाराला देऊन टाकलेले आहे. त्याची दुसरी बाजू अशी, की आपले आरोग्य आपणच बिघडवणार आहोत आणि त्यापासून आपल्याला निरोगी राखण्याचे कर्तव्य सरकारच्या माथी मारून आपण मोकळे झालेले आहोत.

महंमद अफ़रोज नावाचा एक सुशिक्षित तरूण मुंबईकर आहे. आपल्यासारखाच एक सामान्य नागरिक मुंबईकर. रोज सकाळी उठून वर्सोवा या चौपाटीवर फ़िरायला जाणारा. तिथे विविध खाद्यपदार्थ आणून वा खरेदी करून प्लास्टीकचा कचरा तिथेच फ़ेकणार्‍या अन्य मुंबईकरांपेक्षा किंचीत वेगळा. त्याच्याही मनात कुठेतरी चौपाटी विद्रुप व र्रोगट होत असल्याची खंत होती. कदाचित त्यानेही आरंभी महापालिका वा सरकारी यंत्रणेला शिव्याशाप दिलेले असतील. पण इतरांप्रमाणे तो तिथेच थांबला नाही. कोणीतरी हे साफ़ केले पाहिजे असे मनातल्या मनात म्हणत असताना, त्याला तो ‘कोणीतरी’ एकेदिवशी सापडला. त्याचेही नाव महंमद अफ़रोज होते. आपलाच चेहरा आरशात बघताना त्याला एक जबाबदार नागरिक सापडला. दुसर्‍याच दिवशी तो नुसता चौपाटीवर फ़िरायला गेला नाही, तर तिथे वाळूत पसरलेल्या किंवा रुतून बसलेल्या प्लास्टीकचा कचरा शक्य होईल तितका त्याने उचलण्यास आरंभ केला. एकदोन किलोचा कचरा गोळा करताना त्याची दमछाक झाली. पण आपण काही चांगले काम केल्याचे समाधानही त्याला मिळाले. खरे सांगायचे तर आपल्याच पापातून मुक्तीचा एक नवाच मार्ग त्याला मिळाला. हळुहळू तिथे रोजच येणार्‍या इतर मुंबईकरांना हा तरूण एकटाच साफ़सफ़ाई करताना दिसू लागला, तितकाच खटकू लागला. कारण दिसण्यातून तो सफ़ाई कामगार नसल्याचे चटकन नजरेत भरत होते आणि त्याच्या असल्या अजब उद्योगाचे कारणही समजत नव्हते. पण त्याला इतरांची पर्वा नव्हती, तो आपल्या कामातून समाधान मिळवत होता. कुतुहलापोटी अनेकजण त्याच्याकडे चौकशीला वळले आणि आपल्या कृतीचे कारण इतरांना समजावताना अफ़रोजचा एक गोतावळा तयार झाला. त्यात लोक सहभागी होत गेले व आज शेकडोच्या संख्येने त्यात लोक सहभागी झालेत. त्यामुळे अवघी मुंबई वा सगळ्या चौपाट्या साफ़ झाल्या काय?

मुद्दा सगळ्या चौपाट्या साफ़ स्वच्छ होण्याचा नाही, तर आरंभाचा असतो. एका चौपाटीवर अफ़रोजने हा उद्योग सुरू केला आणि वरसोवा चौपाटी स्वच्छ होऊ लागली. तिथून टनावारी कचरा निघून वाळू व समुद्र साफ़ व्हायला हातभार लागला. जुहू वा अन्य चौपाटीपर्यंत त्याची हवा गेली आणि एक दिवस अमिताभ बच्चनही तिथपर्यंत येऊन पोहोचला. अनेकजण साधने व साहित्य देण्यापासून प्रचारासाठी पुढे आले. शेकड्यांनी मुले त्याचे अनुकरण करू लागली आहेत. त्यातून नुसती स्वच्छता होत नाही तर जबाबदार नागरिक होण्याची प्रक्रीया सुरू होत असते. सगळा समाज तितका परिपक्व व्हायला दोनतीन पिढ्या जाव्या लागतील. पण कुठेतरी सुरूवात व्हावी लागते व एका अफ़रोजने कुठलाही झेंडा वा परिवर्तनाची चळवळ उभी केल्याशिवाय त्याचा आरंभ केला आहे. हजारो लाखो अग्रलेख वा सेमिनारपेक्षा त्याने केलेले काम अधिक मोठे व प्रभावी आहे. महात्मा फ़ुले वा महात्मा गांधी यांनी कुठले शुभारंभाचे सोहळे करून चळवळी आरंभलेल्या नव्हत्या. तर स्वत:पासून आरंभ केला आणि चळवळी आकार घेत गेल्या. प्लास्टीक बंदी ही सक्ती आहे. पण ती नागरीकांनी मनापासून स्विकारली व आपलीच जबाबदारी मानली, तर लाखोंनी अफ़रोज निर्माण होऊ शकतात. अशा राक्षसी आक्रमणापासून आपली मुक्ती होऊ शकते. ती सरकार वा कुठला कायदा करू शकणार नाही. त्यासाठीचा दंड वा कारवाई आपल्याला मुक्ती देणार नाही. मुक्ती ही आत्मिक इच्छाशक्ती असते. जिचा साक्षात्कार अफ़रोजला झाला आणि तो सफ़ाईच्या सार्वजनिक उपकारातून मुक्त झाला. त्याच्या प्रेरणेने अनेकांना मुक्ती प्राप्त झाली. प्रेषिताच्या प्रतिक्षेत बसलेल्यांना कुठलाही प्रेषित व इश्वर मोक्ष देऊ शकत नसतो. ती आपली आंतरिक इच्छा व धारणा असली पाहिजे. प्लास्टीकचा राक्षस आपण गाडू शकतो आणि दंडात्मक कारवाईची संधी सरकारला नाकारू शकत असतो.


12 comments:

  1. भाऊ नेहमीप्रमाणे अप्रतिम लेख परंतु पुन्हा एकदा महात्मा फुले यांच्या विषयी आपण केलेले गौरवोद्गार खटकले आपण खरोखरीच त्या महात्म्याचा अभ्यास करावा आणि मग लिखाण करावे असे वाटते. आपल्या देशामध्ये विभाजनाची विकारी चळवळ रुजवणारा एक महात्मा आहे तो

    ReplyDelete
  2. डोळ्यात अंजन घालणारा लेख भाऊ

    ReplyDelete
  3. डोळ्यात अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete
  4. Bhau
    Giving below a link on Environment Issue we have Ignored. Its in Marathi & by Shri Avinash Dharmadhikar. Its really an eye opener.

    So many elite people are readers of your Blog so posting it here.Once any body listen to it, he will realize that the beginning of the End is already started & will start to protect the environment at his level to Save our Mother Earth.I stopped using paper napkins forever after listening this & willing to do whatever best I can do at my level.

    So appreciate if you can publish this comment. Alo request you to listen to this & write an article to educate your readers on such vital issue.

    https://www.youtube.com/watch?v=aPAEUsnGUzs

    Many Thanks


    ReplyDelete
  5. भाऊ प्लास्टिक बंदीच्या अतिशय योग्य निर्णयाचे पण राजकारण चालूय ,विरोधी पक्षांनी केले तर नवल नाही ,पण लवासा फेम तथाकथित पर्यावरण तज्ज्ञ पण भाजप ला विरोध म्हणून प्लास्टिक बंदीला विरोध करतायत ,सुलतानी निर्णय म्हणतायत ,हे लोक विरोध करताना कुठल्याही पातळीला जातात ,काँग्रेस पण इतका विरोध करत नाही ,हे कळत नाही कि स्वतःचे हसे करणारा विरोध का करतात हे लोक ?हा विरोध त्यांच्या बुद्धीला मोदी सतत challenge करतात म्हणून येत असेल .

    ReplyDelete
  6. भाऊ. एक दुरुस्ती सुचवायची आहे. वर्सोवा समुद्रकिनाऱ्याशी संबंधित व्यक्तीचे नाव अफरोज शहा आहे.

    ReplyDelete
  7. ₹ ५०००/- दंड प्लास्टिक बाळगल्यावर. मी हा दंड द्यायला तयार आहे. असाच जोरदार दंड खराब रस्ता बांधणार्याला किंवा रस्ता खोदून निघून जाणार्याला सरकार आणि कोर्ट करेल का?

    ReplyDelete
  8. भाऊ काही तरी समज वा या भाजपच्या बामणांना

    ReplyDelete
  9. रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनला भारता सारख्या ऊष्ण कटीबध देशात हाय स्पीड फॅन प्रत्येक 5 मिटर वर लावले पाहिजेत.
    पावसाळ्यात झड मारली की ही गर्दी होते चपला बुट भिजु नयेत म्हणुन व लोकल मधुन ऊउरताना छाताडावर पाय द्यायला कमी न करणारा मुंबई कर किती गाव वाल्यांनी पाहिला आहे हे गावठी म्हातार कोतवाल माणसाला विचारा.
    सरकार बदलून शासन व मानसिकतेत बदल होत नाही.
    या देशाचे हे दुर्दैव आहे
    म्हणुनच एकच कुटुंब दशके राज्य करत आहे .
    विनाशकाली विपरीत बुद्धी
    बंगलुर मध्ये पेट्रोल डिझेल खुन्नस मध्ये दशकानु दशके पाठींबा देणारे पाढंरपेशी घरात बसले. व भाजपला सत्ते बाहेर बसवले गुजरातमध्ये अशीच खुन्नस व्यापारी व गावकरी नी दिली. पण काही बोध नाही घेतला

    ReplyDelete
  10. नमस्कार भाऊ,अप्रतिम लेख व प्रत्येक नागरिकाला अपरिहार्य कृती




    ReplyDelete
  11. भाऊ एकदम सर्व करण्याची घाई कधी मधी सत्तेवर येणार्या विरोधी पक्षाच्या सरकारला झालेली असते. कदाचित परत पाच वर्षे सरकार चालवण्यासाठी मिळतील की नाही अशी शंका येत असेल. मग अशा निर्णयाचे आपल्या मतदारावर काय परिणाम होतील. व लेकानु दशके बाजारात बसलेले भाजपचे व्यापारी भाजप साठी जनमत तयार करत होतै. व हेच नाक्या नाक्या वरचे मोदी सरकारच्या नाकदुर्या नाक मुरडत आहेत.
    एका बाजुने बाजारातील टेम्पो रिक्षावाले पेट्रोल डिझेल महाग म्हणुन शिव्या देतात तर हा थोडा सुशिक्षीत वर्ग जो दशकानु दशके भाजपला/ विरोधी पक्षाला साथ देत होता तो अशा आडमुठेपणामुळे व इन्कमटॅक्स/रेल्वे लोकल सुविधा न सुधारल्याने स्वार्था पोटी आता विरोधात उतरत आहे.
    खेड्यात काँग्रेसचे ग्रामसेवक सहज राज्य करावे ते काँग्रेसने म्हणत काँग्रेस चा मतदारांना बांधून ठेवत होता तर शहरात व्यापारी वर्ग.
    गुजरात वरुन काही धडा भाजप मोदीच्या पिलावळीने घेतला नाही असेच दिसते. काँग्रेसच्या भ्रष्टाचार महागाईच्या व मुस्लिम लंगुचालनाला कंटाळुनी जनतेने भाजपच्या बाळाला खांद्यावर घेतले तर बाळ डोक्यावर बसुन त्रास द्यायला लागले.असेच पोरखेळ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ अशी परिस्थिती आहे.
    कारण कुरकुरे हळदीराम याला प्लॅप्लॅस्टीकची पॅकिंग चालणार पण सामान्य भाजीवाला मच्छीवाला चहावाला ला अशी पिशवी चालणार नाही हा दुटप्पी पणा उघडा पडत आहे. हे उच्च वर्गाचे सरकार आले की असेच होते.
    लोकल स्टेशनवर पुरेसे फॅन्स लाईट नाहीत पण उंदीराच्या पोराला लोखंडाचा खेळ हवा त्याप्रमाणे अॅटोमेटीक जिने लावलेत. गाड्या पंधरा डब्यांच्या करुन थोडा श्वास घ्यायला सामान्य पॅसेंजर ला द्यायच्या ऐवजी हे व बुलेट ट्रेनने चाळे चालू आहेत.
    यासाठी सामान्य माणसाच्या प्रमाणे लोकल ट्रेन एसटी ने प्रवास करणे आवश्यक आहे. ही जमीनीवरची पकड सुटल्याची लक्षणे आहेत.
    चंद्रशेखर प्रमाणे ठाण्याच्या एसटी व रेल्वे स्टेशनची फेरिवाले व अनीधुक्रीत बांधकामे पाडुन सामान्य माणसाला पटकन वाट मोकळी मिळाली तर अपघात ही टळतील. पण हे या दिडशहाणे ला कोणी सांगायचे
    सांगायचं.
    इथे शहरात दर पाचशे मिटरवरसुद्धा एक माणुस एकतर दारू पिऊन किंवा मनोरुगण होऊन पडलेला दिसतो हे अशा दिडशहाणे सरकारला कोणी सांगायचं.मौत यहां सस्ती आहे. माणसे किडा मुंगी पण पडली आहेत. याचे काही नाही. असेल हिम्मत तर नसबंदी करुन दाखवा मग प्लॅस्टीक बंदी करा.

    Hence opposition party Govt. get some time in decades to rule only for 5 years...बादमें फिर अपोझीशन में...
    *This is due to highly educated class उच्चवर्ग start ruling country as ground level impacts are not known to such mid time stop gap leaders/ inexperience/ rulers (who in hurry of getting new governance power can be misleaded by Govt. Officials easily such officials are puppets of decades ruling party and want thier corrupt rulers to come back in power once again due to nonsense caused to decades supporting voters of just one term(just for 5 years like 1999-2004 in 10-15 years 2014- ) un-corrupt rulers and such rules defame them and only way to defeat patriotic efficient rulers and hence average class rulers become experienced and rule the country for decades*
    एकेएस

    ReplyDelete