Thursday, June 14, 2018

सदा अध्यक्ष बना रहता

Related image

आजकाल कॉग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी पणजोबाच्या पुढे आणखी एक पाऊल टाकण्याचा निर्धार केलेला दिसतो. कारण त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ़ इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहीला होता आणि त्यात आधुनिक भारताचा शोध घेण्याचा प्रयास केलेला होता. त्यातून मग आयडिया ऑफ़ इंडिया नावाचे खुळ भारतीय बुद्धीमंत पुरोगामी वर्गात पसरत गेले. जो भारत जगासमोर होता, त्याचा नेहरूंनी नव्याने शोध लावला आणि त्याच्यासमोर मग वास्तवातला भारत खोटा असल्याचे सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी नवनवी विद्यापीठे अध्यासने निर्माण करण्यात आली. त्या अनुदानावर पोसला गेलेला बुद्धिजीवी वर्ग पुढल्या काळात दोन गोष्टी शिकला. एक म्हणजे नेहरूंच्या पुर्वी भारत नावाचा देश नव्हता आणि असला तर त्याचा कारभार करण्यासाठी कोणीतरी गांधी घरातला माणूस कायम अध्यक्ष बनुन बसलेला असतो. बहुधा त्यामुळेच सरकारी अनुदानाने श्याम बेनेगल यांनी निर्माण केलेल्या ‘भारतकी खोज’ या मालिकेच्या आरंभी एक गाणे सादर केलेले होते आणि त्यात एक ओळ आलेली होती. राहुलना बहुधा तेवढीच ठाऊक असावी. ‘सदा अध्यक्ष बना रहता’ हीच ती ओळ आहे आणि कॉग्रेससहीत तमाम नेहरूवादी पुरोगाम्यांनी ते सत्य म्हणून स्विकारलेले आहे. त्यामुळेच आता पुढले पाऊल म्हणून अध्यक्ष राहुल गांधी ‘डिस्काव्हरी ऑफ़ युनिव्हर्स’चे काम हाती घेतलेले आहे. त्यात त्यांनी कोकाकोला मकडोनाल्ड या कंपन्यांपासून भारतीय संस्कारापर्यंत विविध गोष्टींचा नव्याने शोध सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्या सोमवारी इस्पितळात जाऊन वाजपेयी यांची भेट घेण्याचा उद्योग केला. त्यातून त्यांना भाजपावाल्यांना बुजूर्गांचे मानसन्मान कसे ठेवावेत, याचा धडा द्ययचा होता. अर्थात वयोवृद्ध बुजूर्ग फ़क्त भाजपामध्येच असतात, हा भाग वेगळा. कॉग्रेसमध्ये गांधी घराण्यात जन्मलेले कालचे शेंबडे पोरही बुजूर्ग असते.

manmohan vadra के लिए इमेज परिणाम

तर सोमवारी राहुल अकस्मात एम्स या दिल्लीतल्या इस्पितळात पोहोचले होते. तिथे दरमहा वाजपेयी यांची प्रकृती तपासली जात असते. मागली दहापंधरा वर्षे वाजपेयी स्मृतीभ्रंशाच्या विकाराने ग्रासलेले आहेत. त्यांना आपल्या भोवतालची माणसे ओळखता येत नाहीत, की आसपास काय घडाते आहे, त्याचा अंदाजही त्यांना येत नाही. सहाजिकच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जाण्याने काहीही साधले जाऊ शकत नाही. कारण आपल्यासमोर राहुल गांधी आलेत की नरेंद्र मोदी आलेत, याचाही थांगपत्ता वाजपेयींना लागू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याला व्यवहारी अर्थ काहीच नसतो. शिवाय वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनकही नव्हती. कारण तपास करून त्यांची योग्य काळजी नित्यनेमाने घेतली जात असते. मग राहुलनी तिथे जाण्याचे कारण काय होते? तर त्यातून त्यांना राजकारण खेळायचे होते. आपण विरोधी पक्षातले असूनही भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रकृतीविषयी चिंता करतो. पण त्याच वाजपेयींनी ज्यांना घडवले, अशा मोदी व भाजपाच्या अन्य नेत्यांना या ज्येष्ठ नेत्यांची फ़िकीर नाही, असे नाटक रंगवायचे होते. असा देखावा निर्माण करण्यात राहुल कमालीचे यशस्वी झाले. कारण राहुल इस्पितळात येऊन गेल्याच्या बातमीला प्रसिद्धी मिळाली आणि भाजपा नेत्यांच्या पोटात गोळा उठला. तात्काळ अनेक भाजपा नेत्यांनी इस्पितळात धाव घेतली. पक्षाध्यक्ष अमित शहा, आरोग्यमंत्री नड्डा व अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदीही तिथे जाऊन ठेपले. अर्थात त्यात काहीही महत्वाचे नव्हते. पण तमाम वाहिन्यांनी त्या घटनेला प्रसिद्धी दिली आणि राजकीय खळबळ माजली. राहुल यांचा हेतू सफ़ल झालेला होता. अशी बाजी मारली तर त्याचा राजकीय परिणाम माध्यमातुन साधला गेला असताना गप्प रहाण्यात शहाणपणा असतो. पण तिथेच तर राहुल चुथडा करून टाकण्यात कुशल आहेत. त्यांनी सगळ्या परिणामांवर बोळा फ़िरवला.

काही पत्रकारांनी राहुलच्या या इस्पितळ भेटीला नाटक ठरवले होते. तर त्याविषयी गप्प रहाणे योग्य ठरले असते. पण शाळकरी पोराने घरी येताच आपल्या कौतुकाचे शब्द सांगायची घाई करावी, त्याच बुद्धीचे राहुल असल्याने त्यांनी दुसर्‍याच दिवशी तो पोरकटपणा केला. राहुल गांधींनी ट्वीटर खात्यावर आपले पत्ते उघडून टाकले. आपण विरोधी पक्षाचे असूनही वाजपेयीच्या प्रकृतीची फ़िकीर करायला भेट दिली, असे जाहिरपणे सांगून टाकले. किंबहूना भाजपा नेत्यांना आपल्याच संस्कृतीची फ़िकीर नाही. ज्येष्ठ वडीलधार्‍यांनी अंगठा कापून मागितला तर तो देणार्‍या एकलव्याचाही दाखला राहूलनी दिला आहे. भाजपाचे नेते मात्र ती संस्कृती विसरून आपल्या ज्येष्ठ नेत्यांनाच कापून काढतात, असाही शेरा राहुलनी मारला आहे. यात भाजपावाल्यांना झोडपून काढायला हरकत नाही. पण आपल्या कॉग्रेसी संस्कारात बुजूर्गांचा सन्मान ठेवला जातो हे सांगायची कशाला घाई झालेली होती? आपण आज ज्या पक्षाचे अध्यक्ष बनून बसलो आहोत, त्याच पक्षाच्या निवडून आलेल्या बुजूर्ग ऐंशी वर्षाच्या वृद्ध अध्यक्षाला आपल्याच जन्मदात्या मातोश्रीने कशी चपलांनी मारून पळता भूई थोडी केली होती, हेही राहुलना ठाऊक नाही. १९९८ सालात सीताराम केसरी कॉग्रेसचे अध्यक्ष होते आणि ‘सदा अध्यक्ष बना रहता’ या नियमानुसार ते अध्यक्षपद सोनियांना हवे होते. पण केसरी बाजूला व्हायला तयार नव्हते. मग कॉग्रेसजनांनी केसरींना मारहाण केली व पक्ष कार्यालयातून त्या अध्यक्षाला जीव मुठीत धरून पळ काढावा लागलेला होता. ते राजिनामा देईनात म्हणून त्यांना मारहाण झाली व चपलांनी मारून त्यांना तिथून पळवून लावण्यात आलेले होते. जेव्हा हा म्हातारा पळून गेला, तेव्हा मोठ्या सन्मानपुर्वक राहुलच्या मातोश्रींना पक्ष कार्यालयात आणून अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलेले होते. हे कॉग्रेसी संस्कार आहेत. पण राहुलना त्याचा अजून शोध लागायचा आहे.

बुजूर्गांचा मानसन्मान कसा राखावा, हे अजून राहुलना आईकडून शिकायला मिळायचे आहे. भाजपाचे संस्कार फ़ार वेगळे आहेत. त्यांना आपला अध्यक्ष वा ज्येष्ठ नेता यांना तसे ‘मानसन्मान’ राखून हाकलण्याचे संस्कार अजून कॉग्रेसकडून शिकता आलेले नाहीत. नरेंद्र मोदी यांची पक्षाचे नेता म्हणून निवड झाल्यानंतर अडवाणी तिथून निघून गेले होते आणि त्यांनी नाराजी दाखवण्यासाठी सर्व पदांचे राजिनामे दिलेले होते. तरीही नंतरच्या पहिल्या भेटीत जाहिर समारंभात मंचावरच मोदींनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतलेले होते. अडवाणींनी त्या पाया पडण्याकडे काणाडोळा करून पाठ फ़िरवली, तरी कधी एका शब्दाने मोदींनी त्यांना अपशब्द वापरले नाहीत की त्यांचा अपमान करण्याचे धाडस केले नाही. निवडणूका संपल्यावर वाजपेयींचा आशीर्वाद घ्यायला मोदी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. भाजपाच्या संस्कारात अशा अपमानास्पद वागणूकीचे संस्कार दिले जातात, म्हणूनच हे शक्य झाले. राहुलना असे संस्कार मिळालेले नाहीत. अन्यथा त्यांनी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना काढलेला एक अध्यादेश पत्रकार परिषदेत फ़ाडून टाकून, त्याला जाहिरपणे मुर्खपणा संबोधण्यातून ज्येष्ठांचा सन्मान कशाला राखला असता? सध्या राहुलजी नव्या जगाचा व विश्वाचा शोध लावत आहेत. त्यावर पुढल्या काळात ते सविस्तर पुस्तक लिहीतील आणि विविध विद्यापीठात कोकाकोला वा मकडोनाल्डचे संस्थापक भारतातल्या कुठल्या कुठल्या जत्रा मेळाव्यात सरबते व वडापाव पाणीपुरी विकून मोठे उद्योगपती झाले, त्यावर चिदंबरम मनमोहन सिंग संशोधन निबंध प्रबंध लिहून पदव्याही मिळवू शकतील. कदाचित नवे अनर्थशास्त्रही जगाला स्विकारावे लागेल. कारण कॉग्रेसला ‘सदा अध्यक्ष बना रहता’ या मंत्रापासून मोक्ष मिळू शकत नाही आणि पुरोगामी बुद्धीवादाला राहुलच्या नेतृत्वाखेरीज पर्याय नाही ना?

8 comments:

  1. "राहुलजी नव्या जगाचा व विश्वाचा शोध लावत आहेत. त्यावर पुढल्या काळात ते सविस्तर पुस्तक लिहीतील आणि विविध विद्यापीठात कोकाकोला वा मकडोनाल्डचे संस्थापक भारतातल्या कुठल्या कुठल्या जत्रा मेळाव्यात सरबते व वडापाव पाणीपुरी विकून मोठे उद्योगपती झाले, त्यावर चिदंबरम मनमोहन सिंग संशोधन निबंध प्रबंध लिहून पदव्याही मिळवू शकतील. कदाचित नवे अनर्थशास्त्रही जगाला स्विकारावे लागेल."��मर्यादित लोकशाही कशी वेठिला धरावी याचे अन अनुकरणीय उदाहरण म्हणजे आपली राज्ययंत्रणा��आणि आपल्यातील नागरिकत्वाची जाणीव! ��

    ReplyDelete
  2. तुम्ही कायम त्या अध्यादेश फाडण्याचं उदाहरण देता पण कधी नव्हे तर काही तरी चांगले झाले त्यामुळे. नाही तर लालू ला मार्ग मोकळा झाला असता.जे केले ते योग्य च केले, भले त्या मागे हेतू उदात्त नसेल.

    ReplyDelete
    Replies
    1. त्या अध्यादेशाला राहुल गांधी यांचा विरोध होता असे नव्हे. पण जनमत आपल्या विरोधात जात आहे हे पाहून केली गेलेली खेळी होती. त्यात नावालाही प्रामाणिकपणा नव्हता.

      Delete
    2. अध्यादेश फाडण्याचा अविर्भाव आपण शहाणे, अध्यादेश काढणारे (पं.प्र.ममो)मुर्ख आहेत असा होता. भाऊंचा आक्षेप त्यावर आहे.आणि राहीला भाग तो तसा फाडला नसता आणि कायदा झाला असता तर पुढे त्यानाच नँ.हेरॉल्ड,हरयाण जमीन घोटाळा वगैरे खटल्यामुळे येणाऱ्या संकटात फायदा झाला असता ते समजण्याची सुद्धा अक्कल नाही.

      Delete
  3. भाऊ तुमचे म्हणणे खरे आहे पण इतर पक्षातून माणसे आणून आपला पक्ष वाढवायचा आणि ऐनवेळी कॉंग्रेसला संजीवनी देऊन कॉंग्रेस संपू द्यायची नाही हि खेळी भाजप बर्याच वेळा खेळला आहे .
    आताही सरकार त्याच दिशेने चालले आहे

    ReplyDelete
  4. bhau ya lekhala dilele shirshak vachun hasun hasun purevat zali

    -Padmakar

    ReplyDelete
  5. हातावर मोजण्या इतके पक्ष देशाच्या संस्कृती ला नकळत कित्येक पटीने धक्के देत आहेत, त्यात आपली संस्कृती लोप पावत चालली आहे, ७२ वर्षाच्या स्वातंत्र्य नंतर सुद्धा आपण मानसिक गुलामीत आहोत, देशाला खंडित करण्याचं काम हे पक्ष लीलया करताहेत......आता आपली लडाई आपल्याच माणसासोबत आहेत जे दिसून येत आंही आहेत.....एक नव्या क्रांतीची गरज आहे ..आणि ती क्रांती पार्लिमेंट च्या बाहेर व्हायला हवी.............एक ईस्ट इंडिया कंपनी ला आपण पळवलं ............पण आज प्रत्येक राज्याचा मंत्री आमंत्रण देऊन परदेशी कंपनांया बोलावत आहे...........

    ReplyDelete