Tuesday, September 6, 2016

जोडे खाण्याची हौस

MPs at hurriyat office के लिए चित्र परिणाम

काश्मिरात गेले दोन महिने अशांतता आहे असे सांगून पार संसदेतही गदारोळ करण्यात आला. पण आज तिथे अशांतता असेल, तर शांतता कधी होती, त्याचाही खुलासा व्हायला हवा. पण तसले प्रश्न पुरोगामी युक्तीवादात बसत नसतात. त्यामुळे कशालाही अशांतता व कशालाही शांतता ठरवण्याची सोय आहे. तर अशा अशांत  काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वपक्षिय शिष्टमंडळ पाठवण्याची कल्पना मांडली गेली. सरकारने ती स्विकारली आणि मग तिथे कोणाला भेटावे, यावरून वादविवाद झाले. अखेरीस तिथे गेलेल्या शिष्टमंडळाला नेहमीचेच लोक भेटले. म्हणजे ज्यांना शांततेने जगायचे आहे, असे लोक जरूर भेटले. पण ज्यांची उपजिविकाच अशांततेवर होत असते, त्यांनी शिष्टमंडळाला कशाला भेटावे? त्यांनी भारतीय संसदेच्या शिष्टमंडळाला भेटावे, ही कल्पनाच मुर्खपणाची आहे. जे लोक भारताची घटना किंवा भारताचा काश्मिरवरील हक्कच मान्य करत नाहीत, ते कशाला भेटतील शिष्टमंडळाला? दुसरी बाजू अशी, की ज्यांना काश्मिर हा पाकिस्तानचा अविभाज्य प्रदेश वाटतो, किंवा पाकिस्तानच आपला तारणहार वाटतो, त्यांनी भारतीय शिष्टमंडळाला कसे भेटावे? त्यांच्या तर्कशास्त्रानुसार तशी भेटच गैरलागू आहे. पण ज्यांना कुठलीच भाषा वा तर्क कळत नाही, त्यांना भारतात सेक्युलर वा पुरोगामी म्हणून ओळखले जात असल्याने, त्यांची हौस फ़िटण्यासाठीच असे शिष्टमंडळ तिकडे पाठवावे लागले. अर्थात त्यांनी वेळ देऊनही कुणीही फ़ुटीरवादी नेता त्यांना भेटायला फ़िरकला नाही. तेव्हा या लाचारांनी आपणच हुर्रीयतवाल्याचे उंबरठे झिजवण्याचा लाजिवरवाणा प्रकार केला. बेशरमी किती टोकाची असते ना? त्यांच्या दारी जाऊन हे भिकार्‍यासारखे उभे राहिले आणि त्यांनी दार उघडून यांना आतही घेतले नाही. जोडे खाण्याची किती हौस असते ना?

काही लोकच असे असतात, ज्यांना अपमानित होण्यात धन्यता वाटत असते. आपण मागल्या दोन दशकात लोकांकडून का हाकलून लावले जात आहोत, याचाही विचार करण्याची ज्यांना गरज वाटत नाही. असे लोक आजकाल विचारवंत असतात. त्यांचा भरणा पुरोगामी गटात होत असल्याने त्यांनी काश्मिरात जाऊन हुर्रीयतच्या लाथा खाल्ल्या आणि त्यांचा उद्धार झाला आहे. अर्थात कॉग्रेसचेही नेते तिकडे फ़िरकले नाहीत. पण दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सिताराम येच्युरी व डी. राजा तिथे गेले. त्यांच्यासोबत नवे पुरोगामी शरद यादवही पोहोचले. पुरोगामी असणे किती सोपे झाले आहे ना? मोदींना चुकीचे ठरवा. मोदी सरकारच्या नावाने शंख करा, म्हणजे तुम्ही पुरोगामी होऊन जाता. त्याचा कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाशी संबंध उरलेला नाही. सहाजिकच असे लोक मोदी विरोधात कुठल्याही थराला जायला एका पायावर सज्ज असतात. तेच काश्मिरात झाले. बाकीचे शिष्टमंडळ काश्मिरी जनतेच्या हितासाठी शिष्टमंडळाला भेटायला हजेरी लावत असताना, या पुरोगाम्यांनी हुर्रीयतचे दार ठोठावले. ज्यांना काश्मिरात निवडणूक लढवायची हिंमत होत नाही आणि पाकिस्तानी झेंडे फ़डकावण्याखेरीज कुठले काम नाही, त्यांच्याकडून कुठल्या शांततेची अपेक्षा बाळगता येईल? तुम्ही त्यांच्या उंबरठ्यात गेलात. आज नाही, जेव्हा महापुराने त्यांच्यावर बुडायची वेळ आली, तेव्हा तुमचेच भारतीय बांधव सैनिक याच हुर्रीयतवाल्यांना मरणातून वाचवायला धावलेले होते. तेव्हा त्यांना कुणा मुजाहिदीन वा तोयबाने वाचवलेले नव्हते. तरी त्यापैकी कोणी आभाराचे चार शब्द बोलू म्हणून दिल्लीत येऊन सरकारी प्रतिनिधीला भेटले नाहीत. पण अगत्याने पाक दूतवासात ही मंडळी गेलेली होती. त्यांनी आपले पाकधार्जिणे रूप लपवलेले नाही. पण ते बघायला सामान्य माणसाचे डोळे लागतात. पुरोगामी डोळ्यांना साधे वास्तव बघता येत नाही ना?

तर हे यादव येच्युरी हुर्रीयत नेत्यांना भेटायला गेले आणि त्यांच्या नकाराची चपराक थोबाडावर बसल्यानंतर पवित्र झाल्यासारखे माघारी परतले. यापैकी कोणाला कधी दिल्लीत वा अन्यत्र दिर्घकाळ निर्वासित होऊन पडलेल्या काश्मिरी पंडितांना भेटायला सवड झालेली नाही. कारण त्यात कोणी पकधार्जिणा नाही. त्यातला कुणी यांना थप्पड मारत नाही. हाकलून लावणार नाही. भारतात रहावे लागणे हेच ज्यांचे दु:ख आहे, त्यांच्याशी कसला संवाद होऊ शकतो? एक मात्र गोष्ट मान्य करावी लागेल. हे हुर्रीयतवाले किंवा पाकचे हस्तक पुरोगाम्यांपेक्षा अधिक प्रामाणिक आहेत. ते आपले हेतू लपवत नाहीत, की आपल्या भूमिकेशी दगाबाजी करीत नाहीत. पुरोगाम्यांची गोष्ट वेगळी. त्यांना आपली भूमिका कोणती तेच वेळोवेळी लक्षात येत नाही. संसदेत असताना हे पुरोगामी काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असल्याची ग्वाही देत असतात. पण शिष्टमंडळातून काश्मिरला गेल्यावर त्यांना त्याचे भान उरत नाही. काश्मिरात कुठलीही बातचित वा संवाद व्हायचा असेल, तर तो भारतीय घटनेच्या चौकटीतच व्हायला हवा. त्यासाठी आधी काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे याला मान्यता द्यायला हवी. ती अट कुठल्या हुर्रीयतवाल्याने कधी मान्य केलेली आहे काय? नसेल तर त्यांच्याही काश्मिरविषयी कुठलाही संवाद होऊच शकत नाही. ज्यांना काश्मिर हा पाकिस्तानचा भाग वाटतो, त्यांच्याशी भारतीय घटनेनुसार कसा संवाद होऊ शकतो? नसेल तर त्यांच्याशी संवाद करू बघणारा अप्रामाणिक नाही काय? अशा लोकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन बोलते करणारे, कुठल्याही पक्षाचे असोत, अप्रामाणिक नाहीत काय? जे अशी लाचारी करून तिथपर्यंत गेले, त्यांची भारतनिष्ठा म्हणूनच तपासून घेण्याची गरज आहे. कारण नेहरू विद्यपीठातील भारत विरोधी घोषणांचेही अशाच पुरोगाम्यांनी समर्थन केलेले होते ना?

एक गोष्ट मात्र अशा घडामोडीतून स्पष्ट होते, की देशाची विभागणी क्रमाक्रमाने देशप्रेमी व देशद्रोही यांच्यात होत चालली आहे. अर्थात असे म्ह्टले की आम्हाला कोणी देशप्रेम शिकवू नये, किंवा स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान कुठले; असेही प्रश्न विचारले जाणार. आता त्याची उत्तरे देण्याचीही गरज उरलेली नाही. कारण स्वातंत्र्यलढा कधीच संपलेला असून, मिळालेले स्वातंत्र्य व त्या स्वतंत्र भारताचा सार्वभौम भूभाग आज सुरक्षित राखण्याचा विषय आहे. तो धोक्यात आणत असेल, त्याच्याशी दोन हात करण्याला प्राधान्य आहे. मग असा भूभाग तेव्हाच्या स्वातंत्र्य सैनिकांचे वारस धोक्यात आणणार असतील, तर त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल. भारताला विसाव्या शतकात स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी लढा झाला. पण त्यापुर्वी भारताला ब्रिटीशांच्या गुलामीत जावे लागले. त्याला कोण जबाबदार होता? आधीच्या राजे नबाब यांनी शत्रूशी आपापली सत्ता व मालमत्ता टिकवण्यासाठी समझोते केल्यानेच पारतंत्र्य आलेले होते ना? तेव्हाही आधीच्या स्वातंत्र्याचे वारस पारतंत्र्याला कारण झालेले होते. म्हणून त्यांना झुगारून नवे नेतृत्व पुढे आणावे लागले होते. तात्कालीन राजे रजवाड्यांच्या वारसांना खालसा करूनच स्वातंत्र्य प्रस्थापित करावे लागले होते. म्हणूनच स्वातंत्र्यलढ्याच्या वारसांवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. विषय इतिहासाच्या दाखल्याचा नसून, आज स्वातंत्र्याला जे धोका बनले आहेत, त्यांच्यापासून देश वाचवण्याचा आहे. भारतातले तथाकथित पुरोगामी आज देशासाठी, सुरक्षेसाठी अधिकाधिक धोका बनत चालले आहेत. शत्रूलाही सामिल होण्यापर्यंत त्यांची घसरगुंडी होत चालली आहे. त्यांना पाकच्या हस्तकांनी जोडे मारले असतील, तर देशप्रेमीनीही जोडे मारले पाहिजेत. कारण तीच त्याची अपेक्षा असते. आता राजकारण त्या अर्थाने विभागले जात आहे, देशप्रेमी व देशद्रोही अशा विभागणीत आपण कुठे आहोत, याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.

6 comments:

 1. छानच सुंदर भाऊ या नालायक लोकांना काश्मीर मध्ये तडीपार केले पाहिजे मग कळेल

  ReplyDelete
 2. भाऊ एकदम सही.
  लातों के भुत बातों से नही मानते. काही दोन-चार चांगल्या माणसां आड लाखो देश विरोधी बेमालूमपणे आपली कार्य चालवतात व याच जोरावर आपला देश शतकानुशतके परकीय शक्तीनी सहज काबीज केला आहे व करत राहतील. (बघा राजीव गांधींच्या हत्ये नंतरची गेली पंचवीस वर्षे )
  आता सहज सामान्य माणसाला वाटते की मोदींना हे पाश्र्चात्य देश खरोखरच साथ देतील का? की केवळ बांगलादेश युद्धा प्रमाणे ज्या वेळी निर्णायक घाव घालायची वेळ येईल तेव्हा एक फोन वर (धमकी वर आठवा इंदिरा गांधी ना आलेला तथा कथित फोन व दोन्ही देश एका मेकाशी झुंजंण्यात सर्वस्व खर्च करत राहिलेत व युद्ध सामुग्रीचा बाजार जोरात व नागरिक बेजार ) परत मुळ स्थितीवर देशाला आणुन ठेवतील.
  तसेच अमेरिके सारख्या एवढ्या मोठ्या जागतिक शक्तीचे नाक कापणारा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडुन सुद्धा पाकिस्तान वर कारवाई न करता केवळ त्याला ठार करण्याच्या मर्दुमकीचा जयघोष जगभर झाला. व जणु मोदीं साठी पाकिस्तान वर कारवाइचे पुढिल काम अमेरिकने ठेवले. साप भी मरे और काठी भी ना टुटे और टुटे तो भारत की कमर टुटे.

  जो भी काठी हात में लेगा उसके उपर आपनेही पुरोगामी बरसेंगे और विदेशी ताकतें साप का साथ देगी मिडीया पुछेगा छप्पन इंच का सीना कहाँ गया.

  कमाल आहेबुवा आणि हे सर्व स्वप्न वत आहे व सामान्य माणसाच्या कल्पने पलीकडले आहे. ( मोदींची मुस्सदेगीरी नक्की असणार पण सामान्य माणूस हे खरच समजु शकत नाही).

  ReplyDelete
 3. भाऊ तुमची एका पाठोपाठ लेख लिहिण्याची क्षमता वादातीत आहे व आम्ही भाग्यवान आहोत.

  विचारणीय

  एक बार मेरे कमरे में 5-6 सांप घुस गए। मैं परेशान हो गया, उसकी वजह से मैं कश्मीरी हिंदुओं की तरह अपने ही घर से बेघर होकर बाहर निकल गया। इसी बीच बाकी लोग जमा हो गए। मैंने पुलिस और सेना को बुला लिया।

  अब मैं खुश था कि थोड़ी देर में सेना इनको मार देगी
  तभी कुछ पशु प्रेमी और मानवतावादी आ गये, बोले की नहीं आप गोली नहीं चला सकते, हम पेटा के तहत केस कर देंगे।

  सेना वाले उसको ढेला मारने लगे, सांप भी उधर से मुंह ऊँचा करके जहर फेंकने लगे।
  एक दो सांप ने तो एक दो सैनिक को काट भी लिया पर भागे नहीं।

  फिर इतने में कुछ पडोसी मुझे ही बोलने लगे,
  क्या भाई तुम भी बेचारे सांप पर पड़े हो, रहने दो , क्यों भगा रहे हो ?

  उधर प्रशासन ने खबर भिजवा दिया, सांप के मुंह में जहर नहीं होना चाहिए, उसके मुंह में दूध दे दो
  तो वो मुंह से जहर की जगह दूध फेंकेगा।

  ..... मैं हैरान परेशान...

  फालतू में बात का बतंगड़ हो चुका था। न्यूज़ भी चलने लगे थे।

  एनडीटीवी के रविश ने कह दिया कि सबको जहर नजर आता है सांप नजर नहीं आता, उसकी भी जिंदगी है।

  बरखा दत्त चीख़ कर कहने लगी की ये तो भटके हुए संपोले हुए हैं, मकान मालिक इनको बेवजह परेशान कर रहा है,
  मकान मालिक को चाहिए की वो इनको अपने घर में सुरक्षित स्थान पर इनको बिल बनाकर रहने दे और इनके खाने पिने का भरपूर ध्यान रखे।

  इसी बीच एक सैनिक ने पेलेट गन चला दिया और एक सांप ढेर हो गया,

  मुझे आशा जगी, सेना ही कुछ कर सकती है,

  तभी भाँड मीडिया ने कहा, पेलेट गन क्यों चलाया, सांप को कष्ट हो रहा है,

  अभी कोई कुछ सोचता उससे पहले ही हाइकोर्ट का भी फैसला जाने कहाँ से आ गया कि सांप पर पेलेट गन नहीं चला सकते इस गन से उसकी आँखे और चेहरा ख़राब हो सकता है।

  उधर आम आदमी पार्टी ने कह दिया कि वहाँ जनमत संग्रह हो कि उस घर में सांप रहेगा या आदमी।

  कुल मिलकर सांप को जीने का हक़ है इस पर सब एकमत हो गए थे।

  इतने में जो मेरा पडोसी मेरा घर कब्ज़ा करना चाहता था वो सांप के लिए दूध, छिपकली और मेढक लेकर आ गया, उसको खिलाने लगा,

  उसकी मदद बुद्धिजीवियों, मानवातावादियो और पत्रकारों ने कर दी और पडोसी को शाबाशी दी।

  मैं निराश होकर अब दूर से सिर्फ देखता था।

  काश

  मैंने खुद लाठी लेकर शुरू में ही इन सांपो को ठिकाने लगा दिया होता तो आज ये दिन ना देखना पड़ता।

  ReplyDelete
  Replies
  1. बहुत अच्छे 👍 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

   Delete
 4. मला वाटते काश्मिर प्रश्न हा मुस्लिम मानसिकतेचा प्रश्न आहे. बेकारी अथवा सहानुभुतीचा प्रश्न नाहि.बेकारी चा प्रश्न तर देशात आहे , आणि केवळ बेकारीच या सर्व आस्थिरतेस कारणीभूत असेल तर काश्मिरी लोकांचे प्रथम कर्तव्य हे आहे की त्यांनी घाटीत शांतता कशी नान्देल हे पाहावे कारण त्यामुळे पर्यटन वाढुन समृद्धी येइल. बाजुचे लडाख

  ReplyDelete
 5. व जम्मु हे मुस्लिम अल्पसख्य विभाग शांत आहेत . ज्या सैनिकांना आता हे 'निर्दोष' लो

  ReplyDelete