Friday, October 7, 2016

ऍलर्जिकल सापळा

JNU afzal के लिए चित्र परिणाम

गाववस्तीमध्ये बिबळ्याने उच्छाद मांडला किंवा घरात उंदीर धुडगुस घालू लागले, मग सापळा लावून त्यांना पकडले जाते. राजकारणही काहीसे असेच असते. प्रत्येक पक्ष वा संघटना आपल्या विरोधकांना कुठल्या ना कुठल्या सापळ्यात गुंतवून नामोहरम करायला बघत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा असाच एक राजकारणी आहे. त्याने मागल्या दिड दशकात अनेक बरेवाईट अनुभव घेतले आहेत. त्यामुळेच आपल्या विरोधकांना कसे सापळ्यात अडकवून नामोहरम करायचे, याचा पुस्तकी नव्हेतर व्यवहारी अनुभव त्याने गोळा केलेला आहे. सहाजिकच तोंडाने बडबड करण्यापेक्षा डावपेच खेळून आपल्या विरोधकांची कोंडी करण्यात हा माणूस आता वाकबगार झाला आहे. म्हणूनच अवघी दिल्ली व तिथला उच्चभ्रू अभिजन समाज विरोधात असताना, मोदींनी खंबीरपणे त्यांना नियंत्रणात ठेवले आहे. पण जेव्हा असे लोक अकारण फ़ार मस्ती करू लागतात, तेव्हा त्यांना मोठ्या सापळ्यात खेचण्याखेरीज गत्यंतर नसते. तसाच सापळा त्यांनी वर्षभरापुर्वी लावला होता. तो ज्यांच्यासाठी लावला त्यांना अजून त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मोठ्या पिंजर्‍यात जसे एकामागून एक उंदीर येऊन फ़सत जातात, तसा हा खेळ रंगला आहे. आताही पाक हद्दीत जाऊन भारतीय सेनेने कारवाई केल्यावर अनेक प्रश्न विचारले जाणार, हे मोदींना ठाऊक नसेल असे कोणी समजू नये. मोदींनी काहीही बोलावे आणि त्यांना खोटे पाडण्यासाठी स्पर्धा सुरू व्हावी, ही नवी गोष्ट नाही. मग अशा गंभीर बाबतीत फ़ेकू म्हणून आरोप होणार, हे मोदींनी गृहीत धरलेले नसेल काय? किंबहूना त्यासाठीच हद्दीपलिकडे जाऊन केलेल्या कारवाईची घोषणा झाली. पण पुरावे दिले गेले नाहीत. योग्यवेळी पुरावे दिले जातील, हा त्यातला सापळा होता. पण तो यावेळचा सापळा होता. त्यापेक्षा मोठा सापळा गेल्यावर्षीपासून लावलेला आहे. त्यात सगळे पुरोगामी कसे अलगद येऊन अडकत गेलेत, ही मनोरंजक कहाणी आहे.

आताही भारतीय लष्कराचे कारवाईप्रमुख लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी कारवाईची घोषणा केली. तिचे श्रेय अर्थातच मोदींना पंतप्रधान म्हणून मिळणार होते. परंतु त्यावर शंका घेतली गेली, तर शंका घेणारा सेनादलावर शंका घेतोय म्हणून बदनाम होणार हे नक्की होते. आणि झालेही तसेच. कारवाईचे श्रेय मोदींनी वा भाजपाने घेतले नाही. पण बाकीच्यांनीच ते श्रेय मोदींना दिले. मात्र त्यावर शंका घेतल्या गेल्या आणि कॉग्रेससह केजरीवाल यांनी पुरावे मागितले तेव्हा त्यांच्याच देशप्रेमाविषयी प्रश्न उपस्थित झाला. सगळ्या लोकांमध्ये उमटलेली संतप्त प्रतिक्रीया बघून केजरीवाल यांना माघार घ्यावी लागली आणि कॉग्रेसलाही आपल्या मुंबई विभाग अध्यक्ष संजय निरूपम यांच्या विधानाला अनौरस ठरवावे लागले. या लोकांनी मोदींना गोत्यात आणायचा खेळ केला होता. पण तेच गोत्यात आले. मोदींविषयी कुठली शंका घेतली गेली? अशा शंका घेणार्‍यांकडे आता देशद्रोही वा देशविरोधी म्हणून बघितले जात आहे. पण हे अकस्मात झालेले नाही. थोडे मागे जाऊन बघितले, तर या तथाकथित पुरोगामी विरोधक देशद्रोही असल्याचे जनमानसात ठसवण्याचा डाव तर खेळला गेलेला नाही ना अशी शंका येते. तो मोदी नाहीतर कोणी खेळलेला असू शकतो? नेहरू विद्यापीठात प्रतिवर्षी अफ़जल गुरू वा तत्सम लोकांच्या पुण्यतिथ्या साजर्‍या होत राहिल्या आहेत. त्याच्या बातम्या कुठे येत नव्हत्या. पण तो नेहमीचा तमाशा होता. मूठभर अभाविपवाले त्यावर आवाज उठवायचे आणि विषय संपत होता. गतवर्षी त्याच कार्यक्रमाचा गवगवा झाला आणि देशातल्या तमाम माध्यमांनी त्याचा गदारोळ करून टाकला. त्यातल्या कन्हैयाला अटक झाली व जामिनही मिळाला. पण त्याला वाचवायला तमाम सेक्युपर पुरोगामी धाव घेणार, हे उघड होते. झालेही तसेच! राहुल गांधींपासून केजरीवालपर्यंत सरळे गणंग तिथे जमा झाले आणि त्यांचे चेहरे लोकांसमोर प्रथमच आले.

फ़ार काय झाले? कन्हैयाला मोदी सरकारच्या कारवाईने पुरोगाम्यांचा हिरो करून टाकले. आता त्याला देशाच्या कानाकोपर्‍यातले पुरोगामी अगत्याने आमंत्रण देणार आणि भारतविरोधी घोषणांचे समर्थन करायला पुढे येणार; हे मोदींनाही कळत होते. झालेही तसेच. पण त्यावरील अखंड चर्चा, वाद, उहापोहाने पुरोगामी म्हणजे जिहादी, घातपाती व फ़ुटीरवाद्यांचे समर्थक; असे चित्र तयार होण्यास मोठा हातभार लागला. यातून मग क्रमाक्रमाने पुरोगामी म्हणजे भारताचे शत्रू वा देशविघातक कामाला मदत करणारे; असेच चित्र तयार व्हावे अशीच मोदींची खेळी होती. पण मोदींना ठोकायला संधी मिळते म्हणून त्यात एकामागून एक पुरोगामी उड्या घेत गेला. यातून प्रसिद्धी मिळते म्हटल्यावर पुरोगाम्यांचे भान सुटणार आणि एका कडेलोटावर ते पाकिस्तानचेही समर्थन करण्याची मजल मारणार; हाच मोदींचा आडाखा होता. वेगळे काय झाले? क्रमाक्रमाने घटना अशा घडत गेल्या, की तमाम पुरोगामी भारतविरोधी भूमिकेत गुरफ़टत गेले. काश्मिरात बुर्‍हान वाणी हा मुजाहिदीन मारला गेला. त्याचे समर्थन करण्याला हुर्रीयत पुढे आली आणि पाकिस्तानही सरसावला. त्यातून काश्मिरात फ़ुटीरवाद्यांनी दंगल माजवली. त्याच्या बंदोबस्तामध्ये शेकडो लोक जखमी झाले. मग त्याचेही समर्थन करायला पुरोगामी मंडळी पुढे जाणार होतीच. किंबहूना त्यांना उघडे पाडण्यासाठी़च काश्मिरात संसदीय शिष्टमंडळ पाठवण्याची कल्पना सरकारने उचलून धरली. त्यात हुर्रीयतवाले येणार नाही हे ठाऊक होते. झालेही तसेच आणि पुरोगामी लोक फ़ुटीरवाद्यांचे उंबरठे झिजवायला तिथपर्यंत जाऊन पोहोचले. एकूण काय पुरोगामी म्हणजे फ़ुटीरवादी, देशविरोधी अशी त्यांची प्रतिमा उभारण्याचा मोदींना डाव किंवा सापळा होता. पण पुरोगाम्यांनी त्यांना मनापासून साथ दिली. कॉग्रेस पक्ष काहीप्रसंगी बाजूला राहिला. कारण त्याला त्यातला धोका कळत होता.

पण आज एकूण काय स्थिती आहे? कन्हैयापासून सुरू झालेला घटनाक्रम आता पाकिस्तानच्या जिहादी हिंसेच्या समर्थनापर्यंत येऊन पोहोचला आहे. पाकिस्तान, जिहादी आणि पुरोगामी यांच्या भूमिकेत तसूभर फ़रक राहिलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघ किंवा भाजपाचे योगदान कोणते? असा सवाल विचारणारे आज स्वातंत्र्याच्या गळ्यावर सुरी ठेवणार्‍या जिहादी व पाकिस्तानच्या समर्थनाला जाऊन उभे राहिल्याचे चित्र तयार झाले आहे. ते आपोआप तयार झालेले नाही. क्रमाक्रमाने आपली वस्त्रे फ़ेडून त्यांना नागडे व्हायला मोदींच्या डावपेचांनी भाग पाडले आहे. कन्हैया त्याच सापळ्यातली शेळी किंवा खाऊ होता. ज्याला बघून तमाम पुरोगामी मोदींनी लावलेल्या सापळ्यात फ़सत गेले. तिथून ही घसरण सुरू झाली. मग फ़सलेला जुगारी जसा मोठमोठी बाजी लावून अधिकच गाळात गुरफ़टत जातो, तसे पुरोगामी या सापळ्यात ओढले जात राहिले. आताही त्यांनी मोदींकडे हद्दीपलिकडल्या लष्करी कारवाईचे पुरावे मागून पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळला. ते सापळ्यात अधिकच फ़सले आहेत. अशा उतावळेपणाने आपण देशद्रोही वा देशविरोधी ठरण्याचा धोकाही ओळखण्याचे भान त्यापैकी कुणाला उरले नाही. जनता भोळी असते, भावनाप्रधान असते. तिच्यापुढे युक्तीवाद काम करत नाही. तिला भावना प्रभावित करतात. पाकच्या सुरात बोलणारा देशाचा शत्रू; इतकेच जनतेला उमजत असते. आज पुरोगाम्यांची काय प्रतिमा जनतेसमोर उभी राहिली आहे? पुरोगामी म्हणजे मोदीविरोधात पाकिस्तान वा जिहादी घातपात्यांशी हातमिळवणी करणारा; हेच चित्र तयार झाले आहे ना? यांच्यापासून देश वाचवायचा तर मोदींना पर्याय नाही, अशीच त्यावरची प्रतिक्रीया नसेल काय? म्हणून त्याला सापळा म्हणायचे. कारण डाव मोदी खेळले आहेत. पण आपल्या पायांनी चालत ही पुरोगामी मंडळी त्यात येऊन फ़सली आहेत.

7 comments:

  1. भाऊ,या हलकट लोकांना असच बाद केले पाहिजे यांच्यामुळे देश तर डबघाईला आलाच आहे पण खांग्रेस व यांच्या काळात पैश्याकरता यांनी पाकड्यांच्या बोटावर देशाला नाचवलय ते गजरेवाले व आपण नाचणारी बाई बनलो होतो आता खोट बोलतायत की ४ वेळा surgical strike केलाहोता म्हणे आणि मिलेट्रीवाले म्हणतायत कीहे खोटे बोलतायत आता बोला ? विश्वास कोणावर ठेवणार ? सेनेवरचना ? सेनेचा अभिमान वाटतो भाऊ यांनी इतका अत्याचार करुनही सेना ईमानदार व शांत आहे हेच इतर देशांची सेना असती तर स्वातंत्र्या नंतर २० वर्षांत या नालायकांना गोळ्यांचे धनी व्हायला लागले असते

    ReplyDelete
  2. सगळे पुरोगामी न परत येण्यायेवढे पुढे गेलेत.
    आता पुढे काय होणार (next episode)या गूढ चिंतेने मोदीजींची झोप उडाली असणार हे नक्की. हा हा हा हा।
    सर्व आत्मकेंद्रित, आत्मघाती पुरोगाम्यांना शुभेच्छा.
    इकडे तिकडे न बघता असेच पुढे पुढे चालत रहा.
    भाऊंसारखे लोक काहीही लिहितात. त्यांना गांभीर्याने घेण्याची आपली प्रथा नाही.
    विधायक कामापेक्षा मोदी व संघ विरोध महत्वाचा हे विसरू नका.

    ReplyDelete
  3. भाऊ,

    पुरोगामीला पर्यायी शब्द शोधा हो.

    आता पुरोगामी हा अपशद्ब वाटतो.

    ReplyDelete
  4. जंगलात रानडुक्कर माजलंच होतं. सिंहाने काही दिवस सहन केलं मग घातली झडप, केला खातमा आणि सहज एक डरकाळी फोडली......
    तर,

    कोल्हा म्हणाला.. पुरावा काय
    लांडगा म्हणाला... सिंह खोटं बोलतोय
    गाढव म्हणालं... भांडवल करतोय
    कहर म्हणजे उंदीर म्हणाला,
    माझ्या लग्नापूर्वी मीही सिंह होतो😳 आणि मी तर तेव्हा चार रानडुकरं मारली होती पण जंगलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी नाही ब्वा डरकाळी फोडली.

    ReplyDelete
  5. मोदीमुळे देशाचा एक फार मोठा फायदा झाला. पुरोगाम्याचे खरे चेहरे उघडे पडले , नाहितर jnu मधे असे देशविघातक कार्यक्रम चालतात हे देशाला कधीच कळाले नसते . पुरस्कार वापस लेखक , तथाकथित बुद्धी जीवी हे मोदी, bjp,rss व हिंदू विचारसरणीचा विरोध करण्यासाठी देशही बुडवू शकतात. हेच लोक rss वर आरोप करतात कि हि संघटना द्वेषाचे राजकारण करते परंतु वस्तू स्थिती अशी आहे कि एखादी संघटना , विचार सरणीचा द्वेष पुरोगाम्याएवढा दुसरा कुणी केला नसेल. या सर्वांचे खरे चेहरे आज मोदीमुळे उघडे पडले.

    ReplyDelete
  6. Ho agadi barobar aahe deshdrohi mhanjech purogami asa khara arth lokanna kalala aahe.

    ReplyDelete
  7. विनाश काले विपरीत बुद्धी याचे हे उत्तम उदाहरण.

    ReplyDelete