अडला अश्वमेध आहे, थोडासा मतभेद आहे
पारदर्शी जाहिरनाम्यात तसा परिच्छेद आहे
प्रचारातल्या शिमग्यासाठी दोघांनाही खेद आहे
राष्ट्रवादी गाभार्यातही हिंदूत्वाचा वेद आहे
=========================
सुजल्या गळूला लावले पोटिस, सरकारलाही दिली नोटिस
नैसर्गिक मित्रांची कुंडली, गुणांचाही आकडा छत्तीस
वाघाचाही जबडा उघडून, दात मोजले पुरे बत्तीस
वाघ सुद्धा कागदाचा त्याने चावून खाल्ली नोटिस
============================
किरीटलेला सुरसोमय्या गाई तराणा ठणाणा
दोर कापूनी शेलारमामा, लढवी किल्ला कोंडाणा
महापौराचे नाव घेता विसरून गेले उखाणा
दोघांनाही आता कळेना, कशास केला धिंगाणा
============================
पुण्यानजिक पिंपरीजवळ, चिंचेचाही वड आहे
लोक म्हणती अजिंक्य असा, अजित नावाचा गड आहे
काका म्हणती नाकापेक्षा, मोती जरा जड आहे
ग्रामीण जिल्हा धडधाकट आणि शहरात पड-झड आहे
===========================
जीवाला लागला घोर घोर, हवाच आहे महापौर
बाजारबसव्या सगळ्या जमून, साजरी होते मंगळागौर
निष्ठावान दलबदलूंच्या गर्दीत मिरवी बंडखोर
पदापदांच्या साठमारीत विवेकबुद्धी हरामखोर
भाऊ!
ReplyDeleteफारच "वात्रट" आहात.
गळू. . . . पोटिस . . नोटिस. . वाचलाना मला भलताच कवि "आठवला".
झकास.